🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, जानेवारी ११, २०२२

नायगाव गटशिक्षणाधिकारी पदी विराजमान अशोक पवळे एक उपक्रमशील शिक्षक-डि.टी जाधव सर

 


 नायगाव,दि ११ जानेवारी : एक स्वच्छ प्रतिमा असलेले व्यक्तिमत्व, निस्वार्थी, निगर्वी, निधर्मी, निष्कलंक, निपुण, निर्णयक्षम, असलेले अनेक मोठ मोठ्या पदावर काम केली. परंतु कोणालाही मी उच्चपदस्थ आहे असे वाटू न देता सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे अन्याय व भ्रष्टाचार या विरुद्ध आवाज उठवणारे क्रियाशील पवळे सर ज्या पदावर काम करतात त्या पदाला न्याय देण्याचे काम आज पर्यंत त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत केले आहे. गटशिक्षणाधिकारी हे पद काटेरी मुकुट असून या पदावर काम करत असताना हे पद जिकीरीचे आहे सगळीकडे बजबजपुरी ने उच्छाद मांडला आहे. यावर मात करून यशस्वी वाटचाल करण्याची जबाबदारी सरांनी स्वीकारली आहे. पवळे सरांनी 28 नोव्हेंबर 1985 रोजी ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात मंगनाळी तालुका कंधार येथून पदार्पण केले आहे. शाळा हेच मंदिर विद्यार्थी हे माझी देवता येईल आकार या चिमुकल्या मनाला, अध्यापनात जीव ही ओतावा असा दृष्टिकोन ठेवून मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी अनेक उपक्रम सरांनी सेवा कालावधीत राबविले यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन यांना सन 2009- 10 ला जिल्हास्तरीय गुरू गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यांनी 27 जुलै 2015 ला गडगा केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला या काळात त्यांनी केंद्रामध्ये अनेक उपक्रम राबवून गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले सरांनी विविध राष्ट्रीय कार्यक्रमात साक्षरता अभियान पल्स पोलिओ वृक्षारोपण कुटुंबकल्याण जनगणना व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यामध्ये काम केले. तालुकास्तरीय स्वच्छता दूत म्हणून काम करून अनेक गावे निर्मलग्राम करण्यासाठी उल्लेखनीय अशी कामगिरी बजावली आहे. सरांकडे उत्तम संघटन कुशलता असून कमी वयातच भास्कर पतपेढीचे चेअरमन पद भूषविण्याचा मान मिळाला. सध्या ते सहकारी पतपेढी नांदेड चे पाच वर्षे संचालक म्हणून चांगले काम केले आहे. आता याच पतसंस्थेचे चेअरमन म्हणून धुरा सांभाळत आहेत. 8 ऑगस्ट 2019 ला शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाली या काळात चांगले काम केले या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद नांदेड ने पंचायत समिती नायगांव च्या गटशिक्षणाधिकारी पदाची धुरा सोपवली पुढील कालावधीत पंचायत समितीला वैभव प्राप्त करून देण्यासाठी ते सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होतील यात तिळमात्र शंका नाही यासोबतच शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे गुरूगौरव पुरस्कार, दुय्यम सेवा पुस्तिका या सर्व प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्यांच्या काळात नक्कीच प्रयत्न करतील एवढी माफक अपेक्षा व्यक्त करून पंचायत समिती नायगावच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार मिळाल्याबद्दल सर्व संघटना व शिक्षक बांधवांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा

जाधव डी टी स शि मरवाळी, तालुकाध्यक्ष शिक्षक परिषद नायगांव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट