🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, जानेवारी ११, २०२२

नियुक्ती : नायगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचे सूत्र ए.जी. पवळे यांनी स्वीकारले

 


नायगाव,दि ११ जानेवारी २०२१ : नायगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी पदाचा पदभार शिक्षण विस्तार अधिकारी ए.जी.पवळे यांच्या कडे सुदपूर्द करण्यात आला आसून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

पूर्वीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमती लता कोठेकर, शि.वि.अ.नायगाव यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नायगांव ता. नायगांव या पदाचा अतिरिक्त पदभार होता.तो कमी करून संवितरणासह श्रीमती लता कौठेकर यांच्याकडे असलेला गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नायगांव या पदाचा पदभार कमी करून पवळे अशोक गंगाधर शि.वि.अ. यांच्याकडे अहरण व संवितरणासह सोपविण्यात आला आहे.


दि.१० जानेवारी रोजी पवळे यांनी पदभार स्वीकारला असून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे---‌कलावंत ,मृदंगाचे बोल जाणणारे, पेटीवादक, गाणे ,भजन ,गवळणी, पद यांचा अभ्यास असणारे आणि विद्यार्थ्यांप्रती प्रचंड तळमळ,कळवळा असणारे एकमेव शिक्षक अशोक पवळे सरांचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आजही गावा गावांमध्ये आणि परिसरामध्ये आदराने घेतले जाते. 
अनेक गावचे लाडके गुरुजी म्हणून आजही पवळे सरांना नागरिक ओळखातात. साक्षरता अभियान जोरात चालू होतं,तेंव्हा गावागावातून पवळे गुरुजी रात्री-अपरात्री कलापथक घेऊन फिरायचे.. त्याकाळी गावात राहणारा एकमेव शिक्षक म्हणून सरांकडे लोक कुतुहलाने पहायचे.. परिसरात हरिनाम सप्ताह, शिवनाम सप्ताह ,लक्ष्मण शक्ती, प्रवचन , कीर्तन ,भारुड, दिंडी , श्रावण महिन्यात लावलेली पोथी सर आवर्जून हजर राहायचे! पवळे सर म्हणजे एक नितीमूल्यांचा संस्कारदूतच ! आज त्याच्या अंगी असलेल्या नीतिमूल्यांचा विजय होऊन ते एक तालुक्याच्या महत्त्वाच्या गटशिक्षणाधिकारी या पदावर विराजमान झाले आहेत .त्यांच्या कार्यातील अनुभवाचा नकीच फायदा होणार आहे.

पवळे यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे व पत्रकार रामकृष्ण मोरे यांनी स्वागत केले आहे या वेळी नरसी केंद्राचे मु.अ.कपिलेश्वर नलबलवार ,बारहाळे सर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट