🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, एप्रिल ०८, २०२१

कामठा खु. उपकेंद्राअंतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला प्रतिसाद

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य ; आरोग्य कर्मचाऱ्यांचा ब्राम्हणवाडा येथे सत्कार

नांदेड ,दि 7 एप्रिल : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वडगांव अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कामठा (खु.) येथिल आरोग्य अधिकारी व कर्मचारी कोरोना काळात उत्कृष्टपणे काम करित असून आज त्यांच्या कार्यक्षेञातील मौजे ब्राम्हणवाडा येथील नागरिकांनी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कोरोना प्रतिबंधक लसीकरणादरम्यान त्यांचा सत्कार करुन त्यांच्या कार्यास प्रेरणा दिली.

   प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.विजय कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कामठा (खु.) अंतर्गत कोरोना प्रतिबंधात्मक जागृती व लसीकरण स्थानिक अधिकारी व कर्मचारी कर्तव्यतत्परतेने करित आहेत.उपकेंद्रात तसेच, कार्यक्षेञातील गांवात जाऊनही हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 लसीकरणाच्या सुरुवातीस आज जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ब्राम्हणवाडा येथील स्थानिक सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांकडून या कोरोना योद्धे असलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपकेंद्राच्या सिएचओ डाॅ.फराह तन्वीर,आरोग्य पर्यवेक्षक टि.एल. डोईबळे, कंञाटी ए.एन.एम.श्रीमती एस. यु. शेगावकर आदींसह उपस्थित आरोग्य अधिकारी,कर्मचारी, आशा स्वयंसेविका,अंगणवाडी कर्मचारी आदींचा सत्कार ब्राम्हणवाडावासीयांकडून करण्यात आला.

याप्रसंगी उपसरपंच एकनाथ ब्राम्हणवाडेकर व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी कामठा उपकेंद्रांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी,आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी यांचेकडून सद्या कोरोना काळात यशस्वीपणे व कर्तव्यतत्परतेने होत असलेल्या कामाचे कौतुक केले.

   कामठा (खु.) आरोग्य उपकेंद्र अंतर्गतच्या ब्राम्हणवाडासह सर्वच गांवातील नागरिकांकडून शासन निर्देश व आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घेणे आणि मास्क- सॅनिटायझर, सामाजिक अंतर या ञिसूञी पालनाचे आवाहन उपस्थित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट