माजरम : तालुक्यातील विज वितरण कंपनीच्या मांजरम येथील ३३ केव्ही अंतर्गत येणाऱ्या गावात गेल्या काही दिवसांपासून विजेचा अगदी खेळखंडोबा सुरू आहे.एका तासात किमान दहा वेळा विज पुरवठा खंडित होतो आहेच.या प्रकाराने अंधाऱ्या रात्री व उन्हातान्हात शेतकऱ्यांना पिकाला पाणी देणे अत्यंत अवघड झाले आहे.याकडे एम एस इ बी च्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकरी व ग्राहकांनी केली आहे.
नायगाव तालुक्यातील मांजरम येथे विज वितरण कंपनीचे ३३केव्ही केंद्र आहे.केंद्राच्या अंतर्गत अठरा गावे येतात.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.लाॅकडाऊन मुळे अनेकजण घरातच आहेत परंतु शेतकरी मात्र या उन्हातान्हात आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात राबत आहे.पंरतु गेल्या काही दिवसांपासून मांजरम एम एस इ बी कार्यालयात म्हणावे तसे नियोजन नसल्याने येथील वीज केव्हा ही गुल होते व लगेच येते. विजेचा सारखा लपंडाव सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देणे अत्यंत अवघड झाले आहे.एका तासात किमान पाच-दहा वेळा विज जाते-येते या प्रकारामुळे विजेची उपकरणे जळून जात आहेत.
मार्च महीन्यात मार्च एण्डींग च्यानावाखाली वितरण कंपनीने घरगुती विज बिलाची वसुली कडकपणे केली मात्र लाॅकडाऊनमध्ये विजपुरवठा खंडित करण्याची समस्या निर्माण झाली आहे.विजेचा वापर जास्त वाढल्याने समस्या निर्माण झाली आहे असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.एका बाजूने सरकार लॉक डाऊन मध्ये सरकारने वीज बिल दिलेल्या वंचना प्रमाणे वीज बिल माफ करणे लांब च राहिले उलट वीज पुरवठा सुरळीत न देणे जोमाने चालू आहे.या मुळे येथील नागरिकांना एकच गाणे म्हणण्याची वेळ आली आहे.
ति येतें आणिक जाते
येताना प्रकाश आणते
जाताना अंधकार करिते
असे म्हणण्याची वेळ मांजरंम विभागातील प्रत्येकनागरिका वर आली आहे. अनेक जण लोकडाऊन मध्ये विजेच्या उपकरणाच्या वर आवलंबुन आहेत या मुळे वापर जास्त, वीज जाण्याचं प्रमाण ही जास्त अशी अवस्था झाली आहे. वैतागलेल्या शेतकरी पुत्रा कडून राग अनावर होत असून शेतकर्या च्या वतीने रुमने हातात घेऊन आंदोलन करण्याची भाषा सोशियल मीडिया च्या माध्यमातून भावणाचा उद्रेक व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा