🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

रविवार, मार्च ०७, २०२१

डेअरी मॅनेजरने दुध सेंटरच्या तक्रारी बाबत मागितली १५ हजाराची लाच व दारुचा खंबा

 


मुंबई विभाग

दि./०३/२०२१

प्रेसनोट

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : मुंबई विभाग
  2. गुन्हा नोंद क्रमांक - ११/२०२१
  3. कलम - कलम ७ भ्र.प्र. अधिनियम १९८८
  4. आरोपीताचे नाव व कार्यालय - बापु तानाजी चोरगे, वय ५४ वर्ष धंदा-नोकरी, कनिष्ठ लिपीक,गोरेगांव, मुंबई
  5. मागणी केलेली लाचेची रक्कम - रु.१५,०००/- दारूचा खंबा
  6. तडजोडी अंत स्विकारलेली लाचेची रक्कम - रु.१५,०००/-
  7. स्विकारलेली लाचेची रक्कम - १५,०००/-

थोडक्यात माहिती - 

                            यातील फिर्यादी हे गवई आय आय टी गेट समोर आरे दुध सेंटर चालवितात. दि.०१/११/२०२० रोजी फिर्यादी हे नामीप्रमाणे दुध सेंटर वर असंताना डेअरी अधिकारी श्री. बोरसे व त्यांचेसोबत आणखी एक इसम असे दोघेजण त्यांचे दुध सेंटरवर आले व त्यांनी फिर्यादी यांना " दुध सेटर मधील फ्रिज बंद आहे व दुध सेंटरच्या बाबतीत तक्रारी आहेत" असे सांगुन दुध सेंटरच्या बाहेर फिर्यादी यांना काढून त्यांचे दुध सेंटर सीलबंद केले व निघुन गेले.

दि.०२/११/२०२० रोजी फिर्यादी हे आरे सेंटर गोरेगाव येथील कार्यालयातील डेअरी अधिकारी श्री बोरसे यांना भेटले असता त्यांनी डेअरी मैनेजर श्री जी.एन. राऊत व श्री बापू चोरगे यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी हे श्री.राऊत व श्री चोरगे यांना भेटले. त्यावेळी फिर्यादी यांना लोकसेवक यांनी आज-उद्या असे करत त्यांचे दुध सेंटर उघडून दिले नाही

फेबुवारो २०२१ मध्ये फिर्यादी हे लोकसेवक श्री बापू चोरगे यांना भेटले असता, त्यानी फिर्यादी यांचेकडे रु.१०,०००/- लाचेची मागणी कोली व त्यानंतर दुध सेंटर उघडून देतो असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी लोकसेवक चोरगे याना रू १०.०००/- दिले. परंतु पैसे देवुनही लोकसेवक यांनी फिर्यादी याचे दुध सेंटर त्यांना उघडू दिले नाही. त्यामुळे फिर्यादी हे दि.०२/०३/२०२१ रोजी लोकसेवक बापू चोरगे यांना सेंट्रल डेअरी, आरे येथे जावून भेटले असता, श्री बोरगे यांनी फिर्यादी यांना : १५,०००/- व एक दारूचा खंबा घेवून दि.०५/०३/२०२१ रोजी भेटण्यास या असे सांगितले. परलू फिर्यादी यांची लोकसेवकास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी, मुंबई येथे दि.०३/०५/२०२१ रोजी लेखी तक्रर अर्ज दिला होता.

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दिनांक ०५.०३.२०२१ रोजीच्या पडताळणी दरम्यान लोकसेवक यांनी रु. १५,०००/- व दारूचा खंबा अशी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे रचण्यात आलेल्या सापळा कारवाईच्या वेळी लोकसेवक बापु तानाजी चोरगे यांना फिर्यादी यांचेकडुन रू१५.०००/- लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. आलोसे यांनी लाचेची रक्कम स्थिकारल्याने त्यांचेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लागलुगपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागाशी संपर्क साधावा.

संपर्क : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग, ९१, सरपोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई ३०.

टोलफ्री क्र.१०६४, दूरध्वनी क्र. ०२२-२४९२१२१.२, फेक्स क्र. ०२२-२४९२२६१८, वेबसाईट-acbmaharashtra.gov.in, ईमेल -acbwebmail@mahapolice.gov.in,

ईमेल- addlepacbr ii@mahapolice.gov.in, फेसबुक - www.facebook.com - Maharashtra ACB.

मोबाईलप- www.acbmaharashtra.net

व्हॉट्सॲपक्रमांक-१९३०९९७७००


(वैशाली गोरडे) सहा पोलीस आयुक्त, ला.प्र.वि.,मुंबई विभाग, मुंबई.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट