नरसी (७ मार्च) :- नायगांव तालुक्यातील नरसी येथे क्रांतीकारी महामानव जगतगुरु गुरु रविदास महाराज यांच्या सार्वजनिक जयंती सोहळ्याचे आयोजन केलेआहे . तरी परीसरातील तमाम बहुजन बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन जयंती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांनी केले आहे .
दिनांक ०७ मार्च २०२१ रविवार रोजी सकाळी १०-३० वाजता नरसीच्या शामनगर मधील ज्योती प्राथमिक शाळा मैदानावर हा जयंती सोहळा आयोजित केला आसून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर , मास्क , सैनिटायजर चा वापर केला जाईल. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ साहीत्यीक भगवानराव पाटील भिलवंडे हे असतील तर उद्घाटक म्हणून श्रावण पाटील भिलवंडे व प्रमुख वक्ते म्हणून इंजि. चंद्रप्रकाश देगलुरकर यांची उपस्थीती राहणार आहे . तसेच प्रमुखअतिथी म्हणून जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे ,गुरु रविदास समता परीषदेचे नामदेव फुलपगार , प्रकाशभाऊ कामळजकर , राचमचे माधवराव गायकवाड , संभाजी पा.भिलवंडे , प्रकाशदादा भिलवंडे , रविंद्र पा.भिलवंडे , भास्कर पा.भिलवंडे , मारोती पा.भिलवंडे , सपोनि महादेव पुरी , सरपंच पप्पू भिलवंडे , पो.पा. इब्राहीम बेग पटेल , तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर वडगावे आदी मान्यवरांच्या उपस्थीतीत हा जयंती सोहळा पार पडणार आहे .
तरी परीसरातील बहुजन समाज बांधवांनी या जयंती सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जयंती मंडळाचे अध्यक्ष तथा पत्रकार गंगाधर गंगासागरे , सचिव हाणमंत गंगासागरे , उपाध्यक्ष माधव गंगासागरे , भारत गंगासागरे , भास्कर गंगासागरे , दत्ता गंगासागरे , अणिल गंगासागरे , सुनिल गंगासागरे , संतोष कांबळे , व्यंकट गंगासागरे , ज्ञानेश्वर गंगासागरे , बाबू गंगासागरे , आनंदा बरबडे , बालाजी बरबडे , जमनाजी कांबळे , धोंडीबा कांबळे , सल्लागार दिगांबर गंगासागरे , गंगाराम गंगासागरे , चंद्रकलाबाई गंगासागरे , शशिकलाबाई कांबळे आदींनी केले आहे .
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर
open this link in a new window

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा