नायगाव : विद्यार्थिनी सोबत अश्लिल वाटसप चॅटिंग , वर्गात जवळीक साधने व बस मध्ये मुलीसोबत छेडछाड करण्याच्या प्रकरणावरून नायगाव तालुक्यातील एका शाळेच्या शिक्षकांला कुंटुर पोलिसांनी ताब्यात घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केले आहे.या प्रकारावरून नायगाव तालुक्यात खळबळ उडाली असून ऑनलाइन शिक्षणात अश्लीलतेचा हा चाभरा प्रकार घडल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे.
नायगाव तालुक्यातील देगाव येथील पूज्य साने गुरुजी च्या नावाने चालणाऱ्या विद्यालयतील शिक्षक यांनी आपल्याच शाळेतील विद्यार्थिनी सोबत वाटसप वर परीक्षेत गुण वाढवून देतो या नावाखाली अश्लील विषयाची मागणी व वाटसप चॅटिंग टाकल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केल्याचा प्रकार मंगळवार दिनांक 2 मार्च रोजी घडला. तर त्याच शाळेत शिकून इतरत्र शिक्षण घेणाऱ्या दुसऱ्या एका मुली सोबत याच शिक्षकाने बस मध्ये अश्लील छेडछाड केल्याची याच तक्रारीत नोंद केल्याने सदर शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबद सविस्तर वृत्त असे की, नायगाव तालुक्यातील देगाव येथील शिक्षक बापूराव श्रीपतराव मोरे रा देगाव वय 48 यांनी आपल्याच शाळेतील इयता नववी मध्ये शिकणाऱ्या मुलीस वाटसप वर मार्क जास्त टाकतो म्हणून काही विषयाची मागणी केली व ऑफलाईन शाळेत जवळीकता साधली असा आरोप तक्रारीत करण्यात आला असून त्या मुलीच्या बहिणीला ही बस मध्ये छेडले असा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणात कुंटुर पोलिसात 354 ड 12 , 65,अनुसुचित जाती कलम 3 (1),(w),(1)..3(1) (w) !! प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे कुंटुर सपोनि पठाण साहेब यांनी सांगितले आहे.पुढील तपास पोलोस उपअधीक्षक बिलोली हे करीत आहेत.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा