🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, फेब्रुवारी १०, २०२१

सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण-२०२० राबविण्याबाबत-महाराष्ट्र शासनाचा जि आर


महाराष्ट्र शासन,

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,

शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.२३४/एस.डी.- ४.

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक १० फेब्रुवारी, २०२१.


वाचा :- १) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग,शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०१९/पर.क्र.४२/एस.डी. -४, दिनांक- ०६ जून, २०१९ २) भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे दि. ८ जानेवारी,२०२१ चे पत्र क्र. File No. १३ ३६/ २०१९-18-११ अन्वये नविन मार्गदर्शक सूचना.


परिपत्रक :-

सध्या जगभरात तंबाखू वापरामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. तंबाखू हा कॅन्सर,मधुमेह,हृदयरोग यांसारख्या आजारासाठी प्रमुख कारणीभूत घटक आहे. भारतामध्ये तंबाखू मुळे दरवर्षी १३ लाख लोक मृत्यूमुखी पडतात व आजस्थितीला २७ कोटी लोक तंबाखूच्या विळख्यात सापडले आहेत. ग्लोबल युथ सर्वे-२००९ नुसार भारतामध्ये १३ ते १५ वयोगटातील १४.६ टक्के विद्यार्थी तंबाखू सेवनाच्या आहारी गेलेले आहेत. शासनाने तंबाखू नियंत्रणासाठी वेळोवेळी विविध उपयोजना करून काही प्रमाणात तंबाखूचा प्रचार, प्रसार व वापरास आळा घातला आहे. आपल्या देशातील विद्यार्थ्यांना तंबाखूच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना तंबाखूमुक्त वातावरण मिळावे यासाठी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था धोरण-२०२० अंतर्गत नविन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

वरील संदर्भ क्र.१ येथील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र.४२/एस.डी.-४, दिनांक- ०६ जून, २०१९ अन्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या तुलनेत भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे दि. ८ जानेवारी, २०२१ च्या पत्रान्वये निर्गमित केलेल्या नविन मार्गदर्शक सूचना अधिक सर्वसमावेशक असल्याचे दिसून येते, त्यामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक ०६ जून,२०१९ रोजीचे परिपत्रक अधिक्रमित करण्यात येत असून केंद्र शासनाच्या खालील मार्गदर्शक सूचनांची सर्व शाळांनी अंमलबजावणी करावी.

मार्गदर्शक सूचना :-

१. तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थांचा फलक शैक्षणिक संस्थेच्या आवारात व तंबाखुमुक्त क्षेत्राचा (४५ cm ६० cm) फलक शैक्षणिक संस्थेच्या बाहेर लावावा. हे फलक शाळेच्या प्रमुख ठिकाणी शिक्षणाच्या व स्थानिक भाषेत लावलेली असावीत. या फलकांवर शैक्षणिक संस्थेने अधिकृत केलेल्या व्यक्तीचे (शैक्षणिक संस्था प्रमुख) नाव,पदनाम व संपर्क क्रमांक दिलेला असावा.

२. शैक्षणिक संस्थेने आपल्या कर्मचारी व विद्यार्थ्यामधून तंबाखू निरीक्षक (TOBACCO MONITER) नियुक्त करावेत, आरोग्य व फिटनेस दुतांनाही तंबाखू मॉनिटर म्हणून नियुक्त केले जावे व फलकावर तंबाखू मॉनिटर्सची नावे, पदनाम व संपर्क क्रमांक नमूद करावा.

३. तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारी कोणतेही दुकान शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात नसावे, शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ वापराचा कोणताही पुरावा असू नये व शैक्षणिक संस्थेच्या बाहय भिंतीपासून १०० यार्ड क्षेत्र रेखाकिंत केले गेले असावे. या नियमांचा भग झाल्यास राष्ट्रीय क्वीट लाइन (Quit line) या हेल्पलाईन वर तक्रार करावी व यासंदर्भात दंड लादण्याचा अधिकार त्या शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांना असेल. अशा पदार्थाची विक्री थांबिवण्यासाठी व्यवस्थापन समितीने स्थानिक प्रशासन व पालकांच्या सहाय्याने प्रयत्न करावेत

४. तंबाखूचा वापर शाळेच्या परीसरात केला जाणार नाही या नियमाचा समावेश संस्थेने आपल्या संहितेमध्ये करावे.

५. सर्व शैक्षणिक संस्था या सार्वजनिक ठिकाणी असतात त्यामुळे अशा ठिकाणी धुम्रपान करणे हा तंबाखू नियत्रंण कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा आहे. COTPA २००३(Cigarettes and other tobacco products Act) मधील कलम ४ चे उल्लंघन केल्यास शैक्षणिक संस्थेचे प्रमुख (मुख्याध्यापक/प्राचार्य/प्राधिकृत शिक्षक) यांना दंड लादण्याचा अधिकार असेल.

६. शैक्षणिक संस्थानी तंबाखू वापर करणार्या व व्यसनाधीन व्यक्तीना तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी उत्तेजन दयावे व Quitline Services and mCessation Services याबाबत माहिती दयावी.

७. तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्थानी कोणत्याही तंबाखूचे उत्पादन,प्रचार व व्यापार करणाऱ्या कंपनीने प्राधिकृत केलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊ नये अथवा शिष्यवृत्ती स्विकारू नये.

८. तंबाखू नियंत्रकांनी इ-सिगारेट यासारख्या साधनानप्रति जागरूक राहावे.

९. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने सोबतच्या विवरणपत्रात जोडलेल्या ९ निकषांच्या आधारे स्वमुल्यांकन करून सहामाही आढावा घ्यावा.ज्या शाळेला १०० पैकी ९० गुण मिळतील ती शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त म्हणून जाहिर करावी, पुढे ही संस्था तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था पुरस्कार योजनेमध्ये सहभगी होऊ शकते हा पुरस्कार ९ निकषांच्या आधारे मिळवलेल्या गुणांकानुसार जाहिर केला जाईल, तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था पुरस्कार योजनेविषयी संपुर्ण माहिती आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाद्वारे जाहिर केली जाईल.

१०. तंबाखू नियंत्रण उपक्रम तंबाखूच्या दुष्परीणामा विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पोस्टर्स, घोषणा, निबंध, प्रश्न मंजूषा, यासारख्या स्पर्धांचे आयोजन करावे. शैक्षणिक संस्थेने विद्यार्थी व शिक्षकांना तंबाखू नियत्रंण उपक्रम सुरू करण्यास प्रोत्साहीत करावे व अशा उपक्रमांचे कौतूक करावे. शैक्षणिक संस्थांनी कायदा अंमलबजावणी अधिसत्ता व आरोग्य संस्थाना आमंत्रीत करून तंबाखू नियंत्रणा विषयी माहिती दयावी यासंबंधी विविध सभा व चर्चा सत्राचे आयोजन करावे.

११. या मार्गदर्शक सुचनांच्या नियमित देखरेखीसाठी राज्य तंबाखू नियंत्रण कक्ष जबाबदार असेल व जी संस्था तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था म्हणून किमान बेंचमार्क यशस्वीपणे पूर्ण करेल त्या संस्थेस तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था प्रमाणपत्र देण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियत्रंण कक्ष यंत्रणा पुरवेल.

१२. या सुचनांच्या अंमलबजावणी मध्ये नागरी संस्था, राज्य/जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष यांचा सहभाग महत्वाचा आहे, त्यांच्या सहकार्याने तांत्रिक यंत्राना व विविध नाविन्यपुर्ण उपक्रमांच्या माध्यमाने तंबाखू नियंत्रणाविषयी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी अधिक सक्षमपणे होऊ शकते.


राज्य/जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष (कर्तव्य व जबाबदारी)

राज्य / जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष हे शिक्षण (शालेय शिक्षण/उच्च शिक्षण/व्यावसायिक शिक्षण) विभागाच्या मदतीने शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक कॅलेंडर मध्ये तंबाखू नियंत्रण उपक्रमांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करतील, व सदर सूचनांचे पालन त्या राज्य शिक्षण बोर्डाशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांनी करावे.

जिल्हा व स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना सदर मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी व देखरेख संबंधी कार्यवाही करण्यासाठी सबळ यंत्रणा उभारण्यासाठी प्रोत्साहित करावे.

या मार्गदर्शक सूचनांचा प्रसार सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये करण्यासाठी शिक्षण विभागाशी सहकार्य करावे व यासाठी लागणारा निधी हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या निधीतून भागविण्यात यावा.

२. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक),महाराष्ट्र राज्य, पुणे, शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्याबाबत आवश्यक त्या सुचना संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात याव्यात.


सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२१०२१०१६२५३०६९२१ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. 

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(राजेंद्र पवार)

उप सचिव,महाराष्ट्र शासन.


प्रति,

१) मा.राज्यपालांचे सचिव,राजभवन,मुंबई

२) मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव

३) मा.उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांचे सचिव ४) मा.अध्यक्ष व मा.उपाध्यक्ष, विधान सभा, विधान भवन, मुंबई

५) मा.सभापती व मा.उपसभापती, विधान परिषद, विधानभवन, मुंबई ६) मा. मंत्री, (शालेय शिक्षण) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई

७) मा.राज्यमंत्री (शालेय शिक्षण) यांचे विशेष कार्य अधिकारी,मंत्रालय, मुंबई

८) मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई, २२) निवड नस्ती, एस.डी. ४ कार्यासन,

९) मा.अपर मुख्य सचिव,गृह विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,

१०) प्रधान सचिव,सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,

११) प्रधान सचिव,महिला व बाल विकास विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई, १२)आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे,

१३) सर्व सह सचिव/उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई १४) सर्व मंत्रालयीन विभाग,मंत्रालय, मुंबई

१५) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक). महाराष्ट्र राज्य, पुणे, १६) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे,

१७) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे, १८) राज्य प्रकल्प संचालक,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद,मुंबई,

१९)सर्व विभागीय शिक्षण उप संचालक,

२०)शिक्षण अधिकारी/ गट शिक्षण अधिकारी / शिक्षण निरीक्षक सर्व जिल्हा परिषदा / महानगरपालिका २१) सर्व कार्यासने, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई,


Post by : संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट