5 हजारांची लाच घेणारा कृषी पर्यवेक्षक अडकला जाळ्यात


 ठिबक सिंचन योजनेचे आनुदान मिळवून देण्यासाठी 5 हजार रुपये लाच मागणी करून ती स्विकारणाऱ्या धर्माबाद येथील एका कृषी पर्यवेक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दि.9 फेबु्रवारी 2021 रोजी रात्री धर्माबादमध्ये जेरबंद केले आहे.


दि.5 फेबु्रवारी रोजी धर्माबाद तालुक्यातील एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतात थीबक सिंचन लावले होते. शासनाच्यावतीने यासाठी अनुदान मिळते. ते अनुदान मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची शिफारस लागते. त्यासाठी अर्ज केल्यानंतर कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक दिपक शंकरराव हनवते (कोळीकर) (57) यांनी 5 हजार रुपयांची लाच मागितली. या तक्रारीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबतची शहानिशा केल्यानंतर 9 फेबु्रवारी रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास धर्माबाद जवळी बन्नाळी चौक येथील हिरोहोंडा शोरुमच्या पाठीमागे दिपक हनवते यांनी 5 हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर त्यांना जेर बंद केले आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक एस.एल.नितनवरे, पोलीस अंमलदार किशोर चिंतोरे, हनुमंत बोरकर, अमरजितसिंह चौधरी, मारोती सोनटक्के आदींनी सापळा कार्यवाही पुर्ण केली. धर्माबाद पोलीस ठाण्यात या संदर्भाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post by : संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर; माहिती अधिकारात धक्कादायक बाबी उघड!

मरवाळी: शासकीय रस्त्यावरील अतिक्रमणांचा विळखा दूर करण्यास ग्रामपंचायत, बांधकाम विभाग अपयशी

‘आपले सरकार’पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस