कायदेशीर उत्पन्नाचे तुलनेत १६.६५% अपसंपदा
समाजात, पाहुणे राऊळे, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच जवळची लोकं साहेबांनी लई कमाई केली, कमाई केली सतत चर्चा करत असतात, बहुतांश लोकसेवकांनी ती कमाई अशाच भ्रष्टाचारातून केलेली असावी
By संजय चिखले
नांदेड, रविवार दि.२६-०१-२०२४: सविस्तर माहिती असी कि,लोकसेवक संजय पुजलवार सध्या सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली. लोकसेवक यांनी संपादित केलेली मालमत्ता कायदेशीर स्त्रोताद्वारे संपादित केली किंवा कसे याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देवून माहिती घेण्यात आली. परंतु त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत ते पुष्टीदायक पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यांनी लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांना प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता स्वतःचे नावे, त्यांची पत्नी सौ.मनीषा संजय पुजलवार यांच्या नावे संपादित केल्याचे उघड चौकशी अंती निष्पन्न झाले आहे. त्यांनी संपादित केलेली रू. 28,74,146/- किंमतीची मालमत्ता ही त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 16.65% जास्त असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे.
सदरहू विसंगत बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी दि.01/05/1998 ते दि. 31/03/2019 दरम्यान लोकसेवक संजय पुजलवार यांना त्यांची पत्नी सौ. मनीषा संजय पुजलवार यांनी मदत करून गुन्हयास प्रोत्साहित करून अपप्रेरणा दिली आहे.
म्हणून त्या दोघांचे विरूध्द श्री संतोष कमलाकर गुर्जर, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, मुंबई यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 59/2025 नुसार तक्रार दिल्यानंतर वरील प्रमाणे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम 13(1)(ब), 13 (2), 12 अनुसार पोलीस स्टेशन भाग्यनगर,जि.नांदेड येथे अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पुढील कायदेशीर प्रक्रिया चालु आहे.
आरोपी संजय पुजलवार, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी व पत्नी मनीषा संजय पूजलवार, दोघे आमदार नगर, मालेगाव रोड, नांदेड येथे वास्तव्य करून आहेत.
या अपसंपदेच्या कारवाईचा पुढील तपास श्री संदीप पालवे,पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र,डॉ. संजय तुंगार,अपर पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन व श्री प्रशांत पवार पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड यांचे पर्यवेक्षणाखाली तपास अधिकारी-
श्रीमती माधुरी यावलीकर, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड ह्या करत आहेत.
- नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट)यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास अथवा शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी बेकायदा मार्गाने अपसंपदा जमवल्याची माहिती असल्यास तात्काळ खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
श्री प्रशांत पवार,
पोलीस उप अधीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो, नांदेड.
मो.क्र. - 9870145915
दुरध्वनी 02462-253512
टोल फ्रि क्रं. 1064

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा