🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, जानेवारी २३, २०२५

महाराष्ट्रात सहा यशस्वी सापळा कारवायामधे कनिष्ठ लिपिक(बीड),सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक(नांदेड),ग्रापं स्तरिय संगणक परिचालक(लातूर),नगर भूमापन अधिकारी (धुळे),उप अभियंता(रायगड),वरिष्ठ मुख्य लेखणिक(सोलापूर) असे सात लाचखोर चतुर्भुज

 

By संजय चिखले

नांदेड,दि.२३-०१-२०२५: आज दिनांक २३ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ॲंटी करप्शन‌ ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वेगवेगळ्या युनिट द्वारे करण्यात आलेल्या सहा यशस्वी सापळा कारवाई मधे ७ लाचखोर आरोपी लोकसेवकांना रंगेहाथ पकडण्यात यश मिळाले आहे. त्यात

  1. छत्रपती संभाजीनगर लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत बीड घटक एक कारवाई
  2. नांदेड लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत नांदेड घटक एक कारवाई व लातूर घटक एक कारवाई
  3. नाशिक लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत धुळे घटक एक कारवाई
  4. ठाणे लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत रायगड अलिबाग घटक एक कारवाई
  5. पुणे लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत सोलापूर घटक एक कारवाई
  • एक यशस्वी सापळा कारवाई जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील कनिष्ठ लिपिक(वर्ग-३) आरोपी दिलीप क्रिस्टय्या महलंके याचेवर बीड पथकाने केली
सविस्तर माहिती असी कि,तक्रारदार यांचे बहिणीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना मध्ये एकलपालक म्हणून शासकीय अनुदान मिळवण्याकरिता त्यांचे कागदपत्राची फाईल ही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयात जमा करण्याकरिता गेले असता आलोसे यांनी त्यांना प्रत्येक फाईलची 250 रुपये असे दोन फाईलचे 500 रुपये लाचेची मागणी पंचा समक्ष करून लगेच स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरुन लोकसेवक यांचे कार्यालयात सापळा कारवाईचे आयोजन केले असता तक्रारदार यांचेकडून लोकसेवक  दिलीप महालंके पंचासमक्ष लाच रक्कम 500 रुपये स्वीकारताच त्यांना लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले .लोकसेवक महालंके यास ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजी नगर,बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदर सापळा कारवाई श्री संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ॲंटी करप्शन‌ ब्युरो छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक,(ॲंटी करप्शन‌ ब्युरो छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र) यांचे मार्गदर्शन व श्री शंकर शिंदे पोलीस उपअधीक्षक,ॲंटी करप्शन‌ ब्युरो बीड यांचे पर्यवेक्षणाखाली सापळा अधिकारी-
            श्री युनूस शेख पोलीस निरीक्षक (ॲंटी करप्शन‌ ब्युरो बीड) व हनुमान गोरे ,भारत गारदे, अविनाश गवळी , गणेश मेहेत्रे (ॲंटी करप्शन‌ ब्युरो बीड) यांच्या पथकाद्वारे यशस्वी करण्यात आली आहे.

  • बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अमाचेशी संपर्क साधावा.
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
टोल फ्री क्र:- 1064
मा.पोलीस अधीक्षक, लाप्रवि.छत्रपती संभाजीनगर - 9923023361
पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे ला. प्र. वि. बीड
 मो.9355100100
 वर संपर्क साधावा.
  • दुसरी यशस्वी सापळा कारवाई कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक(वर्ग-२) आरोपी भागवत तुकाराम नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक(वर्ग-२) आरोपी नारायण मारोती शिंदे याचेवर नांदेड पथकाने केली
सविस्तर माहिती असी कि,तक्रारदार यांचेकडे एक हायवा वाहन असून ते या वाहनाने कायदेशीर परवानगी असलेल्या वाळूच्या ठेक्यावरून ऑर्डर मिळाल्याप्रमाणे वाळू वाहतूक करतात. त्यांचा वाळू वाहतुकीचा हायवा पोलीस स्टेशन कुंडलवाडी जिल्हा नांदेड चे हद्दीतून वाळू वाहतूक करताना त्यावर पोलिसांनी कोणतेही कारवाई करू नये या करिता आलोसे क्र. 2 यांनी पडताळणी दरम्यान स्वतःसाठी 10000 रुपये व आ लो से क्रमांक 1 यांच्यासाठी 15000 रुपयांची मागणी केली. 
   त्यानंतर पडताळणी दरम्यान तडजोडी अंती आलोसे क्रमांक 2 यांनी स्वतःसाठी 7000 रुपये व आलोसे क्र 1 यांचे साठी 10000 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच आलोसे क्रमांक 1 यांनी पडताळणी दरम्यान सदरची लाच रक्कम आलोसे क्रमांक 2 यांच्याकडे देण्यास सांगितले. त्या प्रमाणे आलोसे क्रमांक 2 यांनी 17000 रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष पोलीस ठाण्यात स्वीकारली आहे.
         दोन्ही आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाणे कुंडलवाडी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

सदर सापळा कारवाई श्री संदीप पालवे,पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र,डॉ. संजय तुंगार,अपर पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन व श्री प्रशांत पवार पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड यांचे पर्यवेक्षणाखाली सापळा व तपास अधिकारी -
           श्रीमती प्रीती रमेश जाधव , पोलीस निरीक्षक(अँटी करप्शन ब्युरो नांदेड) व पोलिस अमलदार राजेश राठोड, बालाजी मेकाले , ईश्वर जाधव सर्व नेम. अँटी करप्शन ब्युरो टीम, नांदेड यांच्या पथकाद्वारे यशस्वी करण्यात आली आहे

  • नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारीध्कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा

दुरध्वनी 02462-253512
टोल फ्रि क्रमांक 1064

  • तिसरी यशस्वी सापळा कारवाई निलंगा तालुक्यातील शेळगी ग्रामपंचायतच्या आपले सरकार सेवा केद्र कक्षाचा संगणक परिणालक(ईलोसे,कंत्राटी) आरोपी ऋषिकेश तानाजी शिंदे याचेवर लातूर पथकाने केली
सविस्तर माहिती असी कि,तक्रारदार यांचे दि 31/05/2024 रोजी लग्न झाले असून तक्रारदार यांना पत्नीचे नाव बदलण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने त्यांनी इलोसे शिंदे यांना कागदपत्रे सादर केली होती. इलोसे शिंदे यांनी सदर विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करून ग्रामसेवक यांची सही घेऊन प्रमाणपत्र देण्यासाठी 2000/- रुपयांची लाच मागणी केली. त्यापैकी 500/- रुपये दि 22/01/2025 रोजी स्वीकारले व उर्वरित 1500 रुपये दिल्यानंतरच विवाह नोंदणी प्रमाणपत्र देतो असे सांगितले. सदर रक्कम लाच असल्याची तक्रारदार यांची खात्री झाल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथे लेखी तक्रार दिली होती. त्यावरून सदर सापळा कार्यवाही आयोजित करण्यात आली आहे. 
            दि. 23/01/2025 रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी इलोसे शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे वर नमूद प्रलंबित कामासाठी 1500/- रूपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य करून सदर लाचेची रक्कम दि. 23/01/2025 रोजी मौजे शेळगी ता निलंगा जि लातूर येथील चहाचे टपरीवर शासकीय पंचासमक्ष स्वीकारली आहे.
             आरोपीस सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले आहे. पोलीस स्टेशन औराद शहाजनी , जिल्हा लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.

सदर सापळा कारवाई श्री संदीप पालवे,पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र,डॉ. संजय तुंगार,अपर पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन श्री संतोष बर्गे, पोलीस उपअधीक्षक,अँटी करप्शन ब्यूरो, लातूर यांच्या पर्यवेक्षणाखाली तपास अधिकारी:-
       श्री भास्कर पुल्ली , पोलीस निरीक्षक(अँटी करप्शन ब्यूरो, लातूर) व टीम अँटी करप्शन ब्यूरो, लातूर यांच्या पथकाद्वारे यशस्वी करण्यात आले आहे.

  • लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर कार्यालय दुरध्वनी - 02382-242674
 संतोष बर्गे, पोलीस उप अधीक्षक, 
मो.नं. 7744812535
@ टोल फ्रि क्रं. 1064

  • चौथी यशस्वी सापळा कारवाई धुळे नगर भूमापन अधिकारी(वर्ग-१) आरोपी भास्कर गंगाधर वाघमोडे याचेवर धुळे पथकाने केली
सविस्तर माहिती असी कि,तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील चुकीने नोंद झालेले क्षेत्र दुरुस्ती करण्यासाठी सदर प्लॉटच्या मूळ मालकाने नगर भूमापन कार्यालय, धुळे येथे अर्ज केलेला होता.
सदर अर्जावरून आलोसे यांनी क्षेत्र दुरुस्ती करण्याचे आदेश काढले होते.सदर आदेशावरून मिळकत पत्रिकेवर क्षेत्राची दुरुस्ती करण्यासाठी आलोसे यांनी 20,000/-रु.लाचेची मागणी करून 10,000/-रुपये तक्रारदार यांच्याकडून स्वीकारून उर्वरित 10,000/-रु लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. 
 सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी त्यांच्या कार्यालयातील परिरक्षण भूमापक हर्षल खोंडे यांच्याकरिता 10,000/-रु. लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम तक्रारदार यांचे कडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे म्हणून गुन्हा.

सदर सापळा कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र यांचे मार्गदर्शन व श्री सचिन साळुंखे पोलीस उपअधीक्षक, लाचलुतपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा अधिकारी-
      पंकज शिंदे पो. निरी.(ला.प्र. विभाग, धुळे) व पो. हवा. राजन कदम, पो.कॉ.रामदास बारेला,मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट यांच्या पथकाद्वारे यशस्वी करण्यात आली आहे.

  • धुळे जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी इसम याने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी,किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे 02562234020 येथे संपर्क करावा.
टोल फ्री क्रमांक 1064

  • पाचवी यशस्वी सापळा कारवाई रायगड जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग श्रीवर्धन उप अभियंता(वर्ग -१) आरोपी प्रविण पंढरीनाथ मोरे याचेवर रायगड-अलिबाग पथकाने केली
सविस्तर माहिती असी कि,तक्रारदार यांना भावे बौद्ध वाडी, तालुका श्रीवर्धन या ठिकाणी सभागृहाचे बांधकामाचे 7,00,000/-रुपयाचे कंत्राट 2023-24 या कालावधीत मिळाले होते. सदर काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार याना समाजकल्याण अलिबाग खात्याकडून 1,40,000/- रुपयांचे बिल प्राप्त झालेले आहे. सदर मंजूर झालेल्या बिलाची टक्केवारी म्हणून 2500/ रुपये व उर्वरित राहिलेले रुपये 5,60,000/- हे बिल कार्यकारी अभियंता. रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे पाठविण्याच्या मोबदल्यात व मंजूर करण्यास मदत करण्यासाठी 10,500/- रूपये अशी एकूण रक्कम रुपये 13000/- रकमेची लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार दिनांक 22/01/25 रोजी प्राप्त झाली होती 
    तक्रारीच्या अनुषंगाने दि.23/01/25 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे रुपये 13,000/- लाचेची रक्कम मागणी करून पहिला हप्ता 10000/- रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले 
       त्यानुसार दि.23/01/25 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडून मागणी केलेली लाचेची रक्कम रुपये 10,000/- पंच साक्षीदार यांचे समक्ष तक्रारदार यांचेकडून स्वीकारली असता त्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
      आरोपी लोकसेवक यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर सापळा कारवाई श्री.शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,ठाणे परिक्षेत्र,श्री.संजय गोवीलकर,अपर पोलीस अधीक्षक(लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र),श्री.सुहास शिंदे,अपर        पोलीस अधीक्षक(लाच लुचपत प्रतिबंधक विभाग,ठाणे परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शन व श्री शशिकांत पाडावे पो.उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,रायगड-अलिबाग यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा व तपासी अधिकारी-
       श्री.निशांत धनवडे,पोलीस निरीक्षक(लाच लुचपत प्रतिबंधक विभाग,अलिबाग-रायगड) व
श्री संतोष भिसे ,पोलिस निरीक्षक स.फौ.विनोद जाधव,पोहवा/ 2271 सचिन आटपाडकर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,रायगड-अलिबाग यांच्या पथकाद्वारे यशस्वी करण्यात आली आहे.

  • रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड अलिबाग कार्यालय दुरध्वनी - 02141-222331
/ टोल फ्रि क्रं. 1064
मो. 9870332291 शशिकांत पाडावे 
मो.8108355488 निशांत धनवडे 
मो.8652090078 संतोष भिसे

  • सहावी यशस्वी सापळा कारवाई सोलापूर महानगरपालिकेतील कर विभागाचा वरिष्ठ मुख्य लेखणिक(वर्ग-३) आरोपी चंद्रकांत लक्ष्मण दोतूल याचेवर सोलापूर पथकाने केली
सविस्तर माहिती असी कि,तक्रारदार यांनी सोलापूर महानगरपालिका हद्दीमध्ये 3000 स्क्वेअर फुट जागा नोटरी पद्धतीने खरेदी केलेली असून, सदर जागेची कर आकारणीस नावाची नोंदणी करण्यासाठी कर विभाग सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथे अर्ज सादर केला होता, सदर अर्जाचे अनुषंगाने यातील तक्रारदार हे पाठपुरावा करत होते. व त्यासाठी तक्रारदार यांनी कर आकारणी व कर संकलन विभाग, महानगरपालिका सोलापूर येथील वरिष्ठ मुख्य लेखनिक श्री चंद्रकांत लक्ष्मण दोतुल यांची भेट घेतली असता, नमूद लोकसेवक यांनी तक्रारदार यांना त्यांनी खरेदी केलेल्या जागेचा सन 1992 ते मार्च 2025 पावेतोचा कायदेशीर कर एकूण 1,77,745 भरण्यास सांगितले. व तेवढा कर भरायचा नसेल तर 50 हजार रुपये देण्यास सांगून त्यामधून दि. 01.04.1992 ते 31.03.2025 पावेतोचा कर भरल्याची पावती देतो असे सांगून तक्रारदार यांच्याकडून 50 हजार रुपयांचा स्वीकार करून त्यापैकी 21,255 रुपयांची ऑनलाईन कर भरल्याची वर नमूद कालावधीची पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरित 28,745 रुपये लाच रक्कम स्वरूपात स्वतः करिता स्वीकारले. यावरून सदर बाझार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सदर सापळा कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे परिक्षेत्र,
डॉ. शीतल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शन व श्री. गणेश कुंभार,पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि.सोलापूर यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा पथक-    
                 श्री.उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक(लाप्रवि, सोलापूर)पोलीस अंमलदार :- पोह अतुल घाडगे, सलिम मुल्ला, स्वामीराव जाधव, पोकॉ/ राजू पवार,चालक पोह/ राहुल गायकवाड सर्व नेमणूक लाप्रवि, सोलापूर यांच्या पथकाद्वारे यशस्वी करण्यात आली आहे

  • सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी स्वतः अगर खाजगी इसमाच्या मार्फतीने कोणतेही शासकीय काम करण्यासाठी अगर न करण्यासाठी फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर येथे संपर्क साधावा.
गणेश कुंभार
सहाय्यक पोलीस आयुक्त/पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर.
मो.क्र. 9764153999
कार्यालय क्र 0217-2312668
ईमेल dyspacbsolapur@gmail.com
Toll free no 1064

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट