🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, मार्च २८, २०२४

रातोळी येथील गोविंदराव माली पाटील यांचे निधन

 


संजय पाटील चिखले

नायगाव- नायगाव तालुक्यातील रातोळी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोविंदराव लक्ष्मणराव माली पाटील रातोळीकर यांचे प्रदीर्घ आजारामुळे दिनांक २५ मार्च 2024 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर रातोळी येथे दिनांक 26 मार्च 2024 रोजी मंगळवार रोजी सायंकाळी चार वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.कै. गोविंदराव पाटील हे धाडसी एक वचनी व रोखठोक स्वभावाने परिचित होते.गोविंदराव पाटील यांच्या अंत्यविधीस राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार,माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण,शिवराज पाटील होटाळकर,सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप संगम साहेब (आयएएस),खासदार चिखलीकर साहेब यांच्या पत्नी सॊ. चिखलीकर, केशवराव पाटील चव्हाण, माणिकराव लोहगावे, प्रताप पाटील जिगळेकर, श्रीनिवास पाटील ,रवींद्र पाटील भिलवंडे, संभाजी पाटील भिलवंडे,संजय पाटील शेळगावकर,धनंजय पाटील वडजे,बाबासाहेब हंबर्डे,गटविकास अधिकारी नायगाव वाजे साहेब,यांच्यासह सर्व सरपंच,तलाठी,महसूल व पंचायत कर्मचारी,पत्रकार् बांधव,नातेवाईक, गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

     गोविंदराव माली पाटील हे ग्रामसेवक संघटनेचे नायगाव तालुकाध्यक्ष टी.जी.पाटील,तलाठी संघटनेचे मुखेड मा.तालुकाध्यक्ष डी.जी. पाटील व ग्रामसेवक बी.जी. पाटील यांचे वडील होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट