🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

रविवार, जानेवारी ०२, २०२२

जाणून घ्या २०२१ मध्ये एसीबीच्या जाळ्यात महाराष्ट्रातील कोणत्या विभागाचे किती लाचखोर अधिकारी, कर्मचारी अडकले ते ! खातेनिहाय, संवर्गनिहाय, परिक्षेत्रनिहाय लाचखोरांची माहिती



मुंबई,दि.०२ जानेवारी २०२१ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे.भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे.

   शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित असते.कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा असे आवाहन विभागामार्फत करण्यात येत असते.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहतो आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करतो.भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाणार आहे.हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकते.

   समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहे.

महाराष्ट्रातील शासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या विरोधात नागरिकांनी दिलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे मागिल दहा वर्षांत सापळा, अपसंपदा, अन्य भ्रष्टाचार प्रकरणी लाचखोर, भ्रष्ट अधिकारी,कर्मचा-यांवर केलेल्या कारवाईचा आलेख, सांख्यिकीय माहिती खालील प्रमाणे आहे.

२०१२ ते २०२१ वर्षनिहाय सापळा,अपसंपदाअन्य भ्रष्टाचार प्रकरणांची माहिती

२०१२- सापळा ४८९, अपसंपदा २२ व अन्य भ्रष्टाचार १३ असे एकूण ५२४ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०१३- सापळा ५८३, अपसंपदा १६ व अन्य भ्रष्टाचार ०५ असे एकूण ६०४ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०१४- सापळा १२४५, अपसंपदा ४८ व अन्य भ्रष्टाचार २३  असे एकूण १३१६ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०१५- सापळा १२३४, अपसंपदा ३५ व अन्य भ्रष्टाचार १० असे एकूण १२७९ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०१६- सापळा ९८५, अपसंपदा १७ व अन्य भ्रष्टाचार १४ असे एकूण १०१६ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०१७- सापळा ८७५, अपसंपदा २२ व अन्य भ्रष्टाचार २८ असे एकूण ९२५ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०१८- सापळा ८९१, अपसंपदा २२ व अन्य भ्रष्टाचार २३ असे एकूण गुन्हे दाखल करण्यात आले.

२०१९- सापळा ८६६, अपसंपदा २० व अन्य भ्रष्टाचार ०५ असे एकूण ८९१ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०२०- सापळा ६३०, अपसंपदा १२ व अन्य भ्रष्टाचार २१ असे एकूण ६६३ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०२१- ०१ जानेवारी ते ३० डिसेंबर पर्यंत सापळा ७६२, अपसंपदा ०७ व अन्य भ्रष्टाचार ०२ असे एकूण ७७१ गुन्हे दाखल करण्यात आले.

मागिल दहा वर्षांत वरील प्रमाणे २०१२ ते २०२१ दरम्यान एसीबी द्वारे सापळा, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार कारवाईत २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे १३१६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्या खालोखाल २०१५ मध्ये १२७९, २०१६ मध्ये १०१६, २०१८ मध्ये ९३६, २०१७ मध्ये ९२५, २०१९ मध्ये ८९१, २०२१ मध्ये ७७१, २०२० मध्ये ६६३, २०१३ मध्ये ६०४, २०१२ मध्ये ५२४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

०१ जानेवारी २०२१ ते ३० डिसेंबर २०२१ पर्यंत परिक्षेत्र निहाय  सापळा, अपसंपदा, अन्य भ्रष्टाचार नोंद गुन्हे

मुंबई परिक्षेत्र : सापळा- गुन्हे ४६ आरोपी ६६, अपसंपदा- गुन्हे ०४ आरोपी ०५, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे - ०० एकूण गुन्हे ५० आरोपी ७१

ठाणे परिक्षेत्र : सापळा- गुन्हे ८८ आरोपी १३५, अपसंपदा- गुन्हे ००,आरोपी ००, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे ०१ आरोपी १० एकूण- गुन्हे ८९ आरोपी १४५

पुणे परिक्षेत्र : सापळा- गुन्हे १६५ आरोपी २३५, अपसंपदा- गुन्हे ०२ आरोपी ०५, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे ०१ आरोपी ०२ एकूण- गुन्हे १६८ आरोपी २४२

नाशिक परिक्षेत्र : सापळा- गुन्हे १२८ आरोपी १७२, अपसंपदा- गुन्हे ०० आरोपी ००, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे ०० आरोपी ०० एकूण- गुन्हे १२८ आरोपी १७२

नागपूर परिक्षेत्र : सापळा- गुन्हे ७२ आरोपी ९४, अपसंपदा- गुन्हे ०० आरोपी ००, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे ०० आरोपी ००, एकूण- गुन्हे ७२ आरोपी ९४

अमरावती परिक्षेत्र : सापळा- गुन्हे ७२ आरोपी १०३, अपसंपदा- गुन्हे ०१ आरोपी ०१, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे ०० आरोपी ००, एकूण- गुन्हे ७३ आरोपी १०४

औरंगाबाद परिक्षेत्र : सापळा- गुन्हे १२९ आरोपी १८२, अपसंपदा- गुन्हे ०० आरोपी ००, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे ०० आरोपी ००, एकूण- गुन्हे १२९ आरोपी १८२

नांदेड परिक्षेत्र : सापळा- गुन्हे ६२ आरोपी ८६, अपसंपदा- गुन्हे ०० आरोपी ००, अन्य भ्रष्टाचार- गुन्हे ०० आरोपी ०० एकूण- गुन्हे ६२ आरोपी ८६

अशा प्रकारे ०१ जानेवारी २०२१ ते ३० डिसेंबर २०२१ पर्यंत महाराष्ट्रातील वरील आठ परिक्षेत्रा अंतर्गत विविध घटका द्वारे सापळा प्रकरणी एकूण ७६२ कारवायांमध्ये १०७३ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.यात ३११ सह आरोपींचा समावेश आहे.अपसंपदा प्रकरणी ०७ गुन्ह्यात ११ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तर अन्य भ्रष्टाचार प्रकरणी ०२ गुन्ह्यात १२ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सापळा, अपसंपदा, अन्य भ्रष्टाचार मिळून एकूण ७७१ कारवायांमध्ये १०९६ लाचखोरांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

१ जानेवारी २०२१ ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत सापळा प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींची संवर्गखातेनिहाय माहिती

महसूल/भूमी अभिलेख/नोंदणी विभाग- एकूण 177 प्रकरणात क्लास वन 16, क्लास टू 05, क्लास थ्री 140,क्लास फोर 16, तसेच आलोसे 21, खाव्य 52 अशा एकूण 250 लाचखोर महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोलीस विभाग- एकूण 173 प्रकरणात क्लास वन 08, क्लास टू 19, क्लास थ्री 184,क्लास फोर 00, तसेच आलोसे 09, खाव्य 35 अशा एकूण 255 लाचखोर पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

म.रा.वि.वि.कं.मर्यादित विभाग- एकूण 51 प्रकरणात क्लास वन 04, क्लास टू 09, क्लास थ्री 21,क्लास फोर 10, तसेच आलोसे 13, खाव्य 11 अशा एकूण 68 लाचखोर महावितरण अधिकारी,कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महानगर पालिका विभाग- एकूण ५१ प्रकरणात क्लास वन ०३, क्लास टू ०८, क्लास थ्री ४२,क्लास फोर ११,तसेच आलोसे ०६, खाव्य ०७ अशा एकूण ७७ लाचखोर मनपा अधिकारी,कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

नगर परिषद विभाग- एकूण ०९ प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ०४, क्लास थ्री ०५,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०१, खाव्य ०१ अशा एकूण ११ लाचखोर न.प अधिकारी,कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद विभाग- एकूण *५१* प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ०६, क्लास थ्री ४४,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०६, खाव्य ०६ अशा एकूण ६३ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पंचायत समिती विभाग- एकूण ५५ प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ०४, क्लास थ्री ३५,क्लास फोर ०४,तसेच आलोसे २४, खाव्य १० अशा एकूण ७८ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

वन विभाग- एकूण *२७* प्रकरणात क्लास वन ०३, क्लास टू ०२, क्लास थ्री २२,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०२ अशा एकूण २९ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

प.दु.म विभाग- एकूण *०८* प्रकरणात क्लास वन ०२, क्लास टू ०१, क्लास थ्री ०४,क्लास फोर ०१,तसेच आलोसे ००, खाव्य ०० अशा एकूण ०८ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभाग- एकूण *०९* प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ०२, क्लास थ्री ०६,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०१, खाव्य ०१ अशा एकूण ११ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जलसंपदा विभाग एकूण- *१०* प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ०३, क्लास थ्री ०५,क्लास फोर ०१,तसेच आलोसे ००, खाव्य ०१ अशा एकूण ११ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग- एकूण *१४* प्रकरणात क्लास वन ०७, क्लास टू ००, क्लास थ्री ०७,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०१, खाव्य ०६ अशा एकूण २१ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग- एकूण ०८ प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ०३, क्लास थ्री ०५,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०३ अशा एकूण ११ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आदिवासी विभाग एकूण- ०२ प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ००, क्लास थ्री ०२,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०० अशा एकूण ०२ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

प्रादेशिक परिवहन विभाग- एकूण *०३* प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ०१, क्लास थ्री ०१,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०१, खाव्य ११ अशा एकूण १५ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पाणी पुरवठा विभाग- एकूण ०३ प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ००, क्लास थ्री ०३,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०१ अशा एकूण ०४ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग- एकूण *१७* प्रकरणात क्लास वन ०५, क्लास टू ०४, क्लास थ्री ०७,क्लास फोर ०१,तसेच आलोसे ००, खाव्य ०० अशा एकूण १७ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

विक्रीकर विभाग- एकूण ०२ प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ०१, क्लास थ्री ,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०० अशा एकूण ०२ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

विधी व न्याय विभाग- एकूण *०४* प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ०१, क्लास थ्री ०२,क्लास फोर ०१,तसेच आलोसे ०१, खाव्य ०१ अशा एकूण ०६ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग- एकूण *०५* प्रकरणात क्लास वन ०२, क्लास टू ०१, क्लास थ्री ०२,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०१ अशा एकूण ०६ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

समाज कल्याण विभाग- एकूण ०४ प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ००, क्लास थ्री ०२,क्लास फोर ०१,तसेच आलोसे ०१, खाव्य ०० अशा एकूण ०५ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

नगर रचना विभाग- एकूण *१०* प्रकरणात क्लास वन ०२, क्लास टू ०७, क्लास थ्री ००,क्लास फोर ०१,तसेच आलोसे ००, खाव्य ०१ अशा एकूण ११ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

वित्त विभाग- एकूण *१०* प्रकरणात क्लास वन ०२, क्लास टू ०७, क्लास थ्री ०१,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०० अशा एकूण १० लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सहकार व पणन विभाग- एकूण *१६* प्रकरणात क्लास वन ०३, क्लास टू ०८, क्लास थ्री ०५,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०३, खाव्य ०१ अशा एकूण २० लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

शिक्षण विभाग- एकूण *३६* प्रकरणात क्लास वन ०३, क्लास टू ०३, क्लास थ्री ३०,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०३, खाव्य ०२ अशा एकूण ४१ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

क्रिडा विभाग- एकूण ०० प्रकरणात क्लास वन , क्लास टू , क्लास थ्री ,क्लास फोर ,तसेच आलोसे , खाव्य अशा एकूण ०० लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अन्न व औषधी द्रव्ये विभाग- एकूण ०० प्रकरणात क्लास वन , क्लास टू , क्लास थ्री ,क्लास फोर ,तसेच आलोसे , खाव्य अशा एकूण ०० लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कृषी विभाग- एकूण १० प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ०४, क्लास थ्री ०६,क्लास फोर ००,तसेच आलोसे ०१, खाव्य ०३ अशा एकूण १४ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्य परिवहन विभाग- एकूण *०१* प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ०१, क्लास थ्री ००,क्लास फोर ००,तसेच आलोसे ००, खाव्य ०१ अशा एकूण ०२ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

इतर विभाग- एकूण *०२* प्रकरणात क्लास वन ००, क्लास टू ००, क्लास थ्री ०२,क्लास फोर ००,तसेच आलोसे , खाव्य ०६ अशा एकूण ०८ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सिडको विभाग- एकूण ०१ प्रकरणात क्लास थ्री ०१ अशा एकूण ०१ लाचखोर कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

महिला व बालविकास विभाग- एकूण *०४* प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू ०२, क्लास थ्री ०१,क्लास फोर ०१,तसेच आलोसे ०३, खाव्य ०१ अशा एकूण ०८ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महात्मा फुले मागासवर्गीय विभाग- ०० प्रकरणं

म्हाडा विभाग- ०१ प्रकरणात क्लास टू- ०१ अशा एकूण एका लाचखोर अधिकाऱ्याचा समावेश आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभाग- ०१ प्रकरणात क्लास थ्री- ०१ अशा एकूण ०१ लाचखोर कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

प्रदुषण नियंत्रण मंडळ विभाग- ०० प्रकरणं

बेस्ट(मुंबई बस) विभाग- ०० प्रकरणं

वजन व मापे विभाग- ०१ प्रकरणात क्लास फोर ०१, तसेच आलोसे ०१ अशा एकूण ०२ लाचखोर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

उच्च तंत्रशिक्षण विभाग- ०१ प्रकरणात क्लास थ्री ०१ अशा एकूण एका लाचखोर कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

कौशल्य विकास विभाग- ०१ प्रकरणात क्लास वन-०१ अशा एकूण एका लाचखोर अधिकाऱ्याचा समावेश आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग- *०२* प्रकरणात क्लास थ्री-०२ अशा एकूण ०२ लाचखोर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

बंदर विभाग- ०० प्रकरणं

कारागृह विभाग- ०० प्रकरणं

वरील प्रमाणे ७६२ सापळा प्रकरणात क्लास वन च्या ६९ लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.यात महसूल/भूमीअभिलेख चे सर्वाधिक १६, पोलीस ०८, सार्वजनिक आरोग्य विभाग ०७, सार्वजनिक बांधकाम विभाग ०५,महावितरण ०४, महानगरपालिका,वन विभाग,सहकार व पणन विभाग,शिक्षण विभाग या चार विभागचे पत्येकी ०३,प.दु.म विभाग,उद्योग ऊर्जा व विभाग,नगर रचना विभाग, वित्त विभाग या विभागाचे प्रत्येकी ०२ तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती,अन्न व नागरी विभाग, जलसंपदा,प्रादेशिक परिवहन विभाग,विक्रीकर विभाग,समाज कल्याण विभाग,महिला व बालविकास विभाग, कौशल्य विकास विभाग या नऊ विभागाच्या प्रत्येकी ०१ लाचखोर क्लास वन अधिकाऱ्याचा समावेश आहे.

क्लास टू च्या १०७ लाचखोर अधिकाऱ्यांच्या एसीबीने मुसक्या आवळल्या आहेत.यात सर्वाधिक पोलीस खात्यातील आहेत.त्यापाठोपाठ महावितरण ०९, क्लास थ्री च्या ५८८ लाचखोर कर्मचाऱ्यांच्या एसीबीने मुसक्या आवळल्या आहेत.फोर्थ क्लास च्या ४९ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.आलोसे ९६ तर खाव्य १६४ लाचखोरीत एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.

अशा सर्व विभागातील वेगवेगळ्या संवर्गातील एकूण १०७३ लाचखोरांवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

०१ जानेवारी २०२१ ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत अपसंपदा प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींची संवर्ग व खातेनिहाय माहिती

महसूल/भूमी अभिलेख/नोंदणी विभाग- ०१ प्रकरणात क्लास वन ०१, खाव्य ०१ अशा एकूण ०२ भ्रष्ट अधिकारी,कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस विभाग- ०२ प्रकरणात क्लास वन ०१, क्लास टू , क्लास थ्री ०१,क्लास फोर ,तसेच आलोसे , खाव्य ०२ अशा एकूण ०४ भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

०१ जानेवारी २०२१ ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत अन्य भ्रष्टाचार प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींची संवर्ग व खातेनिहाय माहिती


लाच मागितल्याप्रकरणी दाखल तक्रारींची तत्परतेने दखल घेत कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परीक्षेत्राने २०२१ मध्ये इतर परिक्षेत्रापेक्षा महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे, तर नाशिक परिक्षेत्राने दुसरे स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर युनिट प्रथम क्रमांकावर तर जळगाव युनिट दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात सांख्यिकी सदरातील माहितीनुसार ३० डिसेंबर २०२१ अखेर सापळा रचून केलेल्या कारवाईत तसेच अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ७७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यात १०९६ आरोपींचा समावेश आहे. यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राने सर्वाधिक म्हणजे १६५ गुन्हे दाखल करुन २३५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामुळे गुन्हे दाखल करण्यात व चालू वर्षाषा अखेरच्या कामगिरीत या परीक्षेत्राचा प्रथम क्रमांक लागला आहे. तर नाशिक परिक्षेत्राने चालू वर्षाअखेर १२८ गुन्हे दाखल करून दुसरा क्रमांक पटकावला.नाशिक परिक्षेत्राने १७२ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

या प्रमाणेच नाशिक परिक्षेत्रातील जळगाव युनिटने जानेवारी ते डिसेंबर अखेरपर्यंत ३३ गुन्हे दाखल केले.मागील वर्षापेक्षा जास्तीचे १३ गुन्हे दाखल करण्याची कामगिरी करीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक कडासने, जळगाव युनिटचे उपाधिक्षक एस. एस. पाटील यांच्यासह सर्वांचे अभिनंदन केले जात आहे. अहमदनगर युनिटने नासिक परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नगर युनिटनेही ३० डिसेंबर २०२१ अखेर पर्यंत ३३ गुन्हे नोंदवले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट