मुंबई 18 नोव्हेंबर 2021 : राज्यातील 34 जिल्ह्यातील 4554 ग्रामंपचांतीमध्ये पोटनिवडणुकीचा (Gram Panchayat By Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या ग्रामपंचायतीच्या एकूण 7130 रिक्त जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांसी पत्रव्यवहार केला आहे. इच्छूकांना 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
राज्यातील ग्रामपंचायतीत विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7130 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुका पारंपरिक पद्धतीने पार पाडल्या जाव्यात, असे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना करण्यात आल्या आहेत.
नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या रिक्त जागा भरण्यापुर्वी त्या ग्रामपंचायतीचे एकूण आरक्षण 50 टक्क्याच्या मर्यादेत ठेवणे. नागरिकाच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्यापर्यत ठेवणे. आरक्षण मर्यादेची अंमलबजावणी करताना ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्य संख्येची गणणा विचारात घ्यावी, आदी सुचनाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, निवडणूक कार्यक्रमानुसार, नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेल्या रिक्त जागांचे सर्व साधारण जागत बदल करण्यासाठी अंतिम प्रभाग रचनेसाठी सुधारणा अधिसूचना 22 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
उमेदवारी अर्ज मागवण्याचा व सादर करण्याची मुदत - 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर ( वेळ 11 ते दु.3 वाजेपर्यंत )
अर्ज छाननी - 7 डिसेंबर (सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यत)
अर्ज मागे घेण्याची तारीख - 9 डिसेंबर (दु. 3 वाजेपर्यंत )
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे - 9 डिसेंबर (दु. 3वाजेपर्यत)
आवश्यक असल्यास मतदानाची तारीख - 21 डिसेंबर (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 )
मतमोजणी - 22 डिसेंबर
Tags : ग्रामपंचायत पोटनिवडणुक
टिप : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत कार्यक्रम जाहीर
दिनांक 18/11/2021 गुरुवार
जिल्हे-34
ग्रा.पं-4554×7 (सरासरी) =31878 एकूण जागा.
ग्रा.पं.रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम-4554× ?=7130
लोकांमध्ये आखरी टप्प्यातील मुदत संपलेल्या कोरोनामुळे निवडणूका घ्यायचे शिल्लक राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याचा लोकांना गैरसमज झाला आहे.लोकसंख्येनुसार ग्रा.प.सदस्य संख्या 7,9,11,17 असते.सरासरी 7 जागा धरल्या तर ग्रा.पं-4554×7 (सरासरी सदस्य) =31878 एकूण जागा होतात.मग वरील प्रमाणे 4554 ग्रामपंचायतीच्या 7130 जा कशा होतात ? म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी ग्रा.प मधील रिक्त झालेल्या 4554 ग्रामपंचायतींची 7130 जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा