🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शुक्रवार, नोव्हेंबर १२, २०२१

शिक्षकाकडून पदस्थापनेसाठी लाच घेणारा हा कसला कनिष्ठ प्रशासन अधिकारी ? हा तर अपचारी ! याला लाचखोर म्हणावे ; तीन दिवसांत जि.प चे दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

 


  • सोलापूर झेडपीमध्ये शिक्षकाकडून पंधरा हजाराची लाच मागणाऱ्या लाचखोराला अटक

सोलापूर : मुख्याध्यापकाकडे पद स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

सुहास अण्णाराव चेळेकर असे अटक करण्यात आलेल्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कारवाई झाली.

यातील तक्रारदार यांनी राज्यसरकारच्या पती-पत्नी एकत्रीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करणेकरीता यातील आरोपी चेळेकर यांनी २५ हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी जवळच्या रिक्त शाळेत मुख्याध्यापकपदी बदलीकरीता अर्ज दिला होता.सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता यातील आरोपी करून, तडजोडी अंती १५,००० रु. लाच मागणी केली आहे. याची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी अँटी करप्शन विभागाच्या पथकाने या प्रकरणात आरोपी लोकसेवक सुहास चेळेकर यांना अटक केली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये केवळ तीन दिवसात ही अँटी करप्शनची दुसरी कारवाई आहे. समाज कल्याण विभागातील कक्ष अधिकाऱ्याला तीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. या घटनेमुळे बुधवारी पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली.ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर,पोलीस अंमलदार पोना/ प्रमोद पकाले, पोना/अतुल घाडगे, पौकों/गजानन किणगी, चापोकों/शाम सुरवसे, सर्व नेमणुक लाप्रवि, सोलापूर. यांनी पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट