पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माहूर गडावरील 'रोप वे' ला गती ! राज्य शासन व 'वॅपकॉस'मध्ये करार

इमेज
नांदेड दि. 26 सप्टेंबर 2021 :- रेणुकामातेचे देवस्थान असलेल्या माहूर गडावर 'रोप वे' उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या 'वॅपकॉस लिमिटेड' मध्ये करार झाला आहे. यामुळे माहूर गडाच्या विकासकामाला गती मिळाली आहे.  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाच्या औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि 'वॅपकॉस'चे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी औरंगाबाद येथे या करारावर स्वाक्षरी केली. माहूर गड येथील रेणुकादेवी मंदीर, श्री दत्त शिखर मंदीर, अनुसया माता मंदिरासाठी 'रोप वे' उभारणे तसेच रेणुकादेवी मंदिरासाठी 'फुट ओव्हर ब्रीज' व 'लिफ्ट' उभारण्याच्या कामाला केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत सुमारे 51 कोटी रूपयांची मंजुरी मिळाली आहे.  या विकास कामाबाबतच्या करारावर स्वाक्षरी झाल्याने साडेतीन शक्तीपिठांमध्ये समावेश असलेल्या रेणुकामातेच्या मंदिरात 'रोप वे'ने जाऊन दर्शन घेण्याचे भाविकांचे स्वप्न लवकर पूर्णत्वास येत आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर विशेषतः वयोवृद्ध भाविकांच...

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील महत्वाच्या तरतुदी ! रजेची सर्वसाधारण तत्वे

इमेज
  महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील महत्वाच्या तरतुदी रजेची सर्वसाधारण तत्वे 1. रजा हक्क म्हणून मागता येत नाही (नियम 10) 2. रजा मंजूर करणारा सक्षम अधिकारी प्राधिकारी लोकसेवेच्या निकडीमुळे रजा नाकारु शकतो किंवा रद्द करु शकतो. (नियम 10) 3. रजा मंजूर करणा-या प्राधिका-यास कर्मचा-याने मागितलेल्या रजेचा प्रकार बदलता येत नाही. त्यासाठी कर्मचा-याची लेखी विनंती असली पाहिजे. (नियम 10) 4. कर्मचारी सेवेत असताना त्याच्या विनंतीवरुन भूतलक्षी प्रभावाने एका प्रकारच्या रजेचे दुस-या प्रकारच्या रजेत परिवर्तन करता येते. मात्र त्यावेळी तशी रजा अनुज्ञेय असली पाहिजे. रजेच्या परिवर्तनामुळे जादा देण्यात आलेल्या रकमेची वसुली केली जाते किंवा थकबाकीची रक्कम दिली जाते. (नियम 4) 5. अनुपस्थितीचा कालावधी भुतलक्षी प्रभावाने असाधारण रजेत परिवर्तीत करता येतो. अशा प्रकारची रजा ही उपभोगण्यापुर्वी अर्ज करुन मंजूर करुन घेतली जात नाही. अनुपस्थिती नियमित करण्यासाठी ही रजा नंतर मंजूर केली जाते. (नियम 63(6)) 6. कोणत्याही प्रकारची रजा सतत 5 वर्षाहून अधिक कालावधीकरीता मंजूर करता येत नाही. पुर्वी 5 वर्षे अनुपस्थित ...

नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू ! मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ही आहे शेवटी तारीख...

इमेज
  मतदार नोंदणी करण्यासाठी त्वरा करा..... दिनांक ९ आॕगस्ट २०२१ पासून ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत  नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू झाला आहे.तरी १ जानेवारी२०२२ पर्यंत वय वर्षे १८ पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांनी खालील कागदपत्रांसह  मतदान केंद्रस्तरिय अधिकारी    [B L O] यांच्याकडे संपर्क साधावा. 🛑 नवीन मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे ➡️ घरातील मुलगा/मुलगी यांच नाव मतदार यादीत नाव नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. १) जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट २) रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा ३) आधार कार्ड झेरॉक्स ४) २ पासपोर्ट साईज फोटो ५) घरातील नात्यातील(आई, वडील, भाऊ, बहीण)यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स ➡️ घरातील सुनबाईचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. १)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट २)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा ३)२ पासपोर्ट साईज फोटो ४)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याच...

e-Shram Card : असंघटित क्षेत्रातील कामगार ज्यांचा पीएफ कापला जात नसेल आणि ईएसआयसीचा लाभ मिळत नसेल तर त्वरीत मोफत ई-श्रम कार्ड काढून घ्या

इमेज
  नवी दिल्ली : दि १३ सप्टेंबर २०२१ –   e-Shram |   जर तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करणारे श्रमिक आहात आणि तुमचा पीएफ कापला जात नसेल आणि ईएसआयसीचा लाभ मिळत नसेल, तसेच तुमचे वय 16 वर्षापेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा कमी आहे आणि इन्कम टॅक्स भरत नसाल तर ताबडतोब e-Shram कार्डसाठी अप्लाय करा. यामुळे एक रुपये देखील खर्च न करता दोन लाख रुपयांचा दुर्घटना विमा मिळण्याचा अधिकार तुम्हाला मिळू शकतो. याशिवाय आणखी खुप फायदे आहेत. नोंदणी करण्याचे ठिकाण व्यक्ती स्वता आपली नोंदणी आपल्या मोबाईलवर करू शकते तसेच देशभरातील आपल्या जवळच्या कोणत्याही  कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC Center), महा ई सेवा केंद्र (MAHA-E Seva Kendra),  ग्रामपंचायत कार्यालयामधील आपले सरकार सेवा केंद्राच्या संगणक परीचालकाकडे (डाटा एन्ट्री ऑपरेटर) देेेखील करु शकता. नोंदणीच्या नंतर व्यक्तीला युनिव्हर्सल अकाऊंट नंबरसह ई-श्रम कार्ड जारी होईल. रजिस्ट्रेशनसाठी सरकारने 14434 टोल फ्री नंबरसुद्धा ठेवला आहे, जिथे योजनेसंबंधी सर्व माहिती घेता येऊ शकते. या पोर्टलद्वारे राज्य सरकार सुद्धा आपल्या कामगारांचे रजिस्ट्रेशन करू शकतात...

येलो (Yellow) अलर्ट : नांदेड जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

इमेज
   पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क / जागरूक रहावे   नांदेड, दि. 12 सप्टेंबर 2021 :- मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने आज दिलेल्या सूचनेनुसार 13 व 14 सप्टेंबर या कालावधीत नांदेड जिल्ह्यासाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 13 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर 14 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये  पुढील गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छ...

बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयितास मदत करण्यासाठी मागितली लाच ! लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक समाधान वसंत बिलेला लाज कशी नाही वाटली ?

इमेज
  सांगली : मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकास २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. समाधान वसंत बिले (वय ४२) असे त्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयितास मदत करण्याच्या अमिषाने बिले याने लाच मागितली होती. त्याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली होती. त्या तक्रारीवरून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी चौकशीची प्रक्रिया सुरू होती. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान बिले यांनी संबंधित संशयिताला या गुन्ह्यातून बाहेर काढू, असे सांगितले. गुन्हा दाखल करत नाही, असे म्हणत मोठ्या रकमेच्या लाचेची मागणी केली. संशयिताची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने पैसे देण्यास नकार दिला. अखेर चर्चेअंती तडजोड होऊन २५ हजार रुपये बिले यांना देण्याचे ठरले. याबाबतची तक्रार ...

येसगी येथील मांजरा नदीवरील जुना पुल क्षतिग्रस्त झाल्याने वाहतुकीस प्रतिबंध पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत

इमेज
  नांदेड, दि. 8 सप्टेंबर २०२१ :- बिलोली तालुक्यातील येसगी येथील मांजरा नदीवरील जुना पुल क्षतिग्रस्त झाल्यामुळे हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याऐवजी पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. येसगी येथील मांजरा नदीवरील जुना पुलावरील मार्ग प्रतिबंध करण्यात आल्याने पर्यायी मार्ग जाण्या-येण्यासाठी पुढील प्रमाणे राहील. बिलोली शहराकडून बोधनकडे जाणारी वाहतुक ही बिलोली-कुंडलवाडी-धर्माबाद ते राज्य सीमेवरून बोधनकडे या मार्गे तर नांदेडहून हैद्राबादकडे जाणारी वाहतूक नांदेड-नरसी-देगलूर-मदनूर हैद्राबाद हा पर्यायी मार्ग राहील. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 8 सप्टेंबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत नमुद केलेल्या पर्यायी मार्गान सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.

लाचखोर कांबळे नावाच्या तलाठ्याने 25 हजाराची लाच मागितल्याने एसीबी पथकाने घेतले ताब्यात

इमेज
  *== प्रेसनोट ==* *लाच मागणी कारवाई* ▶️ *युनिट -* नाशिक. ▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय - 41 वर्ष, रा. मु.पो. शिरसमनी, ता. कळवण, जि. नाशिक  ▶️ *आलोसे-*   श्री जयवंत केदु कांबळे, वय 48, व्यवसाय-नौकरी, तलाठी, वर्ग -03, सजा-ओतूर, तहसील कार्यालय, कळवण, जि. नाशिक                                                       ▶️ *लाचेची मागणी-* 25,000/-₹ ▶️ *लाचेची मागणी तारीख -   18/08/2021 ▶️ *लाचेचे कारण -*.   तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेतजमिनी चे 7/12 उताऱ्यावर नाव लावून नोंद टाकण्यासाठी लोकसेवक तलाठी श्री. कांबळे यांनी 30,000/- रूपयांची मागणी करून तडजोडीअंती 25,000/- रुपयांची मागणी केली म्हणून गुन्हा.                   ▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. ▶️ *सापळा अधिकारी -* जयंत शिरसाठ ,पोलीस निरीक्षक, ला.प...

लहान-मोठ्या पुराने सतत पाण्याखाली येणाऱ्या पुलांच्या नव्याने उभारणीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

इमेज
   नांदेड, दि. 8 सप्टेंबर २०२१ :- नांदेड जिल्ह्यातील भौगोलिक रचना, गोदावरीसह इतर लहान-मोठ्या नद्या, नाले आणि ओढ्यांना येणारे पूर यात मोठ्या प्रमाणात लहान पुलांचे, ठरावीक ठिकाणी रस्त्यांचे अतोनात नुकसान होते. याचबरोबर जीवत हानीही वारंवार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अतिवृष्टी झाली की सातत्याने यात होणारी हानी लक्षात घेता अशा जागेवर नव्याने पाण्याखाली न येणाऱ्या उंचीचे पूल उभारण्याबाबत गंभीरतेने विचार सुरू असून लवकरच याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.  नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आढावा बैठक आज रात्री उशीरा त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे व सर्...

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 53.90 मि.मी. पाऊस

इमेज
    नांदेड,दि.  8 सप्टेंबर २०२१ :-  जिल्ह्यात  8  सप्टेंबर  2021  रोजी सकाळी  11.28  वा. संपलेल्या गत  24  तासात सरासरी  53.9 0  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून  जिल्ह्यात दिवसभरात एकुण   168.4 0 मिलीमीटर पाऊस झाला आहे.     जिल्ह्यात  8  सप्टेंबर  2021  रोजी सकाळी  11.28  वा. संपलेल्या  24  तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड-  31.2 (111.5 0 ),  बिलोली  102 (258.9 0 )  मुखेड-  205.1 0  (497.2 0 )  कंधार  91.5 (201.4 0 ),  लोहा-  104.1 0  (200), हदगाव  10.5 (157.8 0 ), भोकर  16.8 0  (161.4 0 )  देगलूर  87.1 0  (192.6 0 )  किनवट-  12.2 0  (140.3 0 ),  मुदखेड  19.4 0  (89.1 0 )  हिमायतनगर  36.9 0  (187.3 0 )  माहूर-  1.7 0  (76.1 0 धर्माबाद-  47.9 0  (137.1 0...

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग

इमेज
  नांदेड (जिमाका) दि. 8 :- सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून व यापूर्वी विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढला आहे. याचबरोबर आज 8 सप्टेंबर रोजी निम्न दुधना प्रकल्पातून 36 हजार 640 क्युसेस विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव या मोठ्या प्रकल्पातून 21 हजार 700 क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू आहे. पुर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिद्धेश्वर) पाणलोट क्षेत्रातुन पूर्णा नदीत 16 हजार क्युसेस विसर्ग चालू आहे. सिद्धेश्वर धरणाखाली मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्याने पुर्णा ब्रिजजवळ 1 लाख 18 हजार क्युसेस विसर्ग चालू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला येऊन मिळते. यामुळे विष्णुपुरी प्रक्ल्पातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.  विष्णुपुरी प्रकल्पाच्या 15 दरवाजातून 2 लाख 41 हजार 518 क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू असल्याने गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढणे स्वाभाविक आहे. हा विसर्ग नियंत्रित रहावा यादृष्टीने विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न केला जात असला तरी न...

दोन लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक एकाच दिवशी एकाच परिक्षेत्रातील दोन घटकातील पथकाच्या जाळ्यात

इमेज
  *Respected sir* *Trap Case Report:* ➡ घटक :- पुणे ➡ तक्रारदार :- पुरूष,२२ वर्ष. ➡ आरोपी :-  1)लोकसेवक- राहूल अशोक पाटील,वय-३३, पद- सहायक पोलीस निरीक्षक, नेमणूक- विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर.  2) खाजगी इसम- संतोष भाऊराव खांदवे, वय - 45 वर्षे रा. लोहगाव , पुणे ▶️पडताळणी :- 07/9/2021,08/09/2021 ➡️सापळा:-दि.08/09/2021 ➡️ लाचेची मागणी : सुरुवातीस रू.5,00,000/- (पाच लाख) ➡️तडजोडीअंती :- 300000/-रुपये  ➡️ लाच स्विकारली :-  रु.1,00,000/- ➡ हकीकत:- तक्रारदार यांचे वडीलांवर विमानतळ पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा दाखल गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये जामीन मिळण्यास मदत होईल यासाठी तपासात आवश्यक ती मदत करण्यासाठी नमूद आरोपीनी पाच लाख रुपयांची लाच मागणी करून आरोपी क्रं. 2 याने तडजोडीअंती 3,00,000/-रु. लाच मागणी करून 1,00,000/- रुपये लाच स्वीकारली .आरोपी लोकसेवक क्रमांक 1 यानी त्यास प्रोत्साहन दिले. ➡️पडताळणी व सापळा पथक: पोलीस निरीक्षक - सुनील क्षीरसागर.  पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे पो.हवा. अंकुश माने पो.शि. दिनेश माने. म.पो.शि. पूजा पागिरे.   ...

प्रत्येक विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे त्वरीत पंचनामे करावेत - जिल्हाधिकारी

इमेज
  नांदेड, दि.  8  सप्टेंबर 2021 : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला. सप्टेंबरच्या  1  तारखेपासून जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात कृषिक्षेत्राचे नुकसान झाल्याच्या विविध घटना समोर आल्या आहेत. यात काही ठिकाणी मनुष्यहानीसह शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले आहे. काल  7  सप्टेंबर रोजी नाले व लहान नदी असलेल्या पुलांवरुन पाणी वाहू लागल्याने काही ठिकाणची वाहतुकही विस्कळीत झाली होती. या सर्व परिस्थितीचा एकत्रित आढावा तात्काळ घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्येक विभाग प्रमुखांना प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील अतिवृष्टीचा हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तात्काळ संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे कृती दल स्थापन केले आहे. जिल्ह्यातील सर्व पाझर तलावांची सद्यस्थिती व उपलब्ध असलेला पाणीसाठा याचा आढावा घेण्याचे जबाबदारी जिल्हा परिषदेचे अ...

अक्षम्य दिरंगाई : नुकसान भरपाईसाठी पीक नुकसानीची माहिती कंपनीस कळविणे आवश्यक-असे जिल्हाधिका-याने केलेल्या आवाहनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या पत्राला जिल्हा माहिती अधिकारी याच्याकडून प्रसिद्धीच नाही

इमेज
 प्रेस नोट    महाराष्ट्र शासन नुकसान भरपाईसाठी पीक नुकसानीची माहिती कंपनीस कळविणे आवश्यक -जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील दोन तिन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पुर मेऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधीत विमा कंपनीस 72 तासामध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटीअथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसगीक आग या नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडुन वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. तथापी विमा दा...

पूरसदृश्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन

इमेज
  संततधार पावसाने नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी  नांदेड जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन  नांदेड, दि. 7 सप्टेंबर 2021 :- नांदेड जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पाऊसाचे प्रमाण वाढल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढल्याने आज 7 सप्टेंबर रोजी 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदी पात्रातील वाहते पाणी, जिल्ह्यातील विविध तालुक्यात झालेली संततधार यामुळे लहान मोठ्या नदी-नाल्यांना आज पूर आल्याने अनेक ठिकाणची वाहतुक खोळंबली तर नदीकाठच्या काही सखल भागात पाणी शिरले. जिल्ह्यातील संभाव्य‍ परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला सज्जतेच्या सूचना देऊन लोकांपर्यंत सर्वतोपरी सहकार्य पोहचविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे प्रत्यक्ष विविध ठिकाणी भेट देऊन प्रशासनाला सूचना देत असून संपुर्ण परिस्थितीवर द...

जिल्ह्यातील प्रकल्प साठ्याच्या पाणी पातळीत वाढ ; गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन-नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता स.को.सब्बीनवार

इमेज
  नांदेड, दि. 7 सप्टेंबर 2021 :- आज 7 सप्टेंबर 2021 रोजी निम्न दुधना प्रकल्पातून 4 हजार 320 क्युसेस विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव या मोठया प्रकल्पातून 97 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. पुर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिध्देश्वर पाणलोट क्षेत्रात पूर्णा नदीत 6 हजार 242 क्युसेस विसर्ग सुरु आहे. सिध्देश्वर धरणाखाली मोठया प्रमाणावर पाऊस झाल्याने पुर्णा पुलाजवळ 76 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. या सर्व नद्याचे पाणी गोदावरी नदीला मिळते. पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने विसर्गात वाढ होत आहे. सद्यस्थितीत नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण सुध्दा 100 टक्के भरले असून तेथून 3 लाख 6 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. पोचमपाड प्रकल्प धरल्याने गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो.  विष्णुपुरी प्रकल्पाच्या 12 दरवाज्यातून 1 लाख 72 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. नदीमधून येणारा येवा जास्त असला तरी विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील व विसर्ग नियंत्रित केला जाईल. तथापि संततधार पावसामूळे येव्यात मोठया प्रमाणात वाढ होत आहे. सध...

#नैसर्गिकआपत्ती#अतिवृष्टी#मुख्यालय : कंधार तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनो ; सर्व मंडळ अधिका-यांनो ; सर्व तलाठ्यांनो ; सर्व ग्रामसेवकांनो ; सर्व कृषी सहायकांनो मुख्यालयी थांबा-तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी कंधार

इमेज
  तहसिल कार्यालय,कंधार मेल tahkandhar@gamil.com संचिका क्र.: 2021/नै आ./मु.ह/कावि दुरध्वनी क्र. 02466 223424 दिनांक : 07/09/2021 मंगळवार प्रति, १. सर्व कार्यालय प्रमुख ता. कंधार २. सर्व मंडळ अधिकारी ता. कंधार ३. सर्व तलाठी ता. कंधार ४. सर्व ग्रामसेवक ता. कंधार ५. सर्व कृषी सहाय्यक ता. कंधार विषय:- मुख्यालयी उपस्थित राहणे बाबत. संदर्भ:- मा. जिल्हाधिकारी, नांदेड यांचे अतिवृष्टीच्या अनुषंगाने सुचना दिनांक ०७.०९.२०२१ उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. कंधार तालुक्यात काल पासुन मुसळधार पाऊस चालू असून त्यामूळे नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत. सततच्या पावसामुळे वित्त व जिवीत हानी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. तरी सर्व कार्यालय प्रमुख यांना यादवारे सूचित करण्यात येते की, आपण आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. सक्षम अधिकारी यांचे पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये तसेच, आपले अधिनस्त कर्मचारी यांनाही त्यांचे संबंधित गावात अतिवृष्टी बाबत गावांमध्ये सर्तकतेचा इशारा देण्याच्या सूचना दयाव्यात. जिवीत व वित्त हानी झाल्यास या कार्यालयातील नैसर्गिक आपत्त...

पत्रकार कल्याण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी समिती गठित

इमेज
  नवी दिल्ली - 3 सप्टेंबर २०२१ : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाने वरिष्ठ पत्रकार आणि प्रसारभारतीचे सदस्य अशोक कुमार टंडन यांच्या नेतृत्वाखाली एक दहा सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.ही समिती या योजनेसाठी सध्या असलेल्या मार्गदर्शक तत्वांचा आढावा घेणार असून, त्यात बदल करण्यासाठी आवश्यक त्या शिफारसी सूचवणार आहे. पत्रकारीतेच्या क्षेत्रात, अलीकडच्या काळात बदललेली परिस्थिती तसेच कोविड-19 मुळे अनेक पत्रकारांचा झालेला मृत्यू या सगळ्या पार्श्वभूमीवर, हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.     पत्रकार कल्याण योजना गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून त्याचे निकष आणि मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करण्याची गरज आहे. त्याशिवाय, अधिस्वीकृतीधारक असलेल्या व नसलेल्या पत्रकारांना या कल्याणकारी योजनेत समानतेने बघण्याची गरज असून, त्यांनाही या योजनेचे लाभ मिळवून देणे महत्वाचे आहे.     ही समिती येत्या दोन महिन्यात आपला अहवाल देणार आहे.तिच्या शिफारसींच्या आधारावर जास्तीत जास्त पत्रकारांना लाभ मिळू शकेल, अशा रीतीने नवी मा...

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हयातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याचे जिल्हाधिका-याचे विमा कंपनीस निर्देश-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे

इमेज
सोयाबीनच्या उत्पादकतेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट ; हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसुचना जिल्ह्यात लागू जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली माहिती नांदेड, दि. 3 सप्टेंबर 2021 :- नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत प्रतिकुल हवामान परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसुचना लागु केली. जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या पडलेल्या खंडामुळे सोयाबीनच्या फुलांची गळ तर शेंगा परिपक्व न झाल्याने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन आले आहे. अशास्थितीत जिल्हयातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ अधिसूचना काढण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सूचना दिल्या होत्या. विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ही अधिसुचना लागु केली आहे. नांदेड जिल्हयात 26 जुलै ते 16 ऑगस्ट या 21 दिवसाच्या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने काही भागात सोयाबीनचे नुकसान दिसून आले. जिल्हयामध्ये समितीमार्फत याबाबत सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्हया...

नागरिकांनी गणेश उत्सव व पोळा सण साधेपणाने साजरा करावा-अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे

इमेज
नायगाव :  कोविड -१९  तिसऱ्या संभावें लाटेचा विचार करून गेल्या वर्षीच्या नियमाप्रमाणेच याही वर्षीचा गणेश उत्सव म्हणजेच दिनांक  १० सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या गणेश उत्सवासाठी मागील वर्षीचेच नियम कायम करण्यात आले असून गणेश मूर्ती स्थापना व विसर्जन करताना कसल्याही प्रकारची मिरवणूक  काढण्यात येऊन नये  मिरवणुकांवर प्रशासनाने कोरोनाच्या संकटामुळे बंदी घातली  गणेश उत्सव व बैलपोळा हा सण साध्यापनाने  साजरा करावा असे मत अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी मांडले या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ.सिद्धेश्वर धुमाळ व पो.नि.अभिषेक शिंदे यांनी  आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थितांना शासनाच्या नियमावली प्रमाणेच उत्सव साजरे करा असे बोलतांना व्यक्त केले.तरुण मंडळींमध्ये वर्षभर वाट पाहून मोठ्या जल्लोषात साजरा होणारा गणेश उत्सवावर व वर्षभर शेतक-यांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राहणा-या बैलाचा आनंदाचा सण म्हणजे बैलपोळा या सणावर कोरोनाचे संकट आले आहे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.  ही साखळी तोडण्यासाढी प्रयत्न केले जात आहेत त्य...

नांदेड PRC दौ-यात झाली आर्थिक वसूली-संजय चिखले यांनी समिती प्रमुखांकडे केली तक्रार

इमेज
  नांदेड,दि 4 सप्टेंबर 2021 : पंचायती राज समिती नांदेड दौ-याचे कारण पुढे करून पंचायत समिती माहूर येथे आर्थिक वसूली झाल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.जिल्ह्यात सर्वंच पंचायत समितीत असा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भातील सखोल चौकशी करण्याची मागणी PRC समिती प्रमुख मा.संजय रायमुलकर यांच्याकडे त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्यामार्फत आज दि 4/9/2021 रोजी मेलद्वारे/What's app द्वारे करण्यात आली.     दि.2 ते 4 तारखेदरम्यान पंचायती राज समितीचा नांदेड दौरा आयोजीत करण्यात आला आहे.सदर दौ-यादरम्यान गट क्र.5 मधील भोकर,किनवट,माहूर या मार्गावरील पंचायती राज समिती दौरा व अभिलेखे तपासणी तसेच अधिका-यांची साक्ष घेणे सुरू होते. याच दौ-याचे कारण पुढे करून पं.स.माहूर अंतर्गत विभाग प्रमुखांकडे आर्थिक वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आल्याच्या चर्चा तालुक्यात रंगू लागल्या आहेत. सदर वसूली ही विभाग प्रमुख व त्यांच्या कनिष्ठ अधिका-यांवर सोपवले असल्याचे चर्चेतुन समजते.यासंदर्भात पंचायत समिती माहूरचे गटविकास अधिकारी व अधिनस्त विभाग प्रमुख, अधिकारी व काही ठराविक कर्मचारी यांच्या मार्फत वसूली करण...