🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, जुलै १३, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर स्वप्नील माने सहायक प्रादेशिक परिवहन अधिका-याला लाचखोर खाजगी इसमा मार्फत 17,600 रुपयांची लाच स्वीकारल्याबद्दल एसीबीच्या पथकाने गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले



औरंगाबाद,दि 12 जुलै 2021 : यातील फिर्यादी यांचे मोटार वाहन प्रशिक्षण केंद्र असून त्यांचे ३० प्रशिक्षणार्थीचे पक्के वाहन चालक परवाना मंजूरीकरीता लोकसेवक यांनी रू.१७,६००/- इतक्या लाचेची मागणी करून यापूर्वी खाजगी इसमामार्फत रु. १०,०००/- इतक्या लाचेची रक्कम स्विकारून उर्वरीत रु. ७,६००/- रक्कम लोकसेवक यांचे सांगणेवरून खाजगी इसम यांनी फिर्यादीकडून स्विकारली म्हणून गुन्हा नोंद.

यातील फिर्यादी यांचे औरंगाबाद येथे शासन मान्य मोटार वाहन प्रशिक्षण केंद्र आहे. सदर प्रशिक्षण केंद्रातील ३० प्रशिक्षणार्थीचे पक्के वाहन चालक परवाना मंजूरीकरीता यातील आलोसे स्वप्निल माने यांनी फिर्यादी यांचेकडून रू. १७,६००/- इतक्या लाचेची मागणी करून यापुर्वी खाजगी इसमामार्फत रु. १०,०००/- इतक्या लाचेची रक्कम स्विकारून उर्वरीत रु. ७,६००/- रक्कमेसाठी फिर्यादीकडे तगादा लावला होता.

फिर्यादी यांना लोकसेवकास उर्वरीत लाचेची रक्कम रुपये ७,६००/- इतकी लाच देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी मुंबई येथे दि. ०९/०७/२०२१ रोजी लेखी तक्रार दिली.

फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन दि. १२/०७/२०२१ रोजी औरंगाबाद येथे पडताळणी केली असता, यातील आरोपीत लोकसेवक स्वप्निल विलास माने यांनी फिर्यादी यांचेकडे त्यांचे प्रशिक्षण केंद्रातील ३० प्रशिक्षणार्थीचे पक्के वाहन चालक परवाना मंजूरीकरीता यापूर्वी रू. १०,०००/- इतक्या लाचेची रक्कम स्विकारल्याचे मान्य करून उर्वरीत रु. ७.६००/- इतक्या लाचेच्या रक्कमेची मागणी करून सदरची रक्कम खाजगी इसम अभिजीत पवार यांचेकडे देण्यास सांगितले. त्यानंतर केलेल्या सापळा कारवाई दरम्यान खाजगी इसम यास फिर्यादीकडून रु. ७,६००/- इतक्या लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले म्हणून गुन्हा नोंद.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधीत काही माहिती असल्यास अगर लाब मागणान्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागाशी संपर्क साधावा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट