🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, मे ११, २०२१

पत्रकारांच्या निवेदनाच्या अनुषंगाने पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्याबाबतचे गृहमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 


जा.क्र.मंत्री /गृह/टिप्पणी /38/2021 

मंत्री

गृह

महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

www.maharashtra.gov.in

दिनांक 11 MAY 2021 

मा.श्री मुख्यमंत्री महोदय,

स.न.वि.वि

महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील कोविड-१९ या साथरोगाच्या अनुषंगाने अनेक ज्येष्ठ पत्रकारांकडून पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्याबाबत निवेदन प्राप्त होत आहेत.

भारतातील इतर काही राज्यात पत्रकारांना त्या त्या राज्याने फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित केले असल्याचे समजते. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुध्दा विविध स्तरातून अनेक पत्रकारांकडून फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्याबाबत मागणी जोर धरु लागली आहे. महाराष्ट्र शासनाने सुध्दा सदर पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा असे माझ्या विभागाचेही मत आहे.

तरी महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील कोविड १९ या साथरोगाच्या अनुषंगाने पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्याबाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावेत, ही विनंती.

आदरपूर्वक

दिलीप वळसे-पाटील

गृहमंत्री

महाराष्ट्र राज्य

मा.ना.श्री उद्धव ठाकरे,

मुख्यमंत्री,

महाराष्ट्र राज्य, मुंबई


✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट