![]() |
| १ मे १९६०-२०२१ |
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा
वर्धापन दिन समारंभ १ मे २०२१
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक सोईआर-२०२१,३४/३०
राजशिष्टाचार शाखा ३ रा मजला,
मंत्रालय, मुंबई ४०००३२.
तारीख २८ एप्रिल, २०२१
शासन परिपत्रक
महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी (Break The Chain) व सदर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दि.१३ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये दि. १ मे, २०२१ च्या सकाळी ७.०० वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केलेले आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेवून राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच, अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत :
- जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी ८.०० वा. फक्त ध्वजारोहण करण्यात यावे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य ती व्यवस्था करावी. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये. इतर सर्व जिल्हयात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यलयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावे.
- वरील नमुद ठिकाणी केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त मुख्यालयी समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापोर/नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, आयुक्त, महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद एवढयाच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये.
- कवायती/संचलन आयोजन करण्यात येवू नये..
- विधीमंडळ, मा.उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे.
- ध्वजारोहण करणारे पालकमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय आयुक्त मुख्यालयो विभागीय आयुक्तांनी व जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे.
- आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित अंतर व इतर सर्व नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील. याची दक्षता घेण्यात यावी.
(राजेंद्र गायकवाड)
अवर सचिव,महाराष्ट्र शासन
प्रत :
मा.मुख्य सचिव,
सर्व अपर मुख्य सचिव,
सर्व प्रधान सचिव / सर्व सचिव, मंत्रालयीन विभाग,
मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव,
मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई)
प्रबंधक, मूळ न्याय शाखा. उच्च न्यायालय, मुंबई
प्रबंधक, लोक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण, मुंबई
सर्व मंत्रालयीन विभाग (मंत्रालयीन विभागाच्या खालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांना कळविण्याच्या विनंतीसह)
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, फॉर्ट, मुंबई सर्व पोलीस आयुक्त
सर्व विभागीय आयुक्त
सर्व जिल्हाधिकारी
सर्व महानगरपालिका आयुक्त,
सर्व पोलीस उप महानिरिक्षक
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
![]() |
✍✍️✍️ संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर 7767912933 सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग 👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा |


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा