निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार व नागपूर येथे स्थानांतरीत अपर मुख्य वनसंरक्षक व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांचे छायाचित्र लावून रविवारी हरिसाल येथील चव्हाण यांच्या घरासमोर होळी पेटविण्यात आली
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेला निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार व नागपूर येथे स्थानांतरीत अपर मुख्य वनसंरक्षक व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा संचालक श्रीनिवास रेड्डी यांचे छायाचित्र लावून रविवारी हरिसाल येथील चव्हाण यांच्या घरासमोर होळी पेटविण्यात आली.
हरिसाल येथील निवासस्थानासमोर रविवारी सायंकाळी श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार यांचे छायचित्र असलेले फलक होळीवर लावण्यात आले. रेड्डी याला तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर होळी पेटवून दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते, नातेवाईक, गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभागातील कर्मचारी शुभांगी देहनकर, प्रियंका खेरडे, राणी गरड, अनिता बेलसरे तिवारी, वनरक्षक एस. एम. गिरगुणे, बिसेन, पुंडकर, बेठेकर, वनरक्षक संघटनेचे इंद्रजीत बारसकर, बाळापुरे उपस्थित होते.
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांने केलाला छळ नमूद आहे. मात्र पती राजेश मोहिते यांना लिहिलेल्या दुसऱ्या चिठ्ठीत मनीषा उईके नामक महिलेचा उल्लेख करून ती तिच्या आयुष्यात कधीच सुखी राहणार नाही, तिनेच आपले आयुष्य बरबाद केल्याचे त्यात लिहिले आहे. त्यामुळे पोलिसांनी मनीषा उईके यांचा दीपाली चव्हाण यांना कोणता त्रास होता या दिशेने तपास सुरू केला आहे.
आरोपी शिवकुमारला वनात फिरविले
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याने अटकेतील निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याची धारणी पोलिस कसून चौकशी करीत आहेत. त्याने दिपाली यांना कशाप्रकारे छळले याचा शोध घेण्यासाठी त्याला रविवारी गुगामल वन्यजीव परिक्षेत्रातील काही महत्वाच्या ठिकाणी नेण्यात आले. शिवकुमार याच्यावरील गंभीर आरोपामुळे पोलिस याप्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करीत आहेत.
पूनम पाटील करणार तपास
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक पूनम पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शनिवारी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दीपाली चव्हाण प्रकरणात विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रप्रकाश मीना यांची भेट घेतली होती. त्यांनी श्रीनिवास रेड्डीवर गुन्हा दाखल करण्यासोबत प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय काळे ऐवजी सक्षम महिला अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची मागणी केली होती. यानंतर रविवारी या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक पूनम पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
रेड्डी समर्थकांना फटकारले
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अपर मुख्य वनसंरक्षक व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक श्रीनिवास रेड्डी याचा बचाव करण्यासाठी वनविभागातील काही महिला कर्मचारी व अधिकारी शनिवारी रात्री खासदार नवनीत राणा यांच्या घरी पोहोचले. त्यांना निवेदन देवून रेड्डींची चूक नसल्याचे सांगितले. मात्र या अधिकारी, कर्मचाऱ्यांना खासदार राणांच्या संतापाचे दर्शन झाले. तक्रार करूनही रेड्डींनी दुर्लक्ष केल्याने दीपाली यांचा जीव गेला. तुम्ही महिला आहात, परिस्थितीचे भान राखा, असे खडे बोल खासदार राणा यांनी सुनावले. दरम्यान, या प्रकरणात वन्यजीव संस्था, संघटना, त्यांचे पदाधिकारी व सदस्य यांनी मौन साधल्याने अमरावती जिल्ह्यातील सोशल मीडियावर रोष व्यक्त होत आहे.
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇 लेटेस्ट न्यूज अपडेट पाहण्यासाठी गुगलवर सर्च करा
सापळा कारवाई अहवालासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा