अखेर उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार निलंबित
व्याघ्र प्रकल्पाच्या दिवंगत रेंज ऑफिसर दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसंदर्भात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याविरुद्ध धारणीच्या पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणे संदर्भात कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवकुमार याला स्थानिक गुन्हे शाखेकडून नागपूर येथून अटक करण्यात आली आहे.
विनोद शिवकुमार याला तडकाफडकी गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक या पदावरून दूर केले आहे.
अमरावती : मेळघाटातील बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यास न्यायमूर्ती एम. एस. गाडे यांच्या न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद शिवकुमार हा रातोरात मेळघाटातून फरार झाला होता. मात्र अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून त्याला मोठ्या शिताफिने २६ मार्चला नागपूर रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यास अमरावती येथे आणून लगेच कालच सायंकाळी धारणी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. धारणी पोलिसांनी त्याचे जबाब नोंदवून वैद्यकीय तपासणीनंतर अटक केली होती.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी वन अधिकारी विनोद शिवकुमारला कोर्टाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीला आमच्या ताब्यात द्यावे असा आक्रमक पवित्रा स्थानिक महिलांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.
दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोपी DFO विनोद शिवकुमार विरुद्ध धारणी पोलीस स्टेशन मधे महिलांचा जन आक्रोश........
धारणी पोलीस स्टेशन समोरच आरोपीचा फ़ोटो जाळून निषेध
आरोपी शिवकुमार ला धारणी पोलिसांनी न्यायालयात पोलीस व्हॅनमध्ये न नेता.....पायी न्या अशी मागणी महिलांनी उचलून धरली. त्या मध्ये धारणीतील नगरसेविका क्षमा चोकसे.... वर्षा जैस्वाल, बंदना जाबरकर, सह RFO शुभांगी डेहनकर...महिला वनपाल,महिला वनरक्षक आणि वन विभागाचे कर्मचारी मह अप्पा पाटिल सह पन्नास च्या जवळपास महिला आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा