
पुणे : समृद्ध जीवन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या महेश मोतेवारयांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दान केलेले सोन्याचे दीड किलोचे दागिने गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ताब्यात घेतले आहेत. महेश मोतेवारने सन २०१३ मध्ये दगडूशेठ गणपतीला सोन्याचा हार त्रिशुळ, परशू असे ६० लाख ५० हजार रुपयांचे दीड किलोचे दागिने अर्पण केले होते.
धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. मोतेवारने ठेवीदारांच्या पैशातून 'दानधर्म केल्याची माहिती सीआयडीच्या तपासात समोर आली होती.
समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने देशभरातील लाखो गुंतवणूकदारांना तब्बल २ हजार ५१२ कोटींचा गंडा घातला आहे. या प्रकरणी मोतेवारची २०७ कोटींच्या संपत्तीवर ईडीने आणली आहे. या प्रकरणात मोतेवारला सन २०१५ मध्ये अटक करण्यात आली आहे.
'दगडूशेठ न्यासा'च्या विश्वस्तांनी संपूर्ण सहकार्य करुन हे दागिने सीआयडीकडे सुपूर्द केले.
- दगडूशेठ न्यासाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी 'लोकमत ला सांगितले, गोरगरिबांचा तळतळाट घेऊन अर्पण केलेले दागिने बाप्पाही स्वीकारणार नाही. अशी आमची भावना आहे. बाप्पाला कोणी काही अर्पण करत असेल, त्यावेळी तो कोण आहे, याची माहिती आम्हाला नसते.
- भावना आणि कायदा यांच्यात गल्लत करता कामा नये. आम्ही कायदेशीर मागनि कार्य करतो. धर्मादाय आयुक्त हे आमचे प्रमुख आहे. त्यांच्या आदेशानुसार आम्ही दागिने 'सीआयडीच्या ताब्यात दिले.
https://www.dagdushethganpati.com/
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा