🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

सोमवार, मार्च ०१, २०२१

अधिकारी बंधुभगिनींनो, कार्यसंस्कृती अभियान-सर्वांच्या विकासासाठी...!_जनमानसात अधिकाऱ्यांबाबत नकारात्मक भावना दिसून येते.याचा अर्थ,आपली कार्यपध्दती सदोष तर नाही ना,याचे कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे._महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ


 अधिकारी बंधुभगिनींनो,

७ वा वेतन आयोग, केंद्राप्रमाणे महागाई भत्ते ; ५ दिवसांचा आठवडा; सेवानिवृत्तीचे वय व रिक्त पदे भरणे, या रास्त मागण्यांचा पाठपुरावा करतानाच, बहुसंख्य अधिकारी कार्यालयीन कामकाजही तेवढयाच तत्परतेने करतात. तरीही, जनमानसात अधिकाऱ्यांबाबत नकारात्मक भावना दिसून येते.याचा अर्थ, आपली कार्यपध्दती सदोष तर नाही ना,याचे कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

काही अधिकारी त्यांच्याकडे येणाऱ्या सामान्य नागरिकांना आस्थेवाईकपणे मार्गदर्शन करीत नाहीत; त्यांना छोट्या-छोट्या कामांसाठी वारंवार हेलपाटे घालायला लावतात. अशी अधिकाऱ्यांबाबतची जनमानसात भावना आहे. जनतेच्या मनातील ही धारणा दूर करणे सर्वांच्याच दूरगामी हिताचे आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, लोककल्याणकारी योजनांची प्रभावीरीत्या अंमलबजावणी आणि प्रशासन पारदर्शक व लोकाभिमुख ठेवण्यासाठी सर्वच अधिकारी कर्तव्यदक्ष आहेत, याची वस्तुनिष्ठ प्रचिती नागरिकांना आणून देणे गरजेचे आहे. आपली कार्यपध्दती संवेदनशील' ठेवली, तर ही बाब अशक्य नाही. कार्यालयप्रमुखाने आपापल्या कार्यालयात एका अधिकाऱ्याकडे 'स्वागत अधिकारी' ही जबाबदारी सोपवावी. जनसंपर्क व सामाजिक कार्याची आवड असलेल्या अधिकाऱ्यांना यासाठी नेमावे. या अधिकाऱ्याची बैठक व्यवस्था कार्यालयीन दर्शनी भागात करावी. तेथे 'अभ्यागत स्वागत कक्ष' असा फलक लावावा.

कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या अधिकाऱ्याने सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेने मार्गदर्शन करावे. 'प्रामाणिक जनसेवा' हे आपले ध्येय असायलाच हवे. शासकीय अधिकारी जनतेची कामे तत्परतेने करण्यात पुढाकार घेतात; असे ठळकरीत्या जाणवले पाहिजे, असे अधिकारी नागरिकांना आवडतात. चांगल्या कामाबद्दल वरिष्ठांची प्रशस्तीपत्रे आपल्याला मिळतातच. पण, ज्यांना जनतेकडून प्रशस्तीपत्रके मिळतात, तेच अधिकारी प्रशंसेचे हकदार ठरतात. कामाबद्दल जनतेकडून तक्रारी न येणे, हेच आपल्या कार्यक्षमतेचे प्रशस्तीपत्रक आहे.

राज्याचे मुख्यमंत्री या विधायक भूमिकेस शुभेच्छा देताना म्हणतात, "प्रशासन हे लोकांप्रती जबाबदार असले पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाची जबाबदारी आपल्या शिरावर आहे, या विश्वस्त भावनेने या यंत्रणेतील सर्व संबंधित घटकांनी सकारात्मक संवेदनशीलतेने काम करणे अपेक्षित आहे. गतीमान व पारदर्शक प्रशासन आपला प्राधान्याचा विषय असून, 'लोकसेवा हक्क कायदा लागू करण्यामध्ये सरकारची हिच भूमिका आहे. ती सार्थ ठरविण्यासाठी अधिकारी महासंघाने सहयोग द्यावा, अशी अपेक्षा आहे." शासनप्रमुखांची ही अपेक्षा पूर्ण करण्याचा संकल्प आजच करु या!


आपले,

ग.दि.कुलथे-मुख्य सल्लागार

विनोद देसाई-अध्यक्ष

डॉ सोनाली कदम-अध्यक्ष_दुर्गा महिला मंच

नितीन काळे-कोषाध्यक्ष

समिर भाटकर-सरचिटणीस


👇 महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची वेबसाईट

www.adhikarimahasangh.com


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट