
सांगोला (सोलापूर ) : येथील लोकप्रिय दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब रज्जाक मुजावर यांनी साहित्यिक दबडे यांची आदर्श सेवा सन्मान साहित्य पुरस्कारासाठी निवड झालेबाबत पत्राने दबडे यांना कळविले आहे .
रविवार २१ मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत जिजामाता मल्टीपर्पज हॉल धायटी येथे पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे . यावेळी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविले जाणार आहे .
गेल्या आठवड्यात दबडे यांना नाशिकच्या तेजस फाऊंडेशनचा समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे .
दबडे यांची हाराटीची भुई , उन्हातल्या सावल्या , शिक्षणाचा टिळा , गावपांढरीच्या कविता ही पुस्तके प्रसिद्ध असून त्यांना आतापर्यंत अनेक साहित्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे . शिक्षक परिषदेच्या व माध्यमिक शिक्षक संघाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारानेही दबडे यांना गौरविण्यात आले आहे .
समाजातली अंधश्रद्धा दूर व्हावी , समाजात नवा विज्ञान विचार रुजावा म्हणून त्यांनी आतापर्यंत शेकडो सहप्रयोग व्याख्याने दिली आहेत . शासकीय ग्रंथ महोत्सवातून निमंत्रित कवी , व्याख्याते तसेच डोंबिवली मुंबई येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांची निमंत्रित कवी म्हणून निवड झाली होती .
लांजा राजापूर नागरिक संघामार्फत आयोजित ग्रामीण साहित्य संमेलनात दोन वेळा कवी संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती . जागुष्टे कुवारबाव तसेच कोंडये (कोकण) येथे भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे दबडे यांनी भुषविली आहेत .
ग्रामीण तसेच बालकुमार साहित्य संमेलनांचे संयोजनही दबडे यांनी केले आहे .
दैनिक पुढारी , दैनिक लोकमत , दैनिक रत्नागिरी टाईम्समध्ये पत्रकार म्हणून काम करून त्यांनी अनेक सामाजिक विषयांना वाचा फोडली आहे .
आकाशवाणी व दूरदर्शनवरून त्यांचे अनेक समाजप्रबोधनपर तसेच साहित्यिक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत .
साहित्यिक दबडे हे आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी गावचे आहेत . त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा