प्रेसनोट 1378
कल्याण डोबिवली महानगरपालिका येथील अतिक्रमण कामगार व प्रभाग अधिकारी यांना लाचेची मागणी व स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग घटक - ठाणे
- गुन्हा नोंद क्रमांक - निरंक
- कलम - नरंक
- लोकसेवकाचे नाव व कार्यालय - १) सुहास दत्तु मढवी वय ५० वर्षे अतिक्रमण कामगार,क प्रभाग और कार्यालय,कल्याण डोबिवली महानगरपालिका, कल्याण, २) भागाजी सखाराम भांगरे, वय -५६ वर्षे प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी,क प्रभाग क्षेत्र कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका,कल्याण.
- मागीतलेल्या लाचेची रक्कम - तडजोडी अंती १५,०००/- पंधरा हजार रुपये.
- स्विकारलेली लाचेची रक्कम - १५,०००/-रू पंधरा हजार रुपये.
थोडक्यात हकिकत - यातील तक्रारदार याने घराचे नवीन बाधकामावर पुढील कायदेशीर कारवाई न करणेकरीता यातील लोकसेवक क १ व २ यानी तक्रारदार यांचेकडे २०.०००/- रु. लाचेच्या रक्कमेची मागणी केली होती,
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. ०८/०३/२०२१ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान नमुद दोन्ही लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती १५,०००/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे दि. १५/०३/२०२१ राजी ठाणे युनिटने सापळयाचे आयोजन केले असता, लोकसेवक क्रमांक : १) सुहास दत्तु मढवी याने तक्रारदार यांचेकडुन नमुद १५,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारली असतांना त्याला ओम चैतन्य गगनगिरी,नाथाय नमः टि अन्ड स्नॅक्स सेटर,सर्वोदय गार्डन शॉप नं.२६,कल्याण पश्चिम येथे रंगेहात पकडण्यात आले आहे तसेच प्रस्तुत प्रकरणी लोकसेवक भागाजी सखाराम भांगरे याला,क प्रभाग क्षेत्र कार्यालय, कंडोमपा येथुन त्याचे कार्यालयातुन ताब्यात घेण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना अहवान करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,ठाणे परिक्षेत्र ठाणे यांचेशीशी संपर्क करावा.
संपर्क - ला.प्र.विभाग,ठाणे मध्यवर्ती कारागृहासमोर,ठाणे पश्चिम, ४००६०१
संकेतस्थळ - www.acbmaharashtra.gov.in
ई-मेल - spacbthane@mahapolice.gov.in
ऑनलाईन तकार अप्लीकेशन - www.acbmaharashtra.net
टोल फ्री न. - 1064
दुरध्वनी क्रमांक - ०२२- २०८१३५९८/ २०८१३५९९
व्हॉटस् अँप नं. - ९९३०९९७७००
(चंद्रमोहन दुबे)
पोलीस उप अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो,ठाणे.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा