🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

सोमवार, फेब्रुवारी २२, २०२१

गडगा अपहार प्रकरण पोचले विधानसभेत-ग्रामसेवक पठाण यांनी २० लाखांचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न

 


नायगाव (दि.२० फेब्रुवारी) : ग्रामसेवक एम.ए. पठाण यांनी १५ महीण्याच्या काळात गडगा ग्रामपंचायतमध्ये तब्बल १७ लाखांच्या वर १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील रक्कमेचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झालेले असताना गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे सदरचे प्रकरण थेट विधानसभेत पोहचल्याने भ्रष्ट ग्रामसेवकाला पाठीशी घालणाच्या पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, गुन्हा नोंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

मागच्या पाच वर्षापासून गडगा ग्रामपंचायतीच्या कारभा-यांनी  भ्रष्टाचार करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसह १४ व्या वित्त आयोग आणि दलित वस्तीच्या कामातील अनियमितता व अर्थिक अपहारप्रकरणी यापूर्वी पाच ग्रामसेवकावर गुन्हे नोंद झाल्यानंतर गडगा ग्रामपंचायतमधील अपहार थांबेल असे वाटत असताना पुन्हा एम.ए. पठाण यांनी अपहार केल्याची घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.

ग्रामसेवक पठाण यांनी अपहार तर केला पण चौकशी करण्यासाठी गेलेल्या विस्तार अधिका-याला अभिलेखेही उपलब्ध करून दिले नाहीत. तर दुसरीकडे तातडीने चौकशी होण्यासाठी गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या प्रकरणी चौकशी होण्यासाठी बराच विलंब झाला. 

सदर प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी ४ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाखल करुन अपहार करण्यात आलेली रक्कम प्रचलीत नियमानुसार वसूल करण्याऐवजी निलंबनाची कारवाई करून मोकळे झाले. गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी भ्रष्ट ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याने आमदार राजेश पवार यांनी हा प्रश्न थेट विधानसभेत उपस्थित केला. त्यामुळे पंचायतीतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून वरिष्ठांना उतर देण्याबरोबरच फौजदारी कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सदर प्रकरणी गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्य जनतेच्या, गोरगरीब जनतेच्या,शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे राजेश पवार यांनी म्हटले आहे.

कोणतीही शासकीय /सरकारी योजना ही प्रशासनाच्या कर्तव्यदक्ष सहभागाशिवाय अमलात येऊ शकत नाही . बहुतांश अधिकारी / कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करित असतात परंतु त्यातील काही मोजके मात्र भ्र्रष्टाचाराचा कळस गाठतात .त्यामुळे माझ्या नायगाव विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या अधिकारी / कर्मचारी वर्गावर अंकुश आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही .


👇 महाराष्ट्र शासनाची वेबसाईट/संकेतस्थळ

www.maharashtra.gov.in

👇जिल्हा परिषदेची वेबसाईट

www.zpnanded.in

👇 जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट

www.nanded.gov.in

👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट