🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, फेब्रुवारी २३, २०२१

न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक/प्राचार्य गुलाब पिंजारी ३ हजाराची लाच घेताना चतुर्भुज

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कॅम्प साकी

दि. १७/०२/२०२१

प्रेस नोट

लोकसेवक गुलाब नथ्थु पिंजारी,वय-५५ वर्ष, प्राचार्य/मुख्याध्यापक, न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविदयालय, पिंजार झाडी ता.साकी. जि.धुळे यानी तकारदार यांचेकडे पहिला हप्ता ३,०००/ रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्विकारली म्हणुन गुन्हा..

तक्रारदार यांचे वडिल हे न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविदयालय, पिंजारझाडी ता. साकी येथुन सेवानिवृत्त होत असल्याने, त्यांचा सेवानिवृत्तीनंतरचा पेंशन प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय, धुळे येथे सादर करणेसाठी व प्रस्तावावर सहया करण्याच्या मोबदल्यात आलोसे गुलाब नथ्थु पिंजारी यांनी ८,०००/ रुपये लाचेची मागणी केली होती म्हणुन तकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तकार केली होती.स

सदरतकारीचे अनुषंगाने आज रोजी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक गुलाब नथ्थु पिंजारी यांनी तडजोडी अंती पंच साक्षीदार यांच्या समक्ष पहिला हप्ता म्हणुन ३०००/-रुपयाची मागणी केली. त्या अनुषंगाने सापळा कारवाई केली असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून आज रोजी पंचांसमक्ष ३०००/ रुपये ( पहिला हप्त) लाच स्विकारतांना त्यांना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

सदर लाचेची मागणी संदर्भाची कारवाई मा.पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुनिल कुराडे, पोनि/प्रकाश झोडगे, पोनि/मंजितसिंग चव्हाण, व त्यांच्या पथकातील पोहेकॉ/जयंत साळवे, पोना/संतोष हिरे, संदीप सरग, राजन कदम, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, शरद काटके, प्रकाश सोनार, पोको/प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, संदीप कदम, भुषण शेटे, सुधीर मोरे अशांनी सदरची कारवाई केलेली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे मार्फत सामान्य जनतेस आवाहन करण्यात येते की, ज्यांच्या कडे शासकीय कामा करीता शासकीय अधिकारी/कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास त्यांनी तात्काळ खालीलक्रमांकावर संपर्क साधावा.

फोन नं. ०२५६२/२३४०२० टोल फ्री नं.१०६४

भ्रमणध्वनी न ८७६६८५८६५२

Website : www.acbmaharashtra.gov.in.

Mobile App : www.acbmaharashtra.net Facebook Page: www.facebook.com/MaharasthraACB

(सुनिल कुराडे)

पोलीस उप अधिक्षक,

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे

👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट