अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण
![]() |
| 🚩नाचू किर्तनाचे रंगी🚩 |
मरवाळी,(दि.१९ फेब्रुवारी) : नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे १९ फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,रामकथेला सुरुवात झाली आहे,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सात दिवस अखंडपणे नामांकित किर्तनकारांचे मि.मा.शु. ७ शके १९४२ दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोज शुक्रवार ते मि.मा.शु. १४ शके १९४२ दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत संध्याकाळी ९:०० वा. किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणा व राम कथेसाठी प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प श्री श्रीधर महाराज कासराळीकर यांना बोलावण्यात आले आहे.सप्ताहाच्या निमित्ताने गावक-यांच्या वतिने गावातील व आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांना या नामसंकीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा
पहाटे : ०४ ते ०६ - काकडा भजन
सकाळी : ०७ ते १० - ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण
सकाळी : १० ते १२ - गाथा भजन
दुपारी : ०२ ते ०५ - श्रीराम कथासार
रात्री : ०९ ते १२ - हरी किर्तन
किर्तनकार
१)१९-०२-२०२१-शुक्रवार- ह.भ.प श्री नरसिंग महाराज केरुरकर
२)२०-०२-२०२१-शनिवार- ह.भ.प श्री मनोहर महाराज वसुरकर
३)२१-०२-२०२१-रविवार- ह.भ.प श्री अप्पा महाराज सुर्यवंशी बारामती
४)२२-०२-२०२१-सोमवार- बाबु महाराज काकांडीकर
५)२३-०२-२०२१-मंगळवार- ह.भ.प श्री माऊली आळंदीकर
६)२४-०२-२०२१-बुधवार- ह.भ.प श्री दत्ता महाराज वळसगवाडी
७)२५-०२-२०२१-गुरुवार- ह.भ.पु श्री नामदेव महाराज दापकेकर
काल्याचे किर्तन
२६-०२-२०२१-शुक्रवार- ह.भ.प श्री गुरुराज महाराज देगलूरकर
सकाळी १० ते १२
महाप्रसाद
दिनांक २६-०२-२०२१ रोज शुक्रवार काल्याच्या किर्तनानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, समस्त गावकरी व परिसरातील भाविक भक्तांना गावकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.
सात दिवसाचे अन्नदाते
पारायण करते, भजनी, गायक, मृदंग वादक, कथाकार , विणेकरी यांना सकाळी एकाकडे फराळ , संध्याकाळी दुस-याकडेे जेवन
ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख - ह.भ.प श्री श्रीधर महाराज कासराळीकर
श्रीराम कथाकार - ह.भ.प श्री श्रीधर महाराज कासराळीकर
विणेकरी - ह.भ.प श्री परशुराम महाराज भाटापुरकर
परिपाठ प्रमुख - ह.भ.प श्री परशुराम महाराज भाटापुरकर
मृदंगवादक - ह.भ.प श्री संजय पवळे गोणारकर,ह.भ.प श्री तुकाराम महाराज चांडुळकर,श्री हणमंत पवळे,श्री परमेश्वर पांचाळ
काकडा प्रमुख - श्री रामकिशन चोंडे शेळगावकर
गायक प्रमुख - ह.भ.प श्री परशुराम महाराज भाटापुरकर ,श्री सदाशिव महाराज गडगेकर , श्री भगवान मुगावकर, श्री आबाजी मुळगावकर , श्री माधव गडगेकर , श्री संजय मोकासदरेकर , श्री शिवाजी पांचाळ , श्री राम जाधव , सौ पुष्पाताई केरुरकर
भजणी मंडळ - गडगा , मोकासदरा , मुगाव , टाकळी , रातोळी , कांडाळा , वडगाव
सप्ताह स्थळ - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मरवाळी ता.नायगाव (खै.) जि.नांदेड
विनित - समस्त गावकरी मंडळी मौजे मरवाळी
मंडप डेकोरेशन - जय मल्हार डेकोरेशन मरवाळी
नोट - मरवाळी हे गाव नरसी-मुखेड हायवे आलुवडगाव पाटी पासून पूर्वेस २ कि.मी अंतरावर आहे.धन्यवाद
![]() |
| पहिल्या दिवशी किर्तनरुपी सेवेकरीता घेतलेला अभंग |
https://drive.google.com/file/d/1ERUxJO9-lXYSQRhaiBV0EZ3Qejs-UMqd/view?usp=drivesdk
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
www.nandednewsupdate.blogspot.com












कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा