🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, फेब्रुवारी १७, २०२१

शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांसाठी खुशखबर-बॅंक खाते जास्त काळ वापरात नसले तरी ते बंद करता येणार नाहीत_अल्पसंख्यांक विकास विभाग महाराष्ट्र शासन


मुंबई,(दि. १६ फेब्रुवारी) : शिष्यवृत्तीसाठीची विद्यार्थ्यांची बँक खाती जादा काळ वापरात नसली तरी ती बंद करता येणार नाहीत. शिवाय अशा खात्यांमध्ये किमान रक्कम (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याबाबत आग्रह करता येणार नसल्याच्या आरबीआयच्या सूचना. शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक - अल्पसंख्याक विकास विभागाची माहिती

शिष्यवृत्तीचा लाभ घेणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक यांच्या माहितीसाठी आवाहन 

  • असे निदर्शनास आले आहे की, शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची बँक खाती ही बँकांमार्फत निष्क्रीय (Dormant) करण्यात आली आहेत. खात्यामध्ये किमान रक्कम (मिनीमम बॅलन्स) नसल्याने तसेच खाते दीर्घकाळ वापरात नसल्याने ते बँकांमार्फत निष्क्रीय (Dormant) करण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

  • पण आरबीआयच्या निर्देशानुसार बँकांची ही कृती योग्य नाही.

  • शिष्यवृत्तीचा लाभ मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची बँक खाती ही मिनीमम बॅलन्स तसेच टोटल क्रेडीट लिमीट या अटींपासून मुक्त असली पाहिजेत, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरबीआयने दिल्या आहेत.

  • विद्यार्थ्यांची खाती ही झीरो बॅलन्सच्या कॅटेगरीमध्ये असणे आवश्यक असून एखाद्या विद्यार्थ्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम (मिनीमम बॅलन्स) नसल्याची सबब देऊन बँकांनी त्या खात्यातील देवाण-घेवाण (ट्रान्झॅक्शन) थांबविणे चुकीचे आहे.

  • तसेच विद्यार्थ्यांची बँक खाती जादा काळ वापरात नसली तरी ती बंद करता येणार नाहीत. शिवाय अशा खात्यांमध्ये किमान रक्कम (मिनीमम बॅलन्स) ठेवण्याबाबत बँकांमार्फत केला जाणार आग्रहही आरबीआयने दिलेल्या सुचनांनुसार चुकीचा आहे.

  • तथापी, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे बँक खाते संबंधीत योग्य product code मध्ये खोलणे आवश्यक आहे.
  • तसेच, विद्यार्थ्यांचे खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
  • यासंदर्भातील अर्जाचा नमुना माहितीस्तव सोबत जोडला आहे. शिष्यवृत्तीचा लाभ घेणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक यांनी उपरोक्त बाबीची नोंद घ्यावी.

अल्पसंख्याक विकास विभाग,महाराष्ट्र शासन





👇महाराष्ट्राच्या अल्प संख्यांक विकास विभागाची वेबसाईट

https://mdd.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx

👇Aaple Sarkar DBT (MAHADBT) website

https://mahadbtmahait.gov.in/home/index

👇आपले सरकार वेबसाईट/संकेतस्थळ

aaplesarkar.mahaonline.gov.in

👇MAHA-IT website

https://mahait.org/

👇 महाराष्ट्र शासनाची वेबसाईट/संकेतस्थळ

www.maharashtra.gov.in

👇Deputy Director of Education,Pune 

http://www.dydepune.com/circular.asp 

 👇कॅबिनेट व राज्य मंत्री,अल्पसंख्याक विकास विभाग

  1. श्री. नवाब मलिक

मा. मंत्री, अल्पसंख्याक विकास व वक्फ, कौशल्य विकास व उद्योजकता

  1. डॉ. विश्वजीत कदम

मा. राज्यमंत्री, अल्पसंख्याक विकास व वक्फ,सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, मराठी भाषा

  • सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक

अशा सर्वसमावेशक विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न करणे.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


२ टिप्पण्या:

संजय ब्रम्हानंद पाटील चिखले म्हणाले...

वाचकांना विनंती
बातमीत त्रुटी असेल तर आवश्य कळवावे
🙏
आपला शुभचिंतक
पत्रकार
संजय ब्रम्हानंद पा.चिखले मरवाळीकर
७७६७९१२९३३,7767912933
sanjaybchikhale@gmail.com

संजय ब्रम्हानंद पाटील चिखले म्हणाले...

वाचकांना विनंती
बातमीत त्रुटी असेल तर आवश्य कळवावे
🙏
आपला शुभचिंतक
पत्रकार
संजय ब्रम्हानंद पा.चिखले मरवाळीकर
७७६७९१२९३३,7767912933
sanjaybchikhale@gmail.com

Popular posts लोकप्रिय पोस्ट