🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, जुलै १४, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक 7,50,000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून दोन्ही लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या



सोलापूर : रोहन पंढरीनाथ खंडागळे, व्यवसाय नोकरी, सहायक पोलीस निरीक्षक व संपत नारायण पवार, पोलीस निरीक्षक दोघे नेमणुक सलगरवस्ती पोलीस ठाणे सोलापूर शहर यांच्यावर रु १,००,००००/- रु लाचेची मागणी करून तडजोडी अंती ७,५०,०००/- रु ची लाच मागणी करून ती स्विकारल्याने गुन्हा दाखल.

यातील तक्रारदार हे कॉन्ट्रेक्टर असुन से सोलापूर जिल्हयात ठिकठिकाणी छोटेमोठे रोडचे कॉन्ट्रेक्ट घेत असतात. रोडचे कामाकरीता तक्रारदार यांचेकडे एकूण ०८ मोठे डंपर असुन तक्रारदार यांना डोणगाव परिसरात ०४ कि.मी. रस्त्यावर मुरुम भरण्याचे फॉन्ट्रेक्ट दिले होते. दरम्यान यातील तक्रारदार यांनी परवानगीशिवाय शेतामधील मुख्य चोरुन नेले असलेबाबतच्या तक्रारीवरुन तक्रारदार यांविरुद्ध यस्तो पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल झाला होता.

तक्रारदार यांचे विरुद्ध दाखल गुन्हयाचा तपास यातील आरोपी सपोनि खंडागळे यांचेकडे होता. सदर दाखान गुन्हयात जप्त करण्यात आलेले तक्रारदार यांचे डंपर सोडविण्याकरीता तसेच तक्रारदार यांना अटक न करता गुन्हयाचे तपासात मदत करण्यासाठी यातील वरील नमुद दोन्ही लोकसेवक यांनी संगनमताने तक्रारदार यांचेकडे प्रथम १०,००,०००/- रु लाचेची मागणी करून तडजोडी अंती रु ७,५०,०००/- लाचेची मागणी केली व सदरची लाच रक्कम यातील लोकसेवक सपोनि खंडागळे यांनी संभाजी महाराज पुतळा, पुणे नाका, सोलापूर येथे स्विकारली असता आरोपी खंडागळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तसेच आरोपी लोकसेवक पोलीस निरीक्षक पवार यांना चौकशी कामी ताब्यात घेथून यातील दोन्ही आरोपो लोकसेवक यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

संपर्क पत्ता पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक, सोलापूर.

✍️✍️✍️

 पत्रकार

संजय ब्रम्हानंद चिखले पाटील मरवाळीकर

7767912933

 📱 _वरील नावाने नंबर सेव्ह करा_ _व आपल्या कडील सर्व ग्रुपमध्ये समाविष्ट करा_ 

💁‍♂️ _ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा_

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट