🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

रविवार, फेब्रुवारी १४, २०२१

राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षात फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय–पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार


 नागपूर, (दि.१४ फेब्रुवारी) : शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून राज्यातील प्रत्येक तालुक्यात २०२२ पर्यंत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गंत नागपूर विभागात १५ फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांचा जिल्हा परिषद प्रांगणात हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर आदी यावेळी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात नागपूर विभागात फिरत्या 15 पशुवैद्यकीय रुग्णालयांचा आज प्रारंभ करण्यात आला असून, यातील तीन रुग्णालये जिल्ह्यात असतील. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. पशुसंवर्धन विभागाने रुग्णालये सुरु करुन नवीन पर्वाला आज प्रारंभ केला आहे. शेतकरी, पशुपालकांचे पशुधन निरोगी ठेवण्याला या विभागाने महत्त्व दिले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषि आणि कृषीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे फिरते पशुवैद्यकीय रुग्णालये ही विभागाची नितांत गरज होती. ती आज पूर्ण करत असल्याचे सांगून येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक तालुक्यात ही रुग्णालये सुरु होणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.

ग्रामीण भागात अशा प्रकारची रुग्णालये सुरु करत असून अद्यापही अशी रुग्णालये प्रत्येक गावात नाहीत. त्यामुळे आजारी पशुधनाला रुग्णालयापर्यंत नेणे मोठे अडचणीचे असते. आता शेतकऱ्यांची ही समस्या सुटणार असून, 1962 या नि:शुल्क टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, वैद्यकीय पथकासह हे फिरते रुग्णालय शेतकऱ्याच्या बांधावर पोहचणार असून, ‘शासन आपल्या दारी’ योजना सुरु होत असल्याचे समाधान मंत्री श्री. केदार यांनी व्यक्त केले.

असा होणार शेतकऱ्यांना फायदा

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गंत फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णाल बअयांच्या माध्यमातून आता थेट आजारी पशुरुग्णांवर शेतक-यांच्या दारात उपचाराची सुविधा मिळणार आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून रोगप्रतिबंधक लसीकरण करता येणार आहे. तसेच उच्च उत्पादक क्षमता असणा-या वळूंच्या रेतमात्रा वापरून कृत्रिम रेतनाचीही सोय शेतक-यांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे. तसेच शेतक-यांना पशुआहार व आरोग्याबाबत तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत मार्गदर्शन करण्याचीही व्यवस्था उपलब्ध करुन देणार असून शासनाच्या विविध योजनांची माहितीसुद्धा हे पथक देणार असल्याचे मंत्री श्री. केदार म्हणाले.

''बर्ड फ्ल्यूपेक्षा अफवांमुळे जास्त नुकसान''

राज्यात बर्ड फ्ल्यू आटोक्यात आला असून, बर्ड फ्ल्यूने माणसांना कोणताही धोका नाही. अद्याप या आजाराने कोणीही दगावला नाही, असे सांगून श्री. केदार यांनी एका पक्षाला बर्ड फ्ल्यूची लागण झाल्यास 48 तासात त्याच्या पोल्ट्री फार्मचे मोठे नुकसान होते. मात्र त्यापेक्षा जास्त नुकसान समाजमाध्यमांवरील अफवांमुळे होते. भारतीय खाद्यसंस्कृती ही जगात सर्वाधिक सुरक्षित असून, पूर्णत: शिजविलेले चिकन बिनधास्त खाण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच मांसाहारी नागरिकांमधील भिती काढून टाकण्यासाठी त्यांनी नुकतेच ‘चिकन फेस्टीव्हल’चे आयोजन केले होते, याची माहितीही त्यांनी दिली. कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना नाममात्र दरात पक्ष्यांचा विमा उतरविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींच्या गडकोट-किल्ल्यांना 'ब' वर्ग पर्यटनाचा दर्जा का?एवढे पाप सरकार कुठे फेडणार

अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धनला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा

मुंबई, (दि. १३ फेब्रुवारी) : रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन या पर्यटनस्थळांना ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. मंत्री श्री. ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून मुंबई, पुण्यापासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील या पर्यटनस्थळांच्या विकासास चालना देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या पर्यटनस्थळांना आता ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने शासनामार्फत येथे विविध पर्यटन सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येईल. यामुळे येथील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील अलिबाग हे विस्तृत समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. समुद्रातील शिवकालिन ऐतिहासिक कुलाबा किल्ला, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांची समाधी, १५० वर्षे जुनी ब्रिटीशकालीन वेधशाळा, श्रीकनकेश्वर, श्रीसिद्धेश्वर, श्रीरामेश्वर, श्रीबालाजी मंदिर, श्री काशी विश्वेश्वराचे मंदीर इत्यादी शिवकालीन पुरातन मंदीरे, ज्यू समाजाचे प्रार्थना मंदीर, हिराकोट किल्ला व तलाव, खांदेरी व उंदेरी किल्ले इत्यादी ऐतिहासिक पर्यटनस्थळे येथे आहेत.

मुरुड – जंजिरा नगरीची भौगोलिक स्थिती आकर्षित करणारी आहे. शहरात प्रवेश करतानाच नवाबी नजाकतीचा राजवाडा दृष्टीस पडल्यानंतर पुढे अथांग अरबी समुद्र आहे. समुद्रात पद्मदूर्ग आणि विलोभनीय मुरुड समुद्र किनारा दृष्टीस पडतो. शहराच्या वेशीवर श्री कोटेश्वरी ग्रामदेवतेचे तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री भोगेश्वर मंदीर तसेच श्री लक्ष्मी नारायण व इतर पुरातन मंदीरे आहेत. मुरुड – जंजिरा हा ऐतिहासीक जलदुर्ग असून या जलदुर्गास देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. जवळच असलेले फणसाड अभयारण्य आणि खोकरी टॉम्ब हेही पर्यटकांची आकर्षणस्थळे आहेत.



श्रीवर्धन नगरपरिषद क्षेत्रात कालभैरव, जीवनेश्वर, सोमजादेवी, कुसुमावती इत्यादी देवस्थाने व पेशवे मंदीर इत्यादी वास्तू पेशवाई किंवा त्या अगोदरच्या काळातील आहेत. तसेच श्रीवर्धन येथे सुमारे ४ किमी लांबीचा समुद्र किनारा असून येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात.

राज्य शासनामार्फत कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत बीच शॅक धोरण मंजूर करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील वर्सोली समुद्रकिनारा आणि श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्याचा विकास करण्यात येणार आहे. कोकणातील इतर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांचाही या धोरणांतर्गत विकास करण्यात येणार आहे. सिंधुदूर्गमध्ये हॉटेल ताज ग्रुप गुंतवणूक करत असून चिपी विमानतळही लवकरच सुरु होत आहे. आता रायगड जिल्ह्यातील ३ पर्यटनस्थळांना ब वर्गाचा दर्जा देण्यात येत असून या पर्यटनस्थळांना या दर्जाप्रमाणे सोयी-सुविधा व निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

जगाच्या पोशिंद्याला ७/१२ उता-यावर नोंद घेण्यासाठी तलाठ्याने ४०,००० मागितले,२०,००० लाच घेताना जेरबंद


 प्रेसनोट

दि.१३/०२/२०२१

सज्जा कोरेगांव भिमा ता. शिरूर जिल्हा पुणे येथील तलाठी व खाजगी इसमावर लाच स्वीकारले प्रकरणी कारवाई.

पुणे घटक

शिक्रापूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गु.र.नं. १०५/२०२१

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम - ७, ७ अ आरोपी :-१) लोकसेवक अश्विनी दत्तात्रय कोकाटे,वय -३२, वर्षे, पद - तलाठी, सजा कोरेगांव भिमा तलाठी कार्यालय, ता. शिरूर जिल्हा पुणे. 

२) निवृत्ती लक्ष्मण कानगुडे, वय २९ वर्षे,खाजगी इसम


पडताळणी :- दिनांक १२/०२/२०२१

सापळा दिनांक :- दिनांक १२/०२/२०२१

यातील तक्रारदार यांचे ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदणीसाठी व जमिन वाटपाची नोंद करण्यासाठकरीता तक्रारदार यांच्याकडे ४०,०००/- रूपये लाच मागणी करून त्यातील २०,०००/- रूपये आरोपी लोकसेवक हिने स्वीकारली व २०,०००/- रूपये खाजगी इसमाने स्वीकारली. शिक्रापूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास श्रीमती ज्योती पाटील, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. पुणे युनिट या करत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. राजेश बनसोडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. 

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त/पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.

१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४

२. अॅन्टीकरप्शन व्युरो, पुणे -दुरध्वनी क्रमांक - ०२० - २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३

३. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे ७८७५३३३३३३

४. व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई - ९९३०९९७१७०० ५. ई-मेलआयडी- पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in

६. फेसबुकपेज- www.facebook.com-maharashtraACB ७. वेबसाईट- www.acbmaharashtra.gov.in


(श्रीहरी पाटील)

सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उपअधीक्षक (प्रशासन) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

धक्कादायक! स्वतःवर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या


नवी मुंबई,( १४ फेब्रुवारी)– एपीएमसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. रविवारी म्हणजेच आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. 
त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस ठाण्यात आल्यानंतर ते स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन बसले. त्यानंतर काही वेळाने गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असता हा प्रकार उघड झाला .दरम्यान पवार हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. यामुळे ते सतत शांत रहायचे. यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे तणावाच्या करणाबाबत चौकशी देखील केली होती. परंतु त्यांनी स्वतःच्या तणावाबाबत कोणाकडे वाच्यता केली नव्हती. मात्र ते आर्थिक परिस्थिती व कौटुंबिक कारणाने त्रस्त होते असेही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

हडपसर मध्ये केली होती ड्युटी
भूषण पवार हे अतिशय मृदू स्वभावाचे अधिकारी होते, व्यायामाची आवड असल्याने त्यांनी पिळदार शरीरयष्टी बनविली होती, हडपसर पोलीस ठाण्यात ते सहायक पोलिस निरीक्षक म्हणून काही वर्षांपूर्वी कार्यरत होते, अनेक गुन्हे उकल करण्यात त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती, समाजासाठी अहोरात्र ड्युटी बजावत असताना कौटुंबिक तणाव झाल्याने त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या अकाली मृत्यूने हडपसर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

सामाजिक बांधिलकीतून निर्मल विद्यालयाने केली ९० टक्के फी माफ

 निर्मल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यावर्षी फीसमध्ये ९० टक्के सवलत




नांदेड,(दि. १४ फेब्रुवारी) : कोरोनाच्या संकटात शाळा बंद असल्या तरीही पूर्ण फीस शाळेला भरण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने देऊन पालकांवर अन्याय केला असला तरीही नांदेड येथील नामांकित व शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील मेंढला तालुका अर्धापूर बेथील निर्मल विद्यालय प्राथमिक ते उच्च माध्यमिक आणि निर्मल स्कूल इंग्लिश मीडियम च्या विद्यार्थ्यांना २०२० - २१ या वर्षांत फी मध्ये ९० टक्के सवलत देऊन

समाजाप्रति ऋण व्यक्त केले आहे. कोरोनामुळे देशात आर्थिक आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे हाताला काम नसल्यामुळे जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीत विद्यार्थ्यांचे

हित व पालकांची परिस्थिती लक्षात घेऊन मराठवाड्यात शिक्षण क्षेत्रात गेल्या दोन दशकापासून निर्मल हॉस्टेल या संस्कार केंद्राच्या नावाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारे निर्मल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेश्वर पालीमकर यांनी सर्वच विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंत संपूर्ण वर्याची ९० टक्के फीस माफ आणि गरीब विद्यार्थ्यांची पूर्ण फीस माफ करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

पूर्ण राज्यात आज शाळेकंडून पूर्ण फीस वसूल करण्यासाठी सक्ती केली जात असतानाच निर्मल विद्यालयाने विद्यार्थ्यांची ९० टक्के फीस माफ करून पूर्ण राज्यातील शिक्षण क्षेत्रात एक सामाजिक आदर्श घालून दिला

आहे. शाळा म्हणजे फक्त पैसा कमविण्याचे साधन नसून संस्कारक्षम पिढी घडविण्याची मंदिरे आहेत. या मंदिराबद्दल चुकीचा संदेश जाऊन गोरगरीब पालकांच्या मनात शाळेबद्दल तिरस्कार निर्माण होऊ नये तर आदरच राहावा, या उदात्त भावनेतून कामकरणाऱ्या निर्मल विद्यालयाचा हा आदर्श राज्यातीलच नव्हे तर देशातील शिक्षण संस्था चालकांनी घेतल्यास शिक्षण क्षेत्राबद्दल जनतेच्या मनातील विचार ही निश्चितच बदलेल.

त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत असून विचारवंत प्रा. डॉ अनंत राऊत, मनोहर बंडेवार, भीमराव हत्तीअंबीरे रामराव सुर्यवंशी शिक्षण तज्ञांनी व सामाजिक क्षेत्रातील सर्वच लोकांनी त्यांचे कौतुक केले आह.

✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा.चिखले
7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात भा.प्र.से.पूर्व प्रशिक्षण केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुल

 

नांदेडच्या शैक्षणिक शिरपेचात

आता तीन अध्यासनांची भर

पालकमंत्री अशोक चव्हाण व उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

यांच्याकडून शैक्षणिक विस्ताराचा आढावा   

नांदेड,(13 फेब्रुवारी) :- मराठवाड्याच्या एका टोकावर असलेल्या नांदेड जिल्ह्यासह लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या नव्या वाटा मिळाव्यात यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात आता लवकरच भा.प्र.से. पूर्व प्रशिक्षण केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुल हे लवकरच आता विद्यापीठ परिसरात साकारल्या जाणार आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथील शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोणातून सांगोपांग चर्चाअंती हा निर्णय घेतला. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध शैक्षणिक विकास आणि नांदेड येथील शैक्षणिक क्षेत्राच्या विकासाबाबत आज श्री गुरुगोविंद सिंघजी आभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, संचालक डॉ. यशवंत जोशी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत विद्यापीठ व स्वायत्त दर्जा लाभलेल्या श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेअंतर्गत विविध शैक्षणिक विकास कामांचा आढावा घेण्यात आला. 

नांदेड येथील शासकिय अध्यापक महाविद्यालयाच्या इमारत बांधकामास मान्यतेसह नांदेड येथील शासकिय तंत्रनिकेतची 1 हजार 272 चौ.मीटरची जागा ईबीसी वसतीगृहासाठी हस्तांतरणाच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. या बैठकीत श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेअंतर्गत प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करुन त्यात मार्ग काढण्यात आला. यात प्रामुख्याने व्यवस्थापन मंडळाच्या अधिकारातील कामांना चालना देणे, शिक्षकीय संवर्गातील रिक्त पदे यावर चर्चा करण्यात आली. महाविद्यालयीन स्तरावर निर्णय घेता यावेत व दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडले जावे यादृष्टिने व्यवस्थापन मंडळाची लवकरच नेमणुकीबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ. वाय. व्ही. जोशी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले.




✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


Popular posts लोकप्रिय पोस्ट