🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

सोमवार, एप्रिल १९, २०२१

मांजरम येथे शेतकऱ्याची खोपी जळून खाक,अडीच लाखाचे नुकसान

 


नायगाव,दि 19 एप्रिल : मांजरम येथील शेतकरी माधवराव बापूराव शिंदे पंढरपुरे यांच्या खोपिला रविवारी दुपारी आग लागली असून त्यांच्या खोपीत असलेले 2 हेक्टर चे ठिबक संच,एक तुषार संच,  बैलगाडी व इतर शेती उपयोगी समान जळून खाक झाले आहे. सदर आग शर्टसर्किट ने लागल्याचा प्राथमिक अंदाज असून सुदैवाने शेतकरी गावाकडे गेल्याने व बैल झाडा खाली असल्याने जीवित हानी झाली नाही.


  या बाबद अधिक वृत्त असे की मांजरम ता नायगाव येथील शेतकरी माधवराव शिंदे यांची शेती गावाच्या पश्चिम दिशेला आहे.त्यांच्या शेतात एक जनावरां साठी व शेती उपयोगी साहित्य ठेवण्या साठी एक खोपो होती या खोपी जवळून एमएसइबी ची लाईट गेली आहे. ती नादुरुस्त झाल्याने दुरुस्ती करून लाईट टाकल्या नंतर छिलगे उडाले व त्यातील एक खोपिवर पडून आग लागली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


आग लागल्या नंतर शेतकरी पुत्र दशरथ शिंदे यांनी तलाठी शहाणे यांना फोन केला,नंतर मंडळ अधिकारी पांडे यांना केला दोघांचे ही फोन बंद आल्याने तहसीलदार शिंदे यांना कळवले त्यांनी पंचनाम्याला तलाठी, मंडळाधिकारी यांना पाठवतो म्हंटले पण त्याच दिवशी पंचनामा न करता दुसऱ्या दिवशी सोमवारी तलाठी एस ए शहाणे यांनी पंचनामा केला.


आगीत ठिबक सिंचन साहित्य 120,000,तुषार संच 32 हजार,बैल गाडी 45 हजार, शेतीचे ऑजारे 45 हजार असे अडीच लाखाचे साहित्य जळून खाक झाले आहेत.आगोदरच नापिकी व कोरोनाच्या संकटात शर्टसर्किट ची आग ही शेतकर्या साठी कर्दनकाळ ठरली आहे.






✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

Video : कोण म्हणतं देवदूत नसतो? अंध आईच्या हातातला मुलगा प्लॅटफॉर्मवरुन चालताना रेल्वे ट्रॅकवर पडला आणि तेवढ्यात रेल्वे आली,७ सेकंदाचा हा अंगावर काटा आणणारा मुंबईतील रेल्वेचा व्हिडिओ, पुढे काय घडलं ते बघा…

 कोण म्हणतं या जगात देवदूत नसतो?, याचा साक्षात प्रत्यय वांगणी रेल्वे स्थानकात पाहायला मिळाला आहे

Mumbai Train Incident Video सेंट्रल रेल्वेमधील एक अंगावर काटे आणणारा हिडिओ समोर आला आहे. यात पॉईटमनने अवघ्या 7 सेकंदामध्ये एका चिमुकल्याचा जीव वाचवला

 

Railway Point Man Rescue A Boy

  • ही घटना वांगणी स्टेशनवरील सीसी टीव्हीत कैद झाली
  • मुंबईचा एक रेल्वे कर्मचारी या छोट्या मुलाला देवदूत बनून आला
  • रेल्वेचा हा पॉईंट मॅन ख-या जगातील सुपर हिरो ठरला

वांगणी(मुंबई),दि 17 एप्रिल : कोण म्हणतं या जगात देवदूत नसतो?, याचा साक्षात प्रत्यय वांगणी रेल्वे स्थानकात पाहायला मिळाला आहे.येथे एक लहान मुलगा आईच्या हातातून सुटून थेट रेल्वे ट्रॅकवर पडला आणि समोरुन भरधाव वेगाने गाडी येत होती. ही आई जीवाच्या आकांताने मुलाला वाचवण्यासाठी ओरडत होती. तेव्हा रेल्वेचा एक पॉईंटमन देवदितासारखा धावून आला आणि आपल्या जीवाची पर्वा न करता या चिमुकल्याचे प्राण वाचवलले.

नेमकं काय घडलं?

एक आंधळी आई 17 एप्रिलला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आपल्या मुलाला घेवून प्लॅटफॉर्मवरुन जात होती. तेवढ्यात तो मुलगा आईच्या हातातून सुटून ट्रॅकवर पडला. त्या माऊलीला हे कळालं की आपला मुलगा ट्रॅकवर पडलाय, पण काहीही दिसत नसल्याने तिला कळेना काय करावं, तेवढ्यात तिला ट्रेनचा आवाज आला. तेव्हा ही आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचविण्यासाठी आरडाओरड करु लागली. याचवेळी विरुद्ध बाजुच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या वागंणी स्टेशनवरील पॉईंटमन मयुर शेळके यांनी सर्व प्रकार पाहिला आणि प्रसंगावधान राकत त्याने थेट ट्रॅकवर उडी घेतली.

भरधान येणाऱ्या मेलसमोर धावत त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाचे प्राण वाचविले. मयुर शेळके या पॉईंटमनच्या धाडसामुळे ट्रॅकवर पडलेल्या छोट्या मुलाचे प्राण वाचले आहेत. मयुर यांच्या धाडसाचा हा सर्व प्रकार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पाहा हा थरारक व्हिडीओ –


असं म्हणतात की देव तारी त्याला कोण मारी. असेच काहीसे मुंबईच्या वांगणी रेल्वे स्टेशनवरील एका छोट्या मुलासोबत घडले आहे. अनेकदा असे घडते की कोणीतरी देवदूत पणून मदतीला धावून येते. मुंबईचा एक रेल्वे कर्मचारी असाच या छोट्या मुलासाठी देवदूत बनून आला आणि त्याने प्राण वाचवले. तो जर धावत आला नसता तर आज काही वेगळेच चित्र असते.

ही घटना वांगणी स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आई आपल्या मुलाला घेऊन प्लॅटफॉर्मवरून चालत जात असते. यावेळी मुलाचा हात सुटतो आणि तो रेल्वे रुळावर पडतो. समोरून पाहतो तर काय भरधाव वेगाने -एक्सप्रेस येत असते. हे सर्व रेल्वेच्या पॉईंट्समनला दिसले.
त्याचक्षणी तो वा-याच्या वेगाने तिथे धावत येतो आणि मुलाला वर प्लॅटफॉर्मवर ठेवतो आणि स्वतः ही लगेच वर चढतो. असे करत असतान यात त्याचा स्वत:चाही जीव गेला असता. मात्र त्याने असा कोणताही विचार केला नाही. त्यावेळी त्याच्यासाठी त्या मुलाचा जीव वाचणे सर्वात महत्त्वाचे होते.


अनेक सिनेमांमध्ये आपण सुपरहिरो बघतो. जो स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लोकांचे जीव वाचवतो. रेल्वेचा हा पॉईट्समन खऱ्या जगातील सुपरहिरो ठरला. मयुर शेळले असे या पॉईट्समनचे नाव आहे. त्यांच्या या शौर्याबद्दल रेल्वेनेही ट्वीट करून त्यांचे कौतुक केले आहे.









✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने नांदेडमध्ये मराठवाड्यातील सर्वात मोठा २० के.एल ऑक्सिजन टँकची उभारणी

 


नांदेड : मराठवाड्यामधील सर्वात मोठा २० के.एल ऑक्सिजन टँक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बसवण्यात येणार आहे. चव्हाण यांनी डीपीसीसी तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार मोहन हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली तसे महापौर, अधिष्ठाता, सदस्य, नगरसेवक यांच्या उपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी बैठकीतील उपस्थितांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोव्हिड रुग्णांचे कक्ष, स्वयंपाक घर, आक्सिजन टँकची भेट देवून पाहणी केली. या बैठकीत कोरोनाचा हा काळ अत्यंत कठीण काळ आहे. नांदेड शहरासह जिल्हामध्ये कोराेना रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ऑक्सिजन तसेच खाटा देखील कमी पडत आहेत. या पार्श्वभमूीवर ही महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली.

जिल्हाभरामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना पालकमंत्री यांनी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयांसाठी खुप चांगल्या प्रमाणात सेवा–सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे आता या सर्व सोईसुविधांपासून कोराना रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी मदत नक्कीच होणार आहे. त्यामुळे आता सर्व डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी यांनी आपापली जबाबदारी लक्षात घेवून रुग्णांवर उपचार करण्याचे आवाहन देखील या वेळी आमदार हंबर्डे यांनी बैठकीदरम्यान केले. ही बैठक तब्बल दोन तास चालली तर बैठकीमध्ये उपस्थितांनी विविध सुचना देखील केल्या आहेत.

Popular posts लोकप्रिय पोस्ट