🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शनिवार, ऑक्टोबर ३०, २०२१

MJPSKY : नायगाव तालुक्यातील e-kyc pending असलेल्या ३५८ पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ CSC सेंटरवर जाऊन आपले आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे-श्री.सुनील गन्लेवार सहायक निबंधक

 


नायगाव,दि. ३० ऑक्टोबर २०२१ : राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ही दिनांक २० डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयाव्दारे कार्यान्वित केली आहे. सदर योजने अंतर्गत दि.०१ एप्रिल २०१५ ते दि. ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्प मुदती पीक कर्ज तसेच अल्प मुदती पीक कर्जाचे पुनर्गठण/फेरपुनर्गठण केलेले दि. ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले रुपये ०२.०० लाख पर्यंत पीक फर्जमाफीस पात्र ठरले.

नायगाव तालुक्यात सदर योजनेअंतर्गत ११६३७ लाभार्थी शेतकऱ्यांना रुपये ७५.३५ कोटी रक्कम त्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आली आहे.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेअंतर्गत कर्जमाफीपात्र शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे.

 नायगाव तालुक्यातील ३५८ पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण म्हणजेच e-kyc अद्याप केलेले नाही.त्यामुळे त्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम शासनामार्फत जमा करता आली नाही.सदर आधार प्रमाणिकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर ,CSC केंद्रावर जाऊन  तात्काळ आपले आधार प्रमाणिकरण करुन घेण्याचे आवाहन श्री.सुनील गन्लेवार,सहायक निबंधक नायगाव यांनी केले आहे.

तसेच जे वृद्ध शेतकरी आहेत त्यांचा आंगठा येत नसेल तर त्यांनी पोर्टल वर e -kyc तक्रार करावी.जर कर्जदार मयत असल्यास portal वर तक्रार दाखल करून त्या व्यक्तीचे आधार कार्ड व मृत्यू प्रमाणपत्र सहायक निबंधक कार्यालय,नायगाव यांच्याकडे दाखल करावेत व आधार प्रमाणिकरण करण्यात काही अडचण येत असल्यास तात्काळ कार्यालयाशी संपर्क साधावा असेही श्री.गन्लेवार यांनी सांगितले आहे.

e-kyc pending गावांची यादी खालीलप्रमाणे आहे.

परडवाडी
परडवाडी
परडवाडी
परडवाडी
परडवाडी
परडवाडी
परडवाडी
परडवाडी
परडवाडी
नायगाव
रानसुगाव
रुई बी.के
हंगरगा
बळेगाव
बेंद्री
मांजरम
हिप्परगा (जानेराव)
हुस्सा
कोठाळा
सालेगाव
नायगाव
कुष्णूर
बेंद्री
औराळा
सालेगाव
इकळीमोर
हिप्परगा (जानेराव)
नायगाव
नायगाव
रानसुगाव
कुष्णूर
रुई बी.के
हुस्सा
हुस्सा
रुई बी.के
सालेगाव
रुई बी.के
सुजलेगाव
नरंगल
मांजरम
सांगवी
कुष्णूर
नायगाव
कुष्णूर
हुस्सा
अंचोली
सुजलेगाव
रुई खु.
रुई खु.
रुई खु.
मनूर त.ब
बरबडा
अंतरगाव
मनूर त.ब.
बरबडा
बरबडा
बरबडा
रातोळी
कोपरा
गडगा
गडगा
गडगा
कुष्णूर
कुंटूर
सातेगाव
कहाला खु.
धनज
कुंटूर
कुंटूर
कुष्णूर
सातेगाव
सुजलेगाव
परडवाडी
मांडणी
सावरखेड
रुई बी.के
कहाला बी.के.
कुष्णूर
कुष्णूर
गडगा
टेंभुर्णी
कुष्णूर
कुष्णूर
कुष्णूर
सालेगाव
अंतरगाव
कहाला खु.
मेळगाव
वजिरगाव
मुस्तापूर
लालवंडी
आलुवडगाव
नायगाव
नायगाव
लालवंडी
शेलगाव छत्री
नरसी
टाकळगाव
नायगाव
कार्ला टी.एम.
कार्ला टी.एम.
कोलंबी
खैरगाव
कोलंबी
नायगाव
मांजरम
धुप्पा
मांजरम
खंडगाव
मांजरम
मांजरम
बेटक बिलोली
मांजरम
कोकलेगाव
लालवंडी
कुंचेली
मांजरम
मांजरम
इकळी मोर
नायगाव वाडी
मांजरम
मांजरम
कार्ला टी.एम.
नायगाव
दरेगाव
धानोरा टी.एम.
नायगाव
कोलंबी
कार्ला टी.एम.
टाकळगाव
देगाव
नायगाव
लालवंडी
कुंचेली
धानोरा टी.एम.
कुंचेली
धुप्पा
मांजरम
केदार वडगाव
मुगाव
गोदामगाव
धानोरा टी.एम.
कुंचेली
बेटक बिलोली
लालवंडी
ताकबीड
कांडाळा
नायगाव
मुगाव
धानोरा टी.एम.
आलुवडगाव
मुगाव
धुप्पा
मुगाव
नायगाव
बेटक बिलोली
मांजरम
शेलगाव (गौरी)
ताकबीड
मुगाव
मुगाव
लालवंडी
शेळगाव (गौरी)
गोदामगाव
शेलगाव छत्री
कार्ला टी.एम.
कार्ला टी.एम.
नायगाव
होटाळा
देगाव
टाकळगाव
मरवाली तांडा
मरवाळी
मांजरम
पळसगाव
कार्ला टी.एम.
कुंटूर
ताकबीड
कार्ला टी.एम.
नायगाव
नायगाव
नायगाव
कोकलेगाव
देगाव
देगाव
कोलंबी
नायगाव
देगाव
नरसी
नायगाव
मरवाळी तांडा
कोलंबी
नायगाव
कोकलेगाव
टेंभुर्णी
शेलगाव छत्री
शेलगाव छत्री
मरवाळी
मरवाळी तांडा
नायगाव
नरंगल
नायगाव
नरसी
राजगडनगर
नरसी
कोलंबी
मरवाळी
कार्ला टी.एम.
नायगाव
नायगाव
देगाव
नायगाव
नायगाव
मरवाळी
नरसी
कोलंबी
नायगाव
कोलंबी
कोकलेगाव
शेलगाव (गौरी)
कुंटूर
देगाव
नायगाव
धानोरा टी.एम.
कांडाळा
लालवंडी
खंडगाव
खैरगाव
कोलंबी
कुंचेली
मुगाव
मांजरम
कुंचेली
गडगा
देगाव
शेलगाव छत्री
कोलंबी
कुंटूर
कुंचेली
कुंचेली
नरंगल
भोपाळा
भोपाळा
कुंटूर
कोलंबी
मरवाळी
कोकलेगाव
शेळगाव छत्री
नायगाव
शेळगाव (गौरी)
कांडाळा
धानोरा टी.एम.
कोलंबी
कोकलेगाव
कोलंबी
नायगाव
मांजरम
रातोळी
मांजरम
नायगाव
मांजरम
सालेगाव
खैरगाव
बेटक बिलोली
मरवाळी
नायगाव
नायगाव
खैरगाव
खैरगाव
खैरगाव
खैरगाव
कुंचेली
नायगाव
मुगाव
देगाव
अंचोली
कुंचेली
देगाव
कुंचेली
शेलगाव छत्री
धुप्पा
शेलगाव छत्री
मरवाळी
वजिरगाव
मांजरम
नायगाव
कार्ला टी.एम.
कुंटूर
रातोळी
हिप्परगा (जानेराव)
रानसुगाव
पळसगाव
कुंचेली
नायगाव
मेळगाव
हंगरगा
इकळी मोर
नरसी
हुस्सा
टेंभुर्णी
टेंभुर्णी
नायगाव
नरंगल
नायगाव
शेलगाव छत्री
लालवंडी
धुप्पा
कुंचेली
मरवाळी
भोपाळा
शेळगाव (गौरी)
कुंचेली
कुंचेली
कुंचेली
धुप्पा
धुप्पा
कुंचेली
कुंचेली
भोपाळा
होटाळा
शेलगाव (गौरी)
धुप्पा
कुंचेली
मांजरम
गोदमगाव
कुंचेली
मुगाव

गुरुवार, ऑक्टोबर २८, २०२१

लाच प्रकरण : 10 हजार लाच घेताना तळणी सज्जाचा लाचखोर तलाठ्याच्या एसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या

 


*आदरणीय Sir / Madam*  

Trap Case Report

➡ घटक :- नांदेड 

➡ तक्रारदार :- पुरुष 45 वर्ष

➡ आरोपी :-  संजय गजानन मेहुनकर वय 40 वर्ष व्यवसाय नोकरी तलाठी, तलाठी सज्जा तळणी, तालुका हादगाव, जिल्हा नांदेड राहणार मंत्री नगर नांदेड 

 ➡ लाचेची मागणी:-

     12,000/- 

➡ लाच स्विकारली

      10,000/-

▶️पडताळणी दिनांक :-

  27/10/2021

▶️ सापळा दिनांक :- 27/10/2021

➡ कारण :- यातील तक्रारदार यांचे पत्नीचे नावे असलेली शेत जमिनीचा फेरफार करून 7/12 ला देण्यासाठी  12,000/- रु लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून 10,000/- रु स्वीकारले वरून गुन्हा दाखल 

➡ सापळा अधिकारी  :

श्री  विरनाथ माने, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. नांदेड

सहा. सापळा अधिकारी : श्री दत्ता केंद्रे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. नांदेड

 ➡ सापळा पथक:- पो हे कॉ किशन चिंतोरे, पोना हणमंत बोरकर, सचिन गायकवाड, मारोती सोनटक्के लाप्रवि नांदेड 

➡मार्गदर्शन अधिकारी :- श्रीमती कल्पना बारवकर ,पोलीस अधीक्षक लाप्रवि नांदेड ,

 ➡ श्री धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि,नांदेड

मंगळवार, ऑक्टोबर २६, २०२१

राजधानीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा

 


नवी दिल्ली,दि २८ ऑक्टोबर २०२१ : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात आला. या निमित्त ‘भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची….’ प्रतिज्ञा घेण्यात आली.

राज्यात दरवर्षी ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोज‍ित करण्यात येतो. यावर्षी 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ‘स्वतंत्र भारत @७५ : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ ही संकल्पना घेऊन केला जाणार आहे.

याअंतर्गत कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त श्याम लाल गोयल यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना ‘भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची…… ’ प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी सचिव व आयुक्त (गुंतवणुक व राजशिष्टाचार), अपर निवासी आयुक्त निरूपमा डांगे आणि सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा

महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात आला. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक(अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी  उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना ‘भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची……’ प्रतिज्ञा दिली. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Tags: 

Vigilance Awareness Week 2021 : लाप्रवि नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय येथे दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त "भ्रष्टाचार निर्मुलन शपथ" कार्यक्रम संपन्न

 


नागपूर,दि २६ ऑक्टोबर २०२१ : दरवर्षी दक्षता जनजागृती आयोजन करण्यात येते यावर्षी दिनांक २६ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत जनजागृती सप्ताह साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमीत्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रातील सर्व घटकातर्गत "स्वतंत्र भारत @ ७५ सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे" या संकल्पनेने राज्यात कोविड १९ चा प्रादुर्भाव असल्याने शासनाव्दारे निश्चित केलेल्या कोविड नियमांचे पालन करून विविध कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहेत.

शासनाचे निर्देशानुसार सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयामध्ये "भ्रष्टाचार निर्मुलन शपथ" घेवून दक्षता जनजागृती सप्ताहानी सुरवात करण्यात येते. त्यानुसार आज दिनांक २६/१०/२०२९ रोजी सकाळी ११.०० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय नागपूर येथे तसेच लाप्रविच्या सर्व घटक कार्यालयात शपथ घेवून दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरवात करण्यात आली.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय व वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोदिया व गडचिरोली या घटक कार्यालयामार्फत शहरी व ग्रामीण परिसरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये, प्रशासकीय परिसर इत्यादी ठिकाणी भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत पोस्टर्स / पॅनर्स तसे कार्यक्रम घेवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच सर्व प्रसारमाध्यमांद्वारे समाज माध्यमांद्वारे भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात "लाच घेणे अथवा लाच देणे गुन्हा आहे" असे नमुद करून त्यावर प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाचा पत्ता, फोन नंबर नमुद असलेले फलक/ पोस्टर्स लावण्याबाबत सर्व घटक कार्यालयांना आवश्यक सुचना देण्यात आलेल्या आहेत. भ्रष्टाचार निर्मुलनाच्या कामात तसेच दक्षता जनजागृती सप्ताहामध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग होण्याकरीता तसेच नागरिकांमध्ये जनजागृती होण्यकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवाविरुध्द(अधिकारी / कर्मचारी) काही तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय येथे श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक, श्री मिलींद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक यांचे उपस्थितीत शपथ कार्यक्रम घेण्यात आला असुन त्याकरीता कार्यालयातील सर्व अधिकारी व अमलदार उपस्थित होते.

कार्यालयाचा पत्ता : पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, नागपूर नागपूर दुसरा माळा, प्रशासकीय इमारत क. १,सिव्हील लाईन्स, नागपूर

दुरध्वनी क्रमांक ०७१२२५६१५२०

टोल फ्री क्रमांक १०६४


संबंधित बातम्या 

‘स्वतंत्र भारत @ 75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ ! भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ – परिवहनमंत्री तथा महामंडळ अध्यक्षाची घोषणा

 


मुंबई, दि. 25 ऑक्टोबर 2021 : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी केली.

निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणार पगार यंदा नोव्हेंबरच्या 1 तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक सहकार्याबद्दल मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री.अजित पवार यांचे परिवहन मंत्र्यांनी आभार मानले.

महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचे परिवहन मंत्री तथा महामंडळ अध्यक्षांनी यावेळी सांगितले.

सोमवार, ऑक्टोबर २५, २०२१

लाच प्रकरण : महालाचखोर तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी चंद्रकांत शेळके सह पंटरच्या लाच मागितल्याने एसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या

 


पैठण : पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह खासगी व्यक्ती नारायण वाघ याने लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने महसुल विभागात खळबळ माजली आहे.

वाळूचा व्यवसाय करणारे तक्रारदार भागीदारीत शेती करतात. अतिवृष्टीमुळे तक्रारदाराच्या भागीदारीतील शेतात नदीतील वाळूचा साठा तयार झाला आहे. या वाळूचा उपसा व वाहतूक करण्यासाठी आरोपी वाघ याने पंचांसमक्ष 1 लाख 30 हजार रुपयांची हप्ता स्वरुपात मागणी केली. तहसीलदार शेळके यांच्या चेंबरमधे पंचांसमक्ष या लाचेला समर्थन व प्रोत्साहन देण्यात आले. याप्रकरणी तहसीलदार शेळके, नारायण वाघ अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदरणीय सर, जयहिंद

सापळा अहवाल दि 23/10/2021

▶️ युनिट - औरंगाबाद

▶️ तक्रारदार - पुरुष, वय-35 वर्षे

▶️ आरोपी लोकसेवक :1)-श्री चंद्रकांत शेळके, पद - तहसीलदार ,(वर्ग १), नेमणूक - तहसील कार्यालय, पैठण, जि. औरंगाबाद 

 2) नारायण वाघ (खाजगी इसम )

➡️लाच मागणी दिनांक - 22/10/2021 रोजी 

 ➡️ मागणी रक्कम - रुपये 1,30,000/-             

▶️ कारण - यातील तक्रारदार यांचा शेती व वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे.

तक्रारदार यांचे भागीदारीत असणाऱ्या शेतात अतिवृष्टी मुळे नदीतील वाळूचा साठा झाला आहे. सदर वाळूचा उपसा करणे व दोन हायवा द्वारे वाळू वाहतूक करण्याकरिता आरोपी क्र. 2 खाजगी इसम यांनी पंच साक्षीदार समक्ष रुपये 1,30,000/- ची मासिक हप्ता स्वरूपात मागणी केली.

 त्यानंतर तक्रारदार व पंच यांना आलोसे क्रं.1यांचे समक्ष त्यांचे चेंबर मध्ये भेट झाली असता, आलोसे क्रं. 1 यांनी प्रत्यक्ष पंचांसमक्ष तक्रारदार यांच्या वाळूच्या गाड्या बद्दल बोलणी करून आरोपी खाजगी इसम क्रं. 2 यांना . चेंबर मध्येच समक्ष भेटून घेणे बाबत सूचना देऊन , आरोपी क्रं. 2 यांनी केलेल्या लाच मागणीचे समर्थन करून लाच घेणे बाबत प्रोत्साहन दिले.

त्या नंतर पुनः आरोपी क्र. 2 यांनी आलोसे क्रं 1 याचे चेंबर बाहेर येऊन पंचसाक्षीदार समक्ष रुपये 1,30,000/- लाचेची मागणी केली.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ सापळा अधिकारी, -

      श्री.नंदकिशोर क्षीरसागर ,

      पोलीस निरीक्षक, ला. प्र.

      वि.औरंगाबाद.

➡️ सहायक अधिकारी - 1 पोलीस उप अधिक्षक, श्री मारुती पंडित ला. प्र. वी. औरंगाबाद

 2 पोलीस निरीक्षक श्री संदीप राजपूत ला.प्र. वि.औरंगाबाद 

▶️मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद

➡️मा.श्री.विशाल खांबे -अपर पोलीस अधीक्षक

 ,ला.प्र.वि.औरंगाबाद

➡️मा.श्री रुपचंद वाघमारे पोलीस उपअधीक्षक ,ला. प्र .वि. औरंगाबाद

➡️सापळा पथक -

पोलीस हवालदार गंगाधर भताने राजेंद्र जोशी , पोलीस नाईक. भूषण देसाई , पो अंम.चांगदेव बागुल ला.प्र.वि,औरंगाबाद

*टोल फ्री क्र:- 1064

*दूरध्वनी क्र:-02442/222649

*व्हाट्स अप क्र:-9930997700

*मा.पोलीस अधीक्षक ला प्र वि औरंगाबाद:- 8888807299

*मा अपर पोलीस अधीक्षक ला प्र वि औरंगाबाद:-98811008123

शनिवार, ऑक्टोबर २३, २०२१

‘स्वतंत्र भारत @ 75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ ! भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन

 


  • लाच देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा आहे
  • कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे.त्यासाठी लाच का द्यायची ?
  • लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार

मुंबई, दि. 22 ऑक्टोबर 2021 : भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी, 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहाचे‘ आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वतंत्र भारत @ 75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.

दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थामार्फत या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक २६ ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख किंवा ज्येष्ठतम अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी / कर्मचारी प्रतिज्ञा घेतील. प्रतिज्ञा घेतल्यानंतर मा.राज्यपाल व मा.मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येईल.

दक्षता जनजागृती सप्ताहासंदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करताना कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी त्या-त्या क्षेत्रात लागू असलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन होईल याबाबत आयोजकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुजाण नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक 022-24921212, वेबसाईट acbmaharashtra.gov.in, ईमेल – acbwebmail@mahapolice.gov.in/ addlcpacbmumbai@mahapolice.gov.in, फेसबुक – www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप – www.acbmaharashtra.net, ट्वीटर – @ACB_Maharshtra, व्हॉट्सॲप – 9930997700 येथे संपर्क साधून तक्रार नोंदवावी अशी माहितीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देण्यात आली आहे.

Tags: दक्षता जनजागृती सप्ताह

बुधवार, ऑक्टोबर २०, २०२१

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा- कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे मागणी



  • दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी पावले उचलण्याची केली मागणी

मुंबई, दि. 20 ऑक्टोबर 2021 – राज्यात जुलै-2021 मध्ये पावसाने दिलेली ओढ आणि सप्टेंबर-ऑक्टोबर -2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 900 कोटी रुपयांचा केंद्राचा हिस्सा लवकरात लवकर द्यावा. जेणेकरुन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणे शक्य होईल, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्यातील शेतकऱी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे अडचणीत आला आहे. त्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य शासन प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत केंद्र शासनाचा हिस्सा अद्याप प्रलंबित आहे. तो 5 ऑक्टोबर पर्यंत मिळणे अपेक्षित होते. त्यामुळे तो लवकरात लवकर मिळाला तर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करता येईल, असे या पत्रात कृषिमंत्री श्री. भुसे यांनी नमूद केले आहे.

सन 2021 मध्ये राज्यातील सुमारे 84 लाख शेतकऱ्यांनी पिक विम्यासाठी नावनोंदणी केली. जुलै 2021 मध्ये दीर्घकाळ कोरड्या स्पेलमुळे महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांमध्ये 27 लाख हेक्टर वरील क्षेत्र आणि सुमारे 40 लाख शेतकरी हंगामाच्या मध्यभागी प्रभावित झाले. याशिवाय, सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये मुसळधार पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासंदर्भात विमा कंपन्यांना सुमारे 33.99 लाख सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी 21.55 लाख हेक्टरचे सर्वेक्षण पूर्ण केले गेले आहे आणि 12.44 लाख वरील सूचना प्रलंबित आहेत.

सुधारित परिचालन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शेतकऱी, राज्य आणि केंद्राचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर विमा कंपन्या शेतकऱ्यांचे दावे निकालात काढतात. यामध्ये 444 कोटी रुपयांचा शेतकरी वाटा आधीच विमा कंपन्यांकडे होता. राज्य शासनाची अनुदान रक्कमेपोटीचा हप्ता 973 कोटी दिनांक 5 ऑक्टोबर, 2021 रोजीच विमा कंपन्यांकडे जमा करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने त्यांच्याकडील हिश्श्याचा 900 कोटी रुपये हप्ता विमा कंपन्यांना लवकरात लवकर द्यावा. कारण त्यानंतर विमा कंपन्या कार्यवाही करतील. त्यामुळे ही प्रक्रिया लवकर पार पाडून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी केंद्रीय हिस्सा वेळेवर द्यावा, असे या पत्रात कृषिमंत्री श्री. भुसे यांनी म्हटले आहे.

Tags: पीक विमा

मंगळवार, ऑक्टोबर १९, २०२१

प्रा. राजन शिंदे यांच्या खुनाचा उलगडा; अल्पवयीन मुलानेच केली हत्या,पोलीस चौकशीत निष्पन्न

 


औरंगाबाद,दि.१९ ऑक्टोबर २०२१


कोण चुकले ?

------------------------

औरंगाबादेतील मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रजी विभाग प्रमुख आणि चर्मकार समाजाचे नेते असलेल्या

प्रा.राजन शिंदे यांची हत्या त्यांच्याच मुलाने केल्याचे निष्पन्न झाल्याने सगळे औरंगाबाद शहर सुन्न झाले.आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला फार फार तर तीन वर्षांची शिक्षा,ती देखील बालसुधारगृहात राहून भोगावी लागेल.शहराला हादरवून टाकणाऱ्या या हत्या प्रकरणाचा अत्यंत कसोशीने आणि शक्य तेवढ्या लवकर छडा लावल्या बद्दल औरंगाबाद पोलिसांचे अभिनंदन करावे लागेल.परंतु आई-वडील दोघेही प्रोफेसर असलेल्या सुखवस्तू, सुशिक्षित कुटुंबातील अवघ्या १७ वर्ष ८ महिने वयाचा अल्पवयीन मुलगा अत्यंत थंड डोक्याने,नियोजनपूर्वक आणि अत्यंत निर्घृणपणे स्वतःच्या जन्मदात्या पित्याची हत्या करतो हे धक्कादायक तितकेच चिंताजनक आहे.एखाद्या उलट्या काळजाच्या मुडदेफरास गुन्हेगाराप्रमाणे कर्दनकाळालाही भीतीने कंप सुटावा इतके भीषण कृत्य तो एवढासा पोर करूच कसा काय धजावला ? या घटनेतील आरोपी पकडला असला,हत्येसाठी वापरलेली हत्यारे सापडली असली,आरोपीने खुनाची कबुली दिली असली तरी अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.खुनी मुलगा आपला बाप हिटलरचा अवतार होता,तो कायम आपणास 'ढ' म्हणून हिणवायचा.वेळोवेळी पाणउतारा करायचा.म्हणून एकदाचा संपवला असे म्हणाला.पण त्याच्या जवाबावर पूर्ण विसंबून न राहता पोलीस तपास अजून सुरु आहे.हत्येचे नेमके कारण काय ? काय घडले हे माहित असूनही घरातील इतर सदस्य (आरोपीचे आई व बहीण) आरोपी पकडला जाईपर्यंत इतके शांत व धीरगंभीर कसे काय होते ? याचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे.आरोपी अनेक दिवसांपासून गुन्हेगारी वेब सिरीज,युट्युब आणि सिनेमे पहात होता.हत्या कशी करावी,शरीराच्या कुठल्या भागावर आघात करावा,अल्पवयीन गुन्हेगाराला किती शिक्षा होते.बाल सुधारगृह म्हणजे काय ? तिथे काय सोयी सुविधा मिळतात.या बाबतची देखील इत्यंभूत माहिती आरोपीने गुगल सर्च करून मिळवली होती.पहाटे दोनच्या सुमारास गाढ झोपलेल्या वडिलांच्या डोक्यावर त्याने व्यायामाच्या डंबेल्सने पाच प्रहार केले.तेवढ्याने त्याचे समाधान झाले नाही म्हणून चाकूने गळा आणि हाताच्या नसा कापल्या.हत्येचे दुष्कृत्य केल्यानंतरही  अत्यंत सराईतपणे त्याने हत्यारांची विल्हेवाट लावली.पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.पुन्हा साळसूदपणे ऍम्ब्युलन्स आणायला गेला.बहिणीला घेऊन पोलीस ठाण्यात घटनेची खबर द्यायला गेला.इतकेच नाही तर इतक्या कमी वेळेत त्याने घरातील अन्य सदस्यांना गप्प बसण्यास प्रतिबद्ध केले.पोलिसांच्या तपासाला भरकटवण्याचाही त्याने प्रयत्न केला.अशा स्थितीत या आरोपीला तो केवळ चार महिन्यांसाठी अल्पवयीन ठरतो म्हणून त्याला विधिसंघर्षग्रस्त दर्जा द्यावा काय ? हा ही प्रश्न आहे.दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातही एका आरोपीला अल्पवयीन असल्याचा फायदा मिळाला होता.इतर आरोपीना फाशी तर त्याला फक्त तीन वर्षांची शिक्षा झाली.तीही त्याला बाल सुधारगृहात भोगावी लागली,वास्तविक निर्भयावर सर्वाधिक अमानुष अत्याचार करणारा आणि तिच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये लोखंडी रॉड घुसवणारा गुन्हेगार तो अल्पवयीनच होता.वरील प्रकरणातही आरोपी अल्पवयीन आहे म्हणून त्याला शिक्षेच्या प्रकारात आणि कालावधीत मोठी सूट मिळू शकते.खरे तर आता,ज्या प्रमाणे मतदानाच्या अधिकाराचे वय २१ वरून १८ वर आणले आहे तसेच अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त म्हणून शिक्षेत सूट देण्याच्या वयाची मर्यादा १४ वर्षावर आणणे गरजेचे आहे.अल्पवयीन मुले देखील अविश्वसनीय अशी पराकोटीची पाशवी दुष्कृत्ये करताना मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की नव्या पिढीची विचार करण्याची,परिस्थितीला हाताळण्याची पद्धत भिन्न आहे.त्यांची मानसिकता वेगळी आहे.जीवनविषयक दृष्टिकोन वेगळा आहे.हल्लीची मुले टोकाची भावविवश आहेत.त्यांच्यात संयम आणि सहनशीलता नाही.सभोतालचे वातावरण आणि ते जे ऐकतात पहातात ते जग त्यांच्या भावनिक निकोप वाढीला पोषक नाही.ही स्थिती आहे खरी.आजकाल कुटुंबातला सुसंवाद राहोच, संवाद देखील हरवला आहे.यात गरीब श्रीमंत असा भेद नाही.केवळ दारिद्र्य,अभाव आणि गरिबीत जगणारी झोपड्पट्टीतली मुलेच वाईट वळणाला जातात,व्यसनी,दुर्वर्तनी,गुन्हेगार बनतात असे काही नाही.उच्चभ्रू लब्ध प्रतिष्ठित समाजातील पैशांची आणि सेवा सुविधांची ददात नसलेल्या घरातली मुलेही व्यसनी,जुगारी बनत आहेत.गुन्हे करीत आहेत.औरंगाबाद मध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेतील मुलगा देखील सुखवस्तू कुटुंबातला होता.हे सगळे वैभव आपल्या आई -वडिलांमुळेच आहे याचीही त्याला जाण-जाणीव असणार.एकुलता एक मुलगा म्हणून तो वडिलांसकट सर्वांचा लाडकाही असणार.त्याला पाहिजे ते हवे तितके मिळत असणार.असे असताना केवळ वडील करड्या शिस्तीचे होते.चुकांवर पांघरून न घालता उघडपणे खडे बोल सुनावत होते,म्हणून ते थेट हिटलर,आणि हा कोण                       ? ब्रिटनचा पंतप्रधान विस्टन चर्चिल की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष  हॅरी ट्रुमन ? होय  हॅरी ट्रुमनच ! त्यानेच तरया पृथ्वीतलावरील मानवतेला कायमचा काळिमा फासणारे-हिरोशिमा नागासाकी केले.जगाला अजूनही उमजलेले नाही की अखिल मानवजातीला कलंकित करणाऱ्या त्या घटनेत कोण चुकीचे होते ? इथेही काय वेगळे आहे ? मेलेला बाप आणि मारणारा मुलगा यात नेमके चुकले कोण ?   

रवींद्र तहकीक

संपादक लोकपत्र

रविवार, ऑक्टोबर १७, २०२१

महा लाचखोर उपायुक्त तथा सदस्य जातपडताळणी याला 8 लाख मागून 1 लाख 90 हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या

 


*Respected sir*

*Trap Case Report* 

➡ घटक :- पुणे

➡ तक्रारदार :- पुरुष वय 32 वर्षे

➡ आरोपी :- लोकसेवक - 

 नितिन चंद्रकांत ढगे वय- ४०, 

पद- उपआयुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे, वर्ग-1 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.

➡️लाच मागणी रक्कम :- रू.8,00,000/-

➡️लाच स्वीकारली रक्कम:-रू.1,90,000/- 

➡️ पडताळणी :- दि. 15/10/20201

➡️ सापळा कारवाई :- 16/10/2021 

रात्री 09:40

➡️ठिकाण - वानवडी,आलोसेचे निवासस्थानाजवळ.

➡ हकीकत:- तक्रारदार यांचे पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्याकरिता सुरूवातीस 800000/- रु. लाचेची मागणी. पडताळणी दरम्यान तीन लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती दोन लाख रुपयाची मागणी करून 1,90,000/-रु. स्वीकारल्यावर रंगेहाथ पकडण्यात आले .

➡️ सापळा पथक

पोलीस निरीक्षक- श्रीराम शिंदे

पोलीस निरीक्षक -संदीप वऱ्हाडे

पो.शि.अंकुश आंबेकर पो.शि. सौरभ महाशब्दे

चालक पो.शि. चंद्रकांत कदम

ला.प्र.वि.पुणे युनिट .

➡️ मार्गदर्शन अधिकारी: श्री राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे परिक्षेत्र.

श्री सुरज गुरव,अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे.

श्री सुहास नाडगौडा,अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे.

रेल्वे सुरक्षा दलाच्या लाचखोर महिला उपनिरीक्षकास केंद्रीय ला.प्र.वि च्या पथकाने ६० हजारासह मुसक्या आवळल्या


नागपूर,दि १६ ऑक्टोबर २०२१ : खाजगी संगणक संचालकाने रेल्वे प्रवासाकरिता एका व्यक्तीस आभासी तिकीट काढून दिले. हे तिकीट नियमबाह्य पद्धतीने काढले म्हणून संगणक संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.


त्यात तडजोड करण्यासाठी 60 हजार रुपयाची लाच घेताना वरोडा येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला उपनिरीक्षकास बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले.


वरोडा येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलामध्ये गोपिका मानकर उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. भद्रावती येथील खाजगी संगणक संचालकांनी 1 महिन्यापूर्वी एका व्यक्तीस रेल्वे प्रवासाकरिता आभासी तिकीट काढून दिले. ही बाब उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना माहिती झाली. त्या संगणक संचालकावर रेल्वे सुरक्षा दल वरोडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तडजोड करण्याकरिता गोपिका मानकर यांनी तक्रारकर्त्यास 1 लाख रुपयाची मागणी केली. त्यामध्ये 60 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारकर्त्याने याबाबत केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंध नागपूर यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार वरोडा रेल्वे स्थानकावर बुधवारी रात्री सापळा रचण्यात आला. रात्रीच्या सुमारास 60 हजार रुपयाची लाच घेताना त्यांना रंगेहात त्यांच्या कार्यालयात पकडण्यात आले.


ही कारवाई नागपूर येथील केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक एम. एस खान यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी एस्सार चौगुले, पोलीस निरीक्षक कल्याणी हुमणे, पोलीस निरीक्षक निरज गुप्ता, कविता सरकार, उपनिरीक्षक विनोद कराळे, कोमल गुजरकर, संदीप ढोबळे, सीएम बांगडकर, कीर्ती बावनकुळे, राजेश डेकाटे यांनी केली.

पंजाब डख-हवामान अंदाज : राज्यात 17,18, 19 ऑक्टोबर दरम्याण काही जिल्हात पाउस

 


परभणी,दि १६ ऑक्टोबर २०२१ : पंजाब डख - राज्यात आज 16 ऑक्टोबर रात्री  पासून पावसाला सुरवात होइल. 17,18, या तारखेत राज्यात पाउस होइल.सर्वदूर नसेल !


💥20 आक्टोबर सुर्यदर्शन व हवामान कोरडे राहणार ! पंजाब डख.


20 पासून सोयाबिन, कापूस वेचनी करून घ्यावी .


माहितीस्तव-

राज्यात 17,18, 19 ऑकटोबर दरम्याण काही जिल्हात पाउस येणारच आहे .शेतकर्‍यांनी आपले आलेले  सोयाबिन  20 ऑकटोबर  पासून काढूण घ्यावी . 17,18, ऑक्टोबर दोन दिवस राज्यात पाउस असेल अकोला , वाशिम हिगोली नादेंड परभणी बिड लातूर जालना बुलढाणा जळगाव धुळे औरंगाबाद नगर नाशिक या जिल्हात सर्वदूर नसेल काही भाग सुटेल आपल्या पिकांची काळजी घ्यावी .20 ऑक्टोबर पासून सुर्यदर्शन होइल .


🔴 शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.


नाव : पंजाब डख

हवामान अभ्यासक

मु.पो. गुगळी धामणगाव ता / सेलू जि. परभणी. 431503 मराठवाडा

दि.16/10/2021

शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

दिव्यांग अंमलदार सुर्यभान कागणे यांचे गणवेशावर श्री शिवाजी लष्करे, सपोनि जनसंपर्क अधिकारी यांनी लावले स्टार....


नांदेड जिल्हा पोलीस दलातील १९० पोलीस अंमलदार यांना मा. श्री. प्रमादेकुमार शेवाळे साहेब, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पदोत्रतीची भेट देवून त्यांच्या जिवनातील आनंद द्विवीगुणीत केला आहे. त्यामध्ये सपोउपनि- ५३, पोह-६६, पोना-७१ अशा प्रकारे पदोन्नती देण्यात आलेली आहे.

दिव्यांग अंमलदार सुर्यभान कागणे, यांचा सेवाकाळ नुकताच तीस वर्षे पुर्ण झाला आहे. सध्या सेवेमध्ये एकत्तीसवे वर्ष चालु आहे. दिनांक १५.१०.२०२१ रोजी पदोन्नतीचा आदेश निघाल्यानंतर दिनांक १६.१०.२०२१ रोजी त्यांचे गणवेशावर श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी यांनी त्यांना स्टार लावुन त्यांना सपोउपनि पद बहाल करुन नियंत्रण कक्षाचे डायरी मध्ये नोंद घेतली आहे.

पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार; विजयादशमीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली पोलिसांना ‘गुड न्यूज’

 गुन्ह्यांचा तपास आता अधिक जलदगतीने, अचूकतेने होणार



  • पोलीस दलातील क्रांतिकारी बदलास सुरुवात,४५ हजार पोलिसांना लगेचच होणार निर्णयाचा फायदा

मुंबई दि 15 ऑक्टोबर 2021 : राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा येत्या काही महिन्यात सुमारे 45 हजार हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांना होणार असून विजयादशमीच्या मुहूर्तावर या बातमीमुळे हजारो अंमलदारांच्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होणार आहे.

या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील अंमलदारास कमी कालावधीत पदोन्नतीच्या 3 संधी कमी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल.

पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी मोठ्या संख्येने मिळाल्याने एकीकडे पोलीस अधिका-यांची गरज भागेल तसेच पोलीस दलामध्ये पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या तपासी अंमलदारांच्या सध्याच्या संख्येमध्येही भरीव वाढ होणार आहे.

याशिवाय पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदोन्नती साखळी मधील पोलीस नाईक या संवर्गाची पदेही व्यपंगत होतील.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या पातळीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाने यासंदर्भातील प्रस्तावावर गेल्या सहा महिन्यांपासून काम सुरू होते. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी व शासन निर्णयही निर्गमित करण्यात यावा अशा सूचना देऊन हा प्रस्ताव आज  मंजूर केला.

मुळातच या प्रस्तावाचा उद्देश हा पोलीस शिपाई पदावरील व्यक्तीस पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहचवणे आणि पर्यायाने पोलिसांचे मनोधैर्य व आत्मबल वाढून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणे असा आहे. या निर्णयामुळे प्रत्येक पोलीस स्थानकाकरता मोठ्या संख्येने गुन्हे कामकाजाच्या तपासासाठी अंमलदार मिळणार असून गुन्ह्यांच्या तपासात तसेच दोष सिद्धीच्या कामांत लक्षणीय वेग येणार आहे.

 

बढतीची दीर्घ प्रतीक्षा आता संपली

या निर्णयामुळे आता पोलीस शिपायांना त्यांच्या सरासरी ३५ वर्षाच्या सेवाकालावधीमध्ये, पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त होता येईल. पोलीस शिपायांना सर्वसाधारण १२ ते १५ वर्षानंतर पदोन्नती मिळत असल्यामुळे त्यांचे मनोबल कमी होवून त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. पोलीस अंमलदारांना पदोन्नती साखळीमध्ये पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशा तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात. सर्वसाधारणपणे एका पदावर 10 वर्षे सेवाकालावधीनंतर पदोन्नती मिळायला पाहिजे पण वरच्या श्रेणीतील पदसंख्या कमी असल्यामुळे अपेक्षेपेक्षा दीर्घ कालावधी लागतो.

सध्या सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदावर 3 वर्ष सेवा पूर्ण होण्याआधीच काही जण सेवानिवृत्त होतात, किंवा काही अंमलदार हे पोलीस हवालदार पदावरूनच सेवानिवृत्त होतात. अशा अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी मिळत नाही. त्यांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे.

 

गुन्हे रोखण्यासाठी मोठी मदत

या निर्णयामुळे  गुन्ह्यांची उकल होण्यास तसेच सामान्य नागरीकांची मदत घेण्यात अधिक सुलभता येऊन पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यास मदत तर होणारच आहे शिवाय पोलीस दलास सद्यस्थितीत प्रत्यक्ष कामकाजाकरीता मिळणाऱ्या सुमारे 23 कोटी इतक्या मानवी दिवसामध्ये सुमारे 66 कोटी दिवस इतकी वाढ होईल आणि  गुन्हे उघडकीस येण्याच्या व रोखण्याच्या प्रमाणामध्ये निश्चितच भरीव वाढ होईल.

संख्यात्मक वाढीत सांगायचे तर , पोलीस दलामध्ये सध्याच्या 37861 पोलीस हवालदारांची संख्या 51210 होणार असून 15270 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची संख्या 17071 होणार आहे. एकंदर 15150 अतिरिक्त तपासी अंमलदार उपलब्ध होवून, प्रत्येक पोलीस स्थानकाकरिता 13 अतिरिक्त अंमलदार मिळणार आहेत.



पदोन्नती : नांदेड जिल्ह्यातील ५३ पोलीस हवालदार,६६ पोलीस नाईक व ७१ पोलीस शिपायांची पदोन्नती ! एसीबीच्या दोघाचा समावेश

 


नांदेड,दि १५ ऑक्टोबर २०२१ : पदोन्नती समितीची दि. ०६/१०/२०२९ रोजी बैठक पार पडली.त्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पोलीस अमलदार यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पदावर सेवाजेष्ठतेनुसार आदेश निर्गमीत झाल्याच्या दिनांकापासून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार व पोलीस नाईक या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात स्थानापन्न पदोन्नती देण्यात आली आहे.सर्व पदोन्नत्या ह्या खुल्या प्रवर्गातून देण्यात आल्या आहेत.

५३ पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी, ६६ पोलीस नाईक यांना हवालदार पदी व ७१ पोलीस शिपायांना पोलीस नाईक पदी पदोन्नती देण्यात आल्याचे आदेश जिल्हा अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिनांक १५/१०/२०२१ रोजी काढले आहेत.

पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक 

 रावसाहेब शेषराव घुगे-शिवाजीनगर, भारत नागोराव झुंजारे-किनवट, साहेबराव बाजीराव आडे-पोलीस मुख्यालय, संभाजी दत्ताराम कदम-शवाशा, बाबाराव दिगंबर पवार-एसआयडी किनवट, उमेश उध्दवराव कारामुंगे-धर्माबाद, तानाजी मोहन शिंदे-नियंत्रण कक्ष, बबु्रवान रोकडोबा वाघमारे-पोलीस मुख्यालय,नामदेव जळबा सोनकांबळे-एसीबी, अशोक सिताराम गिते-आर्थिक गुन्हे शाखा, प्रल्हाद नागन बाचेवाड-भोकर, हेमंत दत्तोपंत देशपांडे-अर्धापूर, अनंत राणोजी पवार-इतवारा, चंपती परबता कदम-मुखेड, नवनाथ एकनाथ भारती-पोलीस मुख्यालय, छाया गंगाराम कांबळे-पोलीस मुख्यालय, रतन श्रावण काळे-भाग्यनगर , पिराजी महाजन सोबेकर-लिंबगाव, बळीराम आनंदराव दासरे-पोलीस नियंत्रण कक्ष , बाबूराव धोंडीबा भरकाडे-पो.मु., नारायण सदाशिव कोठुळे-उमरी, मारोती गणपतराव किडे-बारड, भगवान श्रीहरी मुसळे-नांदेड ग्रामीण, सुभाष नागोराव पावडे-पो.मु., राजकुमार लक्ष्मणराव कोडगिरे-मोपवि., व्यंकट नारायण पांचाळ-पोमु., बाबूराव राघोबा जाधव-पोमु.दगडोबा मारोती गिते- नांदेड ग्रामीण, सदाशिव यशवंतराव उबाळे-पो.मु., शेख शादुल शेख लाल-नांदेड ग्रामीण, मधुकर व्यंकटराव शिंदे-नांदेड ग्रामीण, शेलेंद्रसिंघ हुजूरासिंघ मान-शवाशा, शिवाजी काशिनाथ एकाळे-भाग्यनगर, शेख शादुल रब्बानी साब-लोहा-, मिलिंद विठ्ठलराव कात्रे-हिमायतनगर, गंगाधर रामराव केंद्रे-बिलोली, रमेश माणिकराव गोरे-इतवारा, सुर्यकांत काशिनाथ काठोडे-पो.मु., दिगंबर दत्तात्रय बगाडे-लोहा, परमेश्र्वर जळबाजी कदम-नांदेड ग्रामीण, पद्माकर आदिनाथ गायकवाड-देगलूर, शामसुंदर गोविंदराव नागरगोजे-भोकर, मनोज बसवंतराव मसलगेकर-धर्माबाद, विष्णु केरबा शिंदे-शिवाजीनगर, संजय अंबादासराव जोशी-महिला व बालअपरात प्रतिबंध विभाग, चंद्रकांत धोंडीबा कदम-जीवीशा,बालाजी लक्ष्मणराव महागावकर-कंधार, गणेश नरसिंगराव नव्हाटे-पो.मु., माधव नामदेव केंद्रे-पो.मु., संभाजी संग्राम गुट्टे-पीसीआर, शेषराम लक्ष्मण शिंदे-लोहा-काकासाहेब नागोराव रोडके-शवाशा, सुर्यभान दिगंबर कागणे-पो.मु असे आहेत.


पोलीस नाईक ते पोलीस हवालदार 

 विवेक शंकरराव हराळे-पो.मु., भिमराव हिरामन राठोड-अर्धापूर, प्रकाश यादव साखरे-लोहा, प्रकाश व्यंकटराव तमलूरे-रामतिर्थ, दारासिंग गंगासिंग चव्हाण-सिंदखेड, काशिनाथ विठ्ठलराव हिंगमिरे-पो.मु., दौलत व्यंकटराव ताटे-मुखेड, रमेश सकरु आडे- हिमायतनगर, नबाव खान युसूफ खान पठाण-किनवट, सुजात बेग मोहिनोद्दीन मिर्झा-पो.मु., किशन कोंडीबा चिंतोरे-एसीबी, मकरंद शिवाजीराव पाठक-धर्माबाद, अशोक गंगाधर बाबर-पो.मु., माधव राजाराम पाटील-अर्धापूर, निर्मलसिंघ चंदनसिंघ सिध्दू-मो.प.वि., अफजल जलीलखान पठाण-शवाशा, संजय भुजंग शिंदे-भोकर, दत्तात्रय किशनराव भुरे-मुक्रामाबाद, निवृत्ती धोंडीबा तेलंग-पो.मु., संजय संभाजी शिंदे-रामतिर्थ, गंगाराम हणमंतराव जाधव-इतवारा, रामकुमार निवृत्तीराव शेंडगे-नियंत्रण कक्ष, सोनाली बालाजी डाके-तामसा, रमन फकीरा गेडाम-उमरी, प्रकाश गणपती बोदमवाड-अर्धापूर, उत्तम मुकूंदा केंद्रे- इतवारा, माधव धोंडीबा गिते-नांदेड ग्रामीण, सिध्दार्थ पुरभाजी हटकर-जिवीशा, महेंद्र केरबा कवठेकर-मुदखेड, गंगाधर महपती नरबाग-मुक्रामाबाद, विठ्ठल खंडूजी तरटे-सी 47, पिराजी रामा मेडेवार-कुंडलवाडी, संजय किशनराव कंधारे-उमरी, नरेंद्र बालाजी तिडके-मनाठा,  पंडीत शामराव येलकदरे-किनवट, राजेंद्र इरन्ना पांचाळ-देगलूर, कैलास लक्ष्मण मुन्नेश्र्वर-भाग्यनगर, प्रफुल्ल दिगंबर नागरगोजे-भाग्यनगर, अशोक गणेशराव वाडेवाले-शवाशा, मुख्तार हैद्रर शेख-रामतिर्थ, बालाजी रामराव घुगे-पो.मु., दिलीप मुत्तेपराव श्रीमनवार-शवाशा, बालाजी रामजी लोमटे-बारड, पांडूरंग सुदामराव जानापूर-पो.मु., सुर्यकांत व्यंकटराव घुगे-इतवारा, सुरेश तेजेराव भुताळे-मुखेड, गोविंद रामजीकदम-सिंदखेड, बालाजी तुकाराम कदम- वजिराबाद, प्रमोद गोविंदराव कऱ्हाळे- नांदेड ग्रामीण, विठ्ठल पंढरीनथ शिंदे-इतवारा, परशुराम पांडूरंग इंगोले-देगलूर, विरेंद्रसिंघ आशासिंघ बुंगई-जीपीयू, दादाराव माणिकराव काळे-सोनखेड, संभाजी उमाजी पावडे-विमानतळ, रमेश सदाशिव गित्ते-लोहा, गंगाधर लक्ष्मराव शेट्टे-लिंबगाव, दुलबा रामजी वानोळे-बारड, सुर्यभान रावजी क्षीरसागर-पो.मु., सुभाष लोभाजी कदम-भोकर, रंगनाथ एकनाथ भारती-उस्माननगर, साजिदअली विलायतअली सय्यद-सोनखेड, गोविंद गंगाराम चंदनफुले-देगलूर, पंडीत केशवराव कल्याणकर-तामसा, ग्यानबा रघुनाथ शिंदे-एटीएस, किशन गणपती आसनवाड-कंधार, अच्युत गोविंदराव मोरे-पो.मु. असे आहेत.


पोलीस शिपाई ते पोलीस नाईक 

राजीव जीवन कळसकर-देगलूर, शेख रियाज शेख रज्जाक-पो.मु., बालाजी वसंतराव राठोड- उस्मानगर, लक्ष्मण गंगाधर दासरवाड-इतवारा, ज्योती गणपतराव गायकवाड-शवाशा, सतविंदरसिंघ अर्जुनसिंघ मुनीम-बॉम्ब शोध नाशक पथक, बालाजी मोतीराम बेंडे-पो.मु., प्रशांत पांडूरंग कांबळे-मो.प.वि, शिवानंद बालाजी हंबर्डे-इतवारा,पद्मीनी पुंडलिकराव जाधव-शिवाजीनगर, विनोदकुमार गणपतराव पवार-शवाशा, सिध्दार्थ किशनराव वाघमारे-शिवाजीनगर, आशा दिगंबर गिरी-महिला कक्ष, राहुल नारायण कांबळे-पो.मु., अशोक लक्ष्मणराव फुलारी-मसुप, गणेश चंद्रकांत लोसरवार-पो.मु., अनिल नारायण पारधे-वाद्यवृंद, नारायण संभाजी माटे-तामसा, अविनाश शामसुंदर कुलकर्णी-हिमायतनगर, प्रविण राजु सिंहा चंदेल-बॉम्ब शोध पथक, चंद्रकांत पंडीत चावरे-वजिराबाद, शिवराम श्रीपतराव समदरे-भोकर, सुनिता शिवाजीराव मामीलवाड-भाग्यनगर, सिध्दार्थ शंकरराव केळकर-उमरी, शिवकुमार पंचाक्षरी स्वामी-उमरी, अमोल नागनाथराव सातारे-मसुक, प्रदीप व्यंकटराव येमेकर-वजिराबाद, सविता साहेबराव शिंदे-वजिरबाद, मंगल पिराजीराव शिंदे-पो.मु., खदीर हुसेन शेख-धर्माबाद, गोविंद नारायण येईलवाड- पो.मु., सुजाता गुणाजी आळंदीकर-नियंत्रण कक्ष, रेणुका साहेबराव पवार-भाग्यनगर, विश्रांती व्यंकटराव गायकवाड-जीवीशा, वर्षा रामराव गायकवाड-भोकर, तारकेश प्रभाकर गोडबोले-तामसा, वैशाली विठ्ठलराव कुलते- वजिराबाद, सोनीया मन्मथ स्वामी-बिलोली, वैशाली राजेंद्र हनमंते-भाग्यनगर, कृष्णा गंगाराम तलवारे-देगलूर, प्रतिभा गोपाळराव तरटे-अर्धापूर, गंगाधर दत्ता कांबळे-वजिराबाद, अमोल गोपीनाथराव भोकरे-इतवारा, आनंद उकंडजी भेंडेकर-लोहा, विलास संतराम शिंगारपुतळे-शस्त्र शाखा, ज्ञानोबा खाकामुरमुरे-पो.मु., गणेश मोहनराव पंजोल-मसुक, संतोष व्यंकटराव पुलगमवार-जीवीशा, नितीन गोपाळराव कदम-माहूर,सुभाष बाबाराव मुंगल-धर्माबाद, अब्दुल अन्सारी अब्दुल कदीर पटेल-नियंत्रण कक्ष, साईनाथ शिवाजी स्वामी-पो.मु., सुर्यकांता बळीराम कदम-इतवारा, अमरदिपसिंघ प्रताप चौधरी-पो.मु., कुमारप्रसाद दत्तात्रय गायकवाड-शवाशा, अरविंद प्रकाशराव इंगळे-माहूर, संतोष संभाजी आणेराव-धर्माबाद, हनुबी बाबूमियॉं शेख-नायगाव, माधव परसराम डफडे-लोहा, राजकिरण राजाराम खिराडे-जीवीशा, महानंदा अशोक गोडबोले-भाग्यनगर, मुरलीधर दिगंबर येवले-पो.मु., पद्माताई शेषराव कोकणे-इतवारा, पंडीत राजाराम उल्लेवार-पो.मु., रेहानाबानु महेबुब शेख-मरखेल, संतोषी माधवराव मल्लेवार-सोनखेड, ओमकार सुरेश पुरी-पो.मु., लक्ष्मी सुभाषराव कांबळे-पो.मु., साईनाथ शंकरराव बादेवाड-बिलोली, महमद ताहेर फहाद अब्दुल जाकेर खान-पो.मु., शेख शब्बीर शेख मौलाना-कुंटूर असे आहे

सर्व नवीन पदोन्नती प्राप्त पोलीसांना शुभकामना देत प्रमोद शेवाळे यांनी त्यांच्याकडून पोलीस दलाचे नाव जास्त उंचीवर न्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Maharashtra Police website

Nanded Police website

tags : पदोन्नती


शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

भ्रष्टाचार (Corruption) ; इतिहास, व्याप्ती, वैशिष्ट्ये, कारणे, भ्रष्टाचार निमूर्लन योजना

 


एखाद्या व्यक्तिने आर्थिक लाभाकरिता अथवा स्वत:च्या मानसिक समाधानाकरिता अथवा स्वहिताकरिता आपल्या कर्तव्याची जाण न ठेवता दुसऱ्या व्यक्तिला अनैतिकपणे दिलेला त्रास म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. या समस्येचे मूळ प्रामुख्याने व्यक्तिच्या अनैतिक व्यवहारात आहे, असे मानले जाते. त्याचबरोबर व्यक्तिच्या सामाजिक, नैतिक मूल्यांचा ऱ्हास हेही भ्रष्टाचाराचे एक महत्त्वाचे कारण म्हणून बघितले जाते. नियमहिनता, असत्यवादिता, अपारदर्शकता या तीन गोष्टी बरेचदा अनैतिकतेच्या गाभ्याशी असल्याचे दिसते. जेव्हा अशा नैतिक मूल्यांचा ऱ्हास होतो, तेव्हा समाजामध्ये भ्रष्टाचार नावाची समस्या उद्भवते. त्याचबरोबर गुंतागुंतीची आणि आंतर्विरोधग्रस्त सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच प्रचंड प्रमाणातील भ्रष्टाचार वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

भ्रष्टाचार या शब्दाची उत्पत्ती भ्रष्ट व आचार या दोन शब्दांच्या एकीकरणातून झाली असून भ्रष्ट असे आचरण म्हणजे भ्रष्टाचार. व्युत्पत्तीशास्त्रानुसार व्यक्तिगत स्वार्थासाठी व्यक्तिने सदसदविवेकबुद्धी गहाण टाकून केलेले वर्तन म्हणजे भ्रष्टाचार होय. भ्रष्टाचाराची संकल्पना अधिक योग्य रीत्या स्पष्ट होण्यासाठी वेगवेगळ्या विचारवंतानी या संकल्पनेच्या केलेल्या व्याख्या समजून घेणे गरजेचे आहे.

डी. एच. बेली यांच्या मते, ‘भ्रष्टाचार म्हणजे स्वतःच्या व्यक्तिगत लाभासाठी स्वतःला मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करणे होय. हा लाभ पैशाच्या स्वरूपात असण्याची गरज नाही’.

ॲडरली यांच्या मते, ‘भ्रष्टाचार म्हणजे काही औपचारिक नियम किंवा कायद्यांचे उल्लंघन करून सार्वजनिक सत्तेचा व्यक्तिगत फायद्यासाठी उपयोग करणे होय’.

झेप्टेल यांच्या मते, ‘सार्वजनिक भूमिका अथवा कार्यालयाचे नियम आणि कर्तव्य बाजूला ठेऊन व्यक्तिगत फायद्यांसाठी केलेले वर्तन म्हणजे भ्रष्टाचार होय’.


इतिहास : प्राचीन काळी कौटिल्य यांनी अर्थशास्त्रात सरकारी नोकरांकडून राज्यातील महसुलातील पैशांच्या होणाऱ्या अपहाराचे आणि भ्रष्टाचाराचे चाळीस प्रकार मांडले आहेत. इ. स. पूर्व पाचव्या शतकात ग्रीक अधिकारी परकीयांकडून लाच घेऊन त्यांना सार्वजनिक सभेला जाऊ देत आणि मतदान करू देत होते; तर रोमन साम्राज्यात खंडणी आणि देणग्यांच्या रूपात भ्रष्टाचार होत असे. तसेच रोमच्या सिनेटच्या निवडणुकीत भ्रष्टाचारी मार्गाने मते मिळविली जात होती. हीच परंपरा पुढे भारत आणि इतर देशांतही चालू राहिली. सम्राट अशोकांच्या काळातही काही प्रमाणात भष्टाचार अस्तित्वात होता. मध्ययुगात कर वसूल करण्याचे अधिकारच मर्यादित लोकांच्या हातात असल्यामुळे भ्रष्टाचाराची व्याप्ती मर्यादित राहिली. त्यानंतर ब्रिटीश अमदानीत केवळ भारतीय अधिकारीच नव्हे, तर अत्यंत उच्च पदावर असणारे ब्रिटीश अधिकारी देखील लाच घेत होते. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एकूणच आर्थिक क्रियांच्या झालेल्या विस्ताराने भ्रष्टाचाराच्या अनेक मार्गांना जन्म दिला. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या एक-दीड दशकात उच्च पातळीवरील राजकीय नेते मोठ्या प्रमाणात प्रामाणिक राहिले; परंतु तिसऱ्या-चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत हे चित्र बदलायला सुरुवात झाली. नव्या राजकीय नेत्यांनी आपला प्रामाणिकपणा संपविला. लोकांमधील त्यांची प्रतिमाही मलीन बनू लागली. त्याचबरोबर जवळजवळ सर्वच क्षेत्रांतील सरकारी कर्मचारी अत्यंत छोट्या कामासाठीसुद्धा लाच घेऊ लागले. आज जगातील अनेक राजकीय नेते, मंत्री मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी मार्गांचा अवलंब करताना दिसत आहेत. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या अशासकीय जर्मन संघटनेनुसार भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताचा ९७ वा क्रमांक लागतो. दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराच्या व्यवहारातील विसंगती देखील या समस्येची गुंतागुंत आणि व्याप्ती अधिक विस्तारते. त्याचबरोबर जात, वर्ग, लिंगभावात्मक तसेच अनेक प्रकारच्या विषमतायुक्त समाजामध्ये भ्रष्टाचाराची व्याप्ती आणि गुंतागुंत अधिक वाढते. त्यामुळे या समस्येचा विचार व्यापक संदर्भात होणे गरजेचे आहे.


व्याप्ती : भ्रष्टाचार या शब्दाचा वापर प्रामुख्याने लाच घेणे, पैसा खाणे, पैशाची अफरातफर करणे अशा विविध अर्थाने सर्वसाधारणपणे लोक आपल्या जीवनात करत असतात; परंतु आपण भ्रष्टाचाराकडे एक समाजशास्त्रीय संकल्पना म्हणून बघतो, तेव्हा सर्वसामान्यांकडून केला जाणारा भ्रष्टाचार हा मर्यादित स्वरूपाचा आहे, असे आपल्या लक्षात येते. म्हणजेच भ्रष्टाचाराकडे जेव्हा आपण समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून एक सामाजिक प्रक्रिया म्हणून बघतो, तेव्हा त्या सामाजिक प्रक्रियेचे व्यवस्थात्मक आकलन पुढे आणण्याची गरज निर्माण होते.

जगातील सर्वच भांडवली व्यवस्था कमी-अधिक फरकाने भ्रष्ट असतात. भांडवली व्यवस्था जसजशी प्रगत होत जाते, तसतसा भ्रष्टाचार अधिक नियमित, शिस्तबद्ध आणि संस्थात्मक बनतो. भारतासारख्या ‘तिसऱ्या जगामध्ये’ तुटपुंजी साधनसामुग्री, दारिद्र्य आणि विषमता यांमुळे भ्रष्टाचाराला नवे आयाम मिळतात. त्यातूनच भ्रष्टाचाराचा प्रश्न एक ज्वलंत राष्ट्रीय प्रश्न म्हणून समोर येतो.

आज समाजाच्या सर्वच अंगांना भ्रष्टाचार नावाच्या समस्येने ग्रासलेले आहे. ही समस्या केवळ भारतापुरतीच मर्यादित नसून सर्वव्यापी आहे. भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीनुसार तसेच ऐतिहासिक टप्प्यांनुसार या समस्येचे वेगळे आकलन करणे सर्व जगालाच गरजेचे आहे. भ्रष्टाचाराच्या व्याप्तीचा विचार करताना भ्रष्टाचाराच्या क्षेत्रांचा विचार होणे गरजेचे आहे.

भ्रष्टाचाराने संपूर्ण समाज पोखरून टाकला आहे. आज भ्रष्टाचाराविना कोणतेही क्षेत्र अलिप्त असल्याचे दिसून येत नाही. सर्वच क्षेत्रात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचार सुरू आहे. राजकीय क्षेत्र, निवडणुका, बांधकाम व्यवसाय, शेअर व बँकिंग क्षेत्र, विविध हवाला, उद्योग, रस्ते इत्यादी क्षेत्रे भ्रष्टाचाराची ज्वलंत क्षेत्रे म्हणून पुढे आलेली दिसतात. राजकीय क्षेत्र, प्रशासकीय क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र अशा सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार वाढलेला दिसून येतो. तसेच स्पीड मनी, गिफ्ट मनी, एंड मनी व खंडणी इत्यादी भ्रष्टाचाराचे प्रकार अस्तित्वात आलेले दिसतात. भारतासारख्या विकसनशील देशात बांधकाम उद्योग, कर आकारणी, जमीन घोटाळे, राजकारण आणि निवडणुका ही भ्रष्टाचाराची ज्वलंत क्षेत्रे बनलेली आहेत.


वैशिष्ट्ये : भ्रष्टाचार या विसंगतीपूर्ण आणि गुंतागुंतीच्या सामाजिक व्यवहाराची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे : (१) भ्रष्टाचारामध्ये व्यक्तिने तिला लाभलेल्या सत्तेचा, अधिकाराचा आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी केलेला उपयोग केंद्रस्थानी असतो. (२) आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका जाणीवपूर्वक व नियमानुसार न पार पाडणे हेसुद्धा भ्रष्टाचाराच्या समस्येचे मूळ आहे. (३) भ्रष्टाचाराच्या घटना, व्याप्ती आणि परिणाम हे स्थल व काल सापेक्ष असतात. (४) सत्तेचा गैरवापर, संपत्तीचा अवाजवी हव्यास, शासकीय आणि प्रशासकीय नियमांचे उघडपणे केलेले उल्लंघन इत्यादी मूलभूत बाबी भ्रष्टाचाराच्या मुळाशी असतात.

भ्रष्टाचाराच्या समस्येच्या भारतातील स्वरूपाचे स्पष्टीकरण करताना राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर म्हणतात की, ‘भ्रष्टाचार ही विसंगतीत अडकलेली लोकशाही आहे. एकीकडे भ्रष्टाचारात भारताचा ९७ वा क्रमांक लागतो, तर दुसरीकडे लोकायुक्त, केंद्रीय दक्षता आयुक्त, न्यायालये माहिती यंत्रणा इत्यादी भ्रष्टाचार विरोधी यंत्रणादेखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. म्हणजेच सार्वत्रिक भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार विरोधी कायदे व संस्था यांचे सहअस्तित्व हे आपल्या सार्वजनिक जीवनाचे एक विसंगतीपूर्ण वैशिष्ट्य आहे’.


कारणे : भ्रष्टाचाराच्या समस्येबाबतींत विसंगती व भ्रष्टाचार या समस्येमागची प्राथमिक कारणे पुढील प्रमाणे आहेत.

कायदे व नियम यांच्या व्यक्तिनिरपेक्ष अंमलबजावणीचा अभाव : सार्वजनिक संस्था त्यांच्या नेमलेल्या हेतुनुसार चालविणे तसेच त्या संदर्भातील कायदे आणि नियम यांची व्यक्तिनिरपेक्ष अंमलबजावणी करणे या मुलभूत कौशल्यात शासन कमी पडत आहे. याचाच अर्थ कायदे करायचे, नियम बनवायचे आणि त्यांच्या अंमलबजावणीची कोणतीही यंत्रणा योग्य पद्धतीने न राबविता तिचा कारभार बेभरोसे सोडून द्यायचा असा होतो. सध्या ही सर्व प्रकारच्या यंत्रणांची कार्यपद्धतीच बनली असल्याचे दिसते. अशा संस्थात्मक अपयशामुळे कायदे करणे आणि नव्या यंत्रणा स्थापन करणे हे एक प्रकारे धूळफेक ठरू लागली आहे. संस्था चालविण्यासाठी कौशल्य तर लागतेच; परंतु कायद्यासमोर सर्वजण समान आहेत, हे तत्त्व निरपवादपणे स्वीकारावे लागते. त्यामुळे कायदे आहेत, पण कायद्याचा ज्यांच्यावर अंमल करायचा ते घटक मात्र मर्यादित आहेत.

सार्वजनिक जीवनातील व्यवसायिक वृत्तीचा अभाव : व्यक्ती हा व्यक्तिगत पातळीवर बरेचदा प्रेमळ, कनवाळू, दुसऱ्याची व्यक्तीशः काळजी करणारा असतो; परंतु समाज म्हणून सार्वजनिक सभ्यता, सार्वजनिक विवेक यांचा तो पाठपुरावा करतोच असे नाही. प्रत्येकाने आपले काम व्यावसायिक वृत्तीने करावे, हे सार्वजनिक सभ्यतेचा एक भाग असतो; परंतु सर्वसाधारणपणे सार्वजनिक जीवनात (प्रामुख्याने प्रशासकीय जीवनात) व्यावसायिक वृत्ती कमी दिसून येते. एकावर कृपा व दुसऱ्यावर अवकृपा ही वृत्ती जास्त आढळते. व्यक्तिगत जीवनात आपण चांगली व्यक्ती असावे, असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो; पण आपल्या सार्वजनिक भूमिकेत आपण चांगली व्यक्ती असावे, असा तितकासा कोणी प्रयत्न करित नाही. यश मिळविणे, पैसा मिळविणे हे सर्वांचे प्राथमिक उद्दिष्ट असते. हे व्यक्तिगत आणि सार्वजनिक सभ्यतेमधील अंतर भ्रष्टाचाराच्या समस्येच्या विसंगतीपूर्ण स्वरूपाचे एक महत्त्वाचे कारण आहे.

स्वायत्त नागरिक होण्याच्या प्रक्रीयेचा अभाव : माणसांचे रूपांतर स्वाभिमानी आणि आत्मप्रतिष्ठा असणाऱ्या नागरिकांमध्ये होण्याची प्रक्रिया संविधानाला आणि लोकशाही राजकारणाला अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्या जन्मजात समुदायाच्या गुलामगिरीतून माणसे मुक्त होणे आणि राजकीय व्यवस्थेचे आपण आश्रित किंवा ग्राहक नसून स्वतःला अधिकार असलेले स्वायत्त नागरिक आहोत, अशी व्यक्तिंची स्वतःबद्दलची प्रतिमा तयार होणे या दोन गोष्टी आवश्यक असतात. या दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी व्यक्ती म्हणून स्वतःकडे पाहण्यास सुरुवात होणे गरजेचे असते. नेमकी हीच प्रक्रिया अतिशय संथ गतीने होताना दिसते.

आपल्या प्रशासकीय चौकटी आणि राजकीय व्यवहार नागरिकत्वाच्या निर्मितीत सतत अडथळा आणतात. अधिकाधिक कायदे आणि तरतुदी या व्यक्तिंना वेगवेगळ्या समुहांमध्ये कोंडून ठेतात. त्यामुळे कल्याणकारी लोकशाही राजकारणाच्या प्रक्रियेतून माणसांचे हक्क असलेले स्वायत्त नागरिक बनण्याऐवजी त्यांचे लाभधारक समूहांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेत माणसांचे व्यवहार हे जबाबदार आणि स्वाभिमानी नागरिक म्हणून न होता दुय्यमत्त्वाचे नैतिक बळ असलेल्या सामूहिक अहंकारातून होवू लागतात. त्यामुळे नागरिकत्वाचा अभाव हे देखील भ्रष्टाचाराच्या विसंगतीपूर्ण वैशिष्ट्यांचे महत्त्वाचे कारण आहे.


आर्थिक कारणे : भ्रष्टाचाराचे मूळ हे आर्थिकतेशी जोडलेले आहे. माणसाला अल्पावधित, झटपट श्रीमंत होण्याची आणि विनाकष्टाचे उच्च दर्जाचे जीवन जगण्याची इच्छा असते. त्यापोटीच तो अन्य मार्ग शोधत असतो. त्यासाठी तो चलनवाढ करणे, परवाना देण्यासाठी बरीच रक्कम मोजायला लावणे, उद्योग व्यवसायांतील साटेलोटे इत्यादींमुळे आर्थिक भ्रष्टाचार करतो. व्यक्तिगत लाभासाठी तो भ्रष्ट आचरण करण्याचा मार्ग स्वीकारतो. त्याच बरोबर आपल्या देशातील क्लिष्ट कर रचना हीसुद्धा भ्रष्टाचाराचे महत्त्वाचे कारण आहे. त्यासंदर्भातील असंख्य प्रकरणे न्यायालयात निकाली लागलेले नाहीत. कर चुकविण्यासाठी विविध भ्रष्ट मार्गांचा वापर केला जात आहे.

सामाजिक कारणे : जीवनविषयक वाढता चंगळवादी व भोगवादी दृष्टीकोन, निरक्षरता, प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियेविषयक अज्ञान, सर्व प्रकारच्या विषमता, पिळवणुकीस प्राधान्य अशा सामाजिक संरचनेच्या वैशिष्यांमुळे भ्रष्टाचाराला प्राधान्य प्राप्त होते. भारतात जातीव्यवस्था आणि नातेसंबंध देखील भ्रष्टाचारवाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजाविताना दिसतात.

राजकीय कारणे : भ्रष्टाचाराला राजकीय कारण हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे दिसून येते. बऱ्याच वेळा अकार्यक्षम नेतृत्व, निवडणुकांसाठी निधी, राजकारण्यांबरोबरचे हितसंबंध, राजकीय उदासीनता, कामाबद्दलची तत्परता, जात, धर्म, नातेसंबंधांचे राजकारण इत्यादीं मधूनही भ्रष्टाचार होताना दिसतो. राजकारणातील भ्रष्टाचाराची चर्चा करत असताना बरेचदा राजकारणातील भ्रष्टाचाराचे मूळ भ्रष्ट राजकारणी, अधिकारी यांच्या व्यवहारांत शोधले जाते; परंतु राजकीय क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराची पाळे-मुळे जशी भारतातील विशिष्ट स्वरूपाच्या भांडवली व्यवस्थेत शोधता येतात, तशी ती येथील वैशिष्ट्यपूर्ण लोकशाही पद्धतीत देखील आहेत. भ्रष्टाचाराच्या समस्येची ही व्यवस्थात्मक बाजू लक्षात न घेतल्यामुळे राजकारणातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी खेळले गेलेले भ्रष्टाचाराचे राजकारण उथळ, तात्पुरते आणि अव्यवहार्य ठरते.

कायदेशीर कारणे : अमर्यादित कायदे, कायद्यातील कमकुवत बाजू व कायद्याच्या अंमलबजावणीमधील ढिसाळपणा या सर्व गोष्टींचा गैरफायदा घेत आज सत्तास्थानी असलेल्या व्यक्ती मोठमोठ्या घोटाळ्यांतून निर्दोषपणे बाहेर पडल्याचे दिसून येते. यामुळे भ्रष्टाचार आणखी फोपावण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. याचबरोबर सरकारचे आर्थिक धोरण, वस्तुंची कमतरता, पैशांचे वाढते महत्त्व, अपुरे वेतन व आर्थिक असुरक्षितता, योग्य शिक्षेचा अभाव, प्रचंड प्रमाणात असणारा अवैध पैसा इत्यादी कारणेसुद्धा भ्रष्टाचार घडण्यासाठी कारणीभूत असल्याचे दिसून येतात.

भ्रष्टाचार निमूर्लन योजना : इ. स. १९४७ मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर ३० पेक्षा जास्त समित्या किंवा आयोग अस्तित्वात आले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांची प्रशासनातील गतिमानता, पारदर्शकता वाढविण्यासाठी तसेच जनतेच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्रांत असणाऱ्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी हे धोरण योजले होते. त्यानुसार विविध समित्या व आयोग स्थापन करण्यात आले. उदा., सचिवालय, पुनर्गठन समिती–१९४६; मितव्ययिता समिती–१९४७; अय्यंगार रिपोर्ट–१९४९; गोरवाला रिपोर्ट–१९५१; पॉल एच. एपलबी रिपोर्ट–१९५२; संथानम समिती–१९६२; पहिला प्रशासकीय सुधार आयोग–१९६६; दुसरा प्रशासकीय सुधार आयोग–२००५; संस्था-अंमलबजावणी संचालनालय (ईडी) – १९५६; सी. बी. आय.–१९६१; केंद्रीय दक्षता आयोग–१९६४; कायदे : भारतीय दंड संहिता–१८६०; भारतीय आयकर अधिनियम–१९६१; लोकायुक्त–१९७१; भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम–१९८८; मनी लॉडरिंग कायदा–२००२; माहितीचा अधिकार अधिनियम–२००५.


देश-विदेशांत भ्रष्टाचारविरोधी कायदेशीर तरतुदींच्या माध्यमांतून यंत्रणा उभ्या असून देखील एकविसाव्या शतकात समाजामध्ये भ्रष्टाचाराच्या समस्या कायम आहेत. त्यामुळे केवळ कायदे करणे किंवा यंत्रणा उभ्या करणे पुरेसे नसून समाजातील जात, वर्ग, लिंगभावात्मक विषमता यांच्या संरचनांमुळे आणि व्यवस्थांमुळे भ्रष्टाचाराच्या समस्येचे स्वरूप अधिकच गुंतागुंतीचे आणि विसंगतीपूर्ण बनत आहे. त्यामुळे उपाययोजानांचा विचार करता केवळ भ्रष्ट व्यवहारांपुरता तसेच कायदेशीर तरतुदींपुरता मर्यादित विचार करून चालणार नाही. भ्रष्टाचाराचे निराकारण केवळ कायदेशीर किंवा व्यवस्थापकीय पुनर्रचनेमुळे होऊ शकत नाही. त्यासाठी सामाजिक नीती व मूल्यांची जाण वाढविण्याची गरज आहे. तसेच व्यापक पातळीवर खऱ्या अर्थाने सुसंस्कृत, सभ्य व भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करण्यासाठी कृती कार्यक्रमाची आखणी आणि विषमताविरहित समाजाची निर्मिती करावी लागेल. भ्रष्टाचार निर्मुलन ही प्रत्येक नागरिकाची जाबाबदारी आहे, ही बाब प्रत्येकानी मनात रुजविणे गरजेचे आहे.


संदर्भ :


जाधव, तुकाराम; शिरापूरकर, महेश, भारतीय संविधान व भारतीय राजकारण, पुणे, २०१२.

ठाकूर, प्रदिप; राजा, पूजा, भ्रष्टाचाराच्या विरोधातील भारतीय लढ्याचा चेहरा, पुणे, २०१२.

यादव, योगेंद्र; पळशीकर, सुहास; डिसूझा, पीटर, लोकशाही जिंदाबाद, पुणे,२०१०.

Bardhan, Pranab, Globalisation, Democracy and Corruption an Indian Perspective, Kolkata, 2015.

Guhan, Sanjivi; Samuel, Paul, Corruption in India : Agenda for Action, 1997.

Verma, Arvind; Sharma, Ramesh, Combating Corruption in India, New Delhi, 2019.

समीक्षक : मयुरी सामंत

आज आपल्यासमोरची सर्वात गंभीर समस्या आहे ती भ्रष्टाचार व लाचखोरी ; भ्रष्टाचार येतो कोठून ?

 


आज आपल्यासमोरची सर्वात गंभीर समस्या आहे ती भ्रष्टाचार व लाचखोरी. भ्रष्टाचार येतो कोठून ? कुठल्याही भ्रष्टाचाराचे उगमस्थान असते व्यक्तीचा अनैतिक व्यवहार. आज समाजाची जी दुर्गती,स्वच्छंदता आणि बेशिस्त आहे तिचे कारण आहे सामाजिक नैतिक मूल्यांचा र्‍हास. नियमहीनता,असत्यवादीता सगळीकडे सर्रास पहायला मिळते. या दुर्दशेबद्दल व गंभीर समस्येबद्दल विचार करणे,त्याच्या निराकरणाचे उपाय शोधणे हे प्रत्येक बुद्धीजीवीचे कर्तव्य आहे. परंतु, दुर्दैव असे की भ्रष्टाचार विश्वव्यापक समस्या आहे असे म्हणून त्यावर उपाय करण्याचा विचार टाळण्याकडेच सर्वांचा कल दिसतो. असे वाटते की समाजाने भ्रष्टाचार हा जीवनाचा अविभाज्य अंग म्हणून स्वीकारला आहे की काय. या बेजबाबदार व्यवहाराला सामान्य मणुष्य जसा जबाबदार आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने शासन कर्ते व शासन प्रणाली जबाबदार आहे. आज सामान्य जनतेचे कुठलेच काम लाच दिल्याशिवाय होत नसेल तर त्यांनी मतदानासाठी लाच घेतली म्हणून केवळ त्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करता येणार नाही. त्यासाठी सार्‍या व्यवस्था, विशेषत: शासनप्रणाली नैतिकतेच्या पायावर उभी करावी लागेल. घराघरांतून, शाळांमधून नियम, व्यवस्था, अनुशासन, सत्यवादीता, पावित्र्य, आत्मशक्तीचा विकास करण्यावर भर दिला गेला पाहिजे. व्यक्तीच्या व्यवहारात सत्य उतरले तर मणुष्य सामाजिक नैतिकता प्रतिष्ठीत करु शकतो. वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीमुळे मानवाचे भौतिक जीवन सुविधापूर्ण झाले आहे परंतु मानव आतुन अधिक अशांत होत चालला आहे. कारण हेच की सदगुणांचा सदाचारांचा आजच्या जीवनात नितांत अभाव आहे. जेंव्हा नेतृत्वच स्वत: असत्त्याने वागते तेंव्हा सामान्य लोकही त्याचे अनुकरण करतात. शिडीच्या खालच्या पायर्‍यांवर असलेला मणुष्य भ्रष्ट होणार नाही याची काळजी वरच्या पायर्‍यांवरच्या प्रतिष्ठीतांनी घ्यायची असते. सामान्य जनता नेता आणि अभिनेता यांना आपला आदर्श मानते व त्यांचे अनुकरण करते. आज नेता भ्रष्ट,अभिनेता भ्रष्ट आणि आणि म्हणून जनताही भ्रष्ट अशी मानवतेच्या भविष्याच्या दृष्टीने फार भयावह परिस्थिती आहे. भ्रष्ट नेतृत्व, भ्रष्ट समाज स्त्रीच्या अब्रुचे रक्षण करु शकत नाही. यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीला स्वत:च करावा लागेल. कुठलातरी दैवी चचमत्कार आपल्याला यातुन सोडवील हा भाबडेपणा आपण सोडला पाहिजे

भ्रष्टाचार एक समस्या ; भ्रष्टाचार एक कलंक_Essay on Corruption In Marathi

 


भ्रष्टाचार वर मराठी निबंध । Essay on Corruption In Marathi

नमस्कार ! मित्रांनो आज आपण ” भ्रष्टाचार वर मराठी निबंध । Essay on Corruption In Marathi ” या विषयावर निबंध बघणार आहोत.

या निबंधा मध्ये आज आपण आपल्या देशाला बोळकावलेला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारा विषयी असणारी देशातील समाजाची मानसिकता यांवर माहिती बघणार आहोत.

आजचे जग हे एकविसाव्या शतका कडे जात आहे. आणि ह्या एकविसाव्या शतकाला एक राक्षसाने जणू आळाच घातला आहे. त्या राक्षसाचे नाव, ” भ्रष्टाचार” !


भ्रष्टाचारावर मराठी निबंध । Essay on Corruption In Marathi

हल्ली दिवसें दिवस तर वर्तमानपत्रात रोज नव्या ” आर्थिक घोटाळा” बघायला मिळतो. वर्तमानपत्र हे बातम्या देणारे नसून भ्रष्टाचार लिहिणारे पत्रच झाले आहे. त्यात कित्येक बँक घोटाळे, लाच घेणारे अधिकारी, खोट्या नोटा छापणे….. अशा कित्येक घोटाळ्यांच्या बातम्या आपण रोजच वाचत, बघत असतो.

पूर्वीच्या काळातील भ्रष्टाचारा पेक्षा या आधुनिक युगाचा भ्रष्टाचार हा महाभयंकर आहेत. आज कुठल्याही क्षेत्रात विचार केला असता, भ्रष्टाचार नावाची कीड ही त्या क्षेत्राला लागलेली दिसेलच. भ्रष्टाचाराने आज प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व स्थापित केलेले आहे.

जर आपलं एखादं कोणी बँक कर्मचारी किव्हा सरकारी कर्मचारी काम करत नसेल तर तेला पैशाची लाच देऊन काम करून घेणे हेलाच भ्रष्टाचार म्हणतात.

वाढत्या महागाईला तर पर्यायच नाही. महागाई ही दिवसें दिवस आणखी वाढतच जात आहे. कोणत्याही गोष्टीची कमतरता म्हणजेच टंचाई ही भ्रष्टाचाराला जन्म देते.

आज देशाची लोकसंख्या अफाट वाढलेली आहे. इथे नोकऱ्यांच्या जागा कमी आणि नोकरीसाठी अर्ज केलेल्या लोकांची संख्या जास्त आढळते. मग नोकऱ्यांची टंचाई हा मुद्दा समोर आला की, तेथे भ्रष्टाचाराला वावरण्यासाठी जागा मिळतेच.

लाखो रुपयांची लाच देऊन मोठ्या- मोठ्या अधिकाराच्या जागा मिळवल्या जातात, आणि दिलेली लाच पुन्हा मिळविण्यासाठी पुन्हा नव्याने झालेला अधिकारी लाच घेतो, परिणामी हा भ्रष्टाचार वाढत जातो.

लाच देणे आणि लाच घेणे चक्र सुरू होते आणि त्यातूनच ” काळा पैसा” निर्माण होत आहे.

आज विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे. त्यात जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या चैनीच्या गोष्टी ची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. नव- नवीन गोष्ट बघायला मिळत आहेत आणि त्या गोष्टींची प्राप्ती करण्यासाठी लालची होत आहे.

कष्ट करून पैसा मिळविणे सगळ्यांना नको वाटत आहे. सहज काही काम न करता पैसा मिळवणे सगळ्यांना सुखाचे वाटत आहे. पण ह्याच वागण्यामुळे, स्वतःच्या स्वार्थासाठी, हव्यासापोटी मनुष्य भ्रष्टाचार सारख्या राक्षसाला जन्म देत आहेत.

आज पैसा मिळवण्यासाठी मनुष्य वाटेल ते करायला तयार आहे. पैशासाठी लोक चुकीचा आणि भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारत आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराचा किडा फिरत आहे.

भ्रष्टाचाराने अन्न आणि औषधी सुद्धा सोडल्या नाहीत. आज अन्नात व औषधात देखील भेसळ केली जात आहे. अन्नाच्या आणि औषधातील भेसळीमुळे रोज कित्येक गरीब आणि निरपराध जीवांचे बळी घेतले आहेत.

तसेच भ्रष्टाचाराने शिक्षण क्षेत्र सुद्धा सोडले नाही. आज कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यां कडून लाच घेऊन त्यांना मेडिकल, इंजीनियरिंग अशा शाखेत भरती केली जाते. बालवर्गा पासून ते शाळा- महाविद्यालयां पर्यंतच्या सर्व शाखेच्या प्रवेशासाठी लाच घेतली जाते.

आणि अशीच लाच घेऊन दहावी ते बारावीच्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिका फोडल्या जात व लाच घेऊनच परीक्षेतील गुणांची फिरवा फिरवी केली जाते. आज वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या देशाची संरक्षण विषय सर्व माहिती परकीय सत्तेला पुरवायला सुद्धा लोक विचार करेनात.

काही वर्षांपूर्वी आपल्या देशात हा भ्रष्टाचार नावाचा राक्षस जन्माला नव्हता पण कालांतराने ती स्थिती बदलली आहे. सुरुवाती भ्रष्टाचारी माणसाला खूप कमी दर्जा देत असत पण आज सर्व नैतिक चालीरीतीचा व मूल्यांचा ऱ्हास झाला आहे.

आज आपल्याला एक ही ठिकाण असे दिसणार नाही की, जिथे भ्रष्टाचार बघायला मिळणार. आजच्या जगातील पापी लोक मंदिरा मध्ये सुद्धा भ्रष्टाचार करताना दिसतील. जे लोक लाच देतात त्यांना दर्शनासाठी पहिले स्थान असते आणि गरीब लोकांना तासांनतास रांगेतच थांबावे लागते.

आज असे एकही असे क्षेत्र नाही तिथे भ्रष्टाचार बघायला नाही सर्वत्र भ्रष्टाचाराचे साम्राज्य पसरलेले दिसेल. आजचा भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे.

भ्रष्टाचाराचे राज्य केवळ मोठ्या शहरात नसून लहान लहान खेड्यांपर्यंत पोहोचले आहे. सध्या खेड्यातील लोकांना काही काम करायचे म्हटले तर लाच द्यावी लागते. त्या शिवाय कुठलीच कामे पूर्ण होत नाहीत.

भ्रष्टाचाराचे सर्वात प्रथम प्रसारण हे सरकारी कार्यालयांमधून होताना दिसेल कोणते ही काम सरकारी कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे म्हटले तर आधी त्यांचे ” खिसे भरावे” लागतात. म्हणजेच लाच द्यावी लागते.


भ्रष्टाचार एक समस्या :

आज- काल फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. फसवणूक हा एक प्रकारच्या भ्रष्टाचाराचाच भाग मानला जातो. फसवे फोन करून बँकेची माहिती घेऊन पैसे चोरणे, फसवणूक काही ना काही वस्तू घेणे आज खूप वाढले आहे.

आज- काल विमा कंपनी, बँका, आयकर विभाग, मोठी कार्यालय, सरकारी कार्यालये या ठिकाणी हा भ्रष्टाचाराने आळा घातला आहे. मोठे अधिकारी आपल्या पदाचा गैर फायदा घेऊन भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत.

भ्रष्टाचाराचा क्रीडा सर्वांची मने आणि समाजाला पोखरत आहे. आज भ्रष्टाचार हि मोठी चिंताजनक गोष्ट झाली आहे. कारण भ्रष्टाचाराचा राक्षस आपले हात पाय कापत आहे. म्हणजेच आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला भ्रष्टाचाराला आहारी जावे लागत आहे.

अनेक पवित्र ठिकाणांचा भ्रष्टाचाराची कीड लागून ही ठिकाणे अपवित्र झाली आहेत. वैद्यकीय क्षेत्र हे केवढे पवित्र क्षेत्र मानले जाते. डॉक्टरांना, नर्सना तर परमेश्वराचा दर्जा दिला जातो.

डॉक्टर आपल्याला जीवनदान देतात पण ह्या भ्रष्टाचाराच्या अभावी जाऊन आपल्याला जीवदान देणारे परमेश्वराचे दुसरे रूप मानणारे डॉक्टर राक्षस बनत आहेत. तो पैशाच्या पोटी गरीब माणसांवर उपचार करेना ज्यांच्या कडे पैसा आहे त्यांच्या मागे डॉक्टर ही आहे अशी स्थिती झाली आहे.

माणसाची परिस्थिती, उच्चपद आणि अधिकार हे भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरतात. हवं ते मिळवण्यासाठी माणूस भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारत आहे. लहान- लहान गोष्टींमधून भ्रष्टाचार जन्म घेत असतो.

तो म्हणजे वजनामध्ये काटा मारणे, कंडक्टरने सुटे पैसे परत न करणे, परीक्षेत नंबर आल्यास विद्यार्थ्यांची बक्षिसे ठेवून घेणे, अशा लहान लहान गोष्टीं मधून भ्रष्टाचार जन्माला येत असतो. आज प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गोष्टीत भ्रष्टाचार करीत असतो.

राष्ट्राच्या भवितव्याचे नाव सांगून अनेक राजकारणी नेते भ्रष्टाचार करतात. बोगस प्रतिष्ठान, नियम, अटी काढून राजरोस किती मोठ्या प्रमाणात पैसा जमवतात.

शेतकऱ्यांना शेतीसाठी आलेल्या अनुदानातून पैसे काटते, रस्ते- बांधकामाच्या कामातून पैश्याची आदला बदली करणे अश्या कित्येक नव- नवीन कारणांमधून पैसा कमावला जातो भ्रष्टाचार होतो.


भ्रष्टाचार एक कलंक :

काहीजण तर स्वतःच्या स्वार्थासाठी देशाला विकायला सुद्धा कमी करत नाहीत. देशातील गुप्त माहिती इतर देशाला देऊन त्यांच्या कडून पैसे घेणे परिणामी आतंकी हमले अशा समस्यांना तोंड द्यायला भाग पडावे लागते.

नोकरी करताना वरिष्ठ पदासाठी म्हणजे प्रमोशन साठी वरिष्ठ कर्मचाऱ्यांना पार्टी देणे, पैसे देणे हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच समजला जातो.

पण हा भ्रष्टाचार करताना आपण विचार करत नाही की माणूस भ्रष्टाचारी होतो तरी का? माणसाच्या सर्व श्रद्धा निष्ठा हरवतात तर का ?

मंदिरातील देवाच्या सोन्याच्या मुर्त्या सुद्धा चोरीला जातात मग या वागणुकीला म्हणावे तरी काय ?

असे किती तरी प्रश्न आपल्या समोर पडतात. जेव्हा पैसा साठी भ्रष्टाचार करून एखाद्या गरीबा कडून पैशाची लाच घेऊन आपण आनंदी तरी राहू शकतो का ? मग हा भ्रष्टाचार करायचाच का ?

जेव्हा आपण कष्ट करून पैसे कमवतो त्याचा आनंद आपण पैशा सोबत मोजू पण शकत नाही. कोणी भ्रष्टाचार करून आपल्याला देशाला व स्वतःला सुद्धा वाईट मार्गावर घेऊन जात आहोत. प्रत्येक मनुष्याचे स्वप्न असते की चांगले शिकून समाजात चांगला माणूस म्हणून जगावे.

पण हा भ्रष्टाचार रुपी किड आपल्या समाजात येवढ्या मोठ्या प्रमाणात लागली आहे की, गरीब- श्रीमंत, लहान-मोठे, तरुण- म्हातारे सर्व भ्रष्टाचाराला बळी पडत आहेत.

म्हणून आपल्या देशाला या भ्रष्टाचाराच्या राक्षसा पासून मुक्त करायचे असेल तर सरकार बरोबर देशातील प्रत्येक नागरिकाने पाऊल उचलले पाहिजे.

भारत देशातील भ्रष्टाचार ही समस्या दूर झाली तर भारत देश हा विकसनशील देशांच्या यादीत येईल. व देशाची प्रगती सुद्धा होईल सोबतच देशातील प्रत्येक नागरिक प्रगती करेल. म्हणून प्रत्येक व्यक्ती प्रामाणिक पणे राहून आपले कर्तव्य पार करण्यासाठी जबाबदार झाला पाहिजे.

कोणतीही व्यवस्था, सुविधा आणि यंत्रणा जी लोकांच्या फायद्याची असेल ती अस्तित्वात आणलीच पाहिजे.

मानवी विकास हा फक्त आर्थिक दृष्ट्या न होता तो नैतिक दृष्ट्या होणे गरजेचे आहे.

आणि असेच झाले तेव्हाच भ्रष्टाचार आपल्या समाजातून दूर होईल. आणि आपल्या देशाचा विकास होईल व देशातील प्रत्येक नागरिक प्रामाणिक होईल.

Popular posts लोकप्रिय पोस्ट