🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शनिवार, मे २९, २०२१

लाच प्रकरण :महा लाचखोर मंडळ अधिका-यासह लाचखोर तलाठी 10 हजार लाच घेतल्यानंतर दारु, मटणाच्या पार्टीचा अनुचित लाभ घेताना एसीबीच्या जाळ्यात

 


*आदरणीय सर*

*यशस्वी सापळा*

▶️ *युनिट -* बुलडाणा

▶️ *तक्रारदार-* पुरुष ,वय- ४२ वर्षे रा. शिर्ला नेमाणे, ता. खामगाव, जि.बुलडाणा

▶️ *आरोपी-* 

१) श्री. विलास साहेबराव खेडेकर

वय- ५२ वर्षे,  

पद- मंडळ अधिकारी, (वर्ग ३) 

नेमणूक - लाखनवाडा, 

रा. गजानन काॅलनी, खामगाव.     

२) बाबुराव उखर्डा मोरे,

वय - ३६ वर्षे , पद - तलाठी, वर्ग (३)

नेमणूक - शिर्ला नेमाणे , ता.खामगाव   

रा. किन्ही महादेव, ता. खामगाव.     

▶️ *लाचेची मागणी*- रुपये १०००० व दारू मटणाची पार्टी,

▶️ *लाच स्विकारली-*

  रुपये १०००० व दारु मटणाची पार्टी. 

▶️ *हस्तगत मुद्देमाल-* 

दोन इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या बाटल्या व मांसाहारी जेवणाचे पदार्थ.

▶️ *लाचेची मागणी -* 

ता. २८/०५/२०२१

▶️ *लाच स्विकारली -*    

ता. २८/०५/२०२१

▶️ *घटनास्थळ* 

पिंप्री धनगर शिवारातील श्री प्रल्हाद चव्हाण यांचे शेतातील झोपडीसमोर, ता. खामगाव, जि. बुलडाणा.

▶️ *लाचेचे कारण -*.  

यातील तक्रारदार यांच्या भावाच्या नावे खरेदी केलेल्या प्लॉटची सातबारा नोंद घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदार यांना रु १००००/- व दारु मटण पार्टीची मागणी करुन रु १०००० यापूर्वीच स्विकारले असून पडताळणी दरम्यान दारु मटण पार्टीची मागणी करुन, सापळा कारवाई दरम्यान दारु मटनाच्या मेजवानीच्या स्वरुपात अनुचित लाभ मिळवितांना मिळून आले.

▶️हॅश व्हॅल्यू काढण्यात आली आहे.

▶️ *सापळा व मदत पथक-* पो.उपअधिक्षक श्री. संजय चौधरी,

पो.निरीक्षक - श्री.सचिन इंगळे

पोलीस नाईक - श्री विलास साखरे, प्रवीण बैरागी, मोहम्मद रिझवान.

पो.शि.- श्री विनोद लोखंडे, अझरुद्दीन काझी

चालक पो. ना. श्री नितीन शेटे, पो.शि. शेख अर्शद

▶️ *मार्गदर्शन अधिकारी* :- 

1) श्री. विशाल गायकवाड,

पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र.

2) श्री. अरुण सावंत,

अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र.

▶️ *तपासी अधिकारी*

  पो. उप अधिक्षक श्री संजय चौधरी.

▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* 

मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा .

---------------------------------------------- 

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

*लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा*.

*संपर्क क्रमांक* - *8888768218*

*टोल फ्री क्रमांक* - *1064*.

-------------------------------------------


मारहाण प्रकरण भोवले : त्या पोलीस उपनिरीक्षक भागवत कदमसह अन्य चौघे निलंबित, लाचखोर डीवायएसपीच्या बॉडिगार्डचाही समावेश

लाचखोर डीवायएसपी सुधीर खिरडकरसह अन्य सात-आठ पोलिस कर्मचाऱ्यांनी भाजप पदाधिकारी शिवराज नारियलवाले यांना बेदम मारहाण केली होती. 


जालना : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवराय नारियलवाले यांना अमानुषपणे मारहाण प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्ष विनायक देशमुख यांनी शुक्रवारी याबाबत आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे लाचखोरी प्रकरणात घरी बसलेलेल्या डीवायएसपी सुधीर खिरडकर याच्या बॉडीगार्डचा देखील निलंबित कर्मचा-यामध्ये समावेश आहे. आता पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याच्यावर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्षषलागले आहे. 

7 एप्रिल रोजी जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे तोडफोड केल्याप्रकरणी बळाचा वापर केल्याचा दावा करणारे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे देखील आता अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत, त्यांच्यासोबत मारहाण करणारे पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे,सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे या पाच जनांचे निलंबनाचे आदेश पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी काढले आहेत.



27 मे रोजी नारियालवाले यांना अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांची पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी स्वतः चौकशी केली होती. तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्फत त्यांची चौकशी सुरू होती. सुमारास पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे,सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

चौकट

"याप्रकरणी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम याच्यासह वरील चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याचे सांगितले तर पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई होऊ शकते असे संकेत दिले आहेत."

चौकट

“ आपली प्रतिष्ठा कायम ठेवणे आणि नागरिकांच्या सन्मानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली (पोलीस) आहे. आपण फक्त गुन्हा शोधणे आणि गुन्हेगारांची नोंद करणे पुरेसे नाही. आपण लोकांचे प्रेम जिंकण्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत... जो माणूस मानसिकदृष्ट्या मजबूत किंवा स्थिर नसतो किंवा परिस्थितीत शांत राहू शकत नाही, असा व्यक्ती पोलीस दलाचा सदस्य होऊ शकत नाही ”

- सरदार वल्लभभाई पटेल

Popular posts लोकप्रिय पोस्ट