नायगाव,दि.24 नोव्हेंबर 2021 : तालुक्यातील कृष्णूर येथील औद्योगिक वसाहतीत किर्ती गोल्ड ही तेल निर्मिती करणारी कंपनी आहे.कीर्ती गोल्ड ही गेल्या अनेक वर्षा पासून तालुक्यातील सोयाबीनची खरेदी करून शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात लूट करत आहे.नायगाव तालुक्यातील वृक्षाची या तेल निर्मिती करणाऱ्या कंपनीने चांगलीच वाट लावली असल्यामुळे या कंपनीवर कार्यावाही करण्यात यावी या मागणीसाठी सोनाली पाटील हंबर्डे व अंकुशकुमार देगावकर यांनी नायागावच्या तहसीलदारांना 24 नोव्हेंबर रोजी निवेदन दिले आहे.
तालुक्यातील कृष्णूर येथील कीर्ती गोल्ड कंपनी ही एका धनदांडग्या भांडवलदाराची असल्याने वनविभागाचे अधिकारी कंपनीत जाऊन पाहणी केल्याचा बनावटी कांगावा करत आर्थिक तडजोड करत कंपनीत लाकूडच सापडले नसल्याचा खोटा देखावा करून वनपाल ग्रुपवार हे उडवा उडावीची उत्तरं देऊन कीर्ती गोल्ड कंपनीला पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचे सरळ सरळ दिसून येत असल्यामुळे वनविभाग अधिकाऱ्यासह कंपनीवर तात्काळ कार्यावाही करण्यात यावी असी मागणी सोनाली पाटील हंबर्डे व अंकुशकुमार देगावकर यांनी केली असून कठोर कार्यावाही न झाल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कीर्ती गोल्ड कंपनी नायगाव तालुक्यासह अन्य तालुक्यातुन हजारो टन सोयाबीन खरेदी करत असते परंतु कुंटूर मार्केट कमिटीच्या ही डोळ्यात धूळ टाकून कमी सोयाबीन खरेदी करत असल्याचे सांगत टॅक्स देखील कमी प्रमाणात भरते तसेच शासनाची जीएसटी मोठ्या प्रमाणात बुडवत असल्याचे सदरच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.देगलूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या संगनमताने खुप मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असताना वनविभागाचे अधिकारी सांगता कीत कंपनीत एक लाकूड देखील निदर्शनास आले नाही असे म्हणत वन विभागाचे अधिकारी डोळ्यावर पैशाची पट्टी बांधून शासनाची दिशाभूल करत असल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून उघड झाला आहे.
नायगाव तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्षाची मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड नायगाव तालुक्याचे वाळवंट बनवत असल्यामुळे भविष्यात पर्यावरणाचा धोका व ऑक्सिजनचा पुरवठा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.वन विभागाचे अधिकारी कीर्ती गोल्ड कंपनीत साठवण करून ठेवलेल्या लाकडांचा पंचनामा करून कंपनीवर कार्यावाही करण्या ऐवजी अधिकारी मलिदा घेऊन मालामाल झाले असल्याचे तक्रार कर्त्यांचे म्हणणे आहे.त्याच बरोबर कीर्ती गोल्ड कंपनीतून दररोज भेसळ युक्त खाद्य तेल विक्री होत असल्याने नांदेडच्या भेसळ अधिका-या मार्फत ही चौकशी करण्यात यावी असी मागणी देखील करण्यात आली आहे.
कंपनीने गहाण पाणी सोडळल्यामुळे त्या गहाण पाण्यामुळे शेतकऱ्याचे जनावरे ही मरण पावले होते.त्या शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारची आर्थिक मदत कंपनी कडून करण्यात आली नाही.ते गहाण पाणी कायमचे बंद करण्यात यावे यासह कीर्ती गोल्ड कंपनीद्वारे हवेत सोडण्यात येणाऱ्या धुरामुळे प्रदूषण वाढत असल्यामुळे प्रदूषण अधिकाऱ्यांनी चौकशी करून कंपनीवर कारवाई करावी अन्यथा किर्ती गोल्ड कंपनी समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा सोनाली पाटील हंबर्डे व अंकुशकुमार देगावकर यांनी दिला आहे.तसेच काही अनुचित प्रकार घडल्यास स्वतः प्रशासन जबादार असेल याची अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावे असेही निवेदनात नमूद करण्यात आहे.