🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, जून ३०, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर महावितरण सहायक अभियंता चोरावर मोर व्हायला जाऊन 30,000 पाई अडकला एसीबीच्या जाळ्यात

 


प्रेस नोट

दिनांक-३०/०६/२०२१

३० हजार रूपये लाचेची मागणी केली म्हणुन महावितरण शाखा क. १ लातुर च्या सहायक अभियंता शेख मन्सुर नजीर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल.

यातील तक्रारदार यांच्या हॉटेलच्या लाईटने मिटर मधून विद्युत प्रवाह काढून थेट लाईटचा वापर करून विज चोरी केली म्हणुन सहायक अभियंता शेख मन्सुर नजीर याने कारवाई न करणेसाठी ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केली म्हणून दिनांक २९/०६/२०२१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या कडे तकार प्राप्त झाली होती. तक्ररदार यांचे तक्ररीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर यांच्या कडून दिनांक २९/०६/२०२१ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, तक्रारदार यांच्या हॉटेलच्या लाईटचे मिटर मधून विद्युत प्रवाह काढून थेट लाईटचा वापर करून विज चोरी केली म्हणून सहायक अभियंता शेख मन्सुर नजीर याने कारवाई न करणेसाठी ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

तक्ररदार ३०,०००/- रुपये लाचेची रक्कम घेवून आलोसे शेख मन्सुर नजीर, पद- सहायक अभियंता, वर्ग २. नेमणुक महावितरण कार्यालय लातुर शहर शाखा क १, रा. गरुड चौक लातुर याला देण्याकरीता महावितरण कार्यालय लातुर शाख १ येथे दिनांक २९/०६/२०२१ व ३०/०६/२०२१ रोजी गेले असता शेख मन्सुर नजीर याने लाचेची रक्कम घेण्यास जाणून बुजून टाळले आहे.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी लोकसेवक याच्या विरुध्द पोलीस स्टेशन गांधी चौक लातुर येथे कलम ७ ला.प्र.का अधिनियम १९८८ अन्वये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर हे करीत आहेत.

सदरची सापळा कार्यवाही श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड. परिक्षेत्र, नांदेड, श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक कुमार दराडे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, सपोउपनि संजय पस्तापुरे, पोह/लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, पोना / मोहन सुरवसे, मपोना/ शिवकांता शेळके, पोकों / संतोष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, संदीप जाधव, दिपक कलवले, मपोका रुपाली भोसले, चापोना/ राजु महाजन यांनी पार पाडली आहे.

तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय अधिकारी/कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणी संदर्भात मोबाईल फोनवर अधिकारी / कर्मचारी (लोकसेवक) यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबंधाने काही माहीती असल्यास किंवा शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर खालील क्रमांकावर संपर्क करावा.

लाच प्रकरण : जिल्हा पुरवठा विभागातील महा लाचखोर अव्वल कारकून/पुरवठा निरीक्षकासह लाचखोर कंत्राटी तांत्रिक सहायकाला 40,000 /- रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले



आदरणीय महोदय 

*यशस्वी सापळा कारवाई*

▶ *घटक* - अमरावती 

▶ *तक्रारदार* - महिला (शासकिय नोकरदार), वय 28 वर्ष रा. अमरावती.

▶ *आलोसे* -

1) श्री.नारायण जयवंत चव्हाण,वय 29 वर्ष, पद - अव्वल कारकुन/पुरवठा निरिक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय,अमरावती

2) श्री.अविनाश अनंत भगत,वय 29 वर्ष, पद - तांत्रिक सहायक (कंत्राटी), जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय अमरावती.

▶ *लाच मागणी रक्कम* - 50,000/- रूपये 

पडताळणी दरम्यान पहिला हफ्ता लाच मागणी म्हणुन 40,000/- रू.

▶ *स्वीकारलेली लाच रक्कम* - 40,000/- रुपये.

▶ *पडताळणी* -

         दि. 30/06/2021.

➡ *सापळा कारवाई* - 

दि.30/06/2021.

▶ **घटना स्थळ* -

 डी - मार्ट चे मुख्य पार्किंग समोरील बाजुस, बियाणी चौक कॅम्प अमरावती.

▶ *कारण* -     तक्रारदार महिला शासकीय कर्मचारी असून त्यांनी दि.29.06.2021 रोजी तक्रार दिली की, त्यांचेविरुद्ध एका शासकीय रास्त दुकानदार यांनी केलेल्या तक्रारीवर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय अमरावती येथे होत असलेल्या चौकशी मध्ये कोणतीही कारवाई न होवु देण्याकरिता संबधीत काम पाहणारे अव्वल कारकुन श्री. चव्हाण  हे 50,000 रुपये लाचेची मागणी करीत आहे.वरून आज दि.30.06.2021 रोजी पंचासमक्ष आ.लो.से. श्री.चव्हाण यांनी पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार महिला यांना त्यांचे विरुध्द होत असलेल्या चौकशी मध्ये कोणतीही कारवाई न होवु देण्याकरिता( न करण्याकरीता) 50,000/- रुपये  लाचेची मागणी करून पहिले तात्काळ 40,000/- रूपये स्वीकारण्याचे मान्य करून रक्कम जमल्यास त्यांचेसोबत असलेले आ.लो.से.क्रमांक 2.श्री.अविनाश भगत यांना फोन करून लाच रक्कम त्यांचेकडे देण्यास सांगितली.त्यानंतर आजच सापळा कारवाई दरम्यान पंचा समक्ष आलोसे क्र.1 श्री.चव्हाण  यांचेवतीने आलोसे क्र.2 श्री.भगत यांनी 40,000/- रूपये लाच रक्कम तक्रारदार महीला यांचेकडून पंचासमक्ष स्वीकारली.वरून दोन्ही आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले आहे व पुढील कारवाई सुरू आहे.

 *मार्गदर्शन* -

▶मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती. 

श्री.अरुण सावंत, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

श्री. गजानन पडघन, पोलीस उप-अधीक्षक, ला.प्र.वी. अमरावती.

▶️ *सापळा व तपास अधिकारी* - श्री.राहुल वसंतराव तसरे,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वी.अमरावती.

▶ *सापळा कारवाई पथक* -

श्री. राहुल तसरे ,पोलिस निरिक्षक,

 ना.पो.शी विनोद कुंजाम ,

पो.शी सुनील जायेभाये ,

पो.शी.उपेंद्र थोरात.

▶ *आलोसे क्र.1 यांचे सक्षम अधिकारी* मा. उपआयुक्त , पुरवठा आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग.अमरावती

-----------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन* *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अमरावती पोलीस निरीक्षक राहुल तसरे,मो. नं.8805163100.

*@दुरध्वनी क्रं - 0721-2552355, 2553055

*@टोल फ्रि क्रं 1064*

----------------------------------------

अमृतसर -हुजूर साहिब नांदेड - अमृतसर मार्गे अकोला नवीन विशेष गाडी

 


दक्षिण मध्य रेल्वे

जनसंपर्क कार्यालय, नांदेड

प्रेस नोट -३६

दिनांक - ३०.०६. २०२१

आदरणीय संपादक साहेब, 

नमस्कार 

विषय: अमृतसर -हुजूर साहिब नांदेड - अमृतसर मार्गे अकोला नवीन विशेष गाडी 

*****************

उत्तर रेल्वे ने कळविल्या नुसार गाडी संख्या ०४६९२/०४६९१ हि विशेष गाडी दिनांक ५ जुलै पासून अमृतसर येथून सुरु होणार आहे. ती पुढील प्रमाणे – 

१. गाडी संख्या ०४६९२ अमृतसर ते हुजूर साहिब नांदेड (सोमवारी) : हि गाडी अमृतसर येथून दिनांक ५ जुलै २०२१ रोजी दुपारी १४.३०  वाजता सुटेल आणि जालंधर, लुधियाना, न्यू दिल्ली, झांसी, अकोला, वाशीम, हिंगोली मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी रात्री २१.४० वाजता पोहोचेल. 

२. गाडी संख्या ०४६९१ हुजूर साहिब नांदेड ते अमृतसर (बुधवारी)  : हि गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर दिनांक ०७ जुलै २०२१ पासून दुपारी ११.०५ वाजता सुटेल आणि हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे अमृतसर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी १८.३० वाजता पोहोचेल. 

सोबत : गाडीचे वेळापत्रक

आदरणीय संपादक महोदयांना विनंती हि बातमी आपल्या प्रतिष्ठित वर्तमान पात्रात प्रसिद्ध करावी. 

जनसंपर्क कार्यालय, नांदेड



लाच प्रकरण : आश्रम शाळेच्या महा लाचखोर मुख्याध्यापकाला 1500 रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले



Respected sir/madam 

* TRAP CASE 

➡युनिट       :- नांदेड  

➡तक्रारदार  :- पुरुष वय  51 वर्ष 

➡आरोपी  लोकसेवक  :-    1. श्री. नामदेव सोपानराव कैलवाड, वय 56 वर्ष, व्यवसाय नोकरी मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक, आश्रम शाळा सहस्र्कुंड ता. किनवट रा. वैभव नगर जैन मंदिर जवळ, मालेगाव रोड, नांदेड

➡ तक्रार प्राप्त  :- दिनांक  29/06/2021

➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 29/06/2021

➡ सापळा दिनांक :- 30/06/2021

➡ लाचेची रक्कम:-  मागणी 2000/- रु. 

                     तडजोडी अंती 1500/- रुपये  स्विकारले.

➡ कारण:-

            यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना त्यांचे थकीत असलेले कंत्राटी मजुरीचे 04 महिन्याचे बिल तयार करणे व मंजुर करून आणले त्याचा मोबदला बक्षीस म्हणुन 1500/- रु. लाचेची मागणी करून स्वतः स्विकारली आहे. 

➡  मार्गदर्शक:- 

मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

मा.श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

➡  So  :- श्री. विजय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड

➡   TLO  :-   श्री. राजेश पुरी , ला.प्र.वि. नांदेड

 ACB नांदेड टीम  सपोउनि संतोष शेट्टे, दर्शन यादव,  एकनाथ गंगातिर्थ, शेख मुजीब

बँका विरुध्द प्राप्त तक्रारी बाबत.जिल्हाधिका-याने जिल्ह्यातील सर्व शाखाधिका-याला कडक कारवाईचा दिला इशारा ! परंतु मुजोर बॅंक मॅनेजर जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला दाखवत आहेत केराची टोपली



  • जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाबाबत तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी फक्त मुखदर्शकाच्या भूमिकेत

नांदेड : जिल्हाधिकाऱ्याने जिल्ह्यातील सर्व बॅंकेच्या शाखाधिका-याला पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत की, जिल्हाधिकारी कार्यालयास शेतकरी व जनतेकडून अनेक लेखी तक्रारी प्राप्त होत आहेत, तसेच समक्ष भेटून तक्रारी दिल्या जात आहेत. ज्यामध्ये बँका शेतक-यांना ज्या बँकेतून माफी मिळाली आहे त्याच शाखेतून कर्ज घ्या म्हणत आहेत व कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच अनावश्यक कागदपत्राची मागणी करीत आहेत.

या संदर्भात नांदेड जिल्हयातील सर्व बँकांना सूचित करण्यात येते की, मागच्या वर्षी 2020-21 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतक-यांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व बँकांना प्रासंगिक तत्वावर आदेश देण्यात आले होते की, शेतक-यांना ज्या बँकेतून कर्जमाफी मिळाली त्याच शाखेतून पीककर्ज देण्यात यावे जेणेकरुन कोरोना काळात बँकेतील वर्दळ कमी होईल. सद्यस्थीतीत जी गावे ज्या शाखेस दत्तक आहेत त्या शाखेतूनच शेतक-यांना पीककर्ज देण्यात यावे.

सबब, सर्व बँकांना सूचित करण्यात येते की, शेतक-यांना माफीच्या निकषावर बाद ठरवून कर्जपुरवठयापासून वंचित ठेवू नये व शेतक-यांची अडवणूक करु नये अन्यथा संबंधीता विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.एक प्रकारे असा इशाराच जिल्ह्यातील सर्व बॅंकेच्या शाखाधिका-याला दिला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालय अधिकृत संकेतस्थळ

https://nanded.gov.in/

मंगळवार, जून २९, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका व्यवस्थापकाला 3,500 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले



जालना,दि.28 जून : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान, पंचायत समिती मंठा अंतर्गतचा तालुका अभियान व्यवस्थापक तुकाराम छबुरा कु-हाडे यास 3,500/- रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालनाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली कि, तक्रारदार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती मंठा येथे तालुका व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे दोन वर्षापासून प्रति माह 1.500/ रुपये याप्रमाणे मागील दोन वर्षापासुन एफ टी ए रक्कम प्रलंबित आहे. तसेच त्यांचे मागील तीन महिन्यांचा प्रवासभत्ता बिल थकीत आहे. त्यांनी तालुका अभियान व्यवस्थापक श्री. तुकाराम छबुराव कु-हाडे याला त्यांचे एफ टी ए तसेच प्रवासभत्ता देयक मंजूर करून देण्याची विनंती केली असता, तालुका अभियान व्यवस्थापक तुकाराम बुराव कु-हाडे याने त्यांचे एक टी ए तसेच प्रवासभत्ता देयक | मंजूर करून देण्यासाठी 3.500/- रुपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली.

सदर तक्रारीवरून दिनांक 25.06.2021 रोजी लाचेची पडताळणी केली असता, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान, अंतर्गत पंचायत समिती मंठा येथील तालुका अभियान व्यवस्थापक तुकाराम उबुराव कु-हाडे याने तक्रारदार यांचेकडे त्यांचे मागील दोन वर्षापासुन एफ टी ए रक्कम मंजुर करुन देण्यासाठी तसेच त्यांचे मागील तीन महिन्यांचा प्रवासभत्ता बिल थकीत रक्कम मंजुर करुन देण्यासाठी 3,500/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पण्ण झाल्याने, त्यानुसार आज दिनांक 28.06.2021 रोजी पंचायत समिती कार्यालय, मंटा जि. जालना येथे सापळा लावला असता तालुका अभियान व्यवस्थापक श्री. तुकाराम छबुराव कु-हाडे यांनी तक्रारदार याच्याकडे त्यांचे मागील दोन वर्षापासुन एफ टी ए रक्कम मंजूर करून देण्यासाठी, तसेच त्यांचे मागील तीन महिन्यांचा प्रवासभत्ता बिल थकीत रक्कम मंजुर करुन देण्यासाठी 3.500/- रुपये लाचेची रक्कम स्वत: पंचासमक्ष स्विकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचं पथकाने पंचायत समिती कार्यालय, मंठा जि. जालना येथे रंगेहाथ पकडले आहे.

लोकसेवक तुकाराम बुराव कु-हार्ड वय 36 वर्ष व्यवसाय नोकरी तालुका अभियान व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती मंठा जि. जालना रा. योगेशनगर अंबड रोड, जालना याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची सापळा कार्यवाही मा पोलीस अधिक्षक श्री. राहुल खाडे, मा अपर पोलीस अधिक्षक श्री. मारुती पंडीत ला.प्र. विभाग औरंगाबाद, पोलीस उप अधिक्षक श्री. रविंद्र डी. निकाळजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. एस.एस. ताटे, श्री. शिवाजी जमधडे,श्री. गजानन घायवट, श्री कृष्णा देते. श्री. गणेश बुजाडे, चालक श्री. प्रविण खंदारे व आरिफ शेख यांनी केली.

 तसेच अॅन्टी करप्शन ब्यूरो कडुन आवाहन करण्यात येते की, कोणी लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 02482-220252. तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. 8975762906, पोलीस निरीक्षक मो.नं. 8390757835, 9823216788 वर संपर्क करावा.



सोमवार, जून २८, २०२१

जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कोमवाडला सात वर्ष सक्तमजुरी 18 लाख 82 हजार रुपये रोख दंड

 


नांदेड : सन 2016 मध्ये जिल्हा परिषदेच्या ग्राम विकासाचा निधी परस्पर कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरीत करून एक कोटी 18 लाख 83 हजार रुपयांचा शासकीय निधीचा अपहार केला म्हणून नांदेडचे मुख्य न्यायदंडाधिकारी सचिन पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम आनंदा कोमवाडला 7 वर्ष सक्तमजुरी आणि 18 लाख 80 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडातील 18 लाख रुपये रक्कम जिल्हा परिषदेला देण्यात यावी असे आदेश दिले आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दि. 6 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शांताराम काळभोर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेतील ग्राम विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम आनंदा कोमवाड (52) यांनी दि.22 जून 2016 ते 19 जुलै 2016 दरम्यान ग्राम विकासासाठी ग्राम पंचायतीकडून येणाऱ्या प्रस्तावांवर सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेवून तो निधी ग्राम विकासासाठी देण्याची जबाबदारी उत्तम कोमवाड यांच्यावर असतांना त्यांनी आपली जबाबदारी विसरून जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधीचे खाते क्रमांक 62005899192 मधून दिल्ली, फरीदाबाद आणि मुंबई येथील एस.बी.आय. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ऍक्सीस बँकेच्या खात्यावर आरटीजीएस आणि धनादेशाद्वारे एक कोटी 18 लाख 82 हजार रुपयांची मोठी रक्कम वळती केली आहे.

या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 409, 420 नुसार गुन्हा दाखल केला. वजिराबादचे पोलीस निरिक्षक सतिश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंद झोटे आणि पोलीस अंमलदार मधुकर टोणगे यांनी याप्रकरणी तपास करून उत्तम आनंदा कोमवाडला अटक केली. त्या संदर्भाने आवश्यक असलेले पुरावे जमा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. उत्तम कोमवाडला अटक झाली तेंव्हापासून आजपर्यंत न्यायालयाने त्याला जामीन दिलेला नाही. आज पोलीस मुख्यालयातील पोलीस अंमलदार नितीन केंद्रे आणि तेलंग यांनी तुरूंगातून उत्तम कोमवाडला न्यायालयात हजर केले.

तुमच्याविरुध्द सुरू असलेल्या खटल्यातील भारतीय दंड संहितेचे कलम 409 आणि 420 संदर्भाने तुम्हाला दोषी मानन्यात येत आहे. तेंव्हा तुम्हाला काय सांगायचे आहे असा प्रश्न न्यायाधीश सचिन पाटील यांनी उत्तम कोमवाडला विचारला. तेंव्हा मी कांहीच केले नाही असे एक वाक्याचे उत्तर उत्तम कोमवाड यांनी दिले. त्यांच्या वकीलांच्यावतीने या प्रकरणात झालेला अपहार त्यांना मिळाला नाही, गेली पाच वर्ष ते तुरूंगात आहेत. म्हणून त्यांना दया दाखवावी अशी विनंती करण्यात आली.

सरकरी वकील ऍड. सुनंदा चावरे यांनी घडलेला प्रकार जनतेच्या पैशाशी संबंधीत आहे. सार्वजनिक रक्कम उत्तम कोमवाडने हडप केली आहे. ते वर्ग 1 चे अधिकारी आहेत. त्यांच्या हातून घडलेला हा अपहाराचा प्रकार जास्तीत जास्त शिक्षा देवून समाजामध्ये चुकीचे काम करणाऱ्याविरुध्द संदेश जाईल अशी विनंती केली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश सचिन पाटील यांनी उत्तम आनंदा कोमवाड यास भारतीय दंड संहितेच्या कलम 409 प्रमाणे सात वर्ष •सक्तमजुरी, 10 लाख रुपये रोख दंड आणि कलम 420 प्रमाणे सात वर्ष सक्तमजुरी आणि 8 लाख 82 हजार रुपये रोख दंड अशी ठोठावली.

रोख दंड भरला नाही तर दोन्ही कलमांप्रमाणे प्रत्येकी उत्तम कोमवाडला प्रत्येकी 21 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम भरली तर त्यातील दहा लाख 18 लाख रुपये जिल्हा परिषदेला देण्यात यावेत असे आदेश दिले. वजिराबादचे पोलीस अंमलदार बालाजी लामतुरे आणि प्रदीप कांबळे यांनी या खटल्याची प्रक्रिया योग्यरितीने चालण्यासाठी मेहनत घेतली. दिलेल्या दोन्ही शिक्षा उत्तम कोमवाडला एकत्रित भोगायच्या आहेत. अटक झाली तेंव्हापासून आजपर्यंत तुरूंगात होता ते दिवस शिक्षेतून सुट मिळणार आहेत.

शनिवार, जून २६, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर महिला प्रांताधिकारीसह लाचखोर लिपिकाला सव्वा लाख (1.25) रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

 


जळगाव : वाळू वाहतूकदारांकडून सव्वा लाख रुपयाची लाच घेताना जळगाव येथील प्रांताधिकारी व लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार अटक केली आहे. या दोघांनी वाळू वाहतूकदारांकडे ट्रक सोडण्यासाठी दोन लाखाची मागणी केली होती. दिपामाला चौरे असे प्रांताधिकारी यांचे नाव आहे. तर अतुल सानप असे लिपिकाचे नाव आहे.

जळगावात वाळू वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराकडे गौण खनिजकर्म अधिकारी बुलढाणा यांचा वाळू वाहतुकीचा परवाना होता. मात्र, या वाहतूकदाराचे वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक जळगावच्या तहसील पथकाने पकडून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात उभे केले होते. हे ट्रक सोडण्यासाठी दीपमाला चौरे यांनी लिपिक अतुल सानप याच्या मार्फत दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीमध्ये सव्वा लाख रुपये देण्याचे ठरले होते.

या संदर्भात वाळू वाहतूकदाराने लाचलुपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता दीपमाला चौरे यांनी लिपीक सानप याच्यामार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी सापळा रचून अतुल सानप यांच्या खासगी पंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. त्याने प्रांताधिकारी दीपमाला चौरे आणि लिपिक अतुल सानप यांच्यासाठी रक्कम स्वीकारत असल्याचे सांगितल्या नंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या दोघांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक जी. एम. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजोग बच्छाव, हवालदार अशोक आहिरे, मोनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, नासीर देशमुख व ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

शुक्रवार, जून २५, २०२१

परिवहनच्या महा भ्रष्टाचारी डेप्युटी आरटीओ नानासाहेब बच्छावचा हप्तेखोरीसाठी 10 लाख कनेक्शन करुन देण्याचा व्हिडिओ व्हायरल करत कनिष्ठ अधिका-यांनी केला भांडाफोड

भ्रष्ट डेप्युटी आरटीओ

नंदुरबार : राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार होत असल्याच्या प्राप्त झालेल्या तक्रारीने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मात्र नाशिक पोलिसांच्या चौकशीअंती याबाबतचा कुठल्याही प्रकारचा गुन्हा शहर आयुक्तालयाच्या हद्दीत घडला नसल्याचे प्रशासनाने मंगळवारी (दि.22) स्पष्ट केले आहे. नाशिक पोलिसांनी आरटीओ घोटाळ्याबाबत त्यांच्या हद्दीपुरती क्लीन चिट दिलेली असतानाच आता एक व्हिडिओ समोर आला आहे.

नंदूरबारचे डेप्युटी आरटीओ नानासाहेब बच्छाव टेबलवर मोठी रक्कम ठेवून बोलत काही जणांशी बोलत असतानाचा हा व्हिडिओ आहे. कनिष्ठ आरटीओ खडसे आणि भोई यांच्याकडून पैशाचा कथित हिशोब ते मागत असल्याचे दिसते.

बच्छाव यांनी तो पैसा स्वीकारलेला नाही, पण १० लाख रुपयांची मागणी करताना दिसतात. हा व्हिडिओ दीड वर्षापूर्वीचा असला तरी आरटीओतील घोटाळ्यांच्या निमित्ताने त्याची चर्चा सुरू झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्याच एका सहकाऱ्याने तयार केला होता. 'हा व्हिडिओ म्हणजे माझ्याविरुद्धचा कट आहे. तो मोडूनतोडून तयार केलेला आहे', असे बच्छाव यांचे म्हणणे आहे.


राज्याच्या मंत्र्यांपासून उच्चपदस्थ अधिकारी वर्गांपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करणारी तक्रार आरटीओचे निलंबित मोटार निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. 27 मे पासून याप्रकरणी चौकशीला सुरुवात झाली होती. दोनदा मिळालेल्या मुदतवाढीनंतर गुन्हे शाखेने पंधरवड्यात चौकशी पूर्ण केली आहे. या दरम्यान राज्याच्या अवर सचिव, उप सचिवांपासून नाशिक, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, आरटीओची कामे करणारे खासगी व्यक्ती आणि तक्रारदार असे सुमारे 35 पेक्षा अधिक लोकांची कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीपासून यामध्ये क्लिष्टता, गुंतागुंत आढळून येत होती.

गुरुवार, जून २४, २०२१

राज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल शिधापत्रिका – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ



मुंबई, दि. २३ :- राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती. याबाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरण करण्याबाबतचा निर्णय प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत घेतला आहे.

राज्यातील २८ वर्षापर्यंतच्या अनाथांना बीपीएल शिधापत्रिकेबरोबर त्याचे लाभ मिळतील व २८ वर्षावरील अनाथांना उत्पन्नाप्रमाणे शिधापत्रिका मिळेल व त्याप्रमाणे त्याचे लाभ देण्यात येतील. या निर्णयामुळे राज्यातील अनाथ मुलांना मोठा आधार होणार असल्याचे श्री.भुजबळ यांनी सांगितले. कोरोनाकाळात अनेक मुलांच्या पालकांचे मृत्यू झाल्यामुळे ते अनाथ झाले आहेत अशा मुलांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याचे श्री.भुजबळ यांनी सांगितले.

राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर शिधापत्रिका मिळवताना कागदपत्रांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई व वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे माहिती देखील श्री.भुजबळ यांनी दिली. अनाथांना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची भावना देखील श्री.भुजबळ यांनी व्यक्त केली.


Tags: अनाथ बीपीएल

ग्रामपंचायतींना पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती



मुंबई, दि.२३ : राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांची पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यात सध्या कोरोना परिस्थितीमुळे ग्रामीण भागात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके अदा न झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सद्य परिस्थिती पाहता पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधित (Untied) अनुदानातुन पथदिव्याची देयके आणि बंधित (Tied) अनुदानातुन पाणीपुरवठा योजनांची देयके अदा करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकान्वये मान्यता देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने त्यांना प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पथदिव्याची आणि पाणीपुरवठा योजनांची देयके अदा करावयाची आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळणार असून देयकांच्या पूर्ततेअभावी कोणत्याही गावात पथदिव्यांची वीज किंवा पाणीपुरवठा योजना खंडीत होणार नाही, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.


८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना

राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे 80:10:10 प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या निधीतील सर्वाधिक 80 टक्के भाग थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे.त्यामुळे गावांच्या विकासामध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढला आहे. उर्वरित निधीपैकी 10 टक्के निधी हा जिल्हा परिषदेस तर 10 टक्के निधी हा पंचायत समित्यांना मिळत आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.


Tags: ग्रामपंचायत पथदिवे, पाणीपुरवठा योजना विजबिल

ग्रामपंचायतींना पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

महा लाचखोर महिला फौजदाराच्या लाचखोर पतीसह लाचखोर पोलीस हवालदाराला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून घेतले ताब्यात ; महिला फौजदाराच्या लाचखोर पत्नी विरुद्ध तिच्याच पोलीस स्टेशनमध्ये लाचखोरीचा गुन्हा दाखल



  • लाच जमा करण्यासाठी फौजदार पत्नीच्या पदाचा सुशिक्षित बेकार पती घेत होता फायदा
  • लाचखोर महिला पत्नीची सुशिक्षित बेकार पतीला फौजदार पत्नीची मुकसंमती होती का?
  • लाचखोर महिला फौजदाराच्या पदाचा तिचा पती फायदा घेतल्याबद्दल महिला फौजदार सह आरोपी होणार का?
  • मुकसम्मती नसेल तर लाचखोर सुशिक्षित बेकार पतीमुळे मनस्ताप झाल्याबद्दल सोडचिठ्ठी देणार का?

सातारा/औंध : औंध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सोसारख्या संवेदनशील व गंभीर गुन्ह्यात मदत करण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपयांची लाच मागून त्यातील रोख 50 हजार रुपये घेणार्‍यास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ कारवाई केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून,यामध्ये औंध पोलिस ठाण्याच्या महिला फौजदाराच्या पतीचा व एका पोलिस हवालदाराचा समावेश असल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत दादासाहेब शिंदे (वय 34, रा.गुरसाळे ता.खटाव) असे पोलिस हवालदाराचे नाव आहे.तर,सुशांत सुरेश वरुडे (35, मूळ रा. विटा, जि. सांगली सध्या रा. औंध) असे फौजदार पतीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी,या प्रकरणातील तक्रारदार यांच्या भावावर औंध पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा (पोक्सो) गुन्हा दाखल झालेला आहे.भावाला या गुन्ह्यात मदत व्हावी व तक्रारदार याला त्याप्रकरणात सहआरोपी करू नये. यासाठी तो पोलिस हवालदार चंद्रकांत शिंदे व सुशांत वरुडे याला भेटला.यावेळी सुशांत वरुडे याने शिंदे याच्या सांगण्यावरून 1 लाख 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.पैसे दिले तर सहकार्य करू,असे वरुडे याने सांगितले. मोठ्या रकमेच्या लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने सातारा एसीबीकडे तक्रार केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अविनाश जगातप, पोनि अरिफा मुल्‍ला यांनी सोमवारी सापळा लावला.एसीबीने पडताळणी केली असता दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.तडजोडीअंती 50 हजार रुपये घेण्याचे ठरले.पैसे देण्यासाठी जागा व वेळ निश्‍चित झाल्यानंतर फौजदारच्या पतीने लाचेची रक्‍कम स्वीकारली.रक्‍कम स्वीकारताच एसीबी विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

एसीबी विभागाने संशयित सुशांत वरुडे याच्याकडे प्राथमिक चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्याने पोलिस हवालदार चंद्रकांत शिंदे याचे नाव घेतले.एसीबी विभागाने तात्काळ त्याला ताब्यात घेतले. एसीबीने प्राथमिक कारवाईची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संशयित दोघांवर औंध पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशीरा दोन्ही संशयितांना अटक केली. पोक्सो सारख्या संवेदनशील गुन्ह्यात लाचेची मागणी झाल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. 

लाचखोर महिला फौजदाराकडेच होता गुन्ह्याचा तपास...

पोक्सो अंतर्गत तीन दिवसांपूर्वी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास महिला फौजदार स्नेहल सोमदे   हिच्याकडे देण्यात आला.गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली. गुन्ह्याचा तपास सुरू असताना मात्र दुसरीकडे काही नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. यासाठी फौजदार पती व पोलिस हवालदार जुंपले गेले. ‘फोनाफोनी’ व ‘भेटाभेटी’ झाल्यानंतर ‘देवाणघेवाणी’चा विषय सुरू झाला. अखेर तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेतल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला. 

सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्या कडून करण्यात आले आहे.

बुधवार, जून २३, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर महिला जेलरला ४,००० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले


*आदरणीय सर* 

*लाचेची यशस्वी सापळा कारवाई* 

▶️ *युनिट -* रायगड

▶️ *तक्रारदार-* स्त्री वय- ३४ वर्षें,  

▶️ आलोसे - श्रीमती सुवर्णा जनार्दन चोरगे, वय़- 33 वर्षे, हुद्दा - जेलर, श्रेणी-2 (वर्ग -३) रा. ड्रेफोडीलस बिल्डिंग,फ्लॅट न. 303, सी विंग, गोंधळपाडा, ता.अलिबाग, मुळ रा. रामराज, ता.अलिबाग, जि.रायगड

▶️ *लाचेची मागणी-*४,०००/- रुपये,

▶️ **लाच स्विकारली* ४,०००/ रुपये. 

▶️ *हस्तगत रक्कम-* ४०००रुपये

▶️ *लाचेची मागणी -* ता.२१/०६/२०२१ 

▶️ *लाच स्विकारली -* ता.२२/०६/२०२१ रोजी २०.१० वा. 

▶️ *लाचेचे कारण -*. यातील तक्रारदार यांचे पती हे न्यायालयीन कोठडीमध्ये जिल्हा कारागृह अलिबाग येथे आहेत त्यांना जेलमध्ये आवश्यक असलेले सामान तसेच आवश्यक सुविधा पुरविणे करिता आलोसे यांनी तक्रादार यांचेकडे. दि.२१/०६/२१ रोजी ४,०००/- रूपये लाचेची मागणी करून दिनांक २२/०६/२०२१ रोजी लाच रक्कम रु.४,०००/- स्वीकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे         

▶️ *सापळा अधिकारी-* श्रीमती सुषमा सोनवणे, पोलीस उप अधिक्षक, एसीबी रायगड.

▶️ *सापळा पथक* पो.हवा/दिपक मोरे , पो हवा/महेश पाटील, पो. हवा/विशाल शिर्के, मपोना/स्वप्नाली पाटील,पोना/जितेंद्र पाटील

▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-

 *मा.श्री.पंजाबराव उगले सो. पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र. ठाणे.*

▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* - मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, (कारागृह) दक्षिण विभाग, भायखळा, मुंबई

मंगळवार, जून २२, २०२१

लाच प्रकरण : तब्बल ४ लाचखोरांना (उप सरपंच,ग्रामिण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी),लिपिक पंस.घरकुल विभाग,रोजगार सेवक) 2500 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले,लाचखोरांना निलंबित करणारे सक्षम अधिकारी वाचून तुम्हीही चक्रावून जाल



*आदरणीय सर*

*यशस्वी सापळा कार्यवाही*

➡ घटक :- अकोला

➡ तक्रारदार :- पुरुष वय 42,    

       व्यवसाय-शेत मजुरी रा.

       खडकी टाकळी.

➡ ईलोसे :- 1) दिलीप दौलत सदांशीव, वय-52 वर्षे, व्यवसाय- उपसरपंच, खडकी टाकळी, पो सुकोडा, ता. जि.अकोला

2) अमित युवराज शिरसाट, वय-26 वर्ष, व्यवसाय- ग्रामीण गृह निर्माण अभियंता,( कंत्राटी)रा.आगर, ता जि अकोला, 

3) सुधीर मनतकार, वय- ३५ वर्षे, लिपिक, पंचायत समिती घरकुल विभाग, अकोला 

4) योगेश अरुण शिरसाट, वय-29 वर्षे, व्यवसाय-रोजगार सेवक, रा. अमानतपूर पो. सुकोडा, ता. जि. अकोला

➡️पडताळणी दिनांक :-    

     21/6/2021, 

➡️सापळा दिनांक :-

       22/6/2021       

➡️ लाच मागणी रक्कम :- 

       ईलोसे क्र. 2) यांनी 3000/- रु ची मागणी, ईलोसे क्र 1) व 4) यांनी प्रोत्साहन दिले, या व्यतिरिक्त ईलोसे क्र. 3) यांनी 2000/- रु ची मागणी केली, 

➡️ स्वीकारली रक्कम :- 

      ईलोसे क्र. 2) यांनी 2500/- रु

➡️ घटनास्थळ :- ईलोसे क्र 2 यांचे राहते घर आगर, ता. जि. अकोला

➡ हकीकत :- यातील ईलोसे यांनी तक्रारदार यांचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचे जिओ टॅगिंग करून तिसरा हप्त्याचा चेक काढण्यासाठी तक्रारदारास ईलोसे क्र 2 यांनी 3000/- रु लाचेची मागणी करून तडजोडीअंती 2500/- रु ची लाच स्वीकारल्याने तसेच ईलोसे क्र 4 यांनी त्यास प्रोत्साहन देऊन तडजोड घडवून आणली, तसेच ईलोसे क्र 1 यांनी त्यास समर्थन दिले तसेच ईलोसे क्र 4 यांनी तक्रारदारास 2000/- रु लाचेची मागणी केल्याचे कारणावरून ईलोसे 1, 2 व 4 यांना ताब्यात घेण्यात आले.

▶️सक्षम अधिकारी -ईलोसे क्र 2 चे मा. अध्यक्ष/सचिव छत्रपती शाहू महाराज, सुशिक्षित बेरोजगार संस्था म.वडवणी ता.वडवणी,जि बीड, ईलोसे क्र 4 चे ग्रामसभा, ग्रामपंचायत अमानतपुर,ता.जि. अकोला

ईलोसे क्र 1 चे मा. विभागीय आयुक्त, अमरावती, ईलोसे क्र 3 चे मा.जिल्हाधिकारी, अकोला

▶️ मार्गदर्शन - मा. श्री. विशाल वि.गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  

मा. श्री. अरूण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ,

▶️कारवाई पथक-श्री.शरद मेमाणे ,पो. उप अधिक्षक ला. प्र.वि.अकोला, पोलीस अंमलदार अन्वर खान, संतोष दहीहंडे, अभय बावस्कर सर्व ला.प्र.वि.अकोला 

▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

▶️गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

----------------------------------------

शेतकऱ्याने लढवली भन्नाट शक्कल,वांग्याच्या पिकात लावला गांजा ! गुप्त माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 


नायगाव,दि 22 जून : राहेर ता.नायगाव च्या शेतकऱ्यांने हरनाळा शिवारातील शेतीत वांग्याच्या पीकामध्ये गांजाची लागवड केली असल्या ची गुप्त माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी कारवाई करत गांज्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून, ६२ किलो वजनाच्या तीन लाखाच्या गांज्याची झाडे जप्त केली आहेत. सदर प्रकरणी कुंटुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची  प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून मिळाली आहे.

    नायगाव तालुक्यातील राहेर येथील शेतकरी बळीराम गंगाराम घोरपडे यांचे बिलोली तालुक्यातील हरनाळा येथे शेती आहे. कुंटुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हरनाळा परिसरात असलेल्या गट नंबर ३६ मधील शेतात वांग्याचे पिक घेतले. पण या वांग्याच्या पिकात गांज्याच्या झाडाची लागवड या शेतकऱ्याने केली. सदरची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांच्या पथकाने (ता. २२) रोजी सकाळी हरनाळा शिवारातील शेतात धाड मारली. यावेळी वांग्याच्या पिकात कुठलीही परवानगी न घेता गांज्याची ३८ झाडे लावल्याचे दिसून आले.

     कुष्णुर च्या जुगार आड्यावर धाड या नंतर अवैध देशी दारू जप्त व आता कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची लागवड ही स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण करण्याच्या घटना एका मागे एक घडत आहेत.राहेर,बरबडा, कुष्णुर, व गोदाकाठावर च्या गावात अनेक अवैध धंदे बोकाळले असून या वर नियंत्रण करण्या साठी पोलीस प्रशासनाने कडक पाऊल उचलावीत अशी भावना सर्व सामन्यातून व्यक्त होत आहे.

तालुका कृषी अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली म्हणावे की नायगाव तालुका कृषी कार्यालयाचा भोंगळ कारभार



  • गडगा कृषी सहायक पदाचा अतिरिक्त पदभार घेण्यास कुणीही तयार नाही
  • गडगा मुख्यालयाचे कृषी सहायक मनुरकर यांची पदोन्नतीने बदली

नायगाव दि 22 जून : तालुका कृषी अधिकारी अधिनिस्त मंडळ कृषी अधिकारी नायगाव, मुख्यालय गडगा येथील कृषी सहाय्यक मनुरकर किशन शंकरराव यांची कृषी सहाय्यक पदावरून (संवर्गातून) कृषी पर्यवेक्षक पदावर(संवर्गात) तदर्थ पदोन्नतीने तालुका कृषी अधिकारी बिलोली अधिनिस्त मंडळ कृषी अधिकारी बिलोली, मुख्यालय बिलोली वर्ग-1 येथे रिक्त पदावर टी एन जगताप सह संचालक कृषी, लातूर विभाग,लातूर यांनी मा.आयुक्त कृषी पत्र क्र.जा.क्र.कृसेभ/संघटना.मा/२००६/आस्था-४/१५९६०/२० दि.१७ मे २०२१ नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ८ जून २०२१ रोजी बदली करण्यात आली आहे.

नायगाव तालुक्यातील नायगाव मंडाळाअंतर्गत येणा-या गडगा मुख्यालयाचे कृषी सहायक किशन मनूरकर यांची बिलोली येथे पदोन्नतीने बदली झाल्याने कृषी सहाय्यक मनुरकर यांना तालुका कृषी अधिकारी भागवत साधू शिंगाडे यांनी १० जून २०२१ रोजी कार्यमुक्त ही केले आहे. त्यानंतर रातोळी मुख्यालयाचे कृषी सहाय्यक नव्हारे हेमराज पांडुरंग यांच्याकडे गडगा येथील रिक्त कृषी सहायकांचे अतिरिक्त पद सांभाळण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी भागवत साधू शिंगाडे यांनी काढले परंतु रातोळी येथील कृषी सहायक नव्हारे यांच्याकडे त्यांच्या मुख्यालयाअंतर्गत येणारी गावे सांभाळणे अवघड होऊन बसल्यामुळे त्यांनी गडगा मुख्यालयाचा अतिरिक्त पदभार घेण्याचे पत्र आजून स्विकारले नाही.

त्यात गडगा मुख्यालयाअंतर्गत येणा-या आठ-दहा गावांचा पदभार त्यांच्याकडे दिल्यामुळे ते हैराण परेशान झाले आहेत.आता ते गडगा मुख्यालयाअंतर्गत येणा-या गावांचा पदभार स्वीकारण की नाही हे पहावे लागणार, तालुका कृषी अधिकारी काय ऍक्शन घेतात ते येणारा काळच ठरवेल.गडगा येथील कृषी सहायकाचे पद रिक्त झाल्यामुळे जोपर्यंत पूर्ण वेळ कृषी सहायक येत नाहीत तोपर्यंत या गावाच्या शेतकऱ्यांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.कृषी सहायक मनुरकर यांची बदली होणार होती त्याअगोदर त्यांना पर्यवेक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे.त्यांनी जवळपास सहा-सात वर्षे सेवा दिली आहे.मी कधीही पदभार देण्यास तयार आहे.माझ्याकडे यादी तयार आहे असे मनुरकर यांनी सांगितले.

नायगावची एक तालुका कृषी कार्यालय, एक मंडळ अशी अवस्था झाली झाली आहे.याला नेमकं कोण जबाबदार आहे.वरिष्ठांकडे रिक्त पदांचा दरमहिण्याला रिपोर्ट पाठवूनही जर वरिष्ठ अधिकारी,तालुका,जिल्ह्यातील नेते याकडे दुर्लक्ष करत असतील याला काय म्हणायचे शेवटी शेतकऱ्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.तालुक्यात ८९ गावांचा भार १२ कृषी सहायकांवर आहे.आज घडिला कृषी सहायकांची चार पदं रिक्त आहेत.या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार, पालकमंत्री यांनी विशेष लक्ष घालून येथे नविन मंडळाची निर्मिती करणे गरजेचे आहे.एकिकडे भारत हा कृषिप्रधान देश आहे म्हणायचे दुसरीकडे त्याच कृषीप्रधान देशाच्या कृषी विभागाकडे दुर्लक्ष करायचे यामुळे कृषी योजनांची अंमलबजावणी कशी होणार.


प्रतिक्रिया

गडगा मुख्यालयाच्या कृषी सहायक पदाचे अतिरिक्त पदभार घेण्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी मला न विचारता पत्र काढले,त्यामुळे मी पत्र घेतलेच नाही तसेच मला न विचारता आदेश काढण्यात आले आहेत,त्यामुळे मनुरकर यांच्याकडून पदभार घेतलेला नाही.गडगा मुख्यालयाअंतर्ग येणारी गावे घ्यायचं की नाही घ्यायचं विचारायला पाहिजे होते,अगोदरच माझेकडे पोकराची ७-८ गावं आहेत.२१ जून रोजी मिटिंग होती,आज तालुका कृषी अधिकारी आले नाहीत,एक दोन दिवसात तालुका कृषी अधिकारी याच्याशी बोलून घेतो.

कृषी सहायक नव्हारे,रातोळी


प्रतिक्रिया

गडगा मुख्यालयाचा अतिरिक्त पदभार घेण्याकरिता नव्हारे यांच्या नावाने आदेश काढले आहेत.आजून चार्ज घेतला नाही, त्यांना चार्ज घ्यावाच लागेल, जॉईन झालेत कागदपत्र द्यायचे आहेत.जास्त गावं सर्वांकडेच आहेत,नायगाव तालुक्यात चार असिस्टंट कमी आहेत.त्यांची गावं कुणाकडेतरी द्यावेच लागतील रिकामे कशी ठेवता येतील,नोकरी आहे करावेच लागणार आहे.कार्यालयाकडून महिण्याला पदं रिक्त असल्याचा वरिष्ठांना रिपोर्ट पाठवत असतो.आजून कुणाच्या बदल्या झालेल्या नाहीत,३० तारखेनंतर असिस्टंटच्या बदल्या होणार आहेत,त्यात असिस्टंट भेटले तर भेटतील.प्रमोशन झाल्यामुळे दोघं जन गेले आहेत,बदल्या होताना असिस्टंट येतील.नविन असिस्टंट भरणार आहेत म्हणे,असिस्टंट च्या बदल्या होणार आहेत.नव्हारे यांचेकडेही पोकराचे गावं आहेत,ही पण गावं पोकराची झालेत,थोडे काही कमी करुन करा म्हणून म्हणतो.दोन-चार गावं कमी करुन दुस-यांना दिली जातील.

तालुका कृषी अधिकारी, नायगाव


महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग द्वितीय वार्षिक अहवाल २०१८-१९ प्रस्तावना_स्वाधीन क्षत्रिय आयुक्त महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग

 RTS ANNUAL REPORT 2018-19

(स्वाधीन क्षत्रिय)

मुख्य आयुक्त,

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग

प्रस्तावना

आपल्या राज्यातील नागरिकांना राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने देण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ पारित करण्यात आला. नागरिकांना अधिकार देणारा व प्रशासनाला जबाबदार व उत्तरदायी करणारा हा क्रांतिकारी कायदा आहे. शासनाच्या सेवा सामान्य माणसापर्यंत पोहचत नाहीत किंवा त्या सेवा प्राप्त करण्यासाठी नागरिकांना अनेकवेळा प्रयत्न करावे लागतात. या परिस्थितीमध्ये अमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने सेवा हक्क कायदा पारित करण्यात आला. या कायद्याचे उद्दिष्ठ नागरिकांना तत्परतेने, सहज व सुलभपणे सेवा देण्यात यावी असे आहे.

महाराष्ट्रासह देशातील २० राज्यांनी लोकसेवा हक्क अधिनियम लागू केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ हा दिनांक २८ एप्रिल २०१५ पासून हा कायदा अमलात आला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली नियमावली दिनांक १६ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. दिनांक १ मार्च २०१७ रोजी माजी मुख्य सचिव श्री स्वाधीन क्षत्रिय यांची राज्याचे पहिले राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ चे कलम १९(१) प्रमाणे आयोग, प्रत्येक वित्तीय वर्ष संपल्या नंतर, मागील वर्षा मधील आपल्या कार्याचा तसेच सार्वजनिक प्राधिकरणांच्या लोकसेवा देण्याच्या कामगिरीच्या मूल्यमापनाबाबतचा अहवाल तयार करील आणि तो राज्य शासनाला सादर करील. त्याचप्रमाणे कलम १९(२) प्रमाणे राज्य शासन, आयोगाने सादर केलेला वार्षिक अहवाल राज्य विधी मंडळाच्या प्रत्येक सभागृहा समोर ठेवील.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचा हा दुसरा वार्षिक अहवाल आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी करण्यात लक्षणीय प्रगती झाल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन दिल्या जाणाऱ्या सेवांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र राज्याने आघाडी घेतली आहे. दिनांक ३१ मार्च, २०१९ रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या एकूण ४८६ पैकी ४०६ सेवा ऑनलाईन स्वरुपात देण्यात येत आहेत. आपले सरकार पोर्टल व सेवा अधिकारांच्या मोबाईल अॅप द्वारे ऑनलाईन सेवा देण्यात येतात. त्याशिवाय ३०,८७८ आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून सुद्धा नागरिकांना ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सदर अधिनियम लागू झाल्यापासून ऑनलाईन सुविधांचा लाभ घेऊन ६,४४,६५,६६८ अर्ज प्राप्त झाले आहेत व निपटाऱ्याचे प्रमाण ९७ % आहे. सन २०१८-१९ मध्ये एकूण १,८६,३८,६८१ सेवा अर्ज प्राप्त झाले असून निपटाऱ्याचे प्रमाण ९५% आहे. अनेक अर्ज ऑफलाईन स्वरुपात सुद्धा प्राप्त झालेले असल्याचे दिसून आले आहे. मात्र आयोगाने अनेक प्रयत्न करून सुद्धा ऑफलाईन स्वरुपात प्राप्त झालेल्या निपटारा केलेल्या अर्जाची आकडेवारी व “अ”, “ब” व “क” ह्या विहित नमुन्यांमध्ये उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सदर अहवाल हा महाऑनलाईन द्वारे पुरविण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांच्या आकडेवारी वर आधारित आहे.

महाराष्ट्र राज्याने ४८६ विविध प्रकारच्या सेवा अधिसूचित करून महाराष्ट्र सार्वजनिक सेवा अधिनियमाच्या अंमलबजावणीत निश्चितपणे मोठी प्रगती जरी दाखवलेली असली तरीही अन्य राज्यांनी अधिक सेवा अधिसूचित केल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. कर्नाटक राज्याने १०३३ सेवा, तर पंजाब राज्याने ५६८ सेवा व आसाम राज्याने ५०६ सेवा अधिसूचित केल्या आहेत.


राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांची एक संपूर्ण सूची तयार करण्याची व अधिनियमाच्या अंतर्गत सर्व सेवा अधिसूचित करण्यासाठी एक वेळापत्रक तयार करण्याची शिफारस आयोगाने याआधीच केली आहे. आयोगाची सदर शिफारस प्राधान्याने अमलात आणण्याची नितांत आवश्यकता आहे.

आयोगाकडून करण्यात आलेल्या काही सूचना व शिफारशींवर राज्य शासनाने कार्यवाही केली आहे. त्यामध्ये शासन परिपत्रक दिनांक १२.०३.२०१८ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना सेवा अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी व आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून सर्व अधिसूचित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नियंत्रण अधिकारी" म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय समाविष्ट आहे. अशा निर्णयांमुळे सार्वजनिक सेवा अधिनियमाची परिणामकारक अंमलबजावणी होण्यास प्रोत्साहन मिळेल. मात्र सर्वसामान्य जनतेत सदर अधिनियमाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अधिक परिश्रम करणे आवश्यक आहे. अधिनियम अधिक लोकप्रिय करण्यासाठी आयोगाने बोधचिन्ह व घोषवाक्य निर्धारित केली आहे. सर्व विभागांनी सदर बोधचिन्ह व घोषवाक्य यांचा उपयोग करण्याची विनंती आयोगाने शासनाला केली आहे.

महार लोकसेवा हक्क आयोगाचा दुसरा वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रशिक्षण प्रबोधिनी (यशदा), पुणे व महाऑनलाईन यांचे बहुमूल्य सहकार्य प्राप्त झाले. या वार्षिक अहवालामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या आमंलबजावणीमध्ये वेगवेगळ्या विभागांनी केलेली कामगिरी, जिल्हानिहाय व महसूल विभागनिहाय मिळालेला प्रतिसाद या सर्वांचे तुलनात्मक मुल्यांकन करण्यात आले आहे. तसेच आयोगाने राज्य शासनाला केलेल्या महत्वपूर्ण सूचना व शिफारशी व ची सध्यस्थिती बाबतची माहिती देण्यात आली आहे. या सर्व माहिती व अनुभवाच्या आधारे पुढील वाटचालीबाबत काही सूचना करण्यात आल्या आहेत, जेणेकरून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ ची अधिक प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल, पुणे, चंद्रपूर, वर्धा, वाशीम व अहमदनगर या जिल्हयामध्ये आयोगाच्या निर्देशनास आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दाखल घेऊन त्याची इतर जिल्ह्यांमध्येसुद्धा पुनरुक्क्ती करण्याची शिफारस आयोग करीत आहे.


(स्वाधीन क्षत्रिय)

मुख्य आयुक्त,

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग


श्री स्वाधीन क्षत्रिय मुख्य आयुक्त महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग

लाच प्रकरण : लाचखोर पोलीस कॉन्स्टेबल 50 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले ; सोबत खाजगी इसमही अडकला जाळ्यात


*आदरणीय सर*   

Trap Case Report

➡ घटक :- सातारा 

➡ तक्रारदार :- पुरुष २२ वर्ष

➡ आरोपी : 1) चंद्रकांत दादासो शिंदे,वय-34, पोकाँ 2372,वर्ग-3 नेमणूक -: औंध पोलीस स्टेशन,सातारा 2) सुशांत सुरेश वरुडे, वय 35 वर्षे, खाजगी इसम.

➡ लाचेची मागणी:-

     १,५०,०००/- 

➡ लाच स्विकारली

     ५०,०००/-

▶️पडताळणी दिनांक :-

  21/06/2021

▶️ सापळा दिनांक :- 21/06/2021

➡ कारण :- यातील तक्रारदार यांचे भावाविरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करणेसाठी व तक्रारदार यांना सदर गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पडताळणीमध्ये आरोपी नं.2 यांनी शिंदे यांचे सांगणे वरुन 1,50,000/- रु. ची लाचमागणी करून तडजोडीअंती 50,000/- रु.घेतांना आरोपी नं.2 यांना रंगेहात पकडले आहे

➡ सापळा पथक :- पोलीस निरीक्षक अविनाश जगताप

  पो.ना. राजे, पोकाँ खरात लाप्रवि सातारा 

➡️तपास:- अविनाश जगताप, पोलीस निरीक्षक ,लाप्रवि,सातारा 

➡मार्गदर्शन अधिकारी :- 

मा श्री राजेश बनसोडे,

पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे, 

मा श्री सुहास नाडगौडा, 

अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे 

मा श्री सुरज गुरव , 

अपर पोलिस अधीक्षक , लाप्रवि, पुणे.

➡ सक्षम अधिकारी- मा.पोलीस अधीक्षक, सातारा.

सोमवार, जून २१, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर भूसंपादन सहायक जिल्हाधिका-यासह महिला लाचखोर अव्वल कारकून 15 हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले



*आदरणीय सर*

*== प्रेसनोट ==*

*यशस्वी सापळा कारवाई*

▶️ *युनिट -* पालघर, ठाणे

▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय-३० वर्षें,  

▶️ *आरोपी-* *१.अंकुश पुरुषोत्तम पाटील वय ३७ वर्ष भूसंपादन सहायक जिल्हाधिकारी कार्यालय पालघर* 

*२.*वर्षा मनोहर पानझडे पाटील अव्वल कारकून जिल्हाधिकारी कार्यालय पालघर*

▶️ *लाचेची मागणी-* १५,०००/- रुपये,

▶️ *लाच स्विकारली-* १५,०००/ रुपये 

▶️ *हस्तगत रक्कम-* १५,०००/-रुपये 

▶️ *लाचेची मागणी -* ता.१८/०६/२०२१

▶️ *लाच स्विकारली -* ता. २१/०६/२०२१ रोजी १८:३२ वा. 

▶️ *लाचेचे कारण -*. यातील तक्रारदार यांचे राहते घर विरार डहाणू रेल्वे चार पदरीकरणात संपादित केले असून त्याचे मोबदला म्हणून ६,३६,०००/- मिळालेले आहेत सदर रक्कम मिळवून दिली म्हणून लोकसेवक क्र १ व २ यांनी तक्रारदार यांचेकडे १५,०००/- रु. ची मागणी करीत होते म्हणून तक्रारदार यांनी एसीबी पालघर येथे तक्रार दिली. त्याअनुषंगाने दि.१८/०६/२०२१ रोजी तक्रारदार यांना पंचासह आलोसे क्र १ यांचेकडे पडताळणी करीता पाठवले असता आलोसे क्र१ यांनी आलोसे क्र २ यांचेकरीता तक्रारदार यांना १५,०००/- रु. लाचेची मागणी केल्याचे पडताळणीमध्ये स्पष्ट झाल्याने आज दि.२१/०६/२०२१ रोजी सापळा रचून तक्रारदार यांना आलोसे यांचेकडे लाचेच्या रकमेसह पाठवण्यात आले असता आलोसे क्र १ यांनी पालघर रेल्वे स्टेशन परिसरात तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यास आलोसे क्र २ यांनी प्रोत्साहन देवून सहमती दर्शविली आहे. आलोसे क्र १ यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून पुढील कारवाई चालू आहे.   

▶️ *सापळा पथक -* *नवनाथ जगताप, पोलिस उपअधीक्षक ,भारत साळुंखे, पोलीस निरीक्षक, मपोहवा/मांजरेकर, पोना/चव्हाण, पोना/सुतार, पोना/ सुमडा, पोशी/उमतोल, चापोशि/ दोडे*

▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-

 *मा.श्री.पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र*

▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* - *जिल्हाधिकारी पालघर*

----------------------------------------

*पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*

------------+++++++++----------

*अँन्टी करप्शन ब्युरो,ठाणे, कॅम्प पालघर*

*दुरध्वनी 02525-297297*

*पोलिस उप अधीक्षक नवनाथ जगताप* 

*मोबा 9923346810/ 9850158810*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

====================

नायगाव तालुक्यात सोयाबीन बियाण्याच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैरान ! पेरणीच्या तोंडावर बियाण्यांची चढ्या दराने विक्री


  • शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा रास्त भावात मिळावी म्हणून नेमण्यात आलेली भरारी पथके हवेत
  • बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक औषधीबाबत

प्रत्येक तालुकास्तरावरील तक्रार निवारण कक्ष कागदावर

नायगाव,दि २१ जून : शेतक-यांचे दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्वाचा असतो व पर्जन्यमानास सुरुवात झाल्यानंतर कृषि निविष्ठा केंद्रावर खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी होते.मान्सूनचे आगमन झाले असून,शेतकऱ्यांनी पेरणींची लगबग सुरू केली आहे.मात्र,ऐन वेळी कृषी केंद्रचालकांनी बियाणे टंचाईचे जुनेच तंत्र वापरून मनमानी भाववाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मागील वर्षी नापिकी, अतिवृष्टीसारख्या विविध संकटांचा शेतकऱ्यांनी सामना केला. शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांची उगवण झाली नसल्याच्या व बोगस बियाणे निघाल्याच्या तक्रारी केल्या होत्या.यंदा मान्सूनचे आगमन बऱ्यापैकी झाल्याने पेरणीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली आहे.

सोयाबीन बियाणांची टंचाई असल्याचे कारण पुढे करून कृषी केंद्र चालक बॅगा जादा दराने म्हणजे २८०० रुपयांची बॅग ३४०० ते ४००० रुपयांनी शेतकऱ्यांना विक्री करीत आहेत. एकाच कंपनीचे बियाणे वेगवेगळ्या दरामध्ये विविध कृषी केंद्रांवर विक्री होत असल्याने शेतकरी संभ्रमात पडला आहे.शेतक-यांना भरघोस उत्पादन देणाऱ्या कंपन्यांचे बियाणे मिळणे अवघड झाले आहे.नांदेड जिल्ह्यात सगळीकडेच सोयाबीन बॅगांचा तुटवडा असल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांच्या तोंडून ऐकायला येत आहे.

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे पेरणीसाठी भरवशाचे बियाणे उपलब्ध होईल आणि बियाण्यांचा माफक दरात पुरवठा होईल याची कृषी विभागाने कुठल्याही प्रकारची गॅरंटी दिली नव्हती.बियाण्याचा तुटवडा भासणार आहे असे अगोदरपासूनच सांगण्यात येत होते. यंदा पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घरचे बियाणे ठेवावे असे कृषी विभागाकडून वारंवार आवाहन करण्यात येत होते.तसेच उन्हाळ्यात सोयाबीनची पेरणी करुन बियाणे तयार करण्याचे आवाहनही करण्यात आले होते मात्र शेतकऱ्यांना ते परवडणारे नसल्याने कुणीही तसदी घेतली नाही.ऐनपेरणीच्या वेळी सोयाबीन बियाणांची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

सोयाबिनचं खळं होण्याअगोदर पासूनच शेतकऱ्यांसमोर लोकांचं देनं देण्याची समस्या तोंड उघडून उभी टाकलेली असते, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी सुगीच्या वेळीच मिळेल त्या भावात सोयाबीन व्यापा-यांना विकून मोकळा होतो.या वर्षीही तसेच झाले आहे.काही मोजक्या शेतक-यांनी घरचे बियाणे ठेवल्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करावे लागत आहे.

त्यातच बियाणे उगवण शक्तीची हमी शेतकऱ्यांवर राहील, असे लिहून घेतले जात आहे. कोरोना संकटातून उभा राहत असलेल्या शेतकऱ्यावर ऐन पेरणीच्या कालावधीत जादा दराने बियाणे विक्रीचे संकट व्यापाऱ्यांनी आणले आहे. तक्रार करण्याची तसदी घेण्यास मात्र कुणीही धजावत नसल्याने नायगाव बाजारपेठेसह तालुक्यातील कृषी केद्रावर सर्वकाही आलबेल सुरू असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर निविष्ठा वाटप,इ-कॉमर्स (ऑनलाईन विक्री पध्दतीने कमीत कमी संपर्कात शेतक-यांना निविष्ठा उपलब्ध होतील,यादृष्टीने तसे नियोजन करण्याचे आदेश २७/०४/२०२१ कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पत्र पाठवून कळविले होते.मात्र जिल्हा,तालुका स्तरावर कुठलीच अंमलबजावणी होताना दिसत नाही.अशा स्वरुपाचे आदेश दरवर्षी निघतात पण कारमध्ये बसून एसीची हवा खात फिरणारे अधिकारी बांधावर कधी जाणार आणि शेतकऱ्यांना बांधावर कधी कृषी निविष्ठा पोहचणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा रास्त भावात मिळण्यासाठी 17 भरारी पथकांची नियुक्ती 

दि.12 मे रोजी जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके गुणवत्तापूर्ण व रास्तभावात मिळण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.कृषि विभागामार्फत जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर 16 असे एकूण 17 भरारी पथके, नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे असे सांगण्यात आले होते. शेतकऱ्यांनी काही तक्रारी असल्यास जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी  संतोष नादरे (मो. क्र. (8408933779 ) व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बी.बी.गिरी मो.क्र.( 9403727393 ) व तालुका स्तरावर पंचायत समितीचे तालुका कृषि अधिकारी यांना सकाळी 9.45 ते सायं 6.15 या कालावधीत संपर्क करावा असे, आवाहन नांदेडच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले होते.   

या भरारी पथकांनी जिल्हा व तालुकास्तरावर वेळोवेळी कृषि निविष्ठा विक्री केंद्राना भेटी देवून तपासणी करावी. निविष्ठाकांची विक्री चढत्या भावाने होत नसल्याची खात्री करावी. नेमलेल्या भरारी पथकांनी रासायनिक खते व किटकनाशकाबाबत उगम प्रमाणपत्र तपासणीची व्यापक मोहिम राबवावी. कागदपत्रे आढळून न आल्यास विक्री बंद आदेश बजावावेत. वितरीत उत्पादक व विक्रेतेस्तरावर मुदतबाह्य निविष्ठांचा शोध घेऊन विक्री होणार नाही यांची दक्षता घ्यावी. इनव्हाईस बिल, विक्रीसाठी शिल्लक साठा, इ. पास वरील साठयांचा ताळमेळ तपासावा तफावत आढळल्यास तात्काळ कारवाई करावी. वितरकाने विक्रीसाठीच्या प्रत्येक बियाणांच्या लॉटचा किमान एम नमुना ठेवल्याची खात्री करावी. अप्रमाणित बोगस, अनाधिकृत साठयाचा शोध घेवून जप्तीची कारवाई करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते व निविष्ठा दुर्गम भागास पुरवठा करण्यात येतो. अशा कंपन्याच्या निविष्ठांचा नमुना प्राधान्याने दाखल करावा, असे निर्देश नियुक्त भरारी पथकांना देण्यात आले होते.

मात्र या भरारी पथकांनी कृषी सेवा केंद्रांना भेटी देऊन काही कृषी सेवा केद्राची माहिती घरी बसून फोनवरच सर्व काही कागदोपत्री कारभार चालू असल्याने शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या बियाण्याच्या तुटवड्याचे या अधिकाऱ्यांना काही देणे-घेणेच नाही.तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग(तालुका स्तरावरील तक्रार निवारण कक्ष प्रमुख) व तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती(तालुका स्तरावरील भरारी पथक प्रमुख) या दोन्ही जबाबदार अधिका-याकडे तालुक्यातील कृषी सेवा केंद्राच्या नावाची व फोन नंबरची प्रिंटेड यादी नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.तसेच तालुक्यातील कुठल्याही कृषी सेवा केंद्र चालकाने भाव फलक व कृषी निविष्ठा उपलब्ध असल्याचे फलक कृषी केंद्राच्या दर्शनीभागी न लावल्याचे कृषी अधिकारी यांना कसे दिसत नाही, याबाबत एकाही केंद्र चालकावर कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत नाही.

जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी(जिल्हा स्तरावरील भरारी पथक प्रमुख) यांचा फोन शनिवारी व रविवारी स्विच ऑफ होता.कुठे दौऱ्यावर होते कुणास ठाऊक?


बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक औषधीबाबत

प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार निवारण कक्ष येथे नोंदवावी

दि.18 जून रोजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक औषधीबाबत तक्रार असल्यास तालुका स्तरावर तालुका तक्रार निवारण कक्ष, तालुका कृषि अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील तक्रार निवारण कक्षास तक्रार नोंदवावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या होत्या.

जिल्ह्यातील मुख्य बियाणे वितरक व कंपनी प्रतिनिधी यांच्यासमवेत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी बियाणे पुरवठा प्रती बॅग किंमतीबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना, शेतकऱ्यांना बियाणे दराबाबत अडचण येणार नाही व जादा दराने विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतही सूचना त्यांनी दिल्या आहेत.या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी, कृषि विकास अधिकारी, जिल्ह्यातील मुख्य कृषि सेवा केंद्रधारक, कंपनी प्रतिनिधी तसेच प्रभारी मोहिम अधिकारी यांची उपस्थिती होती.

शनिवार, जून १९, २०२१

लाच प्रकरण : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लाचखोर कॅशिअर ला (अतिरिक्त चार्ज- प्रशासक सेवा सहकारी संस्था) १५ हजार रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीच्या पथकाने गुन्हा दाखल करुन घेतले ताब्यात

 


बीड :आरोपी लोकसेवक श्री. सुंदर भागवतराव बांगर, वय ५० वर्ष, धंदा नौकरी, पद कॅशिअर, बीड जिल्हा मध्यवर्ती बँक लि. खालापूरी ता. शिरूर कासार वर्ग ३ व प्रशासक सेवा सहकारी संस्था जांब, ता. शिवर कासार जि.बीड रा. कालीकानगर, बीड,याचे विरुद्ध १५०००/- (पंधरा हजार रुपये) लाच मागणी केल्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांचेकडून कारवाई

दिनांक ०९/०३/२०२१ रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिली की, तक्रारदार यांचे लेखा परिक्षण केलेल्या संस्थेचे लेखा परिक्षण शुल्काचे धनादेशावर सही करण्यासाठी श्री. बांगर, कॅशिअर, बीड जिल्हा मध्यवर्ती बँक लि. शाखा खालापुरी हे १५०००/- रुपयाची मागणी करत आहेत तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक बीड येथे तक्रार दिली.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ०९/०३/२०२१ व दिनांक २८.०५.२०२१ रोजी पंचा समझ लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक श्री. बांगर यांनी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली. त्यावरून आलोसे श्री. सुंदर भागवतराव बांगर वय ५० वर्ष, धंदा नौकरी, पद कॅशिअर, बीड जिल्हा मध्यवर्ती बँक लि. सालापूरी, ता.शिवरासार वर्ग ३ व प्रशासक सेवा सहकारी संस्था जांब, ता.शिरुर कासार जि.बीड, रा.कालीका नगर बीड यांचे विरुद्ध पोलीस ठाणे शिरकार बीड येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कारवाई मा.डॉ.राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, मा.श्री.मारुती पंडीत, प्रभारी अपर पोलीस औरंगबाद श्री बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस उपअधीक्षक, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रविंद्र परदेशी, पोलीस अमलदार श्री. श्रीराम राम श्री भरत गारदे, चालक अंमलदार श्री. मोरे ला.प्र.वि. बीड यांनी कारवाई केली आहे.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बाबत तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेशी संपर्क साधवा



शुक्रवार, जून १८, २०२१

नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजुर करून इफको टोकीयो कंपनीविरूद्ध गुन्हे दाखल करा-शेतकरी पुत्र नायगाव

 


नायगाव,दि 18 जून : तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० सालचा सोयाबीन,मुग,उडीद,कापुस,ज्वारी यासह आदी पिकांचा पिक विमा इफको टोकीयो कंपनीकडे नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरला होता पण सोयाबीन व तुर पिकाचे मोठे नुकसान होऊनही नायगाव तालुक्यातील सर्व महसुल मंडळे बाधीत क्षेत्र घोषीत असतानाही पिक विमा नामंजुर झाल्याने शेतकऱ्यात प्रचंड संतापाचे वातावरण असुन यात तहसिलदार महोदयांनी तात्काळ लक्ष घालावी अशी शेतकरी पुत्रांची मगणी आहे.

    आयुक्त साहेब महाराष्ट्र राज्य पुणे ०५/०३/२०२१ च्या पत्रान्ववे महसुल जिल्हा कृषी परिषद विभागामार्फत ३३% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रात पंचनामे करण्यात आला.

  नायगाव तालुक्यातील स्थानिक नैसर्गीक आपत्ती ४०८४ शेतकऱ्यांना फक्त ३ कोटी ५६ लाख ४४ हजार ४२६ रूपये तर काढणी पश्चात नुकसान भरपाई १२१४ शेतकऱ्यांना ९६ लाख ६ हजार ४४४ रूपये उत्पन्न आधारे २९८९ शेतकऱ्यांना १ कोटी १२ लाख ८६ हजार १०३ रूपये इतकी तुटपुंजी रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांचा थटा करणाच्या प्रकार इफको टोकीयो कंपनीने केला असुन काही शेतकऱ्यांना का? पिकवीमा भरते वेळी शेतकऱ्यांना वेगळीच भुलपाथा इफको टोकीयो कंपनी दिल्याने त्यांचा प्रेमळ आश्वासनाला शेतकरी मायबाप कोरोना महामारीत फसले असुन त्यामुळे माझ्या शेतकरी मायाबापाची फसवणुक केल्याप्रकरणी इफको टोकीयो कंपनीवर तात्काळ गुन्हे दाखल करा अश्या अशयाचे निवेदन नायगाव येथील शेतकरी पुत्र माणिक चव्हाण,विठ्ठल बेळगे,अविनाश अनेराये,नवनाथ जाधव,सुनिल शेळगावे,सचिन गायकवाड,अभिजीत मंगरूळे,शिवराज चव्हाण,अविनाश मोहीते,जयकांत कानोले व तालुक्यातील इतर शेतकरी पुत्र उपस्थीत होते.




गुरुवार, जून १७, २०२१

प्रवासी व मालवाहतूक करणा-या वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनीचे रिफ्लेक्टर्स बसविणे बंधनकारक ! दुय्यम दर्जाची उत्पादने विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करणा-यांवर कारवाई करा_एमॅस संचालक महेश खेडकर



पुणे (दि. 17 जून 2021) : माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दुचाकींसह सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणा-या वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनींचे प्रतिबिंबित करणारे परावर्तक (रिफ्लेक्टर्स) बसविणे बंधनकारक आहे असे परिपत्रक महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दि. 5 मार्च रोजी परिपत्रक काढले आहे तसेच दि. 20 एप्रिल 2021 रोजी सुधारित परिपत्रक काढले आहे.

        परंतू बाजारातील इतर कंपन्यांचे प्रतिनिधी परिवहन विभागातील अधिकारी, प्रवासी व मालवाहतूक क्षेत्रात कार्यरत असणा-या संस्था, संघटनांचे प्रतिनिधी तसेच काही माध्यम प्रतिनिधींची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत असे आमच्या निदर्शनास आले आहे. आमच्या मान्यताप्राप्त कंपनीचे सर्व उत्पादन मुबलक प्रमाणात सर्व शहरांमध्ये उपलब्ध आहे. तरी देखिल इतर कंपन्यांचे प्रतिनिधी आमच्या कंपनीचे उत्पादन बाजारात उपलब्ध नसल्याचे बेकायदेशीरपणे प्रतिक्रिया देतात व तसे काही निवडक माध्यमातून व सोशल मिडीयातून आमच्या कंपनीचे बदनामी होईल असे वक्तव्य करतात. दुय्यम दर्जाची उत्पादने विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करणा-यांवर परिवहन विभागाने कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी एशियन मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संचालक महेश खेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी समन्वयक आदित्य कोठारी उपस्थित होते.


 मा. सर्वेाच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व प्रशिक्षिक बाबी पुर्ण करुन केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 104 ते 104 - ई च्या तरतुदीनुसार AIS 089 व AIS 090 च्या मानकांची पुर्तता करणा-या ओराफोल इंडिया प्रा. लि., अवरी डेनिसन इंडिया प्रा. लि. आणि डाओमिंग रिफ्लेटिव्ह मटेरिअल इंडिया प्रा. लि. या कंपनींच्या परावर्तक (Reflectors), रिफ्लेटिव्ह टेप्स (Reflective Tapes) आणि रियर मार्किंग प्लेट / टेप या उत्पादनाला अधिकृत मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश 20 एप्रिल 2021 रोजी काढले आहे.

     दुय्यम दर्जाची उत्पादने विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करणा-यांवर कारवाई करावी याबाबत आम्ही 3 जून 2021 रोजी परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडे ई - मेलव्दारे ‘ मे. 3M इंडिया लिमिटेड हे मान्यता नसताना वाहनांवर बसविण्यात येणारे दुय्यम दर्जाचे परावर्तक (Reflectors), रिफ्लेक्टीव्ह टेप्स (Reflective Tapes) विक्री करत असल्याबाबत’ परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडे तक्रार केली होती. आमच्या पत्राची दखल घेऊन 4 जून 2021 रोजी माननिय परिवहन उपायुक्त (अं.1) महाराष्ट्र राज्य मुंबई लक्ष्मण दराडे साहेब यांनी सर्व प्रादेशिक / उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आदेश दिला की, ‘उक्त तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करुन आपला अहवाल 07 दिवसांत निम्नस्वाक्षरीतांकडे सादर करावा’.

       माननिय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल रिट याचिकेच्या निर्णयानुसार देशातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षा समितीची स्थापना केली असून, या समितीने रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणा-या मृत्यूमध्ये दरवर्षी दहा टक्के घट करणेबाबत निर्देश दिले आहेत. रात्रीच्या वेळी होणारे रस्ते अपघात हे मुख्यत: रस्त्यांवर उभे असलेल्या तसेच कमी वेगाने चालणा-या जड वाहनांची दृष्यमानता कमी असल्यास अशा वाहनांवर अन्य वाहने आदळून धडकतात. रात्री प्रवास करणारी वाहने ही प्रामुख्याने जड मालवाहतूक वाहने असल्याने त्यांची दृष्यमानता वाढविण्यासाठी त्यावर मान्यताप्राप्त कंपनींचे परावर्तक (रिफ्लेक्टर्स), रिफ्लेटिव्ह टेप्स आणि मागील बाजूस रियर मार्किंग प्लेट / टेप बसविणे अनिवार्य असून त्याबाबत केंद्र सरकारने केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 104 ते 104 - ई मध्ये वेळोवेळी सुधारणा केली आहे.

       केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 104 ते 104 - ई च्या तरतुदीनुसार AIS 089 व AIS 090 च्या मानकांची पुर्तता करणा-या ओराफोल इंडिया प्रा. लि., अवरी डेनिसन इंडिया प्रा. लि. आणि डाओमिंग रिफ्लेटिव्ह मटेरिअल इंडिया प्रा. लि. या कंपनींच्या परावर्तक (Reflectors), रिफ्लेटिव्ह टेप्स (Reflective Tapes)आणि रियर मार्किंग प्लेट / टेप चा वापर करणे खालील प्रकारच्या सर्व वाहनांवर बंधनकारक आहे.

       दुचाकी वाहने, 3.5 टन (GVW) पर्यंत क्षमतेची मालवाहू वाहने (तीनचाकी वाहनांसह), 3.5 टन ते 7.5 टन क्षमता असलेली मालवाहू वाहने, 7.5 टन क्षमतेपेक्षा जास्त वजन असलेली मालवाहू वाहने, 8 पर्यंत आसन क्षमतेची (मोटार कार, ओमानी बस इ.) प्रवासी वाहने, 9 व 9 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेली तसेच 5 टन (GVW)पर्यंत क्षमतेची प्रवासी वाहने, 9 व 9 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेली तसेच 5 टन पेक्षा जास्त (GVW)क्षमतेची प्रवासी वाहने, ॲग्रीकल्चर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कंम्बाईन हार्वेस्टर, एन संवर्गातील प्राईम मुव्हरला जोडलेले ट्रेलर व सेमी ट्रेलर, बांधकाम साहित्य वाहुन नेणारी वाहने आणि मॉड्यूलर हायड्रॉलिक ट्रेलर अशा सर्व वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनींचेच परावर्तक रिफ्लेटिव्ह टेप्स आणि मागील बाजूस रियर मार्किंग प्लेट / टेप बसवावेत. यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होऊन मनुष्यहानी देखिल कमी होईल.

          केंद्रिय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 104 ते 104 ई - नुसार परावर्तक (Reflectors), रिफ्लेक्टीव्ह टेप्स (Reflective Tapes) आणि मागील बाजूस रियर मार्किंग प्लेट/ टेप लावणे आवश्यक असणा-या वाहनांना ती योग्य अवस्थेत बसविली असल्याची खात्री योग्यता प्रमाणपत्र चाचणीच्या वेळेस करुन त्यानंतरच योग्यता प्रमाणपत्र जारी करावे. कोणत्याही परिस्थितीत उक्त तरतुदीची पुर्तता न करणा-या वाहनांस योग्यता प्रमाणपत्र जारी करण्यात येऊ नये. केवळ क्यूआरकोडसह ऑनलाइन जारी केलेले विहित नमुन्यातील इन्स्टॉलेशन प्रमाणपत्र वैध मानले जाईल. योग्यता प्रमाणपत्र चाचणीच्यावेळी संबंधित मोटार वाहन निरिक्षक / अधिकारी यांनी क्यूआरकोड स्कॅन करुन अशा उत्पादनाची व प्रमाणपत्राची अस्सलतेची खात्री करावी. योग्यता प्रमाणपत्र चाचणीकरीता उक्त तरतुदीची पुर्तता न करता वाहन सादर केल्यास वाहनचालकांविरुध्द तात्काळ दंडनीय कारवाई करण्यास यावी तसेच उक्त तरतुदीच्या पुर्ततेअंती वाहन चाचणीकरीता स्विकारण्यात यावे.

        उक्त तरतुदीच्या कार्यक्षम अंमलबजावणीकरीता तसेच उत्पादनाच्या अस्सलतेबाबत जबाबदारी निश्चित करणे शक्य व्हावे याकरीता उत्पादकाच्या अधिकृत वितरकास क्षेत्रिय नोंदणी प्राधिकारी यांनी विहित तरतुदीनुसार व्यवसाय प्रमाणपत्र जारी करावे. असे व्यवसाय प्रमाणपत्र आम्हास मिळाले आहे.

      तसेच ज्या उत्पादकाचे उत्पादन AIS 089 वा AIS 090 मानकांचे उल्लंघन करीत असल्याचे वा दुय्यम प्रतवारीचे (डुप्लीकेट) बसविण्यात आल्याचे निदर्शनास येईल तो उत्पादक मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 190 (2) च्या तरतुदींसह बँक हमीची रक्कम जप्त करुन समायोजित करण्याच्या तसेच अनुषंगीक दंडात्मक कारवाईस पात्र ठरेल. असे निदर्शनास आल्यास प्रादेशिक परिवहन अधिकारी / उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी अशा प्रकरणी संबंधित वितरकाचे व्यवसाय प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावे. तसेच सदर उत्पादनाच्या किंमती निश्चित करुन या विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित कराव्यात. किंमतीतील बदलाबाबत वेळोवेळी परिवहन आयुक्त कार्यालयास कळवावे. निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त रक्कम वाहनधारकाकडून अधिकृत वितरकाव्दारे आकारण्यात येणार नाही. याची खात्री करावी व त्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. या आदेशाबाबत काहीहि शंका असल्यास dytcenfl.tpt-mh@gov.in किंवा dycommr.enfl@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. असेही आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात केले आहे.






लाच प्रकरण : महा लाचखोर सहायक निबंधकाला 25 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून घेतले ताब्यात

 


आदरणीय मॅडम/सर,

➡️सापळा अहवाल ⬅️

▶️ युनिट- परभणी

▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 52 वर्ष

▶️ आरोपी लोकसेवक:- रवींद्र रमेशराव सावंत, वय 39 वर्षे व्यवसाय- नोकरी सहायक निबंधक सहकारी संस्था वर्ग 2, कार्यालय पूर्णा . सावंत गल्ली झरी ता जी परभणी

▶️ लाचेची मागणी- 50,000/- रूपये

▶️ लाच स्वीकारली -25,000/- रुपये पहिला हप्ता

▶️ लाचेची मागणी दिनांक 17.06.2021 रोजी 

▶️ लाचेची स्वीकृती

      दिनांक 17.06.2021 रोजी                       

▶️ कारण - तक्रारदार यांचे व त्यांच्या भाऊ चेअरमन असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था यांचे विरुद्ध दाखल तक्रारचे निरसन करण्यासाठी व सुनावणी मध्ये मदत करून निकाल त्यांचे बाजूने देण्यासाठी यातील अलोसे यांनी सुनावणीच्या वेळी 50000 रु लाचेची मागणी दि 17-03-2021 रोजी करून सदर लाचेची रक्कमे पैकी 25000 पंचा समक्ष लाचेची रक्कम अलोसे यांनी स्विकारली.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️मार्गदर्शक-मा. कल्पना बारवकर,पोलीस अधीक्षक, मा.अर्चना पाटील ,अपर पोलीस अधीक्षक. ला प्र वि कार्यालय नांदेड

▶️ सापळा अधिकारी, भरत के हुंबे पो उप अधिक्षक, ला प्र वि परभणी

➡️सापळा पथक - पोह हनुमंते, पोना/अनिल कटारे, , पोकाॅ/शेख मुखतार, पोकॉ माणिक चट्टे, सर्व पथक ला. प्र. वि.पथक परभणी

➡️आलोसे यांचे सक्षम अधिकारी -मा. सहकार आयुक्त , सहकार संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे.



बुधवार, जून १६, २०२१

नांदेड जिल्ह्यात 53 व्यक्ती कोरोना बाधित, एकाचा मृत्यू तर 92 कोरोना बाधित झाले बरे



नांदेड,दि.16 जून 2021 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 684 अहवालापैकी  53 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 14 तर अँटिजेन तपासणीद्वारे 39 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 993 एवढी झाली असून यातील 88 हजार 173 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 362 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

16 जून रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे अर्धापूर तालुक्यातील दिग्रस येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 900 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 9, नांदेड ग्रामीण 6, भोकर 1, कंधार 14, लोहा 1, मुदखेड 2, उमरी 1, किनवट 2, यवतमाळ 2, बीड 1 असे एकूण 53 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 92 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 3,  मुखेड कोविड रुग्णालय 1,  बिलोली तालुक्यातर्गंत 1, हिमायतनगर तालुक्यातर्गत 3किनवट कोविड रुग्णालय 4, कंधार तालुक्यातर्गत 1, अर्धापूर तालुक्यातर्गंत 2,  मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 68, हदगाव कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 2 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 362 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  23हदगाव कोविड रुग्णालय 1किनवट कोविड रुग्णालय 6देगलूर कोविड रुग्णालय 3,   मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 2,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 252, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 57, खाजगी रुग्णालय 10  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 126, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 131 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 82 हजार 880

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 80 हजार 403

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 993

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 173

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 900

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.90 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-164

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 362

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

Popular posts लोकप्रिय पोस्ट