🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शुक्रवार, जुलै १६, २०२१

लाच प्रकरण : महानगरपालिकेतील शिक्षण विभागाचा महा लाचखोर सहायक प्रशासकीय अधिका-याला 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले



*Respected sir*

*Trap Case Report:*

➡ घटक :- पुणे

➡ तक्रारदार :- महिला 37वर्ष.

➡ आरोपी :- 

लोकसेवक -शिवाजी बबन बोखारे. वय 50 वर्षे, पद- सहायक प्रशासकीय अधिकारी, वर्ग - 2, शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका.

➡️ पडताळणी :-दिनांक 12/07/2021, 13/07/2021, व 14/07/2021.

➡️सापळा दि.16/07/2021

➡️ लाचेची मागणी :- 60,000 रुपये तडजोडीअंती 50,000/-

➡️ लाच स्वीकारली :- 50,000/- रू.

➡ हकीकत :- तक्रारदार यांच्या मुलीचे शिक्षण हक्क कायदा (RTE) 2009 अन्वये ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, बाणेर,येथे लॉटरी पद्धतीने मिळणाऱ्या प्रवेश यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यात आले होते. त्याबाबतची कागदपत्रे तपासून प्रवेशासाठी ऑनलाईन मान्यता देण्यासाठी आरोपी लोकसेवक यानी 50,000/- रुपयांची लाचेची मागणी करून ती रक्कम स्विकारली .

➡ सापळा पथक : -

पोलीस उपअधीक्षक - वर्षाराणी पाटील.

पोलीस निरीक्षक - सुनिल बिले.

पो.हवा.नवनाथ वाळके,

पो.शि.किरण चिमटे,

 म.पो. शि.पूजा पागिरे,

पो. शि. चालक प्रशांत वाळके,

ला.प्र.वि.पुणे युनिट .

➡मार्गदर्शन अधिकारी :- 

श्री. राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे परिक्षेत्र. 

श्री.सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे.

श्री.सुहास नाडगौडा,अपर पोलीस अधिक्षक,लाप्रवि पुणे.

लेटलतीफ गुरूजींना सीईओंचा दणका, पाच शिक्षकांचे निलंबन



  • नांदेड जिल्हा परिषदे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या धडक कारवाईने शिक्षकांमध्ये एकच खळबळ
  • भोकर तालुक्यातील पाच  शिक्षक तडकाफडकी निलंबीत 

नांदेड,दि. 16 जुलै 2021 

भोकर दि.16 जुलै(नांदेड न्यूज अपडेट):- भोकर येथील जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क नुतन शाळेस  शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेटी देवून शाळेची पाहणी केली. यावेळी अनुपस्थित असलेल्‍या 5 शिक्षकांना त्‍यांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे.

सिईओ यांचा भोकर तालुक्‍यात आज दौरा होता. दरम्‍यान त्‍यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क शाळेस भेट देवून ही कार्यवाही केली आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर शिक्षकांना शाळेत 50 टक्‍के उपस्थिती अनिवार्य आहे. 50 टक्‍के प्रमाणे आज 19 शिक्षक उपस्थित राहणे आवश्‍यक होते. परंतु शाळा भेटी दरम्‍यान 5 शिक्षक अनुस्थित आढळून आल्‍यामुळे निलंबनाची कार्यवाही करण्‍यात आली आहे. तर एका शिक्षकास कारणे दाखवा नोटीस देण्‍यात आली.

नियमानुसार शिक्षक शाळेत उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्‍यांचा अभ्‍यास पूर्ण करण्‍यासाठी ऑनलाईन प्रणालीव्‍दारे तसेच शिक्षक मित्र उपक्रमातून प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांपर्यंत शिक्षण पोहोचणे आवश्‍यक आहे. याचे सर्व नियोजन शाळास्‍तरावर उपस्थित राहून शिक्षकांनी करणे आवश्‍यक आहे. परंतु येथील शाळेत शिक्षक अनुपस्थित असल्‍याने सिईओंनी चांगलेच खडसावले.

शैक्षणिक गुणवत्‍ता वाढ अभिनांतर्गत मुलांची इंग्रजी व गणित विषयाची चांगली तयारी करुन घेण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत. तसेच नव-नवे उपक्रम राबवण्‍याची आवश्‍यकता आहे. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शाळेत वृक्ष लागवड, डिजीटल शाळा, रंगरंगोटी व सुशोभिकरण करण्‍यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. यावेळी त्‍यांनी पालक व विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला. दरम्‍यान जिल्‍हा परिषद हायस्‍कुल भोकर, बारड व शेंबोली येथे शाळांना भेटी दिल्‍या. तसेच बारड ग्राम पंचायत व शेंबोली येथील आरोग्‍य उपक्रेंद्रास त्‍यांनी भेट देवून संवाद साधला.

मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल बारड, कें.प्रा.शा. बारड आणि शेंबोली वस्ती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी आज भेट दिली. जिल्हा परिषद प्रशाला बारड येथे शिक्षकांनी शाळेत होत असलेल्या उपक्रमासंबंधी माहिती दिली. नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले. ऑनलाइन शिक्षण, सेतू अभ्यासक्रमा विषयी मुख्याध्यापिका श्रीमती तळणकर यांनी माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छ शाळा सुंदर शाळा करणे, बाला अंतर्गत शाळेची रंगरंगोटी, ॲस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्र, भाषाविषयक जाणिवा वाढवणे, बोलक्या भिंती, रोपवाटिका, नर्सरी तयार करणे आदी बाबतीत सूचना केल्या. वस्ती शेंबोली येथील शाळेस त्यांनी भेट दिली. रूपाली कांबळे, कोमल लोमटे यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती दिली. ओम नावाच्या विद्यार्थ्याला आई बाबा नाहीत. हा विद्यार्थी आजीकडे राहून शिक्षण घेतो. त्यासाठी आवश्यक सर्व मदत करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.


तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्या असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी शाळेच्या दुसऱ्याच दिवशी वेळेवर हजर न राहणाऱ्या शिक्षकांना दणका दिला आहे. भोकर येथील लेटलतीफ पाच गुरूजींना निलंबित केले. या कारवाईमुळे मात्र शाळांची घंटा वाजण्यापूर्वीच शिक्षक शाळांच्या मैदानात हजर राहतील, अशी अपेक्षा आहे.

कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षांपासून शाळांची घंटा वाजलीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले होते. दरम्यान, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १५ जुलैपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल ३९० माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू झाले असून विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय असून शिक्षकांना पन्नास टक्के उपस्थितीचे आदेश आहेत. त्यात प्रत्येक शिक्षकांची कोरोना तपासणी करणेही गरजेचे आहे. कोविडमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याची ही संधी असून प्रत्येक शिक्षकांनी स्वयंस्फुर्तपणे विद्यार्जनाचे काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले. ठाकूर यांनी शुक्रवारी पाच ते सहा शाळांना भेट देवून तेथील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.

पाच शिक्षकांचे निलंबन 

भोकर तालुक्यात दौऱ्यावर असताना एका शाळेत पन्नास टक्केपेक्षाही कमी शिक्षक उपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी तत्काळ पाच शिक्षकांचे निलंबन केले. या कारवाईमुळे लेटलतीफ शिक्षकांना चपराक बसणार आहे. शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी कठोर परिश्रम घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

लाच प्रकरण : खाजगी पंटर मार्फत पंचायत समितीच्या महा लाचखोर कृषी अधिकाऱ्याने घेतली लाच ! पंटर एसीबीच्या ताब्यात तर कृषी अधिकारी फरार



*लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा*

*यशस्वी सापळा*

▶️ *युनिट -* बुलडाणा

▶️ *तक्रारदार-* पुरुष ,वय- 32 वर्षे रा.वडगांव खंडोपंत, ता. मोताळा, जि.बुलडाणा

▶️ *आरोपी-* 

 श्री. संदीप सोपान साळवे, 

वय- ४६ वर्षे अंदाजे,  

पद- कृषी अधिकारी,( वर्ग -२-कनिष्ठ)

नेमणूक - पंचायत समिती-मोताळा, ता- मोताळा, जि. बुलढाणा; ह. मु.-शासकीय निवासस्थान, पंचायत समिती आवार, मोताळा, जि. बुलढाणा. मूळ रा. अकोला.

(फरार)

२) कौतिकराव माणिकराव जुनारे, वय. ४५, व्यवसाय- कृषी केंद्र, रा. मोताळा जि बुलढाणा. (खाजगी इसम -ताब्यात घेण्यात आले आहे)                                                                       

▶️ *लाचेची मागणी*- 

रु ५००० /-,

▶️ *लाच स्विकारली-*

 पहिला टप्पा रु. ३०००/-

▶️ *हस्तगत रक्कम-* 

रु. ३०००/-

▶️ *लाचेची मागणी -* 

ता. १५/०७/२०२१

▶️ *लाच स्विकारली -*    

 ता. १५/०७/२०२१

▶️ *घटनास्थळ*- शिवानी कृषी केंद्र, नांदुरा रोड, मोताळा, जि. बुलडाणा.

▶️ *लाचेचे कारण -*.  

यातील तक्रारदार यांच्या ग्राम अंत्री शिवारातील शेतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत मंजूर विहीर अनुदानाचा पन्नास हजार रुपये रकमेचा चेक दिल्याचा मोबदला म्हणून आरोपी क्रमांक एक यांनी स्वतः तसेच आरोपी क्रमांक दोन मार्फत तक्रारदार यांच्याकडे ५००० रुपये लाचेची मागणी करून लाचेचा पहिला टप्पा रु ३००० पंच क्रमांक एक यांचे समक्ष आरोपी क्रमांक २ यांनी आरोपी क्रमांक १ यांचेसाठी स्वीकारला.

▶️हॅश व्हॅल्यू काढण्यात आली आहे.

▶️ *सापळा व मदत पथक-* पो.उपअधिक्षक श्री. संजय चौधरी,

स.पो.फौ. - शाम भांगे

पोलीस नाईक - श्री मो. रिझवान, राजु शिरसागर

पो.शि.- श्री विनोद लोखंडे, अझरुद्दीन काजी.

▶️ *मार्गदर्शन अधिकारी* :- 

1) श्री. विशाल गायकवाड,

पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र.

2) श्री. अरुण सावंत,

अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र.

▶️ *तपासी अधिकारी*

  पो. उप अधिक्षक श्री संजय चौधरी.


▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* 

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बुलडाणा. .

---------------------------------------------- 

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

*लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा*.

*संपर्क क्रमांक* - *07262-242548*

*टोल फ्री क्रमांक* - *1064*.

-------------------------------------------

PMFBY : राज्यात खरिपाचा पिक विमा भरण्यासाठी २३ जुलै पर्यंत मुदतवाढ ! शेतकऱ्यांना मोठा दिलासा



  • शेतकऱ्यांना मोठा दिलासा,पिक विमा भरण्यासाठी 8  दिवसांची मुदतवाढ

मुंबई,दि 16 जुलै 2021 : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम 2021 करिता अर्ज करण्यासाठी दिनांक 23 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता.त्यानुसार योजनेत सहभागासाठी 23 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गंत नांदेड जिल्ह्यासाठी इफको टोकीयो कंपनीची नियुक्ती केली आहे.या योजनेंतर्गत सन 2021-22 मध्ये खरीप हंगामासाठी पिक विमा प्रस्ताव स्विकारणे सुरु झाले आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत आता शुक्रवार 23 जुलै पर्यंत वाढविली आहे. पिक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी तात्काळ पिक विम्याची नोंदणी करावी.

यापूर्वी पिक विमा भरण्याचा अंतिम मुदत 15 जुलै दिली होती. तथापि महाराष्ट्र शासनाने भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाला एवढ्या अल्पमुदतीत शेतकऱ्यांना पिक विमा काढणे कठीन असल्याचे निदर्शनास आणून यात मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. कोविड-19 ची परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही मुदतवाढ करीत असल्याचे भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त सुनिलकुमार यांनी आदेशात म्हटले आहे.

दोन वर्षापासून पिक विमा भरुन, नुकसान भरपाई रक्कम मिळाली नसल्याने तसेच दिड वर्षापासून कोविडचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ असतो. सिंचनाची मोठी साधनेही नाहीत. त्यामुळे खरीप हंगामात सोयाबीन,कापूस,उडीद,तूर या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा भर असतो.अनेकदा पावसाने ओढ दिल्यानंतर पिके वाया जातात. तर, मागच्या वर्षी पिके निघण्याच्या वेळी अतिवृष्टीमुळे खरीप पूर्ण हातचे गेले त्यामुळे राज्यात यावर्षी पिक वीमा भरण्याला शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.बहुतांश शेतकरी विमा भरुन पिक वीमा काही मिळत नाही म्हणून पिक वीम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळले आहे.

दोन वर्षांत शेतकऱ्यांनी विमा संरक्षणासाठी भरलेल्या रकमा आणि राज्य व केंद्र सरकारने भरलेल्या आपल्या हिश्शांच्या रकमांतून पीक विमा कंपनीची तिजोरी भरत असली तरी शेतकऱ्यांचे हात रिकामेच राहत आहेत. परिणामी म्हणूनच राज्यात यंदा पीक विमा संरक्षणाबाबत शेतकऱ्यांचा अनुत्साह दिसून येत आहे.

शिवाय पिक विमा भरताना विमा कंपनीचे सर्व्हर आणि इंटरनेट अनेकवेळा लोड घेत असल्याने व वारंवार लाईट जात असल्याने ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्र चालक, प्रायव्हेट ग्राहक सेवा केंद्र चालकांना पीक विमा भरण्यात अनेक अडचणी येत होत्या.त्या पार्श्वभूमीवर पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. ही मागणी अखेर मान्य करत 8 दिवसांची 23 जुलै पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.ही मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे. आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत - कृषिमंत्री दादाजी भुसे

संबंधित बातमी

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या खरीप हंगाम-2021 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे_ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी.चलवदे यांचे आवाहन

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिका-याचे आवाहन ; पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै

Popular posts लोकप्रिय पोस्ट