🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, एप्रिल १४, २०२१

पोलीस अधिक्षक कार्यालयात,महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

 


नांदेड, दि. १४ एप्रिल : आज रोजी " क्रांतीसुर्य , बोधीसत्व, परम् पुज्य ,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.भीमराव रामजी आंबेडकर " यांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात साजरी करण्यात आली आहे. या प्रसंगी मा. प्रमोदकुमार शेवाळे साहेब-पोलीस अधिक्षक नांदेड यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच मा. श्री. निलेश मोरे साहेब-अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. विजय कबाडे-अपर पोलीस अधिक्षक भोकर, मा. श्री विकास तोटावर साहेब-पोलीस उप अधिक्षक (मु), नांदेड यांनी पुष्प वाहुन अभिवादन केले. या प्रसंगी श्री द्वारकादास चिखलीकर-पोनि स्थागुशा, श्री प्रशांत देशपांडे-पोनि जिवीशा, श्री हाणमंत गायकवाड-पोनि नियंत्रण कक्ष, श्री अशोक अनंत्रे-पोनि नियंत्रण कक्ष, श्री शिवाजी लष्करे-सपोनि तथा जनसंपर्क अधीकारी पो. अ.कार्यालय नांदेड, श्री. शिवप्रसाद मुळे-सपोनि पोलीस कल्याण, श्री कोलते-सपोनि महिला सहाय्य कक्ष नांदेड, मपोउपनि सो. पिंपरखेडे मॅडम, प्रशिक्षण विभाग व जनसंपर्क कार्यालयाचे सपोउपनि श्री.उत्तम वाघमारे , पोहेकॉ/सुर्यभान कागणे, मपोकॉ रेखा इंगळे व पोलीस अधिकारी व अंमलदार मोठया संख्येने हजर होते. वरील सर्वांनी महामानवास अभिवादन केले आहे.



कोरोनातून बरे होण्यासाठी वेळेवर उपचार अत्यावश्क,प्रत्येक बाधितांना नसते रेमडेसिवीरची आवश्यकता-जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

 “लोकल फॅार व्होकल ” हे ब्रीद


  • जिल्ह्यात कोव्हिड-19 लसीकरण बहुमाध्यम जनजागृती अभियानास प्रारंभ
  • कोव्हिड -19 लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान
  • जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यत कोरोना लसीकरण व उपाययोजनाबाबत वेळोवेळी संदेश पोहचणे तेवढेच अत्यावश्यक
  • कोरोना बरा करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनच लागते ही निर्माण झालेली अंधश्रध्दा प्रत्येकाने दूर केली पाहीजे
  • मास्कचा वापर, किमान 6 फुटाचे अंतर तसेच वेळोवेळी हाताची स्वच्छता करणे या त्रीसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे
  • गीत व नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत, शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची जनजागृती
  • 20 दिवस लोहा, कंधार, मुखेड, भोकर, उमरी, हदगाव तसेच नांदेड या तालुक्यात जनजागृती
नांदेड, दि. 12 एप्रिल :- जनतेने मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता कोव्हिड -19 चे लसीकरण करून घ्यावे, तसेच उपलब्ध असलेल्या दोन्ही प्रकारच्या लस सुरक्षीत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य, पुणे यांच्यावतीने कोव्हिड -19 लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियानाच्या उदघाटन प्रसंगी आज जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा माहीती अधिकारी विनोद रापतवार, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, नांदेडचे प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रचार अधिकारी सुमीत दोडल आदी मान्यवर उपस्थित होते.


सुरक्षित अंतर व शासनाने निर्गमित केलेल्या सूचना लक्षात घेवून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यत कोरोना लसीकरण व उपाययोजनाबाबत वेळोवेळी संदेश पोहचणे तेवढेच अत्यावश्यक आहे असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट करुन कोरोना बरा करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनच लागते ही निर्माण झालेली अंधश्रध्दा प्रत्येकाने दूर केली पाहीजे असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

 जनजागृतीच्या या उपक्रमातून जनतेच्या मनातील लसीकरणाबाबातच्या शंका दुर होऊन अधिकाधिक जनता लसीकरण करून घेईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जनतेने आवश्यकतेनुसार घराबाहेर पडावे तसेच मास्कचा वापर, किमान 6 फुटाचे अंतर तसेच वेळोवेळी हाताची स्वच्छता करणे या त्रीसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे असे सांगून या त्रीसूत्रिचा वापर आणि लसीकरण केले तरच आपल्याला कोरोना आजारावर मात करता येईल यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले. 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या बहुमाध्यम चित्ररथाचे उदघाटन आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून तसेच फित कापून करण्यात आले. या बहुमाध्यम चित्ररथामध्ये शाहीर रमेश गीरी आणि सहकारी यांच्याद्वारे गीत व नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत, शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचार मोहिमेचा मुळ उद्देश हा लोकांपर्यत लसीकरण मोहिमेची खरी माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करणे हा आहे.

“लोकल फॅार व्होकल ” हे ब्रीद वाक्य घेऊन राबविण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे अमुल्य कार्य या जनजागृती अभियानातून केले जाणार आहे. तसेच एलईडी डिस्प्लेच्या माध्यमातूनही संदेश दाखविण्यात येणार आहेत. तसेच श्राव्य संदेशाचाही समावेश या चित्ररथात करण्यात आला आहे.

पुढील 20 दिवस नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार, मुखेड, भोकर, उमरी, हदगाव तसेच नांदेड या तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागातून या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

#लोकल फॅार व्होकल #जनजागृती


Popular posts लोकप्रिय पोस्ट