🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, जून ०९, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षक सह खाजगी इसमास 5000 रुपयांची लाच स्वीकारताना नांदेड एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले


नांदेड,दि 9 जूून : पोलीस स्टेशन कंधार अंतर्गत दुरक्षेत्र कुरूळा येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सुभाष म्हैसाजी चौपडे व खाजगी इसम शेख फारूक शेख युसुफ यांना ५,०००/- रुपयांची लाच स्वीकारतांना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले.
दिनांक ०३/०६/२०२१ रोजी यातील तकारदार यांनी तकार दिली की, "तकारदार यांचे विरुद पोलीस स्टेशन कंधार येथे प्राप्त तकारी अर्जावरून त्यांचे विरुद्ध कोणतीही कार्यवाही न करण्यासाठी लोकसेवक सपोउपनि श्री चोपडे व खाजगी इसम शेख फारूक १०,०००/- रु. लाचेची मागणी करीत आहेत "

तक्ररदार यांचे तक्ररीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडुन दिनांक ०९/०६/२०२१ रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये सपोउपनि चोपडे यांनी तक्रारदार यांचेकडे उपरोक्त कामासाठी १०,०००/- रू. लाचेची मागणी तडजोडीअंती ५,०००/- रु. स्विकारण्याचे मान्य केले व सदर लाचेची रक्कम खाजगी इसम शेख फारूक शेख युसुफ यांचेकडे देण्याचे सांगीतले असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आजच दिनांक ०९/०६/२०२१ रोजी पुजा हॉटेल कुरूळा ता. कधार परिसरात लावण्यात आलेल्या सापळया दरम्याण खाजगी इसम शेख फारूक शेख युसुफ यांनी तक्रारदार यांचेकडून लोकसेवक सपोउपनि चोपडे यांनी सांगीतल्याप्रमाणे ५,०००/-रु लाचेची रक्कम स्विकारली म्हणून (३) श्री सुभाष म्हैसाजी चोपडे, वय ५६ वर्ष, व्यवसाय नोकरी सहा. पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन कंधार अंतर्गत दुरक्षेत्र कुरुळा रा. साईसदर रूबी इंटिल जवळ, सिडको नांदेड (२) श्री शेख फारूक शेख युसुफ, वय ४० वर्ष, व्यवसाय शेती, रा. मु.पो. कुरुळा ता. कंधार जि. नांदेड यांचे विरुध्द पोलीस ठाणे कधार येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस उप अधिक्षक श्री विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले, पोना किशन चिंतोरे, एकनाथ गंगातिर्थ, जगन्नाथ अनंतवार, ईश्वर जाधव, नरेंद्र बोडके यांनी पार पाडली आहे.

तरी सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की, शासकीय अधिकारी / कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर खालील कमाकावर संपर्क करावा.

१) टोलफी हेल्पलाईन कमांक - १०६४ 

(२) कार्यालयाचा फोन क्रमांक ०२४६२-२५३५१२ 

३) श्री विजय डोंगरे, पो उप अधि यांचा मोबाईल क्रमांक ८९७५७६९९१८

Website - www.acbmaharashtra.gov.in Mobile App www.acbmaharashtra.net

Popular posts लोकप्रिय पोस्ट