🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, जुलै १४, २०२१

स्वारातीम विद्यापीठाच्या वेबसाईटच्या तांत्रिक समस्येमुळे पदवीचे शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित ! ऑफलाईन परिक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी



नांदेड,दि 14 जुलै 2021 : स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा ऑनलाईन सुरू आहेत.काल दिनांक 13 जुलै मंगळवारी विद्यापीठाने परीक्षेसाठी दोनवेळा लिंक दिल्या. मात्र त्या सुरू न झाल्याने जिल्ह्यातील असंख्य महाविद्यालयीतील B.A ,B.CO,B.SC च्या तृतीय वर्षाचे शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत.


13 जुलै रोजी इतिहास, समाजशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरण शास्त्र विषयाचे वेगवेगळ्या वर्गाचे पेपर होते. सकाळी 10 वाजता विद्यापीठाने दिलेल्या वेबसाईटवर लिंक सुरू होणे आवश्यक होते परंतु लॉगिन करत असताना बाहेर फेकल्या जात होते.


विद्यार्थ्यांनी खूप वेळा प्रयत्न करूनही लिंक ओपन झाली नाही आणि प्रश्नपत्रिका मिळाली नाही. दुपारी 2 वा. च्याही पेपरला हीच अवस्था झालीग.शंकरनगर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील पदवी परीक्षेचे विद्यार्थी आहेत.परीक्षेपासून वंचित राहिलेल्या B.SC-90,B.A-47 आणि B.COM-40 चे मिळून असे एकूण 177 विद्यार्थी आहेत. ही तांत्रिक समस्या असून अनेक महाविद्यालयात हा प्रकार घडल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य बालाजी पिंपळे यांनी सांगितले.




प्रतिक्रिया

13/07/2021 रोजी घेतलेल्या ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी सकाळी 10 वाजता विद्यापीठाने दिलेल्या लिंक वर लिंक ओपन करत असता लिंक ओपन होत नव्हती आणि लॉगिन करत असताना बाहेर फेकल्या जात असल्याच्या तांत्रिक अडचणी चा सामना करावा लागत होता त्यामुळे बऱ्याच विध्यार्थ्यांना परिक्षा देता आलेली नाही.पदवीच्या तृतीय वर्षाच्या परिक्षेचे पेपर ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाईन पद्धतीने घ्यावे असे कालच्या परिक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे लेखी मागणी केली आहे.परिक्षा ऑफलाईन घेतल्या तर विध्यार्थ्यांना सदर अडचणीचा सामना करावा लागणार नाही आणि पेपर चांगल्या पद्धतीने देता येतील.

महेश चिखले

तृतीय वर्ष (BSC),शंकर नगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट