नागपूर,दि २६ ऑक्टोबर २०२१ : दरवर्षी दक्षता जनजागृती आयोजन करण्यात येते यावर्षी दिनांक २६ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत जनजागृती सप्ताह साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमीत्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रातील सर्व घटकातर्गत "स्वतंत्र भारत @ ७५ सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे" या संकल्पनेने राज्यात कोविड १९ चा प्रादुर्भाव असल्याने शासनाव्दारे निश्चित केलेल्या कोविड नियमांचे पालन करून विविध कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहेत.
शासनाचे निर्देशानुसार सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयामध्ये "भ्रष्टाचार निर्मुलन शपथ" घेवून दक्षता जनजागृती सप्ताहानी सुरवात करण्यात येते. त्यानुसार आज दिनांक २६/१०/२०२९ रोजी सकाळी ११.०० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय नागपूर येथे तसेच लाप्रविच्या सर्व घटक कार्यालयात शपथ घेवून दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरवात करण्यात आली.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय व वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोदिया व गडचिरोली या घटक कार्यालयामार्फत शहरी व ग्रामीण परिसरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये, प्रशासकीय परिसर इत्यादी ठिकाणी भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत पोस्टर्स / पॅनर्स तसे कार्यक्रम घेवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच सर्व प्रसारमाध्यमांद्वारे समाज माध्यमांद्वारे भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात "लाच घेणे अथवा लाच देणे गुन्हा आहे" असे नमुद करून त्यावर प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाचा पत्ता, फोन नंबर नमुद असलेले फलक/ पोस्टर्स लावण्याबाबत सर्व घटक कार्यालयांना आवश्यक सुचना देण्यात आलेल्या आहेत. भ्रष्टाचार निर्मुलनाच्या कामात तसेच दक्षता जनजागृती सप्ताहामध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग होण्याकरीता तसेच नागरिकांमध्ये जनजागृती होण्यकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवाविरुध्द(अधिकारी / कर्मचारी) काही तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय येथे श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक, श्री मिलींद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक यांचे उपस्थितीत शपथ कार्यक्रम घेण्यात आला असुन त्याकरीता कार्यालयातील सर्व अधिकारी व अमलदार उपस्थित होते.
कार्यालयाचा पत्ता : पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, नागपूर नागपूर दुसरा माळा, प्रशासकीय इमारत क. १,सिव्हील लाईन्स, नागपूर
दुरध्वनी क्रमांक ०७१२२५६१५२०
टोल फ्री क्रमांक १०६४
संबंधित बातम्या
‘स्वतंत्र भारत @ 75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ ! भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन