🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

रविवार, फेब्रुवारी २१, २०२१

शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

 

शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

पुणे (दि.१९ फेब्रुवारी) : जय भवानी, जय शिवाजी’ किंवा ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणा  ऐकल्यावर अंगात वीरश्री न संचारणारा महाराष्ट्रीयन विरळाच!  छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत.  देव, देश अन् धर्मासाठी त्यांनी सर्व  जाती- धर्माच्‍या ‘मावळ्यांना’ बरोबर  घेऊन गाजवलेला  पराक्रम आजही  प्रेरणादायी आहे. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर शिवजयंती साधेपणाने परंतु उत्‍साहात साजरी झाली.

पुणे जिल्‍ह्याच्‍या जुन्‍नर तालुक्‍यातील शिवनेरी हे शिवरायांचं जन्मस्थळ. 19 फेब्रुवारी, 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवबानं पुढं हिंदवी स्वराज्य  स्थापन करुन सर्वसामान्य  जनतेला  दिलासा  दिला.  छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची  आठवण राहावी, नव्या पिढीला त्यापासून स्‍फूर्ती मिळावी  यासाठी  दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवनेरी  किल्ल्यावर  शिवजन्मसोहळा  साजरा  होत  असतो.   शिवजयंतीनिमित्त  शिवनेरी  किल्ल्यावर  जाऊन शिवाई देवीचं  आणि  शिवजन्मस्थळाचं दर्शन  घेणं  ही  एक आनंददायी, अविस्‍मरणीय  घटनाच असते!

महाराष्ट्र हा गड-किल्ल्यांचा प्रदेश! छत्रपती शिवरायांच्या  पदस्पर्शानं पावन  झालेल्या  या  किल्ल्यांना  भेटी देणं आणि इतिहासात रमणं हा वेगळाच अनुभव असतो. पुण्‍याला जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून आल्‍यानंतर सन 2006 पासून सन 2010 पर्यंत आणि त्‍यानंतर 2018 पासून 2021 पर्यंत  शिवजयंतीनिमित्त दरवर्षी  शिवनेरी  किल्ल्यावर  शिवरायांना  मानाचा  मुजरा  करण्याची संधी  मी  सोडलेली नाही. तसं म्हटलं तर शिवनेरी किल्ला व परिसर विकास बैठकीच्या निमित्तानं या किल्ल्याला भेट देण्याचा नेहमी योग येतो.

शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थळास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दरवर्षी अभिवादन करण्यास येतात. यंदाही  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे, उपमुख्‍यमंत्री तथा  पुणे जिल्ह्याचे  पालकमंत्री  अजित पवार हे  येणार  असल्यानं वृत्तांकन आणि चित्रीकरणासाठी जाणं आवश्यक होतं.

पुण्यापासून शिवनेरीचं अंतर साधारण 80 कि.मी. आहे. शिवजन्मसोहळा सकाळी 9 च्या सुमारास  होतो.  पायथ्यापासून शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थळापर्यंत जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध  नाही, त्यामुळं पायी चालण्याशिवाय पर्याय नसतो.  या सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही पुण्याहून  19 फेब्रुवारीस  पहाटे अडीचच्‍या सुमारास निघालो. नारायणगावजवळ चहा-नाश्‍ता केल्‍यावर जुन्‍नरला सहा वाजेच्‍या दरम्‍यान पोहोचलो. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर गडावर गर्दी होऊ नये यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍यात आली होती. शिवनेरी  परिसरात  कोणताही  अनुचित  प्रकार  घडू  नये  यासाठी  ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

शिवनेरीच्या पायथ्यापर्यंत शासकीय वाहनानं गेल्यानंतर तिथून पुढचा प्रवास पायी करावा  लागणार होता. त्यामुळं मी, माहिती सहायक गणेश फुंदे, कॅमेरामन संजय गायकवाड, संतोष मोरे, छायाचित्रकार चंद्रकांत खंडागळे, विशाल कार्लेकर, सुनील झुंजार असा आमचा लवाजमा निघाला!

शिवाई देवी मंदिरातील देवीचं भजन, शिवरायांचा पोवाडा लाऊडस्पीकरमुळं संपूर्ण परिसरात ऐकू येत होता. पोवाड्यामुळं एक वेगळाच उत्साह जाणवत होता.  वरपर्यंत तयार करण्यात आलेल्या  पायऱ्यांवरुन आम्ही  गडाकडं  कूच केलं. महादरवाजा, गणेश दरवाजा, पिराचा दरवाजा, पालखी दरवाजा,  हत्ती दरवाजा,  मेणा दरवाजा,  कुलूप दरवाजा  असे दरवाजे  पार करत असताना  आजूबाजूस लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडं लक्ष वेधून घेत होती. जुन्नर वन विभागानं  या किल्ल्यावर  जांभूळ,  साग,  काटेसावर,  निलमोहर,  कडूलिंब, गुलमोहर,  करंज, पायर, बांबू, वड,  चिंच,  खैर,  वरस,  ग्लिरिसिडीया, पळस, चाफा, जास्वंद, बिट्टी अशी अनेक झाडं लावून परिसर शोभीवंत केलेला आहे.  या  झाडावरील वेगवेगळ्या पक्षांच्या आवाजानं वातावरण आणखीनच भारावून गेलं होतं. प्रत्येक  दरवाजावरील  फुलांच्या माळा, सजावट किल्ल्याच्या सौंदर्यात भरच घालत होती.  ठराविक अंतरावरील सौरदिवे, कचरा कुंडी, पाने, फुले, फळे न तोडण्याचे आवाहन आणि त्यानुसार किल्ल्याचं  पावित्र्य राखण्याचा मनोदय आपोआप होत होता.

सकाळी साधारण 7.30 च्या सुमारास आम्ही शिवाई देवी मंदिरात पोहोचलो.  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अभिषेक आणि महापूजा केली. त्यानंतर शिवजन्मस्थळी आलो.  सकाळी  8.30  वाजता शिवाईदेवी  मंदिर  ते छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळापर्यंत  पालखी मिरवणूक काढण्यात  आली. सकाळी पावणेनऊच्‍या सुमारास उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे  पालकमंत्री अजित पवार यांचं किल्ल्यावर उभारण्यात  आलेल्या हेलिपॅडवर हेलिकॉप्‍टरनं आगमन झालं. त्‍यानंतर मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्‍य ठाकरे यांचंही हेलिकॉप्टरनं आगमन झालं. शिवजन्मस्‍थळी पारंपरिक पध्दतीनं शिवजन्मसोहळयात सहभागी झाल्यानंतर पोलिसांच्या वतीनं हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून  मानवंदना देण्यात आली.

त्‍यानंतर तेजुर ठाकरवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्‍यांनी, वघगाळदरे येथील जय हनुमान लेझीम मंडळाने गोफ नृत्‍याची प्रात्‍यक्षिकं सादर केली. त्‍यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांनी शिवकुंज इमारतीतील  जिजाऊ आणि बालशिवबाच्या  पुतळ्यास अभिवादन केले.

उपस्थित शिवप्रेमींना संबोधित करतांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्‍हणाले, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अखंड स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते.  सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढताना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खा. छत्रपती संभाजीराजे, खा. डॉ.अमोल कोल्हे, आ.अतुल बेनके, आ. विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, जुन्‍नरचे नगराध्‍यक्ष शाम पांडे, उपनगराध्‍यक्ष दीपेश परदेशी, विभागीय आयुक्त सौरभ राव,  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, प्रांताधिकारी  सारंग कोडोलकर, तहसिलदार हनुमंत कोळेकर यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे, हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. मनात, ह्रदयात  शिवरायांचे  स्थान आहे. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे. छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका, असा सल्ला त्यांनी दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या  भूमीत जन्माला आले आणि त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावात महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत, हे या भूमीचं, आपल्या सर्वांचं भाग्य आहे.  कोरोना नियमांचं पालन करुन शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घरा-घरात, मना-मनात साजरा होऊदे, असे  आवाहन त्यांनी केले.

शिवजयंती उत्‍सवानिमित्‍त छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्‍कार प्रशासकीय अधिकारी संकेत भोंडवे यांना तर तालुकास्‍तरीय शिवनेरी भूषण पुरस्‍कार सर्पदंश उपचारतज्ञ डॉ. सदानंद राऊत यांना प्रदान करण्‍यात आला. फ्रेरिया इंडिका डालझेल उर्फ शिवसुमन या वनस्पतीची सर्वप्रथम शास्त्रीय नोंद ही डालझेल नावाच्या शास्त्रज्ञाने शिवनेरी गडावरून केली. या वनस्‍पतीच्‍या संवर्धनासाठी भारतीय टपाल विभागाने काढलेल्‍या विशेष लिफाफ्याचे प्रकाशनही प्रमुख पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते झाले.

साधारण 11.30 च्या सुमारास मुख्य शिवजन्मसोहळा संपन्न झाला. आम्ही सर्वांनी युगप्रवर्तक  छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य प्रेमाची  ज्योत हृदयात सतत तेवत ठेवण्याची शपथ घेतली. याचवेळी गडावर चिंचेचे रोप लावून वृक्षारोपण उपक्रमात सहभाग घेतला. या ठिकाणी ठिबक सिंचनाची सोय केलेली  असल्‍यानं रोप जगण्‍याची खात्री आहे. शिवजन्‍मसोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवल्यावर आम्‍ही गड उतरायला सुरूवात केली!

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे


👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

१७ दिवसांपूर्वी चोरी गेलेली गडगा येथील एटीएम मशीन गावातील युवकास सापडली


                  पोलीसांना काही काम उरलेच नाही

गडगा,(दि. २१ फेब्रुवारी) :नायगाव तालुक्यातील गडगा बसथांबा परीसरातून १७ दिवसापूर्वी चोरी गेलेली एटीएम मशीन गडगा-कहाळा रस्त्यावरील गडग्यानजीक पुलात १९ फेब्रुवारी रोजी सापडली. एका युवकाच्या निदर्शनास ही वस्तू आल्यानंतर त्यांनी ही माहिती संबधितांना दिली. त्यानंतर नायगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सदरील मशीन ग्रामस्थांच्या समक्ष इनकँमेरा फोडण्याची कार्यवाही सायंकाळी सहा त सात यावेळेत केली असता सदरील मशीनमध्ये ३ लाख ९१ हजार १०० रूपये रक्कम आढळली.

गडगा बसथांबा परीसरातील बालाजीराव धोंडीबा एकाळे यांच्या जागेत टाटा इंडीकँश कंपनीचे एटीएम आहे. दरम्यान,दि.३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून ते दि.४ फेब्रुवारीच्या पहाटे पाच यावेळेच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन तोडफोड करुन पळविली होती.चोरीच्या घटनेची माहिती जागामालक एकाळे यांनी नायगाव पोलीसांना दिली त्यानंतर घटनास्थळी नांदेडहून श्वानपथक,ठसेतज्ञाचे पथकाने पाहणी केली होती. पंरतु याप्रकरणी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चोरीची तक्रार देण्यासाठी विलंब केला.दरम्यान,१९ फेब्रुवारी रोजी गडग्याच्या नजीक असलेल्या पुलात दुपारच्या वेळी गडगा येथील संतोष बालाजीराव खुजडे या युवकाच्या निदर्शनास लोखंडी पेटीसारखी वस्तू दिसून आली. त्यांनी ही बाब बालाजीराव एकाळे यांना सांगितली. त्यांनी लगेचच नायगाव पोलीसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रमाकांत पडवळ,पोहेकाँ वळगे,एएसआय आनंद वाघमारे हे पोलीस ताफा घेवून दाखल झाले.एका जेसीबीच्या साह्याने एटीएम मशीन उचलून ती एकाळे यांच्या दुकानासमोर सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत ग्रामस्थांच्या समक्ष इनकँमेरा फोडण्याची कार्यवाही केली असता, मशीनच्या तिजोरीत ३ लक्ष ९१ हजार १०० रूपये एवढी रक्कम आढळून आली. कंपनीच्या तक्रार बँलन्सीट मध्ये देखील तेवढ्याच रक्कमेची नोंद असल्याचे दिसून आले.सदरील प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून रक्कम ताब्यात घेतली आहे.ही कार्यवाही चालू असताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. ती पांगवताना पोलीसांच्या नाकीनऊ येत होते. मशीनसह रक्कम मिळाली पण चोरटे कोण होते?याचा तपास लावण्याचे आव्हान पोलीसांसमोर कायम आहे.

👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

मध्य प्रदेशच्या मुलीचे महाराष्ट्राच्या मुलासोबत झाले फेसबुक प्रेम-पोलीस स्टेशन मधीच जमली सोयरीक,पोलिस निरीक्षका वसुंधरा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला विवाह संपन्न


अनोखा प्रेम विवाह

सहा महीने चॅटिंग,व्हिडीओ कॉल होते सुरु 

गंगाखेड,(दि.२० फेब्रुवारी) :- प्रेम आंधळं असतं प्रेमाला भाषा सीमा यांच बंधन नसते हे अधोरेखित करणारी घटना गंगाखेड पोलीस ठाण्यात घडली.मुलगी यामीण लक्ष्मण सोनवने रा. मध्य प्रदेश आणि मुलगा अर्जुन माधव शिंदे रा गंगाखेड महाराष्ट्र यांचे फेसबुक वर ओळख आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात मागील सात आठ महीन्या पुर्वी झाले.मुलगी मध्ये प्रदेश मधून नागपूरला आली आणि मुलगा गंगाखेड मधून नागपुरला मुलीला भेटायला गेला भेट झाली. आणि नागपूर येथून मुलीला घेऊन गंगाखेड येथे आले. अचानक एक जोडपं ठाण्यात येतं आणी आम्हाला लग्न करायचं आहे आमच लग्न लावुन द्या म्हणतं पोलीस ठाण्यात . त्यांना पोलीस चौकशी करतात तुम्ही कुठले आणी कुठून आलात कुटुंबातुन कोणी सोबत आहे का.कोणासोबत पळुन आलस की आणलय याची चौकशी केली असता मुलगी मध्यप्रदेश मधील बर्‍हानपुर जिल्ह्य़ातील नेपानगरची असल्याचे कळताच पोलीसांनी बर्‍हानपुर पोलीसाना यामीनी या नावाची मुलीची मिसिंग आहे का याची चौकशी केली असता नेपानगर येथून मुलगी दुकानात जाते म्हणून घरातुन निघुन गेल्याची तक्रार दाखल असल्याचे कळताच गंगाखेड पोलीसांनी मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना गंगाखेड येथे बोलावुन घेतले. कुटुंबीयांनी मुलीला परत घरी नेण्यासाठी विनवनी केली पण आपल्या प्रेमाला सोडुन मी आता कुठेही जाणार नाही मला जबरदस्तीने पाठवले तर मी आत्महत्या करीन असी धमकी दिल्याने अखेर या जोडप्याला लग्नाच्या बेड्या ठोकण्याचा निर्णय पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी घेतला आणी सुरु झाली लग्नाची तयारी.

यामीनी लक्ष्मन सोनवने वय २० वर्ष नेपा नगर जिल्हा बह्रानपुर राज्य मध्येप्रदेश व अर्जुन माधव शिंदे वय २४ वर्षे राहणार मन्नाथ नगर गंगाखेड, ता.गंगाखेड जि.परभणी महाराष्ट्र यांचे लग्न शहरातील चिंतामणी मंदिरात ए. पी. आय. कोकाटे, बीटजमादार रंगनाथ देवकर, मेजर पो. का. सुग्रीव सावंत, पत्रकार भिमराव कांबळे, पत्रकार शिवाजी कांबळे, व मुलाचे मित्र आई वडील यांच्या उपस्थितीत लावुन तालुका संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत पुढील काही काळ या जोडप्यावर देखरेख असणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यानी दिली.

सोशल मिडीयामुळे अख्खे जग माणसाच्या मुठीत सामावले आहे.

एकंदरीत काय तर प्रेमाला वय. भाषा. प्रांत जात याचे बंधन नसते हेच खरे.


👇लग्नाचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लग्न प्रसंगाचे व्हिडिओ

👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com




क्या बात हैं? : दोन वर्गमित्र एक उपजिल्हाधिकारी, दुसरा गटविकास अधिकारी;दोघेही लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात,एकाची ट्रॅप झाल्यावर दुसरा भेटायला गेला-दुस-या दिवशी स्वतः ट्रॅप झाला

 वर्गमित्र असलेल्या बिडीओची ट्रॅप झाल्यावर  उप जिल्हाधिकारी भेटायला जातो,दुस-या दिवशी स्वतःच अडकतो-कसला हा पैशाचा मोह?

दोन वर्गमित्र एक बिडीओ तर दुसरा उप जिल्हाधिकारी

बीड : वर्गमित्र असलेले दोन प्रशासकीय अधिकारी लाच स्वीकारताना दोन दिवसात एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. श्रीकांत गायकवाड आणि नारायण मिसाळ अशी या दोन लाचखोर अधिकाऱ्यांची नावं आहेत. श्रीकांत गायकवाड हे बीडच्या माजलगावचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तर नारायण मिसाळ हे पाटोदा पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.

श्रीकांत गायकवाड यांना 65 हजारांची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. माजलगावच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आपल्या चालकामार्फत त्यांनी ही लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. एक दिवस आधी त्यांचे वर्गमत्र असलेले पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांना देखील लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

विशेष म्हणजे मिसाळ यांना भेटण्यासाठी गायकवाड हे एसीबीच्या कार्यालयात गेले होते. त्यानंतर तेथून थेट माजलगावला गेले आणि माजलगावमध्ये आपल्या चालकामार्फत लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना देखील अटक केली आहे. गायकवाड आणि मिसाळ हे दोघेही वर्गमित्र असून आता दोघेही एसीबीच्या ताब्यात आहेत. सलग दोन दिवस झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.

विशेष म्हणजे शासकीय विश्रामगृहाचा उपयोग लाच घेण्यासाठी करण्यात आला,हे चूकिचे आहे.ही गंभीर बाब आहे

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक-1064

👇 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वेबसाईट/संकेतस्थळ

www.acbmaharashtra.gov.in

👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation

http://saptarangcreation.com/radio-stations/

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

Popular posts लोकप्रिय पोस्ट