पोस्ट्स

Crime लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या लाचखोर नाईकाच्या एसीबीने आवळल्या मुसक्या; १ लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक!

इमेज
  संजय पाटील चिखले जळगाव,१३/०४/२०२६: जळगाव पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या एका भ्रष्ट कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला असून, एका तक्रारी अर्जात सवलत देण्यासाठी चक्क २ लाखांची लाच मागणाऱ्या पोलीस नाईकाचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ' करेक्ट कार्यक्रम ' केला आहे. शनिपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे याला १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​ नेमकी घटना आणि तक्रार: ​मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मूळ तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी आहेत. त्यांच्या मुलाविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशन येथे एक तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जाची चौकशी आरोपी लोकसेवक पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे (बक्कल नं. ४०) याच्याकडे सोपवण्यात आली होती. ​या अर्जात तक्रारदाराच्या मुलावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आणि सदर अर्ज निकाली काढून (निर्गती) देण्यासाठी अहिरे याने २,००,००० (दोन लाख) रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १३ एप्रिल २०२६ रोजी...

भ्रष्टाचार रोखण्यासाठी २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान ‘दक्षता जनजागृती सप्ताह’

इमेज
लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार  संपादक -संजय चिखले मरवाळीकर  मुंबई, दि. २५: भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृती उपक्रम राबविले जातात. भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी नागरिकांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने जाहीर केल्यानुसार 28 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाकरीता यावर्षी सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृद्धी ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. सप्ताहाचा प्रारंभ येत्या 28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाच्या प्रतिज्ञेने होणार आहे. कुणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना, भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, 91, सर पोचखानवाला मार्ग, वरळी मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1064, दूरध्वनी क्रमांक 022-24921212, अथवा संकेतस्थळ https://acbmaharashtra.gov.in/ , ईमेल acbwebmail@mahapolice.gov.in, addlcpacbmumbai@mahapolice.in, फेसबुक www.facebook....