🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शनिवार, मार्च २०, २०२१

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीपात्र परिसरात आजपासून कलम 144 लागू

  या अगोदर अनेकदा कलम 144 लावण्यात आले होते

27 नोव्हेंबर ते 26 ऑक्टोबर 2019,20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2020,28 डिसेंबर ते 19 जानेवारी 2021 आता 20 मार्च ते 19 एप्रिल 2021

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड किंवा पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही

नांदेड, दि. 19 मार्च :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शनिवार 20 मार्च 2021 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत. 

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरी नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 मार्च 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 एप्रिल 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड किंवा पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

nanded.gov.in

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 22 मार्चला सोमवारी बैठक, नागरिकांनी तक्रारी देण्याचे समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांचे आवाहन

नमुना दाखल फोटो

नांदेड, दि. 19 मार्च :- जिल्ह्यातील शासनाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये चालू असलेल्या किंवा आजपर्यंत केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणाची काही तक्रार असल्यास अथवा एखाद्या कार्यालयामध्ये होत असलेल्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी स्वरुपात तक्रार सोमवार 22 मार्च 2021 रोजी आयोजित जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीत सादर करावी, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात सोमवार 22 मार्च 2021 रोजी दुपारी 3.30 वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत तक्रारीचे निवेदन लेखी स्वरुपात प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावे लागेल. हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नांदेड या नावाने सबळ पुराव्यासह दोन प्रतीत सादर करावे लागेल.

या बैठकीसाठी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे आपल्या निवेदनाची तातडीने दखल घेवून शासनाच्या नियमानुसार भ्रष्टाचार करणाऱ्या अथवा भ्रष्टाचारास वाव देणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहनही जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीतर्फे करण्यात आले आहे.

#tag : जिल्हा स्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती बैठक

भ्रष्टाचार निर्मूलन समिती व पथका बाबत सर्व समावेशक आदेश

nanded.gov.in

www.zpnanded.in

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

जिल्हाधिकारी विपीन इटनकर देगलूरकडे जाताना नायगावला भेट,कोरोना प्रतिबंधक पथकाचे कार्य पाहून व्यक्त केले समाधान


नायगाव : जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी आज दि १९ मार्च रोजी सकाळी ११-०० वाजता देगलूर जात असताना अचानक नायगाव येथील अत्यंत वर्दळीचा असलेल्यां डॉ. हेडगेवार चौकात आपले वाहन थांबवून कोरोना प्रतिबंधक उपाय योजना बाबद नागरिकांशी विचारपूस केली. विचार पूस करताना नागरिकांनी दिलेली उत्तरे एकूण समाधान व्यक्त केले. 

   जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनीनायगावातील काही व्यापारी प्रतीस्थाने व उपहार गृहना भेट देऊन पाहणी केली कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता नायगाव शहरात प्रतिबंधात्मक उपाय योजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. विनामास्क रस्त्यावर फिरणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करीत बेजबाबदार पणे फिरणाऱ्या लोकांकडून 14 हजार 900 रु दंड वसूल करण्यात आला आहे.

    जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे शहरातील उपहारगृहे, मंगल कार्यालये,कोचिंग क्लासेस, सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे बंद करण्यात आले आहे. यापूर्वी महसूल, नगर पंचायत, पोलीस यांनी संयुक्त पणे शहरातील विविध चौकात आणि शहरातील वर्दळीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीनां व वाहनधारकाना दंड आकारून ,कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधक उपाय योजनानची प्रभावीपणे राबवून जनतेत जागृती निर्माण केलेली आहे. त्यामुळे आज दि१९ मार्च रोजी विनामास्क,व उपहारगृह चालकांकडून कोरोना महामारीच्या कायध्यांचे उलघन केल्याने १४९००रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.अशी माहिती नायगाव नगर पंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी नंदकुमार भोसीकर यांनी दिली.

 जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शहरातील सर्व नागरिकांनी तोंडाला मास्क घालूनच घरा बाहेर पडलेले पाहून समाधान व्यक्त केले आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे,तहसीलदार गजानन शिंदे, पोलीस निरीक्षक रमाकांत पडवळ ,प्रशासक तथा मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर , रामेश्वर बापुलें सह नगर पंचायतीचे कोरोना प्रतिबंधक पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

पीएम रिपोर्ट व पंचनामा प्रत देण्यासाठी लाचखोर पोलीस नाईक ला(क्लास थर्ड) १० हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून घेतले ताब्यात


प्रेसनोट

दि.१७/०३/ २०२१

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/घटक : नाशिक/अहमदनगर
  2. गुन्हा नोंद क्रमांक : नेवासा पो.स्टे., जि.अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  3. कलम : लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ संशोधन) सन २०१८ चे कलम ७,
  4. आरोपीचे नांव व कार्यालय : सोमनाथ अशोक कुंढारे, वय-३३ वर्षे, पोलीस नाईक, वर्ग-३, नेमणुक- नेवासा पोलीस स्टेशन, ता.नेवासा, जि.अहमदनगर
  5. मागणी केलेल्या लाचेची रक्कम : रुपये १५,०००/- तडजोडीअंती रुपये १०,०००/-
  6. स्विकारलेली लाचेची रक्कम : रुपये १०.०००/-

 थोडक्यात माहिती : प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की, तक्रारदार यांचे नातेवाईक मोटर अपघातात मयत झाले होते, त्याबाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या मयत व्यक्तीच्या बाबतचे पीएम रिपोर्ट व पंचनामा प्रत मिळणेच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक सोमनाथ अशोक कुंढारे, वय-३३ वर्षे, पोलीस नाईक, वर्ग-३, नेमणुक- नेवासा पोलीस स्टेशन ता.नेवासा, जि.अहमदनगर यांनी तक्रारदार यांना दि. १६/०३/ २०२१ रोजी १५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन दि.१७/३/२०२१ रोजी पंचासमक्ष तडजोडअंती १०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन ती लाचेची रक्कम दि.१७/३/ २०२१ रोजी नेवासा पोलीस स्टेशन ता. नेवासा येथे पंच साक्षीदारासमक्ष तक्रदार यांच्याकडून स्वीकारली असता आरोपी लोकसेवक यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागण्या-या लोकसेवकाबल कार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क करावा.

संपर्क पत्ता : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकिय इमारत,टि.व्ही. सेंटरसमोर, सावेडी, अहमदनगर

संकेतस्थळ : www.acbmaharashtra.gov.in

ई-मेल : acbwebmail@mahapolice.gov.in

ऑनलाईन तक्रार अॅप्लीकेशन : www.acbmaharashtra.net

टोल फ्री क्रमांक : १०६४

दुरध्वनी क्रमांक : -०२४१-२४२३६७७

व्हॉटस अप क्रमक:-९९३०९९७७००

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

लाचखोर महिला राज्य कर अधिकारी(GST) ५,००० हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले

प्रेसनोट

दिनांक -१७/०३/२०२१

श्रीमती मिना गिरिश सांडये वय ५३ वर्षे, राज्य कर अधिकारी भाईदर विभाग, राहणार ए /५,१५५,जे.पी.नगर, विरार (प) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे (कॅम्प पालपर) यांनी घेतले ताब्यात

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : अँटी करप्शन ब्युरो ठाणे (कॅम्प पालघर),भाईंदर पोलीस ठाणे,मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय
  2. गुन्हा नोंद क्रमांक - स्टे.डा.नोंद क्रमांक २६/२०२१, वेळ १७:३७ वाजता दिनांक १७/०३/२०२१
  3. लोकसेवकाचे नाव व कार्यालय : श्रीमती मिना गिरिश सांडये वय ५३ वर्षे, राज्य कर अधिकारी भाईदर विभाग, राहणार ए/५, १५५. जे.पी.नगर, विरार (प) वर्ग-२
  4. मागितलेल्या लाचेची रक्कम - ५,०००/-रुपये,
  5. स्विकारलेली लाचेची रक्कम : ५,०००/-रुपये,

थोडक्यात हकिगत : यातील तक्रारदार हे व्यवसायाने वकील आहेत. श्री. राजन चौरसिया हे आर.सी.स्टील कंपनी, पेल्हार, नालासोपारा पुर्व या कंपनीचे मालक असून  तक्रारदार हे कंपनीचे सल्लागार आहेत.

आर.सी.स्टील कंपनी, पेल्हार, नालासोपारा, पूर्व या कंपनीचे सन २०१६-१७ या कालावधीच्या अँसेसमेंट ऑडर मिळणेकामी तक्रारदार यांनी वस्तु व सेवा कर विभाग, भाईंदर (प) येथील राज्य कर अधिकारी श्रीमती मिना जी. सांडये यांची दिनांक १०/०३/ २०२१ रोजी भेट घेतली असता, त्यांनी तक्रारदार यांचेकडे अँसेसमेंट ऑर्डर काढण्यासाठी ५०००/ रूपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार व कंपनीचे मालक श्री. राजन चौरसिया यांना श्रीमती सांडये यांनी मागणी केल्याप्रमाणे लाचेची रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने तक्रारदार यांनी दिनांक १७/०३/२०२१ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे कॅम्प पालघरकडे श्रीमती मिना सांडये, राज्य कर अधिकारी यांचे विरूध्द लेखी तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने दिनांक १७/०३/२०२१  रोजी तक्रारदार यांना आरोपी लोकसेविका यांचे कार्यालयात पंचासह पाठवून पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे कामाचे अनुपंगाने ५,०००/- रू. लाचेची मागणी केली. तसेच दिनांक १७/०३/२०२१ रोजी सापळापुर्व व सापळा पंचनाम्यात लोकसविका हिने सदर लाचेची रक्कम १६:३५ वा. च्या सुमारास वस्तु व सेवा कर विभाग, १ ला माळा, एम.टी.एन.एल. बिल्डींग, भाईदर प.. जि.ठाणे येथे त्यांचे कक्षात स्विकारली असता त्यांना अॅन्टी करण्शन ब्युरो, ठाणे, (कॅम्प पालघर) कार्यालयाचे सापळा पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाच्या लोकसेवकावद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे (कॅम्प पालघर) यांचेशी संपर्क करवा.

संपर्क पत्ता : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे (कॅम्प पालघर) पालघर प. ४०१ ४०४.

संकेतस्थळ : www.acbmaharashtra.gov.in

ई मेल : acbmaharashtra@mahapolice.gov.in

dypacbpalghar@gmail.com

ऑनलाईन तक्रार अॅप्लीकेशन : www.acbmaharashtra.net

टोल फ्री नं. : 1064

दुरध्वनी क्रमांक : 02525-297297

व्हॉट्स अप क. : 9552250404, 9923699430


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

Popular posts लोकप्रिय पोस्ट