🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, ऑगस्ट २६, २०२१

नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी नागेश पाटील कल्याण यांच्या निवडीचा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील कल्याण यांच्यासह बालाजी बोरवेलचे मालक राजीव पाटील व मुद्रांक विक्रते यशवंतराव पाटील यांच्या संयुक्तविद्यमाने सत्कार सोहळ्याचे आयोजन

 


नायगाव,दि २६ ऑगस्ट २०२१ : तालुका मराठी पत्रकार संघाच्या निवडीचा पदाधिकारी पत्रकार बांधवांचे नायगावच्या सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील कल्याण यांच्यासह बालाजी बोरवेलचे मालक राजीव पाटील व मुद्रांक विक्रते यशवंतराव पाटील यांच्या संयुक्तविद्यमाने नूतन नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या निवडीचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून संघटनेत पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडणारे व समाजसेवेचे काम करणाऱ्या भारतीय राज्यघटनेच्या चौथा स्तंभ असलेल्या सर्व पत्रकार बांधवाच्या सत्कार सोहळ्याचे नायगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या पटांगणात आयोजन करण्यात आले आहे.

तालुका मराठी पत्रकार संघाची निवड नुकतीच नायगाव येथील मिलिनियंम इंग्लिश स्कुल चे सभागृहात नायागांव तालुका मराठी पत्रकार संघांचे जेष्ठ पत्रकार विद्यमान बाळासाहेब पांडे, माजी अध्यक्ष माधव मामा कोकुर्ले, दैनिक सामनाचे तालुका प्रतिनिधी भूषणजी पारळकर साहेब, राजीव कुलकर्णी,एस.एम. मुदखेडकर साहेब, दैनिक गाववालाचे नायगाव तालुका प्रतिनिधी माधव चव्हाण, दैनिक प्रजावाणीचे पत्रकार विकास भुरे साहेब यांच्या नेत्रत्वाखाली मिलिनियंम इंग्लिश स्कुल येथे करण्यात आली होती या निवडी दरम्यान पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी नागेश पाटील कल्याण यांची निवड करण्यात आली, सदरच्या निवडीच्या अध्यक्षासह उपाध्यक्ष, आणि कार्यकरणीतील पत्रकार बांधवाचा भव्य सत्कार सोहळा दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी एक वाजता कारण्यात येणार आहे

नायगाव तालुका मराठी पत्रकार संघात काम करणाऱ्या विशाल पत्रकारानी नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या निवडीचा नायगावचे भूमीपुत्र सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील कल्याण यांच्यासह बालाजी बोरविलचे मालक राजीव पाटील व मुद्रांक विक्रते यशवंतराव पाटील यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित केलेल्या भव्य सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून सदरच्या आयोजकाचा सत्कार स्विकारावा असे आवाहन सेवा सहकारी सोसायटीचे विद्यामान चेअरमन प्रदीप पाटील कल्याण यांनी केले असून या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात मान्यवंराची उपस्थिती लाभणार असल्यामुळे सदरच्या कार्यक्रमाला पत्रकारानी उपस्थित राहावे असे आयोजकाने आवाहन केले आहे.

बरबडा येथे नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाची ३१ ऑगस्ट रोजी महत्व पूर्ण बैठक

 


नायगाव,दि २६ ऑगस्ट २०२१ : तालुक्यातील मौजे बरबडा येथे नायागांव तालुका मराठी पत्रकार संघाची मंगळवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ रोजी  सकाळी साडेअकरा  वाजता बैठकीचे आयोजन केंद्रीय प्राथमिक शाळा बरबडा येथील सभागृहात करण्यात आले आहे .तरी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन बरबड्यातील पत्रकार बांधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

   तालुक्यातील पत्रकार बांधव यांची ग्रामीण पत्रकार बांधवाशी नाळ बांधली जावी व ग्रामीण पत्रकारांच्या समस्यांचा उलगडा व्हावा या उद्देशाने बरबडा  या ठिकाणी  मराठी पत्रकार संघांचे विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांच्या मार्गदर्शना खाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून,  जेष्ठ पत्रकार माधव मामा कोकुर्ले,  भूषणजी पारळकर, एस एम मुदखेडकर , बालाजी नागठाणे, माधव चव्हाण, विठ्ठल अण्णा वडपत्रे, विकास भुरे, बी.आय.बडुरे सर,तालुका मराठी पत्रकार संघाचे नूतन विद्यमान अध्यक्ष नागेश पाटील कल्याण व सर्व पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती बैठकीस राहणार आहे


 बैठकीत पहिल्या सत्रात मान्यवरांचे नूतन पदाधिकारी यांचे स्वागत व ओळख पत्र वाटप करण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात संघटनात्मक बांधणी विषयी जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन होणार असून , ग्रामीण पत्रकारां समोरील आवाहने या विशेष विषयावर विशेष चर्चा करण्यात येणार आहे. शेवटच्या सत्रात समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.

    तरी या बैठकीला उपस्थित राहण्याचे, ता.उपाध्यक्ष गंगाधर ढवळे, बरबडा सर्कल प्रमुख चंद्रकांत सूर्यतळ,व सर्व पत्रकार बांधव बरबडा  यांच्या कडून आवाहन करण्यात आले आहे सर्व तालुक्यातील पत्रकार बांधवांनी वेळेवर उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक आहे.असे ता प्रसिद्धी प्रमुख संजय चिखले यांनी कळविले आहे.

'तहसीलदार मॅडमचा मनमानी कारभार’, पारनेर महसूल कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या!

 


अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. देवरे यांच्याविरोधात आता महसूल कर्मचारी आक्रमक झाले असून तालुक्यातील तलाठी आणि तहसील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. देवरे यांच्या दडपशाहीला कंटाळून हे आंदोलन सुरु केल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलंय.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या

विशेष म्हणजे यात महिला कर्मचारी देखील सहभागी झाल्या आहेत. तहसीलदार मॅडमच्या दडपशाहीला कंटाळून हे आंदोलन सुरु केल्याच कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. तर देवरे यांच्या बदलीची मागणी करत एक तर त्यांची बदली करा नाहीतर आमची बदली करा असा पवित्रा महसूल कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

तहसीलदार देवरे या कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याने कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरु केलंय. सकाळी 11 वाजेपासून कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केलंय. तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. तर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय.

लंके-तहसीलदार वादावर अण्णा हजारेंकडून भूमिका स्पष्ट

आमदार निलेश लंके आणि पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यातल्या वादावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाष्य केलं आहे. मला या दोघांच्याही भांडणात मध्ये पडायचं नाही पण तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो की आत्महत्येसारखा विचार बरा नाही, हा विचार डोक्यातून काढा, असा सल्ला त्यांनी तहसीलदार देवरे यांना दिला.

अहमदनगरमधील पारनेरच्या महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप महिला तहसीलदार यांनी केले होते.

नेमकं प्रकरण काय?

अहमदनगरमधील महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रासा दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप महिला तहसीलदार यांनी केले होते. त्यानंतर आमदार निलेश लंके यांनी “संबधित महिला तहसीलदार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. ज्यातून सुटण्यासाठी त्यांनी हा एक केविलवाना प्रयत्न केला आहे,” अशी प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले होते.

मंगळवार, ऑगस्ट २४, २०२१

RTI मुळे त्रस्त झालेल्या इंदापूर पंचायत समिती कर्मचाऱ्यांचं 23 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन

 

  • कामबंद आंदोलनाला गटविकास अधिकाऱ्यांचा पुढाकार

इंदापूर,दि २४ ऑगस्ट २०२१ : जोपर्यंत जनहिताऐवजी वैयक्तिक माहिती अधिकार वापरून इंदापूर पंचायत समिती कामकाजात अडथळा आणणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत इंदापूर पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या नेतृत्वाखाली दि. २३ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.

यामधून अत्यावश्यक सेवा, घरकुल आदींना वगळण्यात आले आहे मात्र या आंदोलनामुळे इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे असल्याने सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यामध्ये लक्षघालून जनतेसाठी कामबंद आंदोलन थांबवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी विजयकुमार परीट पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गेले काही दिवस पंचायत समितीच्या कामकाजात अडथळे निर्माण केले जात आहेत. वारंवार माहितीचा अधिकार, उपोषण याद्वारे तेच-तेच लोक कोणतेही जनहित नसताना त्रासदेण्याचे काम करत आहेत. त्यामध्ये काही सामाजिक संघटना व माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांचा समावेश आहे. माहिती एकच मात्र ती विविध माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून मागवून मुद्दाम त्रास दिला जातो.

त्यामुळे चांगले काम करून देखील इंदापूर तालुक्याची बदनामी होत आहे. त्यामुळे आम्ही सर्वच कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत यांचा बंदोबस्त होत नाही,तोपर्यंत कामकाज बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे. तसेच जाणूनबुजून माहिती मागविणाऱ्या त्याच कार्यकर्त्यांविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे दाद मागणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकाराचे अस्त्र दिले मात्र त्याऐवजी कामे होण्याऐवजी त्याचा काही जणांनी व्यवसाय केला आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांच्या अधिकारावर गदा आणून त्यांना कायद्याच्या कक्षेत आणून माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यास शिक्षेस पात्र करावे अशी मागणी शासकीय कर्मचारी यांनी केली आहे.

आम्ही आमच्यासाठी' या संकल्पनेतून पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार पतपेढी उभारणार - म.प.सं.ता.अ.नागेश पा.कल्याण


नायगाव,दि. २४ ऑगस्ट २०२१ : पत्रकार आर्थिक सक्षम झाले पाहिजेत यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून सर्वांनी एकदिलाने एकजुटीने "आम्ही आमच्यासाठी"या विचार धारेवर काम करावं त्या माध्यमातून पत्रकारांसाठी आपण पत्रकार पतपेढी उभारू असे प्रखर मत मराठी पत्रकार संघाचे नूतन नायगाव तालुका अध्यक्ष नागेश पाटील कल्याण यांनी व्यक्त केले.

      पुढे बोलताना ते असे ही म्हणाले की, पत्रकारितेच्या माध्यमातून आपण पूर्णवेळ समाजसेवेचे काम करतो संपादकीय विभागा प्रमाणे आपणास कसलेही वेतन नसते. असे असताना देखील ही वर्तमानपत्राच्या ध्येय धोरणाप्रमाणे ग्रामीण भागातील समाजमनाचा आरसा जगा समोर आणण्यासाठी जीवाचा आटापिटा करून बातमी व वृत्त संकलन करीत असतो. यावेळी अनंत अडचणींचा सामना ही प्रसंगी आपनास करावा लागतो. यात आर्थिक अडचणीचा ही मोठा प्रश्न आपल्यासमोर नित्याचा असतो. ग्रामीण क्षेत्रात मिळकत तर नसतेच वरून ताण अधिक असतो. याकरिता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपले पत्रकारितेचे कार्य करीत आपली आर्थिक उन्नती कशी साधता येईल यासाठी "आम्ही आमच्यासाठी" या संकल्पनेतून कार्य करण्याची नितांत गरज आहे. कारण आपण एखाद्या गल्ली बोळातील नेत्याची बातमी लिहितो तो राष्ट्रीय नेता म्हणून उदयाला येतो. एखाद्या उद्योजकाची बातमी घेतो तेंव्हा तो शासनाकडून कोट्यवधींच्या सवलती पदरात पाडून घेतो. आणि एखाद्या अधिकाऱ्याची बातमी घेतली तर तो उच्च पदस्थ पदावर ही पोहचतो. पण आपली प्रश्न मात्र तशीच वर्धापन, दिवाळी, चार दोन हजाराची जाहिरात शे पाचश्याची मिळकत व वर्षभर त्या जाहिरातीच्या बदल्यात बातमी फुकट यामुळे कुठे मान न कुठे सन्मान ही शृंखला बंद करायची असेल तर आपण आपल्या पत्रकार संघाच्या माध्यमातून "आम्ही आमच्यासाठी" या संकल्पनेच्या माध्यमातून व्यापक अर्थाने व एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे. यासाठी या माध्यमातून ज्यांना जशी आर्थिक मदत करता येईल तशी त्यांनी करावी व सर्वांच्या सहकार्यातून जमणाऱ्या निधीतून पत्रकार पतपेढी स्थापन करून अडचणीत असणाऱ्या आपल्या भावंडाना अडचणीच्या वेळी व बचत गटांच्या निर्मितीच्या माध्यमातून लघु व कुटीर उद्योग व्यवसाय यासाठी ही मदत करता येईल. व बिकट परिस्थिती असणाऱ्या आपल्या बांधवांची आर्थिक स्थिती ही सुधारता येईल. यासाठी तालुक्यातील जेष्ठ वरिष्ठ व सहकारी सर्वच पत्रकार बांधवानी या कामासाठी एकजुटीने व एकदिलाने कार्य करावे. जेणेकरुन कोरोनाच्या संकटाने दोन पत्रकार बांधव आपण गमावलो पण इतरांसाठी घरच्या लेकरा बाळांना उपाशी ठेवून वेळ देणारे,अडचणीस मदत करणारे आपण असून ही, आपल्या सहकार्यांच्या कुटुंबियांना ही आपण काही मदत करू शकलो नाही.ही आपली शोकांतिका आहे. कारण एकच पत्रकारितेत काम करणाऱ्या सर्वांचीच परिस्थिती मजबूत आहे असे नाही. यामुळे आपण सर्वांनी आता आपल्यासाठी ही थोडे जगणे गरजेचे आहे. असे मला वाटते कारण आपल्या तालुक्यात आजघडीला सर्वच वर्तमानपत्रांची व न्यूज पोर्टल यूट्यूब चैनल या सर्वांची मिळून 70 च्यावर संख्या पत्रकार बांधवांची आहे. या सर्वांनी ठरवून कार्य केले तर हे कार्य ही कठीण नाही. असे ही ते म्हणाले.ते तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार संघाच्या संघटनात्मक बांधणी सहविचार तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.यावेळी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार यांची उपस्थिती होती.

शनिवार, ऑगस्ट २१, २०२१

लंकेत घरं किती होती त्यांची जशीच्या तशी संख्या सांगतो ऐका-संत तुकाराम महाराज

 


दिनांक : २१ / ०८ / २०२१

४८०. अभंग क्र. ३०८५


*लंकेमाजी घरे किती तीं आइका l सांगतसे संख्या जैसीतैसी ।।१।।* 

*पांच लक्ष घरें पाषाणांची जेथें l सात लक्ष तेथें विटेबंदी ।।धृ।।*

*कोटि घरें जेथें कांशा आणि तांब्याचीं l शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ।।२।।* 

*तुका म्हणे ज्याची संपदा एवढी l सांगाते कवडी गेलीं नाहीं l।३।।*


लंकेत घरं किती होती त्यांची जशीच्या तशी संख्या सांगतो ऐका. तिथे पाषाणाची म्हणजे दगडाची पाच लक्ष घरं होती. तर विटांची सात लक्ष घरं होती. कास्याची आणि तांब्याची कोटी घरं होती तर शुद्ध सोन्याची सात कोटी घरं होती. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची एवढी संपदा होती त्याच्यासोबत एक कवडीही गेली नाही. 

धनधान्य, पशु, जमीन, इमलेमाड्या, सोनं-रूपं, हिरे, माणिकमोती, यावरून माणसाची श्रीमंती मोजली जाते. धन हे फार महत्वाच असतं. निर्धनाला जगात कोणी विचारत नाही. निर्धनाला जगात मानही मिळत नाही. सन्मानही मिळत नाही. म्हणूनच एक कवी म्हणतो, *“दारिद्र्य मरण यातून मरण बरे बा दरिद्रता खोटी l मरणात दु:ख थोडे दारिद्रयात व्यथा असे मोठी ll”* मरण एकदाच येतं. पण दरिद्री माणूस रोज कणाकणाने मरत असतो. स्वाभिमानी माणसाला कोणाची लाचारी करणं, कोणाकडे हात पसरणं मरणप्राय यातना देणारं असतं. एका शायराने म्हटलं आहे, *“किसी को कैसें बताएँ जरुरतें अपनी l मदद मिले न मिले आबरू तो जाती हैं ll” असं करणं म्हणजे रोज मरणं असतं. पण पोटासाठी माणसाला लाचारी पत्करावी लागते. स्वाभिमानीपणाला उर्दूत खुद्दारी म्हणतात. अमीर मीनाई नावाचा एक शायर आपल्या खुद्दारीचं वर्णन करताना लिहितो,  *“किसी रईस की महफिल का जिक्र ही क्या ही l खुदा के घर भी न जायेंगे बिन बुलाए हुए ll”* 

      काय जबरदस्त स्वाभिमान आहे? श्रीमंताच्या मेहफिल मध्ये काय पण देवाघरीही बोलावल्याशिवाय जाणार नाही असं शायर म्हणतो. खरा स्वाभिमानी जो असतो तो दुसऱ्याचाही स्वाभिमान कसा जपतो ते सांगताना जावेद अख्तर लिहितात, *“मुझे दुश्मन से भी खुद्दारी की उम्मीद रहती हैं l किसी का भी हो सर कदमों में सर अच्छा नहीं लगता ll”* या सर्वावर कडी केली ती फानी बदायुनी यांनी. ते लिहितात, *“दुनिया मेरी बला जाणे महँगी हैं या सस्ती हैं l मौत मिले तो मुफ्त न लूँ हस्ती की क्या हस्ती हैं ll”*

 स्वस्त असो वा महाग असो, मरणही मी फुकट घेणार नाही. तर कैफ म्हणतात, *“जिस दिन मिरी जबीं किसी दहलीज‌‍‌ पर झुके l उस दिन खुदा शिगाफ मिरे सर में डाल दे ll”* जबीं म्हणजे माथा, तर शिगाफ या फारसी शब्दाचा अर्थ आहे, दरार, म्हणजे अंतर! ज्या दिवशी मी दुसऱ्या कोणाच्या पुढे माझं मस्तक झुकविल त्याचक्षणी माझ्या डोक्यात दरार पडू दे म्हणजे माझं मस्तक फुटू दे. हे सर्व शायर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जातीचे आहेत. यांचे शेर वाचताना तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या ओळी सहज आठवतात. *“फुटो हे मस्तक तुटो हे शरीर l नामाचा गजर सोडू नये ll”* किंवा *“जरी माझी कोणी कापितील मान l तरी आन नको वदू जिव्हें ll”* तुकाराम महाराजांनी पिढीजात सावकारीला तिलांजली दिली, त्यांनी जे दुष्काळात धान्य वाटून टाकलं. नामदेव महाराजांनीही कुटुंबाच्या पिढीजात व्यवसायाकडे पाठ फिरवली आणि समाज परिवर्तनाचं अफाट कार्य अंगावर घेतलं. त्यांच्या घराची दुरावस्था झाली. त्या दारीद्र्याला कंटाळून त्यांच्या पत्नीने दोन वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला. या दोघांच्या कुटुंबाची अवस्था अशी हलाखीची असतानाही शिवरायांनी पाठवलेलं धन तुकाराम महाराजांनी *“सोने आणि माती l आम्हां समान हे चित्ती ll”* असं म्हणून परत पाठवलं. तर नामदेव महाराजांनी कोण्या व्यापाऱ्याने पाठवलेलं गाडीभर धान्य गोरगरीबांत वाटून टाकलं. याला खुद्दारी म्हणतात. याला स्वाभिमान म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज आपल्या अभंगातून स्पष्ट शब्दात जाणीव करून देतात की, *“जंव मोठा चाले धंदा l तंव बहीण म्हणे दादा ll सदा शृंगारभूषणें l कांता लवे बहुमानें ll”* जोवर तुमचा धंदा व्यवस्थित चालू आहे तोवरच बहिण तुम्हाला दादा म्हणते. जोवर पत्नीला आभूषणे करता तोवरच ती सन्मानाने वागवते. जगाची रीतच अशी आहे. *“बरे जालियाचे अवघे सांगती l वाईटाचे अंती कोणी नाही ll नोहें मातापिता नोहें कांतासुत l इतरांची मात काय सांगो ll”* दारिद्र्य आल्यावर आईबापच किंव्हा बायकापोरंही साथ देत नाहीत तर इतरांच्या कथा काय सांगू असं तुकाराम महाराज म्हणतात. मानवी जीवनात चार पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पण ज्याने अर्थ हा पुरुषार्थ साधला त्यालाच उरलेले तीन पुरुषार्थ साध्य करता येतात. तुमच्याकडेच काही नसेल तर तुम्ही लोकांना देणार काय? भिकारी असेल तर त्याला काम म्हणजे जीवनाचा उपभोग तरी कसा घेता येणार? ज्याच्या कोणत्याच इच्छा, आकांक्षा तृप्त झालेल्या नाहीत त्याला मोक्ष तरी कसा मिळणार? महाभारत सांगतं, *“अर्थस्य पुरुषो दास: दासस्त्वर्थो न कस्यचित् l”* म्हणजे पुरुष अर्थाचा, संपत्तीचा दास आहे, अर्थ, संपत्ती कोणासी दासी नसते. म्हणूनच भर दरबारात द्रोपदीचं वस्त्रहरण होत असतांना भीष्म, द्रोण, कृप सर्व माना खाली घालून बसले. पण कोणीही उठून त्याला विरोध केला नाही. कौरवांची बाजू अन्यायाची आहे हे माहित असतांनाही  भीष्म, द्रोणादी कौरवांच्या बाजूने लढले कारण *"अर्थस्य पुरुषो दास:l”* तुकाराम महाराजांना तर हे माहितीच होतं. आणि म्हणूनच तुकाराम महाराज आपल्या अभंगातून निर्धन माणसाचे काय हाल होतात त्यांचं वर्णन करतात. आईबाप आणि बायकापोरंसुद्धा विचारत नाहीत, तर मग बाकी जगाचं काय? परक्याचं काय? असा प्रश्न तुकाराम महाराज विचारतात. धन मिळवलंच पाहिजे असं तुकाराम महाराज सांगतात. पण ते धन कसं मिळवायचं तेही सांगतात. *“जोडोनिया उत्तम वेव्हारें” हा मार्ग तुकाराम महाराज सांगतात. चोऱ्यामाऱ्या करून, लुटमार करून, दुसऱ्याला फसवून, लुबाडून, धन मिळवू नका, तर उत्तम व्यवहार करून, रास्त मार्गाने धन मिळवा आणि त्याचा योग्य  धनविनियोग करा. त्यातून दुसऱ्यालाही मदत करा. असं तुकाराम महाराज सांगतात. असं असताना मग या अभंगात तुकाराम महाराज पूर्ण यू टर्न कसा घेतात असा प्रश्न वरवर विचार करणाऱ्याला पडू शकतो. जवळ जवळ सर्व कीर्तनकार, प्रवचनकार हेच सांगतात की वर जाताना रिकाम्या हातानेच जावं लागतं. बंगला, गाडीघोडं, सोनंनाणं, हिरेमोती, पैसाअडका, जमीनजुमला सर्व इथेच ठेऊन जायचं आहे. काहीही सोबत न्यायचं नाही. *“मुठ्ठी बांध के आनेवाले हाथ पसारे जायेगा l इस नाचिज दुनियासे तुने क्या पाया क्या पायेगा l चढता सुरज धीरे धीरे ढलता हैं ढल जायेगा ll”* जन्माला येताना मुठ बांधलेली होती, पण मरताना हात पसरलेले असतात. लोक अंगावरचे कपडे आणि दागिनेही काढून घेतात. मग आयुष्यभर इतकी धडपड, पैशाच्या मागे पळणं, संपत्तीचा हव्यास धरणं, त्यासाठी ज्या नाही त्या उचापती करणं हे सर्व कशासाठी? लोकांचे तळतळाट घेणं कशासाठी? जगद्गुरू तुकाराम महाराजही या अभंगातून तेच सांगतात. मग तुकाराम महाराजांचं कोणतं म्हणणं खरं आणि कोणतं खोटं मानायचं? कोणतं योग्य आणि कोणतं अयोग्य मानायचं? याचं उत्तर हे आहे की तुकाराम महाराजांचं तेही म्हणणं बरोबर आहे आणि हेही म्हणणं बरोबर आहे. जर कुणाला या दोन मतात विसंगती दिसत असेल तर तो त्याच्या बुद्धीचा दोष आहे. तुकाराम महाराज कोणता अभंग कोणाला उद्देशून लिहितात ते समजलं नाही तर असा घोटाळा होऊ शकतो.

समजा डॉक्टरांकडे दोन पेशंट गेले. एक कुपोषित आहे. दुसरा अतिपोषित आहे. तर डॉक्टर दोघांना एकच सल्ला का? उघड आहे की जो कुपोषित असेल त्याला डॉक्टर पोटभर जेवण करण्याचा, उपासतापास करण्याचा, पौष्टिक अन्न खाण्याचा सल्ला देतील. त्याला विश्रांती घ्यायला सांगतील. कारण त्याच्या शरीराला त्याची गरज आहे. त्याच्या शरीराचं पोषण होणं गरजेचं आहे. जो अतिपोसलेला असेल त्याला डॉक्टर जेवण कमी करण्याचा सल्ला देतील. चिकन, मटन, चरबीयुक्त पदार्थ खायला प्रतिबंध करतील. त्याला व्यायाम करण्याचा सल्ला देतील. प्रत्येक रुग्णाची जशी गरज असेल तसा सल्ला डॉक्टर देतील. ज्याच्या हातातोंडाची गांठ पडत नाही. ज्याला पोटभर अन्न खायला मिळत नाही. ज्याला नियमित अन्नाचे फाके पडतात. त्याचा आजार वेगळा आहे. त्याला वेगळा सल्ला दिला जाईल. ज्याची चरबी उतू जात आहे, ज्याला आपले पाय दिसतच नाहीत, ज्याला स्वत:चा भारही पेलवत नाही, त्याला वेगळा सल्ला दिला जाईल. पण सल्ले परस्पर विरुद्ध असले तरी त्या दोन्ही सल्ल्याचं उद्धिष्ट एकच असेल. ते असेल रुग्ण बरा करणं. 

समाजात सर्व माणसं समान पातळीवर जगात नाहीत. कोणी अत्यंत गरीब असतो, तर कोणी अत्यंत श्रीमंत असतो. या अभंगात तुकाराम महाराजांनी जो उपदेश केला आहे तो श्रीमंतांसाठी, गर्भश्रीमंतांसाठी, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा, धन, संपत्ती असूनही ज्यांचा हव्यास अजून संपलेला नाही त्यांच्यासाठी केला आहे. आपल्या परंपरेत श्रीमंती म्हटली की एकतर कुबेर आठवतो वा दुसरा रावण आठवतो. रावणाची लंका सोन्याची होती असं म्हणतात. सोन्याची लंका मारुतीने पेटवली कशी हा एक प्रश्नच आहे. पण तो इथे बाजूला ठेऊ. तुकाराम महाराजांनी तर या अभंगात एक यादीच दिली आहे. तुकाराम महाराज सांगतात, *“लंकेमाजी घरे किती तीं आइका l सांगतसे संख्या जैसीतैसी ।।* 

*पांच लक्ष घरें पाषाणांची जेथें l सात लक्ष तेथें विटेबंदी ।।*

*कोटि घरें जेथें कांशा आणि तांब्याचीं l शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ।।* 

समजायला अत्यंत सोपा अभंग आहे. तुकाराम महाराज सांगतात की लंकेत घरं किती होती ती मी जशीच्या तशी सांगतो, नीट ऐका. चिरेबंदी दगडाची पाच लक्ष घरं होती. तर विटांची सात लाख घरं होती. कांस्य आणि तांब्याची तिथे प्रत्येकी एक कोटी घरं होती. तर शुद्द सोन्याची सात कोटी घरं होती. लंकेत गरिबी कमी होती असं दिसतं. आणि गर्भ श्रीमंतांची संख्या जास्त दिसते. कारण दगड-विटांची मिळून फक्त बारा लाख घरं आहेत. तर कास्य, तांबं आणि शुद्ध सोन्याची एकूण आठ कोटी घरं आहेत. आपल्याकडे उलटी परिस्थिती दिसते. अब्जोपती, करोडोपती, लखोपती यांची संख्या चढत्या क्रमाने असते. जगभर हीच परिस्थिती आहे. दोन टक्के लोकांच्या हातात ऐंशी टक्के संपत्ती आहे तर ऐंशी टक्के लोकांच्या हातात फक्त दोन टक्के संपत्ती आहे. ती पण लुबाडून घ्यायचं सुरूच असतं. म्हणजे एकीकडे उपासमार आहे तर दुसरीकडे खाऊन खाऊन अजीर्ण होतं आहे. हा अभंग त्या अजीर्ण होणाऱ्या लोकांसाठी आहे. मध्यंतरी कोणत्यातरी मंदिराच्या पुजाऱ्याच्या मुलीच्या लग्नाचा फोटो व्हायरल होत होतां. त्या नवऱ्या मुलीच्या अंगावर अंगभर सोनं होतं, त्या पुजाऱ्याच्याही अंगावर अंगभर सोनं होतं. किलो, किलो सोनं अंगावर पांघरणाऱ्या या पुजाऱ्याने इतकं सोनं आणलं कुठून? आणि त्याचं करणार काय? मेल्यावर सोबत नेणार आहे का? या जनतेचा पैसा जर जनतेच्या हितासाठी खर्च केला तर किती गरीबांचा उद्धार होईल? किती जणांना शिक्षण मिळेल? किती जणांना रोजगार मिळेल? किती कुटुंबं सुखी होतील? चोवीस तास देवाच्या संपर्कात राहूनही पुजाऱ्याच्या बुद्धीत काहीही फरक पडत नाही. त्याचा हव्यास सुटत नाही. *अंगावर सोनं पांघरून हे जीवनाची माती करतात. तुकाराम महाराजांनी घरी चालून आलेलं सोनं नाकारून जीवनाचं सोनं केलं.*

आज आपल्या देशात काय सुरु आहे? आताच्या अंबानी बंधूंचा बाप कोणे काळी पेट्रोल पंपावर लोकांच्या गाड्यात पेट्रोल भरत होता. मरताना धीरूभाई अंबानी एक यशस्वी उद्योगपती, भांडवलदार बनला होता. पोराच्या वाट्याला प्रचंड संपत्ती सोडून गेला. अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आले. धीरुभाईने आपला व्यवसाय वाढवताना कसली तमा बाळगली नाही. अत्यंत आक्रमकपणे व्यवसाय वाढवला. तोच गुण अंबानीपुत्रात उतरला. त्यांची हाव वाढली. गेल्या दहा वर्षात अंबानीने अनेक टीव्ही चँनेल संपत्तीच्या जोरावर ताब्यात घेतले. त्यावरून ज्याला सत्तेत आणायचं त्याचा धुँवाधार प्रचार केला. एका सामान्य बुद्धीच्या माणसाला पहाता पहाता मसिहा बनवून टाकला. अधिनिक प्रचारतंत्रांचा वापर करून लाखो कोटी उधळून आपल्याला हवं ते सरकार त्यांनी आधी राज्यात आणि नंतर केंद्रातही सत्तेत आणलं. आणि आता सत्तेत बसवलेल्या आपल्या हस्तकांच्या माध्यमातून मन मानेल तसे निर्णय घेतले जात आहेत. अंबानी आणि अदानी यांची गेल्या आठ वर्षात झालेली प्रगती एकीकडे आणि देशाच्या अर्थ व्यवस्थेच्या विकासदराची नऊवरून जवळ जवळ वजा सव्वीस पर्यंत झालेली घसरण दुसरीकडे ठेवली तर अगदी स्पष्ट दिसून येतं की देशाच्या हिताचा बळी देऊन अंबानी-अदाणी पोसले जात आहेत. देश भिकेला लागला असतांना, देशावरचं दरडोई कर्ज आजवरच्या विक्रमी उत्तुंग टप्प्यावर पोचलेलं असताना, अंबानीची संपत्ती वाढत आहे. अंबानीची मुंबईला बावीस की सव्वीस मजली इमारत आहे. प्रत्येक मजल्यावर पोहोण्याच्या तलावापासून सर्व सोयीसुविधा आहेत. वर हेलीकॉप्टर उतरवण्याची सोय आहे. नीता अंबानी कडे प्रचंड पैसा आहे. कशासाठी वापरते? हजारो पायताणांचे जोड, कपड्याचे जोड, दागिने वगैरेची वर्णनंही आपल्यापर्यंत पोचवली जात असतात. अन्न उद्योग, शेतीसंबंधी करण्यात आलेल्या ज्या कायद्यांच्या विरोधात आठ महिन्यांहून अधिक काल शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसला आहे, ते कायदेही अंबानी आणि अदानी यांच्यासाठीच केले आहेत हे आता सर्वांना माहिती झालं आहे. प्रश्न हा आहे की करोडो भारतीयांची बरबादी करून, त्यांच्या तोंडाचा घास हिसकावून घेऊन अंबानी उद्या जगातला पहिल्या क्रमांकाचा भांडवलदार ठरला तरी काय होणार आहे? जगभरात कमावलेली इस्टेट तो मरताना वर बरोबर बांधून नेणार आहे? सत्ताविसाव्या मजल्यावरून आकाशात झेप घेणारं त्याचं हेलिकॉप्टर काय त्याला स्वर्गात पोचवणार आहे? आणि अशा देशद्रोह्यांच्या मदतीने सत्तेत आलेले तरी काय वरती जाताना लाखो रुपये किंमतीचे मश्रूम बरोबर  बांधून नेणार आहे? अशा अनिर्बंध लुट करणाऱ्या लोकांना तुकाराम महाराज सांगतात की सोन्याच्या लंकेचा मालक असलेला रावण, ज्याच्याकडे अफाट, अमर्याद अशी संपती होती, तोही वर गेला तर त्याच्यासोबत एक फुटकी कवडीही गेली नाही. *“तुका म्हणे ज्याची संपदा एवढी l सांगाते कवडी गेलीं नाहीं ll”* तुम्ही काय घेऊन जाणार आहे? आणि जर इथेच सर्व सोडून जायचं असेल तर मग या संपत्तीचा इतका हव्यास कशाला? एखाद्या प्रामाणिक, संवेदनाशील मनाला खरोखर विचारप्रवृत्त करायला लावणारा हा प्रश्न आहे. हा प्रश्न फक्त अंबानी-अदांनीसाठी नाही तर केवळ धन आणि सत्ता यांच्यामागे लागलेल्या, त्यापायी माणुसकी विसरलेल्या प्रत्येकासाठी आहे. ऐनकेन मार्गाने सत्ता मिळवली. ठीक आहे. सव्वा लाखाच्या गॉगलची हौस पुरी करून घेतली. ठीक आहे. दहा-बारा लाखाचे पँट आणि शर्ट घातले तेही ठीक आहे. खायची, प्यायची आणि फिरायचीही हौस करून घेतली, हेही ठीक आहे. तुमच्या नादानपणामुळे करोडो कामगार बेरोजगार झाले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. पण इतकं सारं करूनही जर देश खड्डयातच जात असेल तर मग तुमची बुद्धी वेळेवर काय करत होती? कशासाठी तुम्ही ही सत्ता, संपत्ती कमवली? यांच्यातला दमडाही तुम्हाला सोबत नेता येणार नाही. मग हा अट्टाहास कशासाठी? म्हणून अजूनही ताळ्यावर या. नीट विचार करा. आपल्या मनाशीच विचार करा. आता आपला परतीचा प्रवास सुरु झाला आहे. माणसाला सुखी करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा. संपत्ती महत्वाची आहेच. तिला मोल आहेच. पण तिच्या मर्यादाही समजून घ्या. कितीही संपत्ती असली तरी ती गेलेला जीव परत आणू शकत नाही. अंबानी जगातला सर्वात श्रीमंत उद्योगपती झाला आणि त्याने त्याची सर्व संपत्ती देऊन धीरुभाईला परत आणायचं ठरवलं तर आणता येईल का? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, “सांगाते कवडी गेलीं नाहीं ll” मग काय करायला हवं? वॉटसअँपवर खूप काही कचरा असला तरी काही चांगल्या गोष्टीही येतात. त्यातलीच एक ! एक खूप पैसेवाला शेठ होता. त्याने व्यवसायात प्रचंड पैसा कमवला होता. पण आता त्याचं वय झालं. संध्याछाया भिववू लागल्या. त्याला वाटत होतं की मी नाना लटपटी, खटपटी केल्या. व्यवसाय वाढवला. पण मी एकही पुण्याचं काम केलं नाही. स्वर्गात कसं जायचं. आणि आपल्या या संपत्तीसह कसं जायचं? त्याने दवंडीच पिटली की जो कोणी मला माझी सर्व संपत्ती स्वर्गात नेण्याचा मार्ग सांगील त्याला मी मोठं बक्षीस देईल. लोकांनी बक्षिसाच्या अपेक्षेने भरपूर डोकं खाजवलं. पण त्यांना काही सुचेना. दिवसांमागून दिवस उलटले. शेवटी एके दोव्शी एक तरूण आला . म्हणाला, “मी तुम्हाला मार्ग सांगतो.” शेटजी म्हणाला सांग. त्याने शेटजीला विचारलं तुम्ही दोन वर्षांपूर्वी अमेरिकेला गेला होतात ना ? शेटजी म्हणाला, “हो, गेलो होतो.” तिथे भरपूर खरेदी केली होती ना ? त्या तरुणाने विचारलं. शेटजी म्हणाला , हो केली होती.” मग तरुणाने विचारलं तिथे आपला रुपया चालतो का ? शेटजी म्हणाले नाही, “तिथे डॉलरच लागतो.” त्या तरुणाने विचारलं मग तुम्ही डॉलर कुठून आणले? शेटजी, “रुपये देऊन डॉलर घेतले.” मग तो तरूण म्हणाला, “तसंच स्वर्गात हे पैसे चालणार नाही? तिथलं चलन घ्यावं लागेल. शेटजी म्हणाले स्वर्गात कुठलं चलन असतं? तो तरूण म्हणाला तिथे पुण्ण्याचं चलन चालतं. इथे जो पैसा कमावला, तो इथेच खर्च करा. गोरगरिबाला मदत करा. भूकेलेल्यालां अन्न दया. तहानलेल्याला पाणी द्या. जे रंजले गांजले असतील त्यांचं दु:ख दूर करायचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला पुण्य मिळेल. मग त्याचा उपयोग तुम्हाला स्वर्गात होईल. तेंव्हा शेटजीच्या डोक्यात प्रकाश पडला. तुकाराम महाराजांना नेमकं हेच सांगायचं आहे. गरजेपुरतं कमवा. योग्य मार्गाने कमवा. कमावलेलं दीनदुबळ्यांसाठी खर्च करा. वर सांगितलेली गोष्ट एक बोधकथा आहे हे लक्षात ठेवायचं. नाहीतर लगेच एखादा उठून विचारेल की तुम्हीच म्हणता की स्वर्ग-नरक असं काही नसतं त्याला हे विसंगत आहे. गोष्टीचं सार तेवढं घ्यावं. बाकी विसरून जावं. 

*तुकाराम महाराजांना जर फक्त आपल्या मोक्षाचीच चिंता असती तर मग त्यांना हे सर्व सांगायची गरज राहिली नसती. पण तुकाराम महाराज एका सुखी, समृद्ध आणि समतेवर आधरित समाजाचं स्वप्न पहात होते. त्यांचा प्रत्येक श्वास याचसाठी होता. तुकाराम महाराज नवसमाजाचे दृष्टे होते. त्यासाठीच ते आयुष्यभर धडपडत होते. त्यंच्या आयुष्यातली ही धडपड समजली तर तुकाराम महाराज समजले असं होईल. म्हणून आपणही तुकाराम महाराज समजून घेऊ आणि इतरांनाही तुकाराम महाराज समजावून देऊ!*                       


जय जगद्गुरू !

जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, “सरे ऐसें ज्याचे दान l त्याचे कोण उपकार ll” जो संपून जाणारं दान देतो, त्याचे काय उपकार मानायचे? कोणाला अन्नदान केलं. तो ते खाऊन संपवून टाकतो. पैसे दिले ते खर्चून टाकतो आणि पुन्हा कफल्लक होतो. म्हणून अन्न-वस्त्र वा धन दान करण्याऐवजी एखाद्याला ज्ञान दिलं तर ते कायम स्वरूपी रहातं. म्हणून कोणाला भेट द्यायची तर पुस्तकांची द्या. ज्ञानाची द्या. तुकोबांचा हा संदेश आचरणात आणणाऱ्यांच्या दोन कथा आपल्याला या माध्यमातून सांगितल्या. आज तिसरी कथा. मोबाईलवर बँक खात्यात ५०००/- रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. कोणी पाठवले असतील याचा विचार करत होतो तेवढ्यात फोन आला. माउली तुमच्या खात्यात पाच हजार भरले आहेत. मला पुस्तकांचे दहा सेट पाठवा. पुण्याहून माननीय बाळकृष्ण शिंदे बोलत होते. त्यांनी आधी एक सेट मागवला होता. वाचल्यावर आपल्या मित्रांनीही वाचावा असं त्यांना वाटलं. त्यांनी लगेच दहा सेटचे पैसे पाठवून दिले. या निरुपणातून तुकाराम महाराजांचे विचार जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचवण्याची तळमळ यातून दिसून येते. गाथा परिवार बाळकृष्ण शिंदे यांचा कायम  ॠणी राहील.

"शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान" (किंमत : ₹ ४००/-); जगद्गुरू तुकाराम महाराज जीवनसंघर्ष ( ₹ ५०/-) आणि लोकराजा महाराजा सयाजीराव गायकवाड ( ₹ ६०/-) ही तिन्ही पुस्तके एकत्र रु. ५००/- त घरपोच मिळतील. यासाठी गुगल पे क्र. 9975641677 (उल्हास पाटील, कोटक बँक वा एचडीएफसी बँक ) संपूर्ण पत्ता आणि पैसे भरल्याचा स्क्रीन शाँट 

9420801956 या नंबरवर पाठवा.

               - उल्हास पाटील

                 गाथा परिवार

                   gathaparivar.org

               9975641677


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

शुक्रवार, ऑगस्ट २०, २०२१

महिला सुरक्षितता : छेडछाड आणि त्यापलीकडील त्रास ; विवाह - पतीद्वारे फसवणूक होत असल्याची लक्षणे ; कौटुंबिक हिंसाचार - तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करत आहात का? ; हुंड्यासाठी होणारा छळ - हुंड्याची प्रथा ; हुंड्यासाठी होणाऱ्या छळाची तक्रार

 


महिला सुरक्षितता

१.छेडछाड आणि त्यापलीकडील त्रास

रस्ते, बस स्थानके, रेल्वे स्थानके, उद्याने आणि अन्य सर्व सार्वजनिक स्थळे सर्वांसाठी खुली आहेत. त्यांचा आनंद सर्वजण घेऊ शकतात. मात्र, अनेक स्त्रियांसाठी ही छळाची ठिकाणे ठरतात. स्त्रियांच्या संचाराच्या तसेच व्यक्ती म्हणून प्रतिष्ठेच्या मूलभूत हक्कावर दररोज गदा आणली जात आहे. 

समस्या:

सीमा रस्त्यावरून चालत असते, तेव्हा एक पुरुषांचा समूह तिच्या चेहऱ्यावर व बांध्यावर टिप्पणी करतो.  ‘वा! काय फिगर आहे!’ ‘बत्तीस असेल की छत्तीस?’ सीमा या आगाऊ टिप्पणीकडे दुर्लक्ष करून चालत राहते. टिपण्या अधिक अश्लाघ्य होत जातात. ते तिला 'बिच’ म्हणतात. 

सुधा बससाठी रांगेत उभी आहे. अचानक तिला तिच्या छातीवर हात पडल्यासारखा वाटतो. ती आजूबाजूला बघते पण हे नेमके कोणी केले ते तिला ते कळत नाही. तिला आपल्या खासगी मर्यादेत अतिक्रमण झाल्यासारखे वाटते पण काही बोलण्याची हिंमत तिला होत नाही. 

एक माणूस ऑफिस ते घर या मार्गात आपला पाठलाग करत आहे हे कविताच्या लक्षात येते. तो बऱ्यापैकी अंतरावर असतो आणि अनेक दिवस शांत राहतो. मात्र, एक दिवस तो जवळ येऊन तिला हाक मारतो. ती खूप घाबरते आणि त्याला टाळण्यासाठी तिचा मार्ग तसेच जाण्यायेण्याची वेळ बदलून टाकते. सार्वजनिक स्थळी लैंगिक त्रास दिला जाणे चालवून घेण्याजोगे नाही. टक लावून बघणे, घाणेरडे हावभाव करणे, स्पर्श करणे, कमेंट्स करणे, पाठलाग करणे या सगळ्याचा समावेश  लैंगिकदृष्ट्या अश्लाघ्य वर्तनामध्ये होतो. ही मोठी समस्या नाही असे वाटू शकते पण या बाबी अस्वस्थ करून टाकू शकतात. यामुळे स्त्रियांना शरमल्यासारखे वाटते, अपमानित वाटते, भीती वाटते. 

सार्वजनिक स्थळी होणाऱ्या लैंगिक छळाशी निगडित गैरसमज:

-विशिष्ट कपडे घातल्यामुळे लैंगिक छळाला आमंत्रण मिळते

हा गैरसमज आहे. कोणत्याही वयोगटातील व कोणत्याही प्रकारचे कपडे घातलेल्या स्त्रियांचा छळ होऊ शकते हे जगभरातील अनेकविध अभ्यासांतून पुढे आले आहे. एनआयपीपीसीआयडीने दिल्ली पोलिसांसाठी केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या स्त्रियांपैकी ८२ टक्के स्त्रिया अगदी सामान्य, प्रक्षोभक नसलेले कपडे (सलवार-कमीज, ट्राउजर-टॉप, साडी) परिधान करत होत्या, तरीही त्यांना लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता.

-विशिष्ट वर्गातील लोकच लैंगिक छळात सहभागी असतात

हीदेखील सामान्य धारणा आहे. मात्र, येथे मुद्दा वर्गाचा नाही, तर मानसिकतेचा आहे. स्त्रियांना त्रास देणे सोपे आहे असे वाटणारे लोक स्त्रियांचा लैंगिक छळ करण्यात सहभागी असतात. 


लैंगिक छळाची समस्या कशी हाताळावी?


लैंगिक छळाची समस्या हाताळण्यासाठी एक असा उपाय नाही. प्रत्यक्ष घटनास्थळी आजूबाजूचे संदर्भ विचारात घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. 

स्पष्टपणे व मोठ्या आवाजात 'नाही’ म्हणायला शिका. एखादे वाक्य मनात योजून ठेवा (उदाहरणार्थ, 'माझ्याकडे टक लावून बघू नका') आणि ते प्रतिक्षिप्त क्रियेसारखे उमटत नाही, तोवर ते म्हणण्याचा सराव करा. जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी हे वाक्य सुनावण्याचा आत्मविश्वास येईपर्यंत सराव करत राहा. 

आत्मविश्वासाने संवाद साधणे शिका. तुम्हाला त्रास देणाऱ्यांकडे सरळ बघा आणि त्यांच्या वर्तनाला स्पष्टपणे व शांतपणे उत्तर द्या. तुम्हाला तुमच्या हक्कांची व खासगीत्वाच्या अधिकाराची जाणीव आहे हे समोरच्याला दाखवून द्या. 

तुम्ही बसमधून प्रवास करत असाल, तर अशा वर्तनाची तक्रार वाहक किंवा चालकाकडे करू शकता. कायद्यानुसार तक्रार करणाऱ्या स्त्रीबरोबर जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तिला मदत करू शकता. 

जवळ सेफ्टीपिन्स बाळगणे तसेच स्वयंसंरक्षणाची तंत्रे अंगिकारणे उपयुक्त ठरू शकते. 

तुम्हाला कोणी सातत्याने त्रास देत असेल, तर याची माहिती तुमच्या पालकांना/मित्रमंडळींना दिली पाहिजे. यातून या त्रासावर उपायही निघू शकतो आणि तुम्हाला पाठिंबाही मिळू शकतो. अनेक स्त्रिया या त्रासातून गेलेल्या असतात आणि तुम्हाला काय अनुभव येत आहे हे त्या समजून घेऊ शकतात. 

छळ थांबवण्यासाठी पुरुष काय करू शकतात? 

तुम्ही स्वत: कोणालाही असा त्रास देऊ नका. या समस्येबद्दल जाणून घ्या, जेणेकरून, तुम्ही याबद्दल संवेदनशील व्हाल आणि या त्रासाला तोंड देणाऱ्यांच्या समस्या समजून घेऊ शकाल. 

- स्त्रियांना लैंगिक त्रास देणाऱ्यांना मदत करू नका. लैंगिक छळाला विरोध करा. छळाला प्रोत्साहन देऊ नका. त्यात सहभागी होऊ नका.

- अनुकूल प्रसंग असेल तेव्हा लैंगिक छळाचा मुद्दा उपस्थित करा.

- तुमची मते कणखरपणे मांडा.

- एखाद्या स्त्रीचा छळ केला जात आहे अशी परिस्थिती लक्षात आली, तर तुम्ही तिला मदत करू शकता. कोणी एखाद्या स्त्रीला त्रास देत असेल, तर 'तुम्हाला कोण त्रास देत आहे?’ असा प्रश्न तिला विचारा. जर गर्दीत एखाद्या स्त्रीने छळाची तक्रार केली, तर 'हे कोण करत आहे, असे अजिबात खपवून घेण्याजोगे नाही’ असे गर्दीला उद्देशून जोरात ओरडा.


२.विवाह

पतीद्वारे फसवणूक होत असल्याची लक्षणे

तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत आहे की नाही हे जोखण्याचा सामान्यपणे वापरला जाणारा मार्ग म्हणजे त्याच्या दिनक्रमात व वर्तनात काही बदल आहेत का, हे बघणे. तुमच्या जोडीदाराचे प्रेमप्रकरण सुरू असेल तर तो नक्कीच वेगळा वागेल. याचे कारण म्हणजे, आपण सगळे एका ठराविक दिनक्रमात रमलेले असतो आणि आपल्या आयुष्यात काही बदल झाला, तर साहजिकच आपला द्नक्रम बदलतो व आपण गोष्टी वेगळ्या पद्धतीने करू लागतो. तुमच्या पतीच्या दिनक्रमातील बदलांमधून त्याचे कोणासोबत प्रेमप्रकरण सुरू आहे का, याबद्दल धागेदोरे सापडतील. अर्थात हे अनेकदा नजरेतून सुटूही शकते. 

खालीलपैकी काही तुमच्या लक्षात आले आहे का?

- तो तुमच्यावर किंवा मुलांवर पटकन चिडू लागला आहे का?

- पूर्वी तो तुमच्यासोबत आनंदाने घरी थांबत होता पण आता त्याला बाहेर राहणे अधिक आवडू लागले आहे का?

- तो रात्री उशिरापर्यंत जागा राहत आहे का? याचा अर्थ तुम्ही त्याच्या आधी झोपी जाल आणि मग तो 'तिला' फोन किंवा एसएमएस करू शकेल या हिशेबाने तो उशिरापर्यंत जागा राहत असेल.

- त्याचे सेलफोनबाबतचे वर्तन संशयास्पद झाले आहे का? म्हणजे तो त्याच्या सेलफोनबद्दल अधिक पझेसिव झाला आहे का? तुम्ही आसपास असताना तो सेलफोन स्वत:च्या जवळच ठेवतो का? फसवणूक करणारे पुरुष दुसऱ्या स्त्रीशी संपर्क साधण्यासाठी सेलफोनचा वापर करतात. ते अगदीच मूर्ख असतील, तरच घरातील फोननंबरचा वापर करतील. तो कॉल लॉग्ज आणि मेसेजेस सारखे इरेझ करत असतो का, याकडे लक्ष ठेवा.

- तुम्ही आसपास असताना फोन घ्यावा लागला तर तो सांकेतिक भाषेत बोलतो का? तुमच्या उपस्थितीत तो अवघडून जातो का?

- त्याचे पैशाचे पाकीट, पॉकेट कॅलेंडर किंवा ब्रिफकेसबद्दल तो अधिक पझेसिव झाला आहे का?

- तो घरात तुम्हाला टाळू लागला आहे का? तो तुमच्या नजरेला नजर देऊन बोलत नाही का?

- तो अधिक वेळ आणि वारंवार चालण्यासाठी बाहेर जात आहे का?

- वाद सुरू झाल्यानंतर तो हिरीरीने वाद न घालता, पडती भूमिका घेत आहे का? पुरुष जेव्हा फसवत असतात तेव्हा त्यांना वाद घालणे आवडत नाही, वाद टाळण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात.

- त्याला पूर्वी ज्या गोष्टीबद्दल खूप प्रेम होते, उदाहरणार्थ एखादा खेळ किंवा छंद, त्या गोष्टीतील त्याचा रस कमी झाला आहे का?

- गेल्या अनेक वर्षांत न भेटलेल्या किंवा तुम्ही पूर्वी नावही ऐकलेले नाही अशा मित्रांना भेटण्याबद्दल तो अचानक बोलू लागला आहे का?

- त्याने कपडे इतस्तत: टाकणे थांबवले आहे किंवा तो स्वत:चे कपडे स्वत: धुऊ लागला आहे का? यामागील कारण या कपड्यांवरील वास किंवा खुणा दूर करणे हे असू शकते.

- तो तुम्हाला एकटीने आईवडिलांना किंवा मित्रमंडळींना भेटण्यास अचानक प्रोत्साहन देऊ लागला आहे का?

- तो पूर्वीच्या तुलनेत अधिक वारंवार चर्चासत्रे/अधिकृत/बिझनेस ट्रिप्सना उपस्थित राहू लागला आहे का किंवा दौऱ्यांवर जाऊ लागला आहे का?

- तो ऑफिसमध्ये करायला विसरलेल्या गोष्टी अचानक आठवून कधीही, कोणत्याही वेळी घराबाहेर जातो का?

- तो साखरपुड्याची अंगठी घालायला विसरू लागला आहे का?

- तुमच्या किंवा मुलांच्या वस्तू बाइक/कारमध्ये राहू नयेत यासाठी तो दक्ष राहू लागला आहे का?

- तो कामासाठी रात्रभर बाहेर जावे लागते म्हणून कपड्याची बॅग ऑफिसमध्ये किंवा कारमध्ये ठेवू लागला आहे का?

पत्नीची फसवणूक करणाऱ्या पतीमध्ये ही लक्षणे साधारणपणे लक्षात येतात. ही लक्षणे एकेकटी बघितली तर अनेकदा त्यांच्यात काहीच अर्थ नसतो पण अनेक लक्षणे एका ठराविक नमुन्यात दिसू लागली तर त्यातील इशारा तुम्ही ओळखला पाहिजे आणि कुठे पाणी मुरत आहे हे तपासले पाहिजे. तुमचे लग्न वाचवण्यासाठी तुम्हीच काही पावले उचलणे आवश्यक आहे. 


मद्यपी पती

मद्यपानाचे व्यसन ही सर्वत्र आढळणारी समस्या आहे. दारू पिऊन घरी येणाऱ्या व बायका-मुलांना मारझोड करून सगळ्यांची आयुष्ये बिघडवून टाकणाऱ्या नवऱ्यांना शतकानुशतके असंख्य स्त्रिया तोंड देत आहेत. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे बहुतेक स्त्रिया याला विरोध करण्याऐवजी भिऊन आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेतात. कदाचित त्यांच्या अशा काही समस्या असतात किंवा समस्यांशी जुळवून घेण्याचे मार्ग असतात पण नवरा मद्यपान करून तुमचे शोषण करत असेल, तर हे प्रकार थांबवण्याची वेळ आलेली आहे. दारूच्या या व्यसनाविरोधात धैर्याने लढा द्या आणि स्वत:चे व कुटुंबाचे रक्षण करा.  मद्यपी नवऱ्याला मदत करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना:

- तुमची प्रवृत्ती योग्य असावी. तुम्ही नवऱ्याचा तिरस्कार करता, तुम्हाला त्याची काळजी नाही किंवा त्याच्याबद्दल आदर नाही हे त्याला समजले तर त्याला मदत करणे कठीण होऊन बसते.

- मद्यपानाचे व्यसन म्हणजे एखाद्या औषधाचे व्यसन लागण्यासारखे आहे. ते सोडवण्यासाठी केवळ इच्छाशक्ती पुरेशी नाही, तर योग्य ते उपचार आवश्यक असतात. एखाद्या पुनर्वसन केंद्राची किंवा समुपदेशकाची मदत घ्या.

- तुमचा नवरा आजारी आहे असे समजून त्याच्याशी वागा व संभाव्य उपाय देण्याचा प्रयत्न करा. मद्यपींना संधी दिल्याशिवाय ते त्यातून बाहेर येत नाहीत.

- तुमच्या मद्यपी नवऱ्याला त्याच्या कृत्यांसाठी जबाबदार करा. तुम्हीच त्याला काही सबबी पुरवल्या किंवा पाठीशी घातले तर तो पुन्हापुन्हा मद्याच्या आहारी जाणार हे नक्की.

- दारू सोडवण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा वापर करा. मद्याचे व्यसन हा जटील आजार आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी अनेकांची गरज भासते. नवऱ्याच्या जवळच्या मित्रांना (दारूचे व्यसन नसलेल्या) जवळ करा आणि व्यसन सोडवण्यासाठी नवऱ्याचे मन वळवण्याची विनंती त्यांना करा. बरेच पुरुष बायकोच्या विनंत्या अव्हेरतात पण मित्रांचा सल्ला मान्य करतात.

- कधीच आशा सोडू नका; नाउमेद होऊ नका. एकदा केलेल्या प्रयत्नांत तुमच्या नवऱ्याची दारू सुटलेली नसली, तरी त्याची बिजे नक्कीच पेरली गेली आहेत. याची फळे भविष्यकाळात मिळतील हे नक्की.

- मद्याचे व्यसन हा संपूर्ण कुटुंबाला होणारा आजार आहे; सर्व कुटुंबियांवर याचा परिणाम होतो आणि उपचारही सर्वांवर केले जाणे आवश्यक असते.

- मद्यपी नवऱ्याला कधीही एकटे सोडू नका, कायम त्याच्यावर लक्ष ठेवा. सगळ्या पार्ट्या आणि गॅदरिंग्जना नवऱ्यासोबत जा आणि त्याच्यावर दक्षतेने नजर ठेवा. त्याच्यावर लक्ष ठेवणारे कोणी असेल तर तो सहसा मर्यादा ओलांडणार नाही.

- ज्या पार्ट्यांमध्ये तुमच्या नवऱ्याला त्याचे मित्र मद्यपानाचा आग्रह करतात, अशा पार्ट्या टाळा.

- तुमच्या नवऱ्याचा पगार थेट तुमच्या बँकखात्यात जमा होईल अशी सोय करून घ्या. म्हणजे त्याच्याजवळ दारू पिण्यासाठी जास्तीचा पैसाच राहणार नाही.

- समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. व्यवसाचे मूळ कारण समजून घेण्यासाठी त्याच्याशी आतून संवाद साधण्याचा प्रयत्न करा.

- एकदा कारणे सापडली की, त्याच्याशी निगडित समस्या सोडवण्यासाठी उपाय व मार्ग निश्चित करता येतात.


३.कौटुंबिक हिंसाचार

तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करत आहात का?


घराच्या चार भिंतीत स्त्रियांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराचे प्रमाण खूप अधिक आहे. कौटुंबिक हिंसाचार व्यापक स्तरावर प्रचलित आहे पण तो फारसा दिसून येत नाही. आकडेवारीतून दिसून येते की, ४५ टक्के भारतीय स्त्रियांना त्यांचे नवरे थोबाडीत मारतात, लाथा मारतात किंवा मारहाण करतात (आयसीडब्ल्यूआर २००२). ३२ टक्के नवऱ्यांनी पत्नी गरोदर असताना तिच्याविरोधात हिंसाचार केलेला आहे. भारतात दर ६० मिनिटांनी एक स्त्री कौटुंबिक हिंसेमुळे दगावते. सामाजिक संकेतांमुळे स्त्रिया कौटुंबिक हिंसाचार सहन करतात. तसेच संस्कृतीची बंधने आणि आर्थिक परावलंबित्व यांमुळे स्त्रियांना पतीच्या घरी राहणे भाग पडते. कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी कायदा तर आहेच, शिवाय, अलीकडेच आलेल्या 'प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायोलन्स’ या दिवाणी कायद्याचा उद्देश स्त्रीला मदत, भरपाई व पाठिंबा पुरवणे हा आहे.तुमचा पती किंवा जोडीदार तुमच्या किंवा तुमच्या मुलाच्या विरोधात खालीलपैकी कोणते हिंसक कृत्य करतो का?


- भाषिक किंवा भावनिक हिंसाचार

- अपमान- तू आकर्षक नाहीस, स्मार्ट नाहीस, मला/माझ्या आईवडिलांना मान देत नाहीस असे बोलणे

- तुमच्या आईवडिलांवर आरोप करणे/त्यांचा अपमान करणे

- शिवीगाळ करणे (नेम-कॉलिंग)

- तुमच्या चारित्र्यावर किंवा वर्तनावर आरोप करणे

- हुंडा न दिल्याबद्दल अपमान करणे

- मुलगा जन्माला न घातल्याबद्दल अपमान करणे

- तुम्हाला किंवा तुमच्या ताब्यातील मुलाला शाळा, कॉलेज किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेत उपस्थिती लावण्यास प्रतिबंध करणे

- तुम्हाला नोकरी करण्यास प्रतिबंध करणे

- तुम्हाला नोकरी सोडण्यासाठी जबरदस्ती करणे

- तुम्हाला किंवा तुमच्या ताब्यातील मुलाला घरातून बाहेर जाण्यास मनाई करणे

- तुम्हाला सामान्य दिनक्रमात एखाद्या व्यक्तीस भेटण्यापासून रोखणे

- आत्महत्येची धमकी देणे

आर्थिक हिंसाचार

- तुम्हाला स्वत:च्या किंवा तुमच्या मुलांच्या देखभालीसाठी पैसे न देणे

- तुम्हाला तसेच तुमच्या मुलांना अन्न, कपडे, औषधे न पुरवणे

- तुम्हाला रोजगार सुरू ठेवण्यापासून रोखणे

- तुम्हाला रोजगाराची संधी घेण्यास मज्जाव करणे

- तुमचा पगार, रोजंदारी तुमच्याकडून काढून घेणे

- तुमचा पगार, रोजंदारी वापरण्यापासून तुम्हाला रोखणे

- तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढणे

- घराच्या कोणत्याही भागात प्रवेश करण्यास किंवा तो वापरण्यास तुम्हाला मज्जाव करणे

- तुम्हाला कपडे, वस्तू, किंवा सामान्य घरगुती वापराच्या वस्तू वापरण्यास परवानगी न देणे

- भाड्याच्या घरात राहत असल्यास घरभाडे न भरणे

शारीरिक हिंसाचार

- थोबाडीत मारणे

- मारहाण करणे

- आपटणे

- चावे घेणे

- लाथा मारणे

- बुक्के मारणे

- ढकलणे

- लोटून देणे

- कोणत्याही पद्धतीने शारीरिक वेदना देणे किंवा जखमा करणे


लैंगिक हिंसाचार

- जबरदस्तीने शारीरिक संभोग करणे

- तुम्हाला पोर्नोग्राफी किंवा अन्य काही अश्लिल साहित्य किंवा चित्रे बघण्याची जबरदस्ती करणे

- तुम्हाला त्रास देण्याच्या, तुमचा अपमान करण्याच्या किंवा कमी लेखण्याच्या उद्देशाने लैंगिक कृत्य करणे अथवा तुमच्या प्रतिष्ठेचा भंग करणारे किंवा अन्य कोणत्या प्रकारे खपवून न घेण्याजोगे लैंगिक कृत्य करणे

सरकारने नुकताच कौटुंबिक हिंसाचार (डीव्ही) कायदा संमत केला आहे हे लक्षात ठेवा. 


डीव्ही कायद्याची ठळक वैशिष्ट्ये:

- पीडब्ल्यूडीव्हीए पुरुषासोबत कौटुंबिक नात्यात राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सामावून घेतो, लिव्ह-इन नातेसंबधात राहणाऱ्या, द्विभार्या विवाहात राहणाऱ्या, फसव्या लग्नांत राहणाऱ्या सर्व स्त्रियांना हा कायदा लागू आहे.

- हा कायदा स्त्रियांना सामाईक कुटुंबात राहण्याचा हक्क देतो

- या कायद्यानुसार, न्यायदंडाधिकारी हिंसाचार थांबवण्यासाठी त्वरित संरक्षक आदेश देऊ शकतात.

- हा कायदा दोन्ही पक्षांना स्वतंत्र किंवा संयुक्त पद्धतीने समुपदेशन पुरवतो.

- ३ दिवसांच्या आत केस नोंदवली गेली पाहिजे आणि ६० दिवसांच्या आत सर्व देय सहाय्य दिले गेले पाहिजे असे या कायद्यात निर्दिष्ट आहे.

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेची माहिती कोणाला द्यावी?

- नजीकचे पोलीस ठाणे

- संरक्षण अधिकारी (जिल्ह्याच्या महिला व कुटुंबकल्याण विभागाचे प्रकल्प संचालक). तुमच्या स्थानिक संरक्षण अधिकाऱ्याशी संपर्क साधा.

- सेवा पुरवणारे (राज्य सरकारद्वारे नियुक्त)

- न्यायदंडाधिकारी


तुम्हाला निवारा नसेल तर-

- निवाऱ्यासाठी: निवाराघरात निवारा पुरवण्याच्या दृष्टीने नजीकचे संरक्षण अधिकारी किंवा सेवा पुरवठादार

- वैद्यकीय सुविधांसाठी: कोणत्याही वैद्यकीय सुविधेसाठी नजीकचे संरक्षण अधिकारी किंवा सेवा पुरवठादार

- मदतीसाठी किंवा आदेश प्राप्त करण्यासाठी: न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे

- भरपाईच्या पेमेंटसाठी किंवा हानीसाठी: सामाईक घरात राहण्याचा अधिकार

- संरक्षण आदेश: कौटुंबिक हिंसाचाराच्या कोणत्याही कृत्याच्या प्रतिबंधासाठी

- मदत करणे किंवा प्रवृत्त करणे: नोकरीच्या ठिकाणी प्रवेश करणे किंवा मुलाच्या शाळेत जाणे; व्यक्तिगत, मौखिक, लेखी, इलेक्ट्रॉनिक किंवा टेलिफोनच्या माध्यमातून संपर्क साधणे


मालमत्तेपासून वंचित ठेवणे

- तिचे स्त्रीधन असलेली बँकेची लॉकर्स किंवा दोन्ही पक्षांची संयुक्त वा एकेरी बँकखाती ऑपरेट करणे

- तिच्या नातेवाईकांविरोधात किंवा अन्य व्यक्तींविरोधात हिंसाचार करणे

- अन्य कोणतेही कृत्य

- निवास आदेश

- पैशाच्या स्वरूपातील मदत

- ताबाविषयक आदेश

- भरपाईचे आदेश


४.हुंड्यासाठी होणारा छळ

हुंड्याची प्रथा

भारतात प्रत्येक समाजामध्ये हुंड्याची प्रथा प्रचलित आहे. विवाहसंस्थेत गुंतलेल्या व भवतालच्या असंख्य लोकांच्या आयुष्यांवर ही प्रथा अनिष्ट परिणाम करत आहे. 

जेव्हा एखाद्या घराण्याच्या राजकन्येचे लग्न होत असे तेव्हा राजा अत्यानंदाच्या भरात त्याच्या संपत्तीचा व राज्याचा काही भाग जावयाला एका भव्य सोहळ्यामध्ये प्रदान करत असे. त्याचे मंत्रीही या राजेशाही प्रथेचे पालन एक शिष्टाचार म्हणून करू लागले. मग राजाची सामान्य प्रजा, मग ती गरीब असो किंवा श्रीमंत, या दिखाऊ प्रथेचे पालन 'प्रतिष्ठा’ जपण्यासाठी करू लागली आणि त्यांनाही आपण राजेशाही असल्याचा आभास यातून होऊ लागला. 

विवाहातील ही विचित्र प्रथा गरीब व वंचित कुटुंबांमध्येही वेगाने जाऊन पोहोचली आणि त्याभवती प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पना गुंफल्या गेल्या. तेव्हापर्यंत मुलीला जन्म देण्याशी आणि तिचे पालनपोषण करण्याशी एक अपराधी भावना जोडली गेली होती. त्यातच मुलींचा जन्मदर मुलग्यांच्या तुलनेत वाढल्यामुळे ही भ्रष्ट प्रथा अधिक दृढ होत गेली. प्रत्येक घरात मुलग्यांच्या तुलनेत जास्त मुली असणे ही कुटुंबातील ज्येष्ठांसाठी धोक्याची घंटा होती. त्यांनी मुलींच्या लग्नाची घाई सुरू केली व त्यातून स्पर्धा लागली. 

अलीकडील काळात हुंड्याची प्रथा रुजत गेली.  हुंड्यापोटी मिळणाऱ्या वस्तू, सोने आणि पैसे नवऱ्यामुलासाठी अभिमानाची आणि दिखाव्याची बाब झाली. 

मुलीचे आईवडीलही जावयाला या सगळ्या भेटवस्तू देऊन सुटकेचा नि:श्वास टाकू लागले. कारण, हे सगळे दिल्यामुळे आता त्यांच्या मुलीला सासरी मान मिळेल, चांगली वागणूक मिळेल असे त्यांना वाटू लागले. 

नवऱ्यामुलींनाही आपल्या आईवडिलांकडून खूप काही मिळणे अभिमानास्पद वाटू लागले. नवीन घरात प्रवेश केल्यानंतर आपले माहेर किती श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्याची प्रत्येक संधी त्या घेऊ लागल्या. त्या ज्या घरात जातात त्यात त्यांची ऐहिक श्रेष्ठता प्रस्थापित करण्यासाठी हुंडा महत्त्वाचा ठरतो. भलामोठा हुंडा घेऊन न आलेल्या सुनांचा दर्जा कमी असतो आणि त्या एकतर सासरच्यांशी भांडतात किंवा आईवडिलांना अधिक हुंडा देण्यास भाग पाडतात, जेणेकरून, त्यांना नवऱ्याच्या घरात आदराचे स्थान मिळेल. 


हुंड्याचे परिणाम 


वर दिलेल्या संघर्षांचा परिणाम कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर होतो आणि हे संघर्ष वेगवेगळे आकार घेऊ शकतात. उदाहरणार्थ, कुटुंबाचे विभाजन होते, जोडपी वेगळी होतात, न संपणारी शत्रुत्वाची भावना निर्माण होते, कोर्टात खटले होतात, आनंद पार हरवून जातो आणि व्यक्तिगत हाडवैर निर्माण होते. 

लग्नाची चर्चा सुरू झाली की बहुतेक सर्व कुटुंबात स्त्रीच स्त्रीची शत्रू असल्यासारखे चित्र निर्माण होते. सुनेने लग्नानंतर किती पैसा व सोन्याचे दागिने आणायचे आणि आपल्या ताब्यात द्यायचे याबद्दल वाटाघाटी करताना नवऱ्यामुलाची आई जिभेच्या एका फटकाऱ्याने सर्व कुटुंबाला गप्प करते.

आपणही लग्न करून आलो तेव्हा हुंडा घरात आणला होता असा युक्तिवाद काही स्त्रिया करतात, तर काही स्त्रिया सुनेने आणलेले दागिने आपल्या मुलीला तिच्या लग्नात हुंडा म्हणून देतात. हे सुनेला व तिच्या आईवडिलांना आवडत नाही. 

नवऱ्यामुलाचे कुटुंबीय किंवा स्वत: नवऱ्यामुलाने मागितलेला बेसुमार हुंडा देणे परवडत नाही, अशा आईवडिलांच्या परिस्थितीचा विचार करून बघा. हुंड्याच्या या प्रथेमुळे मुलीचे लग्न करून देणे त्यांच्यासाठी ओझे होते. 

हुंडेच्या प्रथेमुळे मुलींबद्दल घृणा निर्माण होते आणि नवजात मुलींच्या हत्येसारख्या गुन्ह्यांकडे लोक प्रवृत्त होतात,  बळजबरीने गर्भपात घडवले जातात, कुटुंबाच्या एकीला तडे जातात, जोडप्यांचे चांगले नातेसंबंध खराब होतात, शत्रुत्व वाढते आणि तरुण सुनांना जाळून किंवा अन्य मार्गांनी ठार मारण्याचे प्रकारही होतात. 


हुंडा मागणे हा पुरुषार्थ नव्हे!

लोभीपणा, सहज पैसा मिळवण्याचा मोह, मित्रमंडळींमध्ये खोटी प्रतिष्ठा या कारणांमुळे मुलगा मुलीच्या आईवडिलांकडे हुंड्याची मागणी करतो. मात्र, आपण स्वत:ला पुरुषवेश्येप्रमाणे विकत आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही. 

मुलाच्या आईवडिलांनी मागितलेल्या हुंड्याची मागणी मुलीचे आईवडील पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत तो अत्यंत आज्ञाधारक मुलासारखा वागतो. 

कष्टाशिवाय मिळालेला पैसा आपल्याला आयुष्यात कधीही वर उचलणार नाही हे लग्नाला उभ्या राहिलेल्या मुलाने समजून घेतलेच पाहिजे. मुलीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती त्याने संवेदनशीलतेने समजून घेतलीच पाहिजे. 

लक्षात ठेवा हुंडा घेतल्याचा अपराधीभाव तुमच्या मनात कायम राहील आणि हुंडा म्हणून जे काही मिळाले आहे त्याचे खऱ्या अर्थाने मालक तुम्ही होऊ शकणार नाही.


तुम्ही पालक म्हणून काय करू शकता?

हुंडा मागणे हा समाजात प्रतिष्ठा कमावण्याचा मार्ग नाही, तर एक शाप आहे, एक पाप आहे, हे मुलाचे लग्न करू इच्छिणाऱ्या प्रत्येक कुटुंबाने समजून घेतले पाहिजे. हुंडा मागणाऱ्या मुलाचा व त्याच्या कुटुंबाचा समाजातील दर्जा प्रत्यक्षात खालावतो. 

नवीन नाते जोडताना आर्थिक बाबीमुळे काही कमी पडत असेल तर ते समजून घेण्याची व त्याच्याशी जुळवून घेण्याची नैतिक जबाबदारी नातेवाईकांनी व आईवडिलांनी स्वीकारावी तसेच समोरच्याला अवघडून टाकणाऱ्या तसेच कमी लेखणाऱ्या टिप्पण्या करणे टाळावे. तरच हुंड्याची अनिष्ट प्रथा दूर होईल किंवा मुळापासून नष्ट होईल आणि लग्नेच्छुकांची आयुष्ये सोपी होतील. 

आईवडिलांनी आपल्या इच्छेने मुलामुलींना दिलेली मालमत्ता नवविवाहितांनी नाकारू नये पण विवाहासाठी पूर्वअट म्हणून केलेल्या कोणत्याही मागणीला ठाम विरोध करावा. 

हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी प्रत्येक जबाबदार पालकाने प्रोत्साहन द्यावे तसेच आपल्या मुलांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी व मन:शांतीसाठी प्रयत्न करावे.

५.हुंड्यासाठी होणाऱ्या छळाची तक्रार

तुमच्या तक्रारीत कोणत्या बाबींचा समावेश हवा?

- विवाहाचे तपशील, उदाहरणार्थ, निमंत्रण पत्रिका, विवाह प्रमाणपत्र, फोटो, व्हिडिओ आदी

- ज्यांच्याविरोधात आरोप आहेत अशा व्यक्तींची नावे व त्यांचे पत्ते, पासपोर्ट्स आदी तपशील

- छळाचे तपशील, उदाहरणार्थ, छळाचा कालावधी, काळ, स्थळ व प्रकार

- हुंडा मागितला असल्यास त्याचे तपशील

- तुम्ही हुंड्याची रक्कम बँकखात्याद्वारे दिली असेल, तर बँकेचे स्टेटमेंट

- हुंडा धनादेशाद्वारे (चेक) दिला असेल तर त्याचे तपशील

- ज्या व्यक्तीला हुंडा दिला गेला, त्याचे तपशील

- शारीरिक हिंसा झाली असेल, तर जखमांचे व त्या करण्यासाठी वापरलेल्या हत्यारांचे तपशील

- लग्न जमवणाऱ्या व वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचे तपशील

- मध्यस्थ/समुपदेशन सत्र झाली असतील, तर ती कुठे झाली याचे तपशील

- साक्षीदारांचे, विशेषत: स्वतंत्र साक्षीदारांचे,  आणि तुमच्या मुलांचे तपशील

- लग्नादरम्यान काही लेखी करार झाले असतील, तर त्याच्या प्रती

- दागिने/रोख पैसे/कपडे/वाहने आदी जंगम स्वरूपातील भेटवस्तूंचे तपशील तसेच भूखंड/फ्लॅट आदी स्थावर स्वरूपातील भेटींचे तपशील

- तक्रार नोंदवण्यास विलंब झाला असेल, तर त्या विलंबामागील कारणे

- पीडितेची स्वाक्षरी व संपर्क क्रमांक

४९८ (अ) कायद्याचा गैरवापर टाळण्यात व तुमची केस मजबूत करण्यात आम्हाला मदत करा

- नेहमी लक्षात ठेवा! जोडपे व मुलांनी परस्परात केलेले समुपदेशन अन्य कोणत्याही समुपदेशनाहून चांगले ठरते.

- चुका माणसाच्या हातून होतातच! चुका दोन्ही बाजूंनी होऊ शकतात. आपल्या चुकांवर पांघरुण घालण्यासाठी कोणीही कायद्याचा वापर करू नये

- पोलीस ठाण्याची पायरी चढण्यापूर्वी दोघांनी परस्परांना समजावण्याचा प्रयत्न करा.

- तुमच्याबाबत घडलेल्या बाबी कधीही अतिशयोक्त स्वरूपात मांडू नका. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, समस्येबाबत स्पष्ट, मोकळेपणाने व मुद्दयाला धरून सांगा.

- छळाशी संबंध नसलेल्यांची नावे छळाशी जोडू नका. प्रामाणिकपणे तक्रार करा.

- नेहमी लक्षात ठेवा! ४९८ (अ) हा कायदा सुडासाठी नाही, तर छळ करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यासाठी आहे, जेणेकरून, बाकीच्यांनाही धडा मिळावा.

- तुमच्या हतबलतेचा फायदा घेण्यामध्ये अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात. ते तुम्हाला छळाची तथ्ये अतिशयोक्त स्वरूपात मांडण्याचे, छळात सहभागी नसलेल्यांची नावे तक्रारीत समाविष्ट करण्याचे, हुंड्याची रक्कम वाढवून सांगण्याचे दिशाभूल करणारे सल्ले देऊ शकतात. 

- तुम्हाला जे भोगावे लागले ते व्यक्त करण्यात कोणाची मदत हवी असेल, तर मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांची किंवा हेल्पलाइन्सची मदत घ्या.

तुमची हुंड्याची रक्कम परत मिळवून देण्याचा वायदा करणाऱ्या लबाड लोकांची मदत घेऊ नका, ते समोरच्यांकडून खंडणी मिळवतात व तुमची केस कमकुवत करतात. 

- तुमच्या तक्रारीची मसुदा तयार केला जात असताना तेथे उपस्थित राहा आणि हा मसुदा पोलिस ठाण्यात दाखल करण्यापूर्वी, तो लिहिणाऱ्यांकडून, मोठ्याने वाचून घ्या.

- केस मजबूत करण्याच्या उद्देशाने तक्रारीतील आशय अतिशयोक्त स्वरूपात मांडण्याचा सल्ला काही पीडितांना दिला जातो.  प्रत्यक्षात मात्र तक्रारीचे सर्वांत मोठे बलस्थान हे पीडितेने सादर केलेले पुरावे असतात. तक्रारीतील मजकुराला प्रत्यक्ष तथ्यांचा आधार मिळाला नाही, तर केस कमकुवत होते व पीडितेला न्याय मिळणे कठीण होते.

- प्रकरणाचा तपास करण्यासाठी तसेच आरोपीला अटक करण्यासाठी संबंधित पोलिस किंवा अधिकारी पैशाची मागणी करत असतील, तर ते कधीही देऊ नका. त्यांच्या वरिष्ठांच्या कानावर हा प्रकार घाला.

- तुमच्या मुलीला जो जिव्हाळा मिळाला पाहिजे, जसे जपले गेले पाहिजे, त्या जिव्हाळ्यावर व काळजीवर सुनेचाही अधिकार आहे हे कधीच विसरू नका.

- लक्षात ठेवा! ४९८ (अ) हे समोरच्यावर घटस्फोटासाठी दबाव आणण्याचे साधन नाही. विवाहातील प्रतिकूलतांवर तोडगा काढण्यासाठी अन्य अनेक कायदेशीर प्रक्रिया आहेत.

- ४९८ (अ) हे मुलांचा ताबा मिळवण्यासाठी वापरण्याचे हत्यारही नाही. यासाठी पर्यायी कायदेशीर पद्धती आहेत.

- ज्या दिवशी तक्रार दाखल झाली, त्याच दिवशी आरोपीला अटक करा असा दबाव पोलिसांवर कधीच आणू नका, कारण, विश्वासार्ह पुरावा जमवण्यासाठी वेळ लागतो. मात्र, तक्रार दाखल करतानाच बहुतेक पुरावे सादर करून तुम्ही पोलिसांना तपासाचा वेग वाढवण्यात मदत नक्कीच करू शकता.

- आरोपीचा देशाबाहेर जाण्याचा बेत आहे अशी माहिती तुम्हाला मिळाली, तर तुम्ही ते तपास अधिकाऱ्यांना त्वरित सांगणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास, पोलिस सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच समुद्रीतळांवर (सीपोर्ट्स) इशारा देऊ शकतात.

- जर तुम्ही पालक असाल, तर मुलीकडून सर्व तथ्यांची खात्री करून घेतल्याखेरीज तक्रार दाखल करू नका. तपासासाठी मुलीचा जबाब महत्त्वाचा असतो.

- देशभरात ४९८ (अ) या कायद्याखाली आरोपी दोषी ठरवले जाण्याचा दर अत्यंत कमी आहे. यामागे अनेक कारणे आहेत. तपासादरम्यान जे काही सांगितले त्यावर खटल्यादरम्यान ठाम राहून, तुम्ही आम्हाला, हा दर सुधारण्यात मदत करू शकता.

महिला व सुरक्षा माहिती.pdf


Tags: #महिला सुरक्षितता#छेडछाड आणि त्यापलीकडील त्रास#विवाह#पतीद्वारे फसवणूक होत असल्याची लक्षणे#कौटुंबिक हिंसाचार#तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करत आहात का?#हुंड्यासाठी होणारा छळ#हुंड्याची प्रथा#हुंड्यासाठी होणाऱ्या छळाची तक्रार 



गुरुवार, ऑगस्ट १९, २०२१

नागेश पा.कल्याण यांची मराठी पत्रकार संघाच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड

  •  प्रसिद्धी प्रमुख पदी संजय पा.चिखले

  • तालुका कार्यकारिणी जाहीर

नायगाव /प्रतिनिधी

            अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे यांच्या अध्यक्षतेखाली मिलेनियम इग्लिश स्कुल येथील सभागृहात विचारविनिमय व संघटनात्मक बांधणी बैठकीत नायगाव तालुका अध्यक्ष माधव मामा कोकुरले यांचा कार्यकाळ संपल्याने अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी नागेश पाटील कल्याण यांची बिनविरोध निवड करुन तालुका कार्यकरणी जाहीर करण्यात आली आहे.

    नायगाव तालुक्यातील तळागाळातील पत्रकारांना योग्य तो न्याय देत जेष्ठ पत्रकार सल्लागारांनी तालुका कार्यकारिणीची निवड करताना सर्व पत्रकारांना समानतेची वागणूक देऊन निवड करण्यात आली आहे.

      यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब पांडे जिल्हा उपाध्यक्ष ,माधव मामा कोकुरले , माधव पाटील चव्हाण ,भूषण पारळकर, एस.एम.मुदखेडकर, राजेश कुलकर्णी, बापूराव बडूरे विकास भुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवड करण्यात आली.


निवड खालील प्रमाणे आहे.

       नायगाव ता मराठी पत्रकार संघ

कार्यकारिणी


ता.अध्यक्ष - नागेश पा.कल्याण

कार्याध्यक्ष - माधव धडेकर कुंटुर

उपाध्यक्ष - गंगाधर ढवळे बरबडा

उपाध्यक्ष - बालाजी माली पाटील मांजरम

उपाध्यक्ष - शेख आरिफ

सरचिटणीस - माधव बैलकवाड

कोषाध्यक्ष - माधव पवार

सह सचिव - देविदास जेटेवाड

सह सचिव - पवन कुमार पुठेवाड

प्रसिद्धी प्रमुख - संजय ब्रह्मानंद चिखले

संघटक - शंकर आडकीने

सहसंघटक - शंकर आडकीने

सदस्य 

हाणमंत बोयाळे

संजय ठिकाणे

लालसिंग रानडे


नायगाव शहराध्यक्ष - विश्वांभर वने

सर्कल प्रमुख

मांजरम -मारोती कोपंलवार

कुंटुर -नागोराव भोसले

नरसी -अ.खाज्या महेबुबसाहब

बरबडा -चंद्रकांत सुर्यतळ

 यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून बालाजी नागाठाणे, संजय ठिकाणे, शिवाजी शिंदे ,गंगाधर पा.कल्याण, विकास भुरे, वसंत जाधव , विठ्ठल वडपत्रे ,मधुकर जावळे, साईनाथ पांढरे, प्रशांत वाघमारे,प्रल्हाद भंडारे ,एल.बी.रानडे, गंगाधर कोतेवार, भगवान शेवाळे, बळवंत जाधव,अवि चालीकवार प्रेस फोटो ग्राफर, आनंद डकोरे, संभाजी वाघमारे, बालाजी माली पाटील ,चाऊस अब्दुल करीम ,देविदास सूर्यवंशी, गौतम एडके, गोविंद उपासे , नागोराव भोसले,चांदू आंबटवाड,संदीप कांबळे,राजू चिनतेवाड,असिफ शेख, अब्दुल शेख,बालाजी कोकणे,शिवजी ईबीतदार.


चौकट

फोटो ग्राफर दिनानिमित्त अवि चालीकवार ,गंगाधर ढवळे ,बालाजी शेवाळे, यांचा सत्कार करून

जेष्ठ साहित्यिक प्रदीप पाटील ,अशोक सूर्यवंशी याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

बुधवार, ऑगस्ट १८, २०२१

झोपेत असताना सापाने दंश केल्याने उपचारादरम्यान मरवाळी जि.प शाळेच्या एका गुणवान विद्यार्थीनीचा मृत्यू

 


गडगा,दि.18 ऑगस्ट 2021 : कुटुंबाच्या समवेत घरी झोपलेल्या इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थीनीचा झोपेत असताना पायाच्या अंगठ्याला विषारी साप चावल्याने शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी पहाटे घडली.या घटनेने मरवाळीत शोककळा पसरली आहे.

कु.प्रभावती राघोबा मुंडकर(वय ११ वर्षे)रा.मरवाळी ता.नायगाव असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.सदरील विद्यार्थीनी गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत होती.दरम्यान, नेहमीप्रमाणे कुटुंबियांसमवेत घरात झोपली असताना १७ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर दोन वाजताच्या सुमारास प्रभावतीच्या पायाच्या अंगठ्याला विषारी सापाने दंश केला.त्याच वेळी तिने माझा पाय ओढल्यासारखे वाटत आहे असे वडीलांना सांगितले तेव्हा त्यांनी आजूबाजूला पाहिले असता अंथरूणाच्या जवळ उंदीरासारखा प्राणी चुचूंद्री दिसून आल्याने आई-वडीलांना काही झाले नसावे असे वाटले परंतु पंधरा विस मिनिटांनी मुलीला उलटी होत असल्याने उपचारासाठी मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथे उपचारादरम्यान पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रभावतीचा दुर्दैवी मृत्यू झाला.उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून तिचा मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला.


प्रतिभा ही शाळेतील गुणवान विद्यार्थीनी असल्यामुळे या घटनेची माहिती मिळताच जि.प शाळेच्या सर्व शिक्षकांनी प्रतिभाच्या घराकडे धाव घेतली.प्रतिभाला पाहून सर्व शिक्षकांना अश्रु आनावर झाले.कु.प्रभावती शाळेमध्ये अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेची व नम्र असल्यामुळे सर्व मित्र-मैत्रिणींना प्रिय होती.ती शालेय उपक्रमामध्ये नेहमी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत असे.तिच्या या आकस्मिक निधनाने शाळेमध्ये व गावांमध्ये शोककळा पसरली असून एका चांगल्या विद्यार्थिनी ला आपण गमावल्याच्या भावना तिचे वर्ग शिक्षक श्री. गिरी एच.डी. श्री. नागेश्वर जी.पी.श्री. लोहकरे एन.बी श्री .पवार डी.जी. श्री. जाधव डी .टी.श्री. पवळे एम एच श्री. चेडगूलवार आर आर यांनी व्यक्त केले आहेत.

 तिच्यावर आज सकाळी शोकाकुल वातावरणात मरवाळीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१

बहुआयामी,अष्टपैलू कुशल संघटक,शिक्षणप्रेमी व कर्मयोगी व्यक्तीमत्व म्हणजे बाळासाहेब पांडे-साहित्यिक वीरभद्र मिरेवाड

 


नायगाव,दि 13 ऑगस्ट : पत्रकार, लेखक ,संवेदनशील माणूस आणि समाजाची सुखदुःख अव्याहतपणे आपल्या लेखणीच्या स्तंभातून अविष्कृत करणारा अवलीया शिक्षक पत्रकार,कलावन्त व अष्टपैलू संघटक म्हणजे बाळासाहेब पांडे मांजरमकर.आज नागपंचमी त्यांचा वाढदिवस या निमित्ताने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा व जीवनतेजोमय करणारा लेख

    मांजरम ता नायगाव येथील ग्रामीण भागात 1 आगष्ट 1970 नापंचमी या दिवशी शंकुतलाबाई व रघुनाथराव पांडे यांच्या पोटी जन्मलेले सात बहिणी व एकटे भाऊ असे लाडके बाळासाहेब पांडे पण त्याचे जीवन मात्र लहान पणा पासूनच संघर्ष मय वातावरणात जीवन कंठीत केले.शब्दांचे शस्त्र हातात घेऊन पत्रकारितेच्या माध्यमातून उपेक्षितांना, वंचितांना, अल्पसंख्यांकांना व त्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून लेखन करणारा हा पत्रकार स्वभावाने अतिशय मायाळू, प्रामाणिक आणि नम्र आहे.वरून मात्र नारळासारखा कठीण स्वभाव पण त्यांच्या आत अरुवार खोबरे भरलेली दिसतात .विद्यार्थ्याप्रती प्रचंड कणव असलेला हा शिक्षक आपल्या संगीत कौशल्याने, बहारदार सूत्रसंचालनाने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रेरणा पेरून विद्यार्थ्यांना सामाजिक सलोख्याचे ज्ञान आणि अध्यापन करतो. 

 शिक्षकांचेही प्रश्न सोडवत शिक्षक संघटनेमध्ये बाळासाहेब पांडे नावाचं व्यक्तिमत्व कार्यकर्ता म्हणून आहे .

वाढदिवस ,लग्न समारंभ ,कुठलाही आस्वादक कार्यक्रम या सगळ्यात बाळासाहेब पांडे हिरीरीने भाग घेतात .त्यांच्या वाडवडिलांकडून त्यांना मिळालेला वसा आणि वारसा ते तर चालवत आहेत पण या पलीकडे जाऊन माणुसकी नावाचं अस्त्र बाळासाहेब पांडे शिताफीने वापरतात .त्यांच्या ठिकाणी कुठलाच भेदभाव नाही .सर्वाभूती समान वागणारा आणि समानतेच्या विचाराची बिजं पेरणारा शिक्षक ,पत्रकार म्हणून अखंडपणे न्याय देण्याचे काम बाळासाहेब पांडे करतात. किर्तन, प्रवचन, भजन ,कुठलीही कला त्यांच्यात अवगत आहे आणि ते स्वतःच्या मर्जीने दिलखुलासपणे सहभागी होऊन इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं सामर्थ्य बाळगतात. बोलताना प्रचंड करारीपणा,उत्कृष्ट ध्येयनिष्ठा, प्रचंड आत्मविश्वास या त्रिपुटीने बाळासाहेब पांडे यांचे व्यक्तिमत्त्व भरलेलं आणि भारलेलंआहे. बाळासाहेब पांडे म्हणजे एक सळसळते चैतन्य कधीही चेहऱ्यावर दुःखाचा लवलेस न बाळगता सदाहरित वनाप्रमाणे माणसांना हिरवागार करणारा हा माणूस तेवढाच वृक्षावर प्रेम करणारा आहे. हिरवगार मन घेऊन जपणारा हा माणूस गतिमानतेची उर्मी अंतरंगात साठवून तळागळातील जनसामान्यांच्या अंधारवेदनेला शब्दात मांडणारा प्रतिभावंत आहे.

 बाळासाहेब पांडे यांच्या आशीर्वादातून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत ,एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व गप्पा मारण्यात पटाईत आणि गारुड्याच्या पोतडीतून नवे नवे जादूचे प्रयोग बाहेर पडावेत तसे त्यांच्या बोलण्यातून नव्या नव्या गोष्टी मिळतात अनुभव मिळतो, आनंद मिळतो असं विलोभनीय व्यक्तीमत्व म्हणजे बाळासाहेब.

 त्यांनी आपले विचार माध्यमातून , नियतकालिकांमधून खेड्यांमधल्या लोकांची मनं, त्यांच्या पिचलेल्या वेदना हाती घेऊन लेखन करत बाळासाहेब पांडे पुण्यनगरी सारख्या दैनिकांमधून व्यक्त होतात. आयुष्यात बरे वाईट अनुभव पचवताना त्यांनी कधी अन्यायाचा मार्ग स्वीकारला नाही त्यांच्या लेखनाने, त्यांच्या अध्यापनाने मुलांना केवळ प्रेरणा, उत्साह आणि मायेचा ओलावा मिळत गेला .काही कार्य करण्यासाठी माणसांच्या हातात बळ पाहिजे हा भाव मनामध्ये ठेवून सरांनी अव्याहतपणे आपला प्रवास सुरू ठेवला. कठोरतेचे नियम पाळत गुणवत्तेचे रसायन विद्यार्थ्यांना पाजवणारा हा शिक्षक संधी मिळेल तेथे संधीचं सोनं करून विद्यार्थ्यांना भूमिका वठवायला लावून सामाजिक दायित्व फेडतो. साहित्यप्रेमी, अभ्यासू शिक्षणप्रेमी ,रसिक आणि सगळ्यांचा हितचिंतक, तळमळीचा कार्यकर्ता म्हणून बाळासाहेब पांडे यांचा गौरव करावा असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या आज होणाऱ्या ५१ व्या वाढदिवसा निमित्त विरा गणेश हाके या एका बाल गायिकेला व्यासपीठ निर्माण करून देऊन सायंकाळी नायगाव शहरात अभिष्टचिंतन सोहळा ठेवण्यात आला आहे बाळासाहेबांना त्यांच्या प्रचंड चाहता वर्गाकडून भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा !!


वीरभद्र मिरेवाड

साहित्यिक   

व्यंकटेशनगर, नायगाव 

तालुका नायगाव

 जिल्हा नांदेड

गुरुवार, ऑगस्ट १२, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर महिला मा.शिक्षणाधिकारी वैशाली विर-झनकर सह दोघे ८ लाख रुपये लाच स्वीकारताना चतुर्भुज

 


आदरणीय सर

लाचेची यशस्वी सापळा कारवाई

▶️ युनिट - ठाणे

▶️ तक्रारदार- पुरुष वय ४५वर्षे

▶️ आरोपी- १)श्रीमती वैशाली पंकज विर, वय -४४ वर्षे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, नाशिक.

२)ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले.शासकीय वाहक चालक.

३) पंकज रमे दशपुते,प्राथमिक शिक्षक जि. प. शाळा राजेवाडी त.नाशिक.

▶️ लाचेची मागणी- ९,००,०००/- रुपये

▶️ लाच स्विकारली तडजोड अंती रु.८,००,०००/-

▶️ हस्तगत रक्कम- ८,००,०००/-रुपये.

▶️ लाचेची मागणी - ता.०६/०७/२०२१, २७/०७/२०२१


▶️ लाच स्विकारली -

 दि.१०/०८/२०२१ रोजी १७:३० वा.

▶️ लाचेचे कारण

     यातील तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबत चा कार्या देश काढून देण्याकरिता आरोपी क्र.३) यांनी आरोपी क्र.१) यांचे करिता ९,००,०००/- ₹ मागणी केली त्यांनंतर दिनांक २७/०७/२०२१ रोजी आलोसे क्रमांक 1 यांची पडताळणी केली असता त्यांनी सादर कामाकरिता तडजोडी अंती 8,00,000 स्वीकारल्याचे मान्य करून लाचेच पुढील व्यवहार त्यांचे चालक आरोपी क्रमांक 2 यांचे सोबत करण्या बाबत सांगितले त्यांनंतर दिनांक 10/8/21 रोजी आलोसे क्रमांक 2 यांनी आलोसे क्रमांक 1 यांचे करीत तक्रारदार यांचे कडून 8,00,000 रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले

▶️ सापळा अधिकारी- श्रीमती पल्लवी ढगे पाटील 

ए. सी. बी. ठाणे

▶️ सह सापळा अधिकारी पो नि मते

 ▶️ सापळा पथक

पोहवा/ मोरे ,लोटेकर पोना/ शिंदे , अश्विनी राजपूत पो शी/ सुतार चापोहवा/शिंदे

 ▶️ मार्गदर्शन अधिकारी-मा. डॉ. श्री.पंजाबराव उगले सो. पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र*

▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी-अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई

 ----------------------

------------+++++++++----------

*अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे

दूरध्वनी क्र 27833344


*@ टोल फ्रि क्रं. 1064*

====================

मंगळवार, ऑगस्ट १०, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर जिल्हा जलसंधारण अधिकारी गुप्ताला 75,000/- रुपये लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

 


आदरणीय महोदय,

▶️ यशस्वी सापळा कारवाई

▶️घटक - अमरावती

▶️तक्रारदार - पुरूष, वय 44 वर्ष, व्यवसाय - शासकीय सिव्हिल कंत्राटदार रा. नागपुर जि. नागपुर

▶️ आ.लो.से - श्री.रमेश कुमार हिरालाल गुप्ता,वय 56 वर्ष,पद - जिल्हा जलसंधारण अधिकारी, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद नागपुर वर्ग - 1.

▶️लाच मागणी रक्कम - 75,000/- रूपये 

➡ लाच स्विकारली रक्कम - 75,000/- रुपये 

▶️पडताळणी- दि.08/08/2021 

▶️ यशस्वी सापळा कारवाई दि.- 10/08/2021.

▶️घटनास्थळ- आलोसे श्री.गुप्ता, यांचे राहते घरातील रूम मध्ये,33 उदय नगर, नागपुर 

▶️कारण - तक्रारदार हे शासकीय सिव्हिल कंत्राटदार असुन आ.लो.से.श्री.गुप्ता, जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी तक्रारदार यांना डी.पी.सी (आदिवासी)2020-2021 अंतर्गत Construction of Cement Nalla Bandh at Salai ( Pathrai )No.2 Tah.Ramtek Dist.Nagpur केलेल्या कामाचे प्रथम व अंतिम बिल काढण्यासाठी तडजोड करून जिएसटी सोडुन बिलाचे रकमेच्या 2 टक्केप्रमाणे तडजोड करून त्यांचे राऊंड फिगर 40,000 रूपये, बिलामध्ये ॲडजस्ट केल्याचे बोलुन वाढीव बीलाचे 25,000 रूपये व पंधरा लाख ग्रँट असून त्याचेवरचे बिल असल्याने निधी आणण्यासाठी 10,000 रूपये असे एकुण 75,000/- रूपये पडताळणी दरम्यान लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले.वरुन आज रोजी सापळा कारवाई आयोजीत केली असता आलोसे श्री.गुप्ता यांनी त्यांचे राहते घरी उदय नगर, नागपुर येथे तक्रारदार यांचेकडून 75,000/- रुपये लाच रक्कम स्विकारली.आरोपी लोकसेवक श्री. गुप्ता यांना ताब्यात घेण्यात आले असून कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

▶️ आ.लो.से. यांचे सक्षम अधिकारी - मा.सचिव, ग्रामविकास मंत्रालय, म.रा.मुंबई.

मार्गदर्शन -

▶️मा. श्री. विशाल वि.गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  

मा. श्री. अरुण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती,मा.श्री.गजानन पडघन, पोलिस उपअधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती.

▶️ सापळा कारवाई पथक-श्री. राहुल वसंतराव तसरे ,पोलीस निरीक्षक ला. प्र.वि. अमरावती, श्री.संतोष इंगळे, श्रीमती ममता अफुणे,स्टाफ NPC विनोद कुंजाम , युवराज राठोड, ज्योती झाडे PC सुनिल जायभाये, राजेश कोचे, उपेंद्र थोरात वाहन चालक सतीश किटूकले. सर्व ला.प्र.वि.अमरावती.

▶️तपासी अधिकारी :- श्री.राहुल वसंतराव तसरे ,पोलीस निरीक्षक ला. प्र.वि. अमरावती


▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

----------------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन*

 *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती.

*दुरध्वनी क्रं 07252 235933

*@टोल फ्रि क्रं 1064*

------------------------------

विधानसभा निवडणूकित खोटे शपथपत्र प्रकरणी नामदेव आयलवाड यांना भोकर न्यायालयाने बजावली नोटिस...

 


भोकर,दि 10 जुलै 2021 : भोकर विधानसभा निवडणुकीत नामदेव आयलवाड यांनी खोटा शपथ पत्र दिल्या प्रकरणी कोर्टाने समस बजावली आहे.

सविस्तर वृत्त असे की २०१९ मध्ये विधानसभा निवडणुक पार पडली या निवडणूकित भोकर विधानसभा मतदारसंघातून ना. अशोकराव चव्हाण यांच्याविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरून पराभुत झालेले


नामदेव आयलवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता सदरील अर्जासोबत त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्या मालमत्तेबाबत व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती बाबत खरी माहिती लपवली होती त्या मुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्याना शिक्षा व्हावी याकरिता विधानसभा उमेदवार मा.शेख एजास महेबुब यांनी संबंधित कागदपत्रे हस्तगत करून भोकर येथील मा. न्याय दंडधिकारी साहेब प्रथमवर्ग यांच्या न्यायालयात भोकर चे जेस्ट विधीज्ञ ऍड मो.सलीम, व ऍड हर्षवर्धन पाटील, यांच्या मार्फत तक्रार दाखल केली होती, मा.न्यायालयाने मा.शेख एजास शेख महेबुब यांच्या तक्रारीची दखल घेऊन आरोपी विरुद्ध कार्यवाही चालविण्याचे आदेश पारित करून नामदेव आयलवाड यांना त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपास जबाब देण्यासाठी न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे हजर न झाल्यास वारंट काढण्यात येईल असे ही आदेश मा.न्यायालयाने दिले आहे.

रविवार, ऑगस्ट ०८, २०२१

बोगस व मनमानी कारभार करणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करावी शेतकरी संघटनेची मागणी

  


लोहारा,दि ८ जुलै २०२१ : तालुक्यातील मौजे अचलेर येथे बोगस व चुकीचे मनमानी काम करणाऱ्या मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यावर कारवाई करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी केली तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

लोहारा तालुक्यातील मौजे अचलेर येथे शेतीचा बोगस पंचनामा करून शासनाचे व शेतकऱ्यांची फसवणूक करणारे येथील संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार यांना कळवले आहे.संबधित शेतकऱ्याचे बनावट सही करून शेतकरी पंचनामा करत असताना उपस्थित आहे असे दाखवले आहे. याप्रकरणी संबधित अधिकाऱ्याची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे.अन्यथा 15 ऑगस्ट पासून जिल्हा अधिकारी कार्यालया समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष रवींद्र इंगळे यांची स्वाक्षरी आहे.



महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई ३२ जिल्हा -शाखा-अमरावती कडुन महानगर पालिका आयुक्त यांना निवेदन सादर

 


अमरावती, दि 6/8/21 :  महाराष्ट्र राज्य .अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 जिल्हा -शाखा अमरावतीच्या वतीने मा.आयुक्त मा.प्रशांत रोंडे महानगर पालिका यांना दिव्यांग कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले.

  निवेदन देताना जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र दीक्षित, जिल्हासचिव श्री किशोर मालोकार, जिल्हाउपाध्यक्ष सौ शालिनी बोरखडे, श्री कपिल हडाले, कार्याध्यक्ष श्री चंद्रकांत मामनकर,अमरावती तालुकाध्यक्ष श्री विशाल धोटे,अमरावती तालुकासचिव श्री मंगेश खंडारे आदी संघटनेचे म.न पा सदस्य श्रीधर हिवराळे , अमोल साकुरे, रवि खडसे ,इरशाद खान रऊफखान , साजीद हुसैन , गुणसागर गवई , अजय चव्हाण , धिरज धोरधळे, हरजेश बांबल, रणजित नरोडे , रमेश पातुडैकर , मंगेश भावे , अजय वाढोणकर यावेळी उपस्थित होते.


यावेळी दिव्यांग कर्मचारी पदोन्नती दिव्यांग कर्मचारी यांना सहायक तंत्रज्ञान साधने व उपकरणे त्वरित उपलब्ध करून द्यावीत, दिव्यांग कर्मचारी यांची विभागनिहाय स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी दरवर्षी प्रत्येक आस्थापना मध्ये प्रसिद्ध करण्यात यावी,दिव्यांग कर्मचारी 2005 पुर्वी चा असो किंवा नंतर असो त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. दिव्यांग कर्मचारी यांना चार टक्के प्रमाणे पदोन्नती देण्यात यावी, प्रत्येक आस्थापना चा कार्यालयात दिव्यांग अधिनियम2016 चा फलक लावण्यात यावा .महानगर पालिका चा अंतयेणारे राखीव भुखंड साठी दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रस्ताव मागविण्यात यावे आदी विषयावरील प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले. यावर अमरावती महानगर पालिका प्रशांत रोडे मा. आयुक्त यांनी सकारात्मकता प्रतिक्रिया दाखविली आहे.


शुक्रवार, ऑगस्ट ०६, २०२१

लाच प्रकरण : लोहा तहसिलमधील महा लाचखोर महसूल सहायक ३,००० लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले



Respected sir/madam 

* TRAP CASE 

➡युनिट :- नांदेड  

➡तक्रारदार :- पुरुष वय 25 वर्ष 

➡आरोपी लोकसेवक :- 1. श्री. देवबा नारायण वाघमोडे वय 48 वर्ष, व्यवसाय नोकरी महसूल सहाय्यक (लिपिक) तहसील कार्यालय लोहा जि. नांदेड रा. राम मंदिराजवळ शिक्षक कॉलोनी लोहा

➡ तक्रार प्राप्त :- दिनांक 06/08/2021

➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 06/08/2021

➡ सापळा दिनांक :- 06/08/2021

➡ लाचेची रक्कम:- मागणी 3500/- रु. 

                     तडजोडी अंती 3000/- रुपये स्विकारले.

➡ कारण:-

            यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे व त्याच्या इतर सहा मित्रांचे उत्पन्न प्रमाणपत्र व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्याकरिता 3500/- रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती 3000/- रु. लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली आहे . 

➡ मार्गदर्शक:- 

मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

मा.श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

➡ So :- श्री. विजय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड

➡ TLO :- श्री. राजेश पुरी , ला.प्र.वि. नांदेड

 ACB नांदेड टीम सपोउनि संतोष शेट्टे, एकनाथ गंगातिर्थ, ईश्वर जाधव, मारोती सोनटक्के



गुरुवार, ऑगस्ट ०५, २०२१

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण (www.acbmaharashtra.gov.in)

 


मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्याच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण दि. ३१/०५/२०१८ रोजी ला.प्र.वि. वे अपर महासंचालक (अतिरिक्त कार्यभार महासंचालक श्री विवेक फणसळकर, यांचे शुभहस्ते करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जुने संकेतस्थळ हे संगणकावर हाताळणे मर्यादित होते, परंतु नूतनीकरण केलेले www.acbmaharashtra.gov.in संकेतस्थळ हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने ते मोबाईल, टॅब, आयपॅड या सारख्या आधुनिक उपकरणामध्येही सहजपणे वापरता येऊ शकते. विशेषतः दृष्टीहीन व्यक्तींना स्क्रीन रिडर सॉफटवेअर चा वापर करून सदरचे संकेतस्थळ वापरण्यास सुलभ केले आहे. तसेच त्यामध्ये सायबर सुरक्षेवर विशेष भर देण्यात आलेला आहे. नूतनीकरण केलेले संकेतस्थळ हे नागरिकांना सहज हाताळण्यायोग्य (user friendly) लोकाभिमुख बनविण्यात आलेले आहे.

नव्याने तयार करण्यात आलेले संकेतस्थळ हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची माहिती, ला.प्र.वि. तर्फे करण्यात येणाऱ्या सापळा, अपसंपदा अन्य भ्रष्टाचार इ. कारवाईची माहिती, सांख्यिकी विश्लेषण, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८, माहितीचा अधिकार अशी विविध प्रकारची माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे. तसेच सदर संकेतस्थळावरून नागरिकांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय करावे व काय करू नये याबाबत सूचना देऊन जनतेला भ्रष्टाचार विरोधात सहकार्य करण्याकरीता आवाहन करण्यात आले आहे.

तरी नागरिकांनी या नवीन संकेतस्थळाचा जास्तीत जास्त वापर करून त्याची मदत घ्यावी.असे आवाहन वंदना नारकर अपर पोलीस अधीक्षक मुख्यालय ला.प्र.वि. म. राज्य, मुंबई. यांनी केले आहे.






बुधवार, ऑगस्ट ०४, २०२१

वस्तुनिष्ठ पत्रकारितेसाठी व्यासंगपूर्ण सतर्कता गरजेची–माहिती व जनसंपर्क महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे



औरंगाबाद, दिनांक ४ जुलै २०२१ – अवतीभवतीच्या घटनांचे वृत्तांकन संतुलीत आणि तटस्थपणे करण्याची खबरदारी पत्रकारांनी बाळगणे आवश्यक आहे. अशा वस्तुनिष्ठ पत्रकारितेसाठी व्यासंगपूर्ण सतर्कता गरजेची असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

महात्मा गांधी मिशनच्या वृत्त व जनसंवाद महाविद्यालयात आयोजित संवाद कार्यक्रमात डॉ. पांढरपट्टे बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, औरंगाबाद विभागाचे संचालक हेमराज बागुल, ज्येष्ठ पत्रकार प्रविण बर्दापूरकर, जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके, प्रा. डॉ. आशा देशपांडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.


महासंवाद

वस्तुनिष्ठ पत्रकारितेसाठी व्यासंगपूर्ण सतर्कता गरजेची – महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे

Team DGIPR by Team DGIPR ऑगस्ट 4, 2021 1 min read

वस्तुनिष्ठ पत्रकारितेसाठी व्यासंगपूर्ण सतर्कता गरजेची – महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे

औरंगाबाद, दिनांक ४ (जिमाका) – अवतीभवतीच्या घटनांचे वृत्तांकन संतुलीत आणि तटस्थपणे करण्याची खबरदारी पत्रकारांनी बाळगणे आवश्यक आहे. अशा वस्तुनिष्ठ पत्रकारितेसाठी व्यासंगपूर्ण सतर्कता गरजेची असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

महात्मा गांधी मिशनच्या वृत्त व जनसंवाद महाविद्यालयात आयोजित संवाद कार्यक्रमात डॉ. पांढरपट्टे बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, औरंगाबाद विभागाचे संचालक हेमराज बागुल, ज्येष्ठ पत्रकार प्रविण बर्दापूरकर, जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके, प्रा. डॉ. आशा देशपांडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

पत्रकारितेकडे व्रत आणि व्यवसाय या दोन स्वतंत्र दृष्टीकोनातून बघताना स्वातंत्र्य लढ्यात अनेक राजकीय नेत्यांनी, समाज सुधारकांनी तत्कालीन नियतकालिके, साप्ताहिके यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची, स्वातंत्र्य लढ्याची महत्त्वाची कामगिरी बजावलेली बघायला मिळते. त्या पत्रकारितेत काळाच्या ओघात झालेले लक्षणीय बदल सांगून श्री. पांढरपट्टे यांनी राजकारण, समाजकारण, पत्रकारिता या बाबी एकमेकांशी निगडीत असून पूर्वीच्या काळात प्रसार माध्यमांची आज इतकी संख्या नव्हती. रेडिओ, दूरदर्शन, अन्य माध्यमेही त्यावेळी नव्हती. अशा काळात नियतकालिक, साप्ताहिक चालवणे, व्रत म्हणून पत्रकारिता करणे हे आव्हानात्मक होते. अशा काळातही दर्जेदार वृत्तपत्र, नियतकालिके काढल्या गेली. त्या परंपरेतून आजच्या युवा पिढीने बोध घेत संतुलित, वस्तूनिष्ठपणे वृत्तांकन करण्याची खबरदारी आवर्जून घेतली पाहिजे. कारण आज माध्यमांच्या ‘सर्वात आधी’ या चढाओढीत अनेकदा वस्तूस्थितीची पडताळणी न करता वृत्तांकन केल्या जाते. अशा प्रकारच्या घडलेल्या घटनांची शहानिशा न करता वृत्तांकन करणे हे संबंधिताच्या तसेच समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने घातक ठरणारे आहे, याचे गांभिर्य लक्षात घेऊन कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी पत्रकाराने बाळगणे आवश्यक असल्याचे डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले


त्याचप्रमाणे वैयक्तिक मत, पूर्वग्रह यापासून अलिप्त राहुन तटस्थपणे संतुलित पत्रकारिता करता येणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी पत्रकाराने बहुश्रुत आणि व्यासंगी असले पाहिजे. त्यादृष्टीने विविध विषयांची माहिती, सातत्यपूर्ण वाचन, चिंतन, सभोवतालचे अद्ययावत ज्ञान ठेवणे या सवयी जाणीवपुर्वक जोपासल्या गेल्या पाहिजेत. यातून घटना घडामोडींकडे बघण्याचा प्रगल्भ दृष्टीकोन तयार होतो.

निर्भिडता हा पत्रकारीतेचा स्थायी भाव असून कोरोना काळातही पत्रकारांनी निर्भिडतेने घराबाहेर पडून काम केल्याचे बघायला मिळालेले आहे. या क्षेत्राची बलस्थाने लक्षात घेऊन पत्रकारीतेच्या विद्यार्थ्यांनी सकारात्मकतेने आपला अभ्यास वाढवण्याचे सांगून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कार्यपद्धतीबाबत डॉ. पांढरपट्टे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.


Tags: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

Popular posts लोकप्रिय पोस्ट