🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

रविवार, फेब्रुवारी २८, २०२१

मंत्रिमंडळ निर्णय : दि. २८ फेब्रुवारी २०२१


 बालसंगोपन योजनेच्या सहायक अनुदानात वाढ करणार


मुंबई (दि. २८ फेब्रुवारी) : बाल संगोपन योजनेअंतर्गत बालकांचे संगोपन करणाऱ्या पालकांना प्रति बालक दरमहा देण्यात येणाऱ्या सहायक अनुदानात ४२५ वरून ११०० रुपये इतकी तर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना सहायक अनुदानात प्रति बालक ७५ वरून १२५ इतकी वाढ करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे प्रति बालकास देण्यात येणारे अनुदान १ हजार २२५ रुपये इतके होईल. 


…या बालकांना लाभ

बालसंगोपन योजनेअंतर्गत अनाथ, ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके, एक पालक असलेली व संकटग्रस्त कुटुंबातील बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इ. कारणामुळे विघटित झालेली बालके, एकपालक कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एचआयव्हीग्रस्त/बाधीत बालके, तीव्र मतिमंद, एकाधिक अपंगत्व असलेली बालके, दोन्ही पालक अपंग आहेत, न्यायालीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अपवादात्मक परिस्थितीतील बालके, कामगार विभागाने सुटका केलेले बालकामगार, बाल न्याय अधिनियमातील तरतुदीमधील मुलांच्या व्याख्येनुसार वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली नाहीत ती मुले अशी बालके यांचा समावेश होतो.

राज्यामध्ये १३४ स्वयंसेवी संस्था व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली योग्य कुटुंब प्रमुखामार्फत १७ हजार बालकांचे संगोपन केले जाते. या योजनेतून मुलांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा संबंधित कुटुंबामार्फत पुरविण्यात येतात.

—–०—–

नांदेड येथे शासकीय परिचर्या महाविद्यालय होणार 

नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शासकीय परिचर्या (बी.एस्सी.) महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता 50 असणार असून यासाठी आवश्यक पदनिर्मितीस आणि खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या महाविद्यालयासाठी 16 कोटी 9 लाख 14 हजार 480 च्या खर्चास मान्यता देण्यात आली.

नांदेड शहर शैक्षणिक व व्यावसायिकदृष्ट्या मराठवाड्यातील एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असल्याने जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या भागातील बरेचसे लोक शहरास भेट देतात. तसेच नांदेड शहरात शीख धर्माचे पवित्र स्थान असल्यामुळे तेथे दरवर्षी भाविक तसेच पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. परिणामी, येथील आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न असे परिचर्या महाविद्यालय स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

—–०—– 

पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयांतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू 

महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयातील शिक्षण व शिक्षक समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या निर्णयामुळे विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयातील शिक्षकांसोबत विद्यापीठ अनुदान आयोग, भारतीय पशु चिकित्सा परिषद, भारतीय कृषि अनुसंधान परिषद आणि राज्य शासन यांनी शिक्षक समकक्ष म्हणून घोषित केलेल्या पदांना लाभ होणार आहे. वेतनाचे स्तर, सुरुवातीचे वेतन आणि कुलगुरु यांचे वेतन निश्चित करण्यात येईल.

या पदांना सुधारित वेतन संरचना आणि महागाई भत्ता व इतर भत्ते 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात येणार आहेत. या निर्णयाचा लाभ 388 शिक्षक व शिक्षक समकक्ष पदांवर कार्यरत व्यक्तींना होणार आहे. याकरिता 17.94 कोटी रुपये एवढा निधी थकित रकमेसाठी तसेच 12 कोटी एवढा निधी वार्षिक खर्चासाठी देण्यात येईल.

—–०—–

मुंबईतील महापौर निवास परिसरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणीस सुधारित मान्यता 

मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या ४०० कोटी रुपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टण्पा १ व २ स्वरूपात काम हाती घेण्याबाबत निश्चिती करण्यात आली आहे. सदर प्रकल्पाच्या टप्पा १ मध्ये सर्व इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असून, यामध्ये स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत व बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे. रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामांचा समावेश आहे.

टप्पा-१ करिता अंदाजित किंमत २५० कोटी रुपये (करांसहित) इतकी आहे. सदर प्रकल्पाच्या टप्पा-२ मध्ये तंत्रज्ञान, लेझर शो. डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे. चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक इत्यादी कामे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना हाती घ्यावयाचे प्रस्तावित आहे. टप्पा २ करिता १५० कोटी रुपये (करांसहित) खर्च अपेक्षित आहे. अशा रितीने टप्पा १ व टप्पा २ निहाय कामाची एकूण रु. ४०० कोटी अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला आहे. या अनुषंगाने सदर प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टप्पा १ व २ स्वरूपात काम हाती घेण्यास मान्यता देण्यात आली.

मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक प्रकल्पासाठी लागणाऱ्या ४०० कोटी रक्कमेचा खर्च सुरुवातीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.

—–०—–

Tags: मंत्रिमंडळ निर्णय


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार सीताराम कुंटे यांनी स्वीकारला


 मुंबई, (दि28 फेब्रुवारी): राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवनियुक्त मुख्य सचिव श्री. कुंटे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर मावळते मुख्य सचिव संजय कुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर श्री. कुंटे यांनी श्री. संजय कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला.

सुमारे २२ वर्षांपूर्वी ज्या मुख्य सचिव कार्यालयात श्री. कुंटे यांनी सहसचिवपदी काम केले त्या ठिकाणी ते मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. गेल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी विविध विभागांच्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

भारतीय प्रशासन सेवेतील १९८५ च्या तुकडीचे असलेले श्री. कुंटे मूळचे सांगली येथील असून एम.ए (अर्थशास्त्र) आणि एलएलबीपर्यंत शिक्षण झाले आहे. १९८६ मध्ये जळगाव येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून श्री. कुंटे यांची प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी धुळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे म्हणून त्यांनी काम पाहिले.


२०१२ मध्ये ते मुंबई महापालिकेचे आयुक्त झाले. त्यानंतर पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, अल्पबचत आणि लॉटरीचे आयुक्त (अतिरिक्त कार्यभार), प्रधान सचिव (व्यय) म्हणूनही त्यांनी काम पाहिले. उच्च व तंत्रशिक्षण, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली. २७ ऑगस्ट २०२० पासून ते गृह विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते.

राज्यपालांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. गृहनिर्माण, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव म्हणून काम पाहत असताना त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यानंतर ते वन विभागाचे सचिव झाले. महसूल विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता. ऑक्टोबर २०१० मध्ये वन विभागाच्या प्रधान सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली. या सर्व महत्त्वाच्या पदांच्या जबाबदारी बरोबरच त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव, धुळे व बीडचे जिल्हाधिकारी, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त, मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव, मुंबई महापालिकेचे उपायुक्त, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, म्हाडाचे उपायुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते


Tags: सीताराम कुंटे

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : राठोड यांची वनमंत्रिपदाची खुर्ची गेली-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला राजीनामा

शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.



मुंबई (२८ फेब्रुवारी) : संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घऊन त्यांचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे, असं संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितलं आहे.
या प्रकरणात राजकारण करण्यात आलं ते लोकशाहीच्या विरोधात आहे, असं संजय राठोड यांनी म्हटलंय.


पूजाच्या मृत्यू प्रकरणी विरोधीपक्षांनी मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून घाणेरडं राजकारण केलं आहे, असा आरोप राठोड यांनी केला आहे.

पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, तसंच या प्रकरणी 19 दिवस एफआयआर दाखल न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच नाव आल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकार आणि शिवसेनेवरही विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे.

संजय राठोड यांच्याबाबत निर्णयासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी 24 फेब्रुवारी रोजी एक बैठकही पार पडली होती. या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतरही संजय राठोड यांच्याबाबत कुठलाच निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता.

परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

महंतांची मागणी

दरम्यान संजय राठोड यांचा चौकशीआधीच राजीनामा घेऊ नका अशी मागणी महंत सुनील महाराजांनी केली होती.

"मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या दबावाला बळी पडू नये. चौकशी न करता राजीनामा घेतला तर बंजारा समाजात असंतोष निर्माण होईल, त्याला भाजप जबाबदार राहील. संजय राठोड यांना दोषी ठरवणं म्हणजे बंजारा समाजाला दोषी ठरवणं होईल, चौकशीतून येमारा निकाल सर्वांना मान्य राहील त्यामुळे चौकशी होईपर्यंत राजीनामा घेऊ नये अशी आमची विनंती आहे, "असं सुनील महाराज यांन म्हटलंय.


संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर करावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

तसंच अकार्यक्षम पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा चित्रा वाघ यांनी केली आहे.

"पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहाता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यूमोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आधी केली होती.

"पुरावे असतांनाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय," असा सवालही चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले असून याप्रकरणी सखोल चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

संजय राठोड कोण आहेत?

संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं.

संजय राठोड यांनी वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली.

शिवसेना जिल्हाध्यक्ष असतांना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला 'संत गाडगे बाबा विमानतळ' हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

त्यानंतर त्यांनी यवतमाळच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान दिलं.

अगदी ग्रामपंचायतीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले.

2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला.

राठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली. सध्या संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री आहेत.

यापूर्वी भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांना काम करू दिलं जात नाही, असं म्हणत राठोड यांनी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यासाठी त्यांनी राजीनाम्याचं अस्त्र वापरलं होतं.

'ग्रामीण भागातील शिवसेनेचं नेतृत्व'

संजय राठोड हे ग्रामीण भागातील आमदार आहेत, असं मत ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव यांनी व्यक्त केलं.राठोड यांच्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना ते सांगतात, "संजय राठोड ज्या मतदार संघातून येतात तो मतदार संघ कायम बंजारा, कुणबी बहुल राहिलाय. बंजारा मतं ही त्यांच्या विजयासाठी नेहमी निर्णायक राहिली आहे. या मतदार संघामधली बंजारा मतं संजय राठोड यांनी शिवसेनेच्या बाजूने फिरवली. बंजारा नेतृत्व म्हणून संजय राठोड हे जरी पुढे आले असतील, तरी त्यांनी समाज उपयोगी कामं किती केले, यावर वादविवाद होतील. ग्रामीण भागातील शिवसेनेनं उभं केलेलं नेतृत्व म्हणून संजय राठोड यांच्याकडे पाहता येईल."

पुढे बोलताना ते सांगतात "गेल्या 20 वर्षांमध्ये आपण जर शिवसेनेचा कार्यकाळ बघितला खासकरून युती सरकारच्या काळातला कार्यकाळ बघितला, तर विदर्भामध्ये यवतमाळमधील दारव्हा दिग्रस या भागात शिवसेना वाढली ती संजय राठोड आणि भावना गवळी यांचे वडील पुंडलिक दादा गवळी यांच्यामुळे.

संजय राठोड यांचा राजकीय प्रवास सामान्य कुटुंबातून मंत्रिपदापर्यंत झाला, असं मत हितवादचे जिल्हा प्रतिनिधी दिनेश गंधे व्यक्त करतात.

ते सांगतात, "संजय राठोड यांना राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी संपर्क वाढवला. आरोग्य सेवेत त्यांनी मोठं काम केलंय. तात्या लहाने यांच्याकडून घेतलेल्या शिबिरात त्यांनी हजारो लोकांचे डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घेतली. यवतमाळ शहरात एवढे दिग्गज नेते असतांना स्वबळावर त्यांनी महाराष्ट्रात ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी मोठे आंदोलन केली."

पूजा चव्हाण प्रकरणामुळे कोडींत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राठोड यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारलेला नाही. विधिमंडळाचं अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपानं संजय राठोड यांच्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता.

याआधीच मुख्यमंत्र्यांकडून संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे संकेत गेले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडीवर विरोधकांचा वाढता दबाव तसेच घटक पक्षांचा आक्रमकपणा पाहता मुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशन काळात सत्ताधारी महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यात येईल यामुळेच संजय राठोड यांना राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात यापुढे पोलीस तपासात काय निष्पन्न होते यावरच संजय राठोड यांची मंत्रीमंडळातील पुर्नप्रवेश अवलंबून आहे. सध्या हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आले आहे. या प्रकरणातील चौकशी अहवालानंतरच संजय राठोड यांचा महाविकास आघाडीतील पुढचा टप्पा निश्चित होईल.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


शनिवार, फेब्रुवारी २७, २०२१

गडग्याचे वादग्रस्त निलंबित ग्रामसेवक एम ए पठाण यांच्यावर लाखोंच्या अपहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

गडगा ठरले तब्बल अर्धा डझन भ्रष्ट ग्रामसेवकांची हजेरी लागलेले गाव

नायगाव (दि २६ फेब्रुवारी) : गडगा ग्राम पंचायतीचे निलंबीत वादग्रस्त ग्रामसेवक एम.ए. पठाण यांनी आपल्या नोकरीच्या काळात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील तब्बल १७ लाखांहुन अधिक रक्कमेचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे,गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई या पूर्वीच केली असली तरी सदरचे प्रकरण विधानसभेत पोहचल्याने या भ्रष्ट ग्रामसेवकाविरुद्ध संबधित विस्तार अधिकारी एस.आर.कांबळे यांच्या फिर्यादीवरून २६ फेब्रुवारी च्या रात्री उशिरा नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाआहे.

            मागच्या पाच वर्षांपासून गडगा ग्रामपंचायतीत सरपंच पुत्र व ग्रामसेवकांने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. येथे आलेल्या प्रत्येक ग्रामसेवकाने गैरव्यवहार व भ्रष्टाचार करण्याचा सपाटाच लावला होता . त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसह १४ व्या वित्त आयोग आणि दलित वस्तीच्या कामातील अनियमितता व अर्थिक अपहारप्रकरणी यापूर्वी पाच ग्रामसेवकावर गुन्हे नोंद झालेआहेत.तर आता सहाव्या क्रमांकाचे ग्रामसेवक एम.ए.पठाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाल्याने अर्धा डझन ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झालेले गडगा गाव अशी ख्याती झाली आहे .

       ग्रामसेवक एम ए पठाण यांनी अपहार तर केला पण चौकशी करण्यासाठी गेलेल्या विस्तार अधिकाऱ्यांना अभिलेखेही उपलब्ध करून दिले नाहीत. तर दुसरीकडे तातडीने चौकशी होण्यासाठी गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी प्रयत्न केले पण पुरावे उपलब्ध नसल्याने प्रकरण प्रलंबित राहिलें. त्यामुळे या प्रकरणी चौकशीचाच फार्स सुरू होता, प्रत्यक्ष गुन्हा दाखल होण्यासाठी बराच विलंब झाला. दिनांक १९ १० २०२० रोजी सरपंच चंद्रकला माधवराव कोंडलवाडे यांनी सदर प्रकरणी आपल्या निराक्षरतेचा गैरफायदा घेत एम ए पठाण यांनी गटविकास अधिकारी नायगाव यांच्या कडे ९६ हजार च्या चेक ला २९६०० केले,व असा उपद्व्याप सात ते आठ करून निधी अपहृत केला अशी तक्रार दिली होती.

   या वरून गट विकास अधिकारी प.स. नायगाव च्या आदेशावरून विस्तार अधिकारी कांबळे हे चौकशी कामी गेले असता आठ वेळा वेगवेगळ्या एजन्सीच्या नावे एकूण 17 लाख 85 हजार 343 रु उचलल्याचे निदर्शनास आले नंतर याची जवाबदारी माझी आहे असे संबंधिताने लिहून दिल्या नंतर.तसा अहवाल सादर झाला.

      गट विकासअधिकार्यांनी ४ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार कारवाई करुन ग्रामसेवकाचे निलंबन केले, परंतु अपहार करण्यात आलेली रक्कम प्रचलीत नियमानुसार वसूल करन्याची प्रथा असूनही पठाण यांच्या वर केवळ निलंबनाची कारवाई झाल्यामुळे सदर प्रकरण आ.राजेश पवार यांनी विधानसभेत उचलून धरले.    

 त्यामुळे या भ्रष्टाचारी साखळीत सामील असलेले ग्रामसेवक व पंचायत समिती मधील संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते, वरिष्ठांना उतर देण्याबरोबरच फौजदारी कारवाई करण्याच्या हालचालीस वेग आला . व २६ फेबुरवारी च्या रात्री ११वाजून २० मी वाजता एम ए पठाण यांच्या विरुद्ध फिर्यादीवरून भादवी 1860 प्रमाणे गु.र.न.045 प्रमाणे 420,409,467,468,471 कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय एस एस बाचावार करीत आहेत.

पोलीस स्टेशन नायगाव गुरनं.45/2021 कलम 420.409.467.468.471 420.409.467.468.471भादिव दनांक 26.02.2021

Daily Crime Report ( D.C.R) 27/02/2021

DCR Upload Date 26.02.2021

👇गडगा येथील ग्रामसेवक पठाणवर गुन्हा दाखल_पेज नंबर २८

https://drive.google.com/file/d/1JmOReS2hymq-Y19l5wnKdAzgSVbvr9OP/view?usp=drivesdk

Maharashtra Police - Services for Citizen

https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/PublishedFIRs.aspx

Maharashtra Police - Services for Citizen

https://drive.google.com/file/d/1K7MLpsc7TolYBkvnTCbJKCEYVEX-1ZFg/view?usp=drivesdk

👇Nanded Police

http://nandedpolice.gov.in/index/en

👇Nanded Police

http://nandedpolice.gov.in/publish/13

👇Government of India, Ministry of Home Affairs

https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/DownloadOfflineEForm.aspx


👇 संबंधित बातम्या

गडगा अपहार प्रकरण पोचले विधानसभेत-ग्रामसेवक पठाण यांनी २० लाखांचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न

https://nandednewsupdate.blogspot.com/2021/02/blog-post_50.html



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

नादुरुस्त तिकिट मशिन ने घेतला वाहकाचा जीव; बदनामी च्या भीती ने माहूर आगाराच्या वाहकाची आत्महत्या-वाहकावरील अन्याय दूर करण्यासाठी लिहली सुसाईड नोट!

 


नांदेड (२६ फेब्रुवारी) : माहुर आगारातील एसटी महामंडळाच्या वाहकांना बसेसमध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी उपलब्ध असलेल्या ईटीआयएम (इलेक्ट्रॉनिक तिकीट व्हेंडिंग मशीन) नादुरुस्त असल्याने तपासणीत कार्यवाही ला सामोरे जावे लागेल,त्यात आपली नाहक बदनामी होईल या भीतीने माहूर आगारातील वाहकाने आज दिनांक २६ रोजी सकाळी एसटी बस मध्ये आत्महत्या केली. वाहकाच्या आत्महत्येला रापम प्रशासन जबाबदार असल्याचे सुसाईट नोट मध्ये नमूद असल्याने मानसिक छळ करणारे ते अधिकारी कोन हे पोलिस तपासात समोर येणार असले तरी नादुरुस्त तिकिट मशिन मुळे संजय संभाजी जाणकार (४९) या वाहकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

माहूर आगारात वाहक म्हणून कार्यरत संजय संभाजी जाणकार (४९) यांनी दोरी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २६ शुक्रवार रोजी उघडकीस आली.सफाई कर्मचारी लक्ष्मीबाई व्यवहारे यांना एस. टी.बस क्रमांक एम.एच.२० बी.एल.४०१५ मध्ये संजय संभाजी जाणकार यांचा दोरीने लटकलेला मृतदेह दिसून आल्याने त्यांनी ही माहिती इतर कर्मचाऱ्यांना दिली.आगारातून मिळालेल्या माहिती वरून पोलीस कर्मचारी विजय आडे,प्रकाश देशमुख यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला व सुसाईट नोट हस्तगत केली.आत्महत्या पूर्वी सदर ची सुसाईट नोट कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सप ग्रुप वर वाहकाने टाकल्याने घटना स्थळी रापम प्रशासना विरूद्ध रोष व्यक्त करण्यात येत होता.सुसाईट नोट मध्ये जाणकार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ईटीआयएम मशीन नादुरुस्त असल्याने वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून बिघाड असलेल्या मशिनी द्वारे वाहक आपली कामगिरी बजावत आहे.व खोट्या अहवालाने निलंबित व सेवेतून बडतर्फ होत आहे.मी सुद्धा दिनांक २४ रोजी माहूर वरून महागाव साठी साडे तीन प्रवासी घेतले,मात्र मशिनित बिघाड असल्याने साडे तीन ऐवजी एक तिकीट प्रिंट झाली.ती ही अपंगा साठी असलेली तिकीट बाहेर आली.हे सारा प्रकार सुरू असताना धनोडा पर्यंत गाडी पोहचली.परिणामी तपासणीत माझ्यावर केस दाखल झाली. आता मला निलंबित केले जाईल,सोयरे, धायरे,व भावकी आणि रापम कर्मचाऱ्यात माझी बदनामी होईल,प्रत्येक जण मला चोर समजेल.मी रापम मध्ये चार वर्ष प्रामाणिक सेवा केली आहे.त्या मुळे माझी बदनामी होईल. आगारात सदर ची मशीन चेक केली जाईल,बिघाड दुरुस्त करून खोटा अहवाल दिला जाईल.व मला दोषी ठरविले जाईल.मशीन योग्य असती तर तिकीट योग्य निघाली असती माझी बदनामी झाली नसती.माझ्या आत्महत्येला प्रशासन जबाबदार आहे. आगारातील ५० टक्के मशीन नादुरुस्त आहेत.आदिलाबाद, किनवट साठी देण्यात येणाऱ्या मशिनी तर पूर्ण नादुरुस्त आहे.मशिनित डिस्प्ले होत नाही.अंधार असतो.त्या मुळे ना टप्पा दिसतो ना तिकीट… ना..प्रवास भाडे…. वाहकाने आपली कामगिरी कशी करावी,गाडी तपासणीत चूक आढळल्यास केस बुक होते,मशिनित बिघाड असल्याने वाहक दोषी कसा..? रापम प्रशासनाने योग्य मशीन देणे,व प्रशासनाने वाहका वरील अन्याय दूर करावे असे नमूद केल्याने दिनांक २४ रोजी गाडी तपासणी दरम्यान तपासणी अधिकाऱ्याने केलेल्या मानसिक छड व बदनामी च्या भीती ने जाणकार यांनी आत्महत्या केल्याचा एकच सुर बस स्थानक परिसरात होता. सदर प्रकरणी माहूर पोलीस अधिक तपास करीत आहे.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून १४ पुस्तकांचे प्रकाशन

मराठी भाषा गौरव दिन

 

प्रकाशन

मुंबई, (दि 26 फेब्रुवारी) : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची अनेक वर्षाची मंडळाची परंपरा आहे. यावर्षी कोरोनासारख्या महासंकटातदेखील सदर परंपरा खंडित न होऊ देता मंडळाकडून अत्यंत मौलिक अशा 14 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून करण्यात येत आहे. या पुस्तकामध्ये श्रीमती मलिका अमर शेख संपादित नामदेव ढसाळ यांच्या समग्र वाङमयातील खंड पहिला मंडळाने गतवर्षी प्रकाशित केला असून यावर्षी दुसरा खंड ग्रंथरुपाने मंडळाकडून प्रकाशित केला जात आहे.

महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती आणि इतिहास हे विषय तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये उत्तमोत्तम ग्रंथ रचना करणे हे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि आधुनिक महाराष्ट्राच्या वाङमयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङमयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध वाङमयीन योजनांबरोबरच उपरोक्त उद्दिष्ट पूर्तीसाठी मंडळाकडून सातत्यपूर्ण मौलिक ग्रंथांची निर्मिती करण्यात येत आहे.

मंडळाच्या महाराष्ट्राचे शिल्पकार योजनेअंतर्गत श्री. कमलाकर अंबेकर लिखित भारतरत्न नानाजी देशमुख व प्रा. चंद्रकुमार नलगे लिखित डॉ. ग.गो.जाधव यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारी, त्यांचे कार्य व योगदान मांडणारी चरित्रेदेखील मंडळ प्रकाशित करीत आहे. याबरोबरच भारतीय नाट्यशास्त्र, पाश्चात्त्य नाट्यशास्त्र आणि निवडक मराठी नाट्यरुपे संबंधित महत्त्वाच्या पारिभाषिक संज्ञांचा उलगडा करणारा, नाटक आणि रंगभूमीसाठी सद्यस्थितीत अत्यंत महत्त्वाचा असणारा, अत्यंत मौलिक स्वरुपाचा नाटक आणि रंगभूमी परिभाषासंग्रह हा डॉ. विलास खोले यांचा ग्रंथ मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित होत आहे. या मराठी ग्रंथांसोबतच एकोणिसाच्या शतकात जर्मन आणि रशियन साहित्याच्या  इतिहासात मानाचे स्थान पटकावेल्या लघुकादंबऱ्यांची ओळख करुन देणाऱ्या सुनंदा महाजन व अनघा भट संपादित तिकडून आणलेल्या गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे मौलिक वाङमय देखील मंडळाकडून प्रकाशित होत आहे. याबरोबरच वाङमय महर्षी गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या समग्र वाङमयातील गुरुवर्य केळुसकर यांचे डॉ. राजन गवस यांनी संपादित केलेले सेनेका व एपिक्टेटस यांची चरित्र व बोधवचने हे पुस्तक मंडळ प्रकाशित करीत आहे.

याबरोबरच मंडळाच्या पुनर्मुद्रण योजनेंतर्गत अण्णाभाऊ साठे यांचे आगळेपण सिद्ध करणारे निवडक साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वाङमय या ग्रंथांच्या माध्यमातून मंडळाकडून पुणर्मुद्रित करुन प्रकाशित करण्यात येत आहे.

धर्मशास्त्राचा इतिहास उलगडणारे धर्मशास्त्राचा इतिहास (पूर्वाध) धर्मशास्त्राचा इतिहास (उत्तरार्ध) ही पुस्तके मंडळ प्रकाशित करीत आहे. तसेच लयतालाच्या शास्त्रीय सिद्धांत परंपरेची ओळख करुन देणारा लयतालविचार हा ग्रंथ मंडळाच्यावतीने प्रकाशित करण्यात येत आहे. प्राचिन ग्रीसचा महाकवी होमरलिखित ‘इलियद’ हे महाकाव्य मंडळ पुनर्मुद्रित करुन प्रकाशित करीत आहे. भाषेविषयी प्राचिन भारतीय विचारवंतांनी जे चिंतन व विश्लेषण केले आहे, त्याचा परिचय करुन देणारे ‘पाणिनीय व्याकरण आणि भाषा तत्त्वज्ञान’ हे पुस्तक मंडळाकडून पुनर्मुद्रित करुन प्रकाशित होत आहे. शुल्बसूत्रांची आजच्या भौतिकी विज्ञानासंदर्भात उपयुक्तता विशद करणारा ‘कात्यायन शुल्ब सूत्रे’ हा ग्रंथ मंडळाकडून पुनर्मुद्रित करण्यात येत आहे. ज्योतिषशास्त्राचा परिचय करून देणारा ग्रह-गति सिद्धांत (किंवा ज्योतिर्गणिताची मूलतत्वे)’ हे पुस्तक देखील मंडळाकडून पुनर्मुद्रित करुन प्रकाशित करण्यात येत आहे.

Tags: 


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

शुक्रवार, फेब्रुवारी २६, २०२१

पाटबंधारे विभागाचा कनिष्ठ लिपिक रामदासीला ३ हजारची लाच घेताना एसीबी पथकाने पकडले

कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधी प्रकरण

 प्रेस नोट ::

दिनांक :- 26.02.2021.

पाटबंधारे विभाग जालना येथील कनिष्ठ लिपीक श्री. महेश बाळकृष्ण रामदासी यांना 3,000/- रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालनाच्या पथकाने पकडले.

  1. आरोपीचे नाव, हुद्दा व पत्ता : लोकसेवक श्री. महेश बाळकृष्ण रामदासी वय 39 वर्ष व्यवसाय नोकरी कनिष्ठ लिपीक, कार्यकारी अभियंता कार्यालय, पाटबंधारे विभाग, जालना रा रो हाऊस नं ।2 पांगारकर नगर, अंबड रोड, जालना (वर्ग - 3)
  2. गुन्हा घ ता व ठिकाण : दि- 26.02.2021 रोजी अंबड चौफुली चहाचे हॉटेलवर जालना येथे
  3. लाचेची रक्कम : 3,000/- रुपये.

याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली की, ते पाटबंधारे उपविभाग, अंबड येथे कार्यरत असुन त्यांनी त्यांचे भविष्य निर्वाह निधीतुन रक्कम मंजुर करण्यासाठी अर्ज दिला होता, सदरचे अर्जावरुन त्यांचे भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढून देण्यासाठी कार्यकारी अभियंता कार्यालय, पाटबंधारे विभाग, जालना येथील कनिष्ठ लिपीक श्री. महेश रामदासी यांनी तक्रारदार यांचेकडे 3,000/- रूपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदारास कनिष्ठ लिपीक श्री. महेश रामदासी यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली. सदर तक्रारीवरून दि. 22.02.2021 रोजी पडताळणी केली असता कनिष्ठ लिपीक श्री. महेश रामदासी यांनी तक्रारदार यांचेकडे 3,000/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पण्ण झाले. तसेच आज दि. 26.02.2021 रोजी आलोसे कनिष्ठ लिपीक श्री. महेश रामदासी यांनी तक्रारदार यांचेकडून त्यांचे भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढुन देण्यासाठी 3,000/- रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्विकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचे पथकाने अंबड चौफुली चहाचे हॉटेलबर जालना येथे रंगेहाथ पकडले.

लोकसेवक श्री. महेश बाळकृष्ण रामदासी वय 39 वर्ष व्यवसाय नोकरी कनिष्ठ लिपीक, कार्यकारी अभियंता कार्यालय, पाटबंधारे विभाग, जालना रा रो हाऊस नं 12 पांगारकर नगर, अंबड रोड, जालना (वर्ग 3 ) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालू आहे.

तसेच अॅन्टी करप्शन ब्युरो कडून आवाहन करण्यात येते की, कोणी लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 02482 220252, तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. 8975762906, पोलीस निरीक्षक मो.नं. 8390757835, 9823216788 वर संपर्क करावा.


पोलीस उप अधिक्षक, 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जालना.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

ब्रेकिंग लाच प्रकरण : तहसिलचा अभिलेख कक्षपाल(स्टोअर किपर) फेरफार उतारा नक्कल देण्यासाठी ३००रु लाच स्वीकारताना चतुर्भुज


 प्रेसनोट

दिनांक २४/०२/२०२१

शिर्षक :- श्री.महेश्वर नारायण बडेकर, अभिलेख कक्षापाल (रेकॉर्ड किपर) यांनी ८००/- रुपयांची लाच मागणी करुन तडजोडीअंती ३००/- रुपये स्विकारले प्रकरणी गुन्हा दाखल. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग :पुणे परिक्षेत्र,सातारा युनिट
  2. गुन्हा नोंद क्रमांक :कराड शहर पो.स्टे. गु.र.नं.१३५/२०२१
  3. कलम :भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे
  4. आरोपीचे नाव व कार्यालय :लोकसेवक महेश्वर नारायण बडेकर, ४६ वर्षे, अभिलेख कक्षापाल तहसिलदार कार्यालय कराड रा. शिवशक्ती निावास शास्त्रीनगर मलकापूर कराड वर्ग-३ महसूल खाते
  5. मागणी केलेली लाचेची रक्कम :८००/-
  6. स्विकारलेली लाचेची रक्कम :३००/-

थोडक्यात माहिती : तक्रारदार यांच्याकडे त्यांचे फरफार उता-याची नक्कल देण्यासाठी ८००/- रुपयांची लाच मागणी करुन तडजोडीअंती ५००/- रुपये दि.२२/०२/२१ रोजों स्विकारले तसेच सापळा कारवाई दरम्यान दि.२३/०२/२०२१ रोजी ३०० रूपये उर्वरीत लाच रक्कम स्विकारुन वैध परिश्रमिकाहुन अन्य पारितोषण म्हणून आर्थिक फायदा मिळविला म्हणुन त्याचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फ नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्ट्राचारासंवधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरोत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,म.रा.शी संपर्क करावा. संपर्क पत्ता:- पोलीस उपअधीक्षक, अन्टी करशन ब्युरो, सिटी सर्वे नं.५२४,सदरबझार सातारा

संकेत स्थळ:- acbmaharashtra.gov.in

ई-मेलः- acbwebmail@mahapolice.gov.in

ऑनलाईन तक्रार अॅप- acbmaharashtra.net

टोल फ्री क्रमांक:- १०६४

दुरध्वनी क्रमांक:- ०२१६२-२३८१३९

व्हॉटसअॅप क्रमांक :-७८७५३३३३३३


(अशोक शिर्के)

पोलीस उपअधीक्षक,

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा.

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

ब्रेकिंग लाच प्रकरण : जगाच्या पोशिंद्याच्या वाटणी पत्रकाद्वारे फेरफार लावण्यासाठी महसूल मंडळ अधिकारी ४ हजाराची लाच घेताना चतुर्भुज

 


प्रेस नोट ::

दिनांक :- 26.02.2021.

तहसिल कार्यालय अंबड जि.जालना अंतर्गत जामखेड विभागाचे मंडळ अधिकारी श्री. श्रीपाद गंगाधर मोताळे,वय 55 वर्षे, व्यवसाय नोकरी मंडळ अधिकारी,महसूल विभाग जामखेड, तहसिल कार्यालय अंबड जि.जालना. रा.देऊळगाव राजा जि.बुलढाणा.हृ.मु.समर्थ नगर प्लॉट क्र.2.3A जिल्हा परीषदच्या पाठीमागे जुना जालना यास 4,000/- रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना च्या पथकाने पकडले.

1) आरोपीचे नाच,हुद्दा व पत्ता : लोकसेवक श्री.श्रीपाद गंगाधर मोताळे, वय 55 वर्षे, व्यवसाय नोकरी मंडळ अधिकारी,महसुल विभाग जामखेड, तहसील कार्यालय अंबड,जि.जालना.

2) गुन्हा घडला तारीख व ठिकाण : दिनांक 26.02.2021 रोजी जयभद्रा किराणा स्टोअरचे दुकाण पाचोड, जि.औरंगाबाद,

3) लाचेची रक्कम : 4,000/- रुपये.

याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांनी दिनांक 26.02.2021 रोजी तक्रार दिली की, मौजे डोणगाव शिवार ता.अंबड जि.जालना येथेली गट क्र.33 मधील शेत जरमीनीचा वाटणीपत्राच्या आधारे फेरफार झाला असुन सदर शेतजमीनीचे क्षेत्र विभाणी करण्यासाठी महसूल अधिनियम 1966 कलम प्रमाणे क्षेत्र विभागणी करुन देण्यासाठी दिनांक 25/02/2021 रोजी तहसिल कार्यालय अंबड येथे अर्ज दिला.

महसूल विभाग मंडळ अधिकारी जामखेड,तहसिल कार्यालय अंबड जि.जालना यांनी तक्रारदार यांना काल रोजी 10,000/- रुपयांची लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली. सदर तक्रारीवरून आज दिनांक 26.02.2021 रोजी लाचेची पडताळी करुन सापळा लावला असता 4.000/- हजार रुपये लाचेची मागणी केली. लोकसेवक श्री.श्रीपाद गंगाधर मोताळे,वय 55 वर्षे, व्यवसाय नोकरी मंडळ अधिकारी, महसुल विभाग जामखेड,तहसिल कार्यालय अंबड जि.जालना. यांनी स्वतः पंचासमक्ष लाच स्वीकारली असतांना त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना पथकाने जयभद्रा किराणा स्टोअर्स,पाचोड जि. औरंगाबाद येथे रंगेहाथ पकडण्यात आले.

आलोसे श्री.श्रीपाद गंगाधर मोताळे,वय 55 वर्षे, व्यवसाय नोकरी मंडळ अधिकारी,महसूल विभाग जामखेड,तहसिल कार्यालय अंबड जि.जालना. यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालू आहे.

सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक अनिता जमादार, ला.प्र.विभाग औरंगाबाद, पोलीस उप अधिक्षक श्री.रविंद्र डी.निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, एस.एस.शेख तसेच कर्मचारी श्री. ज्ञानदेव गुंड, श्री.मनोहर खंडागळे, श्री. आत्माराम डोईफोडे, श्री. ज्ञानेश्वर म्हस्के, श्री.गजानन कांबळे, श्री. गणेश चेके श्री. जावेद शेख, चालक श्री. प्रविण खंदारे, श्री. आरेफ शेख यांनी पार पाडली.

तसेच अॅन्टी करप्शन ब्युरो कडून आवाहन करण्यात येते की, कोणी लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 02482-220252, तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. 8975762906, पोलीस निरीक्षक मो.नं. 8390757835, 9823216788 वर संपर्क कराया.


पोलीस उप अधिक्षक

अॅन्टी करप्शन ब्युरो, जालना


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

ब्रेकिंग लाच प्रकरणी कारावास : भुमी अभिलेखच्या लिपिकास १० हजारांच्या लाच प्रकरणी ३ वर्षे सक्त मजूरी,१० हजार दंड


लाचखोरी प्रकरणी कारावास

Respected Sir,

 Good Afternoon,

 *Conviction Report*

    Satara Unit


➡ दिनांक-२६/०२/२०२१

➡ स्पे.केस नं. ०५/२०१५

➡ पो.स्टे. :- वाई पोलीस स्टेशन     

➡ गु.र.नं. :- २७/२०१४

➡ आलोसे :- कृष्णात यशवंत मुळीक,  वय-४७ वर्षे, छाननी लिपिक, उप अधीक्षक भुमी अभिलेख वाई, रा.प्लॉट नं.१६, जेजुरीकर कॉलनी, सिद्धनाथवडी, वाई, ता.वाई जि. सातारा, वर्ग-३, खाते - मोजणी खाते.                                   

➡लाच मागणी रक्कम :- १२,०००/-                         

➡लाच स्विकारली रक्कम :- १०,०००/-

➡कोर्ट :- श्री.एन.एल.मोरे, विशेष न्यायाधीश, विशेष न्यायालय, सातारा.

➡ तपासी अधि. :-   १) श्री. श्रीहरी पाटील, तत्कालीन पोलीस उप अधीक्षक, २) श्री.बयाजी कुरळे, तत्कालीन पोलीस निरिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा

➡️ पैरवी अधिकारी :- श्री. अशोक शिर्के, पोलीस उप अधीक्षक,पो हवा. काटवटे  

प्रतिबंधक विभाग, सातारा

➡एपीपी :- श्री. एल. के. खाडे.

➡ शिक्षा :- आलोसे यांस ला.प्र.का.कलम ७ अन्वये - ३ वर्ष सक्त मजुरी व १०,०००/- रु दंड, तसेच कलम १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये - ४ वर्षे सक्त मजुरी व १०,०००/- रु दंड,

 Regards


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ संचलित सी आय एस बी कंपनीचा सुपरवायजर १९०० रु.लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

 


नांदेड (२५ फेब्रुवारी)   

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/घटक : नांदेड  
  2. गुन्हा नोंद क्रमांक व कलम : पोलीस स्टेशन वजीराबाद जिल्हा नांदेड गुन्हा र.नं. 063/2021 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम संशोधन 2018 
  3. आरोपी चे संपूर्ण नाव पद व नेमणुकीचे ठिकाण : आनंद मारोतराव हंबर्डे 28 वर्ष व्यवसाय सुपरवायझर सी आय एस बी कंपनी औरंगाबाद द्वारा स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड राहणार विष्णुपुरी नांदेड 
  4. आरोपीचे खाते व वर्ग : उच्च शिक्षण विभाग 
  5. मागणी केलेली रक्कम : 1900 रुपये मागणी केली 
  6. स्वीकारलेल्या स्वीकारलेली लाचेची रक्कम : 1900 रुपये स्वतः स्वीकारले.

गुन्ह्याची थोडक्यात हकीकत : यातील अलोसे यांनी तक्रारदार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संचलित कै.उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट येथून कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करणारे तक्रारदार यांना कामावरून काढून न टाकण्यासाठी 1900 रुपये लाचेची मागणी करून स्वतः स्वीकारली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क करावा.

SP ACB NANDED 9923028122

LANDLINE NO.02462-255811

TOLL FREE NO. 1064

Website : www.acbmaharashtra.gov.in

Mobile App : www.acbmaharashtra.net

Facebook Page : www.Facebook.com/Maharashtra ACB

Whatsapp No.:9930997700


(विजय डोंगरे) 

पोलीस उप अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

अमेरिका करणार भ्रष्टाचारविरोधी योद्ध्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांचा सन्मान

 

भ्रष्टाचारविरोधी योद्ध्या भारद्वाज
 वॉशिंग्टन (२५ फेब्रुवारी) : बायडेन प्रशासनाने नव्याने सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी पुरस्कारासाठी १२ योद्ध्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत यामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी या मुद्द्यांवर काम करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांचा समावेश आहे. 

दोन दशकांहून अधिक काळ भारद्वाज यांनी भारतामध्ये माहिती अधिकार चळवळीच्या सक्रिय सदस्य म्हणून कार्य केले आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून सांगण्यात आले. ‘ही मान्यता महत्त्वपूर्ण आहे. यामुळे देशात सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना लक्ष्य केले जात असताना, चळवळीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळेल,’ अशी प्रतिक्रिया भारद्वाज यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुधवारी व्यक्त केली. भारद्वाज ‘सजग नागरिक संघटने’च्या संस्थापक आहेत. हा पुरस्कार म्हणजे पारदर्शकतेसाठी काम करणारी उत्साहपूर्ण चळवळ आणि देशभरात माहिती अधिकारांचा व्यापक वापर याला मान्यता आहे, असेही त्या म्हणाल्या.

केवळ वचनबद्ध लोकांसोबत एकत्र काम करून आम्ही यशस्वी होऊ, यामध्ये भ्रष्टाचारविरोधात प्रयत्न करणाऱ्या योद्ध्यांचा आणि आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी स्तर राखण्याची कटिबद्धता पूर्ण करण्यासाठी काम करणाऱ्या देशांचा समावेश आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव टोनी ब्लिंकन यांनी मंगळवारी सांगितले. पारदर्शकतेसाठी, भ्रष्टाचारविरोधात लढण्यासाठी कठीण परिस्थितीत न थकता काम केलेल्यांना समोर आणण्याकरिता मी नवा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी पुरस्कार जाहीर करत आहे, असेही ते म्हणाले.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

गुरुवार, फेब्रुवारी २५, २०२१

ग्रामीण भागात ३,२०० चौरस फुटापर्यंतच्या भूखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

  • ग्रामीण भागातील बांधकामांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागाचा निर्णय

बांधकाम परवानगीसाठी शाखा अभियंत्यांना देणार अधिकार

मुंबई, दि.२५ : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही, अशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली घोषणा.

सुमारे १,६०० चौरस फुटापर्यंतच्या (१५० चौरस मीटर) भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थास मालकी कागदपत्र, लेआऊट प्लॅन/मोजणी नकाशा, बिल्डींग प्लॅन आणि हे सर्व प्लॅन युनिफाईड डीसीआरनुसार असल्याचे परवानाधारक अभियंत्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ग्रामपंचायतीस फक्त सादर करावी लागणार असून आवश्यक विकास शुल्क भरावे लागेल. ही पूर्तता केल्यानंतर ग्रामस्थास थेट बांधकाम सुरु करता येईल. या मर्यादेतील बांधकामास ग्रामपंचायतीच्या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राची (commencement certificate) आवश्यकता लागणार नाही. तर १,६०० ते ३,२०० चौरस फुटापर्यंतच्या (३०० चौरस मीटर) भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थाने युनिफाईड डिसीआरनुसार बांधकामाची परवानगी मागण्यासाठी ग्रामपंचायतीकडे परवानाधारक अभियंत्याद्वारे प्रमाणित आणि साक्षांकीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायत संबंधीत ग्रामस्थास किती विकास शुल्क भरायचे याची माहिती १० दिवसात कळवेल. ग्रामस्थाने ते शुल्क भरल्यानंतर ग्रामपंचायत १० दिवसात कोणत्याही छाननीशिवाय बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र (commencement certificate) देईल. ग्रामपंचायत पातळीवर त्याची अडवणूक होऊ नये यासाठी या पातळीवरील प्रक्रियाही खूप सोपी करण्यात आली आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

शासनाच्या नगरविकास विभागाने युनिफाईड डीसीआर (एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली) जाहीर केली असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन पत्र ग्रामविकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे नगररचनाकाराच्या मंजुरीअभावी रखडलेल्या ग्रामीण भागातील बांधकामातील अडचणी दूर होणार असून त्यास चालना मिळेल. ग्रामस्थांची नगर रचनाकाराच्या मान्यतेसाठी होणारी धावपळ थांबेल, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच ग्रामस्थांना तळमजला अधिक दोन मजल्यापर्यंत किंवा स्टील्ट (stilt) अधिक ३ मजल्यापर्यंत बांधकाम करता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

तथापी, ३,२०० स्क्वेअर फुटावरील भुखंडावरील बांधकामांसाठी मात्र नगररचनाकाराची परवानगी आवश्यक असेल. तसेच रत्नागिरी जिल्ह्याची प्रादेशिक योजना बनविण्याचे काम अद्याप सुरु असल्याने सध्या हा नवीन निर्णय रत्नागिरी जिल्ह्यासाठी लागू होणार नाही.

ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ग्रामीण भागात नागरीक विविध निवासी, व्यावसायिक किंवा इतर बांधकामे करीत असतात. बहुतांश बांधकामे ही छोट्या क्षेत्रफळाची असतात. पण प्रत्येक बांधकामासाठी आतापर्यंत नगररचनाकाराची परवानगी घेणे बंधनकारक होते. त्यामुळे कमी क्षेत्रफळाच्या छोट्या बांधकामासाठीही ग्रामस्थांना तालुका किंवा जिल्हास्तरावर नगररचनाकाराकडे हेलपाटे मारावे लागत असत. पण आता घेण्यात आलेल्या निर्णयामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार असून त्यांची वणवण थांबणार आहे.

बांधकाम परवानगीसाठी शाखा अभियंत्यांना देणार अधिकार

ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना सवलत देण्यात आली असली तरी उर्वरित ३,२०० स्क्वेअर फुटावरील भुखंडावरील निवासी, व्यापारी व इतर बांधकामाच्या परवानगीसाठी नगररचना विभागाकडे जावे लागणार आहे. तथापी, गेल्या ४ ते ५ वर्षांमध्ये नगररचना विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे नागरिकांना वेळेत बांधकाम परवाने न मिळाल्याने त्यांना फारच अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. बांधकामावर परिणाम झाला आहे. तसेच बँकेकडून अर्थसहाय्य मिळू शकले नाही. नागरीकांचे स्वतःचे हक्काचे छत निर्माण होवू शकले नाही. या निर्णयामुळे मर्यादीत बांधकामांना परवानगीची गरज नसली तरी एमआरटीपी कायद्यामुळे परवानगीसाठी ३८७ पदे निर्माण करणे आवश्यक आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता ग्रामविकास विभाग पुढाकार घेत आहे. सध्या राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच तालुकास्तरावर बांधकाम, पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंते कार्यरत आहेत. आता त्यांनाच टाऊन प्लॅनरचा दर्जा देवून तसेच त्यांना नगरविकास विभागामार्फत यशदामध्ये प्रशिक्षण देवून, ही कामे देवून बांधकाम परवाने मिळण्यामध्ये सुलभता येवू शकते. हा प्रस्ताव तात्काळ नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येईल, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

महाआवास अभियानास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ_ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 


मुंबई (२३ फेब्रुवारी) : राज्यात 1 एप्रिल २०२० पासून आतापर्यंत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील ३ लाख ३७ हजार ९७८ लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून २ लाख ९८ हजार ०९७ लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे प्रदान करण्यात आले आहे. आतापर्यंत १ लाख ८५ हजार ०३० घरकुले बांधून पूर्ण झाली असून उर्वरीत घरकुले 31 मार्चपर्यंत पूर्ण करुन “मिशन झीरो” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महाआवास अभियानास 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज येथे केली.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, घरकुलविषयक सर्व योजना ह्या ग्रामीण भागातील गरीब, बेघर यांना दिलासा देणाऱ्या आणि घरकुलाचे त्यांचे स्वप्न साकार करणाऱ्या महत्त्वाच्या योजना आहेत. या योजनांसाठी काम करणे हे एक प्रकारचे सामाजिक कार्य आहे. त्यामुळे घरकुलविषयक सर्व योजनांची जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रभावी अंमलबजावणी करुन ग्रामीण गरीब, बेघरांना घरे उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जागा उपलब्ध नसल्यामुळे राज्यात ७४ हजार ३७३ पात्र लाभार्थ्यांना घरकुले बांधता आली नाहीत. या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. गायरान तसेच शेती महामंडळाच्या जागा घरकुल बांधकामांसाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण महसूल मंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असेही मंत्री श्री.मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालयात आज यासंदर्भातील कार्यक्रम झाला. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे, आयआयटीचे प्रा.प्रकाश नाथागोपालन, रिलायन्स फाऊंडेशनचे अभिजित ठाकरे, हुडकोचे प्रादेशिक प्रमुख व्ही. टी. सुब्रम्हण्यम, राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माणचे उपसंचालक मंजिरी टकले, निलेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते. ऑनलाईन प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

Popular posts लोकप्रिय पोस्ट