पोस्ट्स

लसीकरण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा घेतला आढावा

इमेज
राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा घेतला आढावा. राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाकडून लसींचा अधिकाधिक पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना. राज्यात दररोज ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण ८२ लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर; मुख्य सचिवांकडून लसीकरणाचा आढावा मुं बई,दि 6 एप्रिल : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या. कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सुकाणू समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिवांनी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा आढावा घेतला. शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, महसूल विभागाचे अपर...