🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील ला 40 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या

 


मुंबई,दि ८ ऑक्टोबर २०२१ : ACB Trap on Sujata Patil | राज्य पोलिस दलातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिध्दी झोतात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई ( ACB Trap on Sujata Patil) केल्याची माहिती समोर येत आहे. एसीबीच्या पथकाने सापळा रचुन सुजाता पाटील यांच्यावर कारवाई केल्याने राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.


मेघवाडी डिव्हीजनच्या (meghwadi division) सहाय्यक आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर अॅन्टी करप्शनने काही वेळापुर्वी कारवाई केल्याचं सांगितलं जातंय. तक्रारदाराकडे 1 लाख रूपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली होती. तडजोडीअंती 40 हजार रूपये देण्याचं ठरलं आणि त्याच प्रकरणी सुजाता पाटील यांच्यावर काही वेळापुर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं (anti corruption bureau) कारवाई केली आहे. अॅन्टी करप्शनच्या (ACB, Maharashtra) कारवाईनं राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

VIDEO : मुगाव जि.प शाळेचा वाचाळवीर मुख्याध्यापक शेख नजीर विरुद्ध पालकासोबत अभद्र भाषेचा वापर करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी निलंबनासह विभागीय चौकशीची कारवाई प्रस्तावित

 


नायगाव, दि 7 ऑक्टोबर 2021 : नायगाव तालुक्यातील मुगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक शेख नजीर ने मुलांना शिकवत का नाही असे विचारणा करणा-या पालकासोबत अभद्र भाषेचा वापर करत घाणघाण शिव्या दिल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या सूचनेनुसार गटशिक्षणाधिकारी यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दिनांक 7 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी ११:४५ वाजता मुगाव येथील गजानन लघुळे यांचा मुलगा व ईतर विद्यार्थी लवकर घरी निघून आले होते.शाळा सुरू असताना तुम्ही घरी का आल्या असे म्हणत त्यांनी लवकर घरी येण्याचे कारण मुलाला विचारले.ते मुलांनी शाळेत काहिच शिकवत नाहीत असे पालकाला सांगितले.हे ऐकून तब्बल दिड वर्षांपासून कोरोनामुळे महामारीमुळे शाळा बंद होत्या आणि आत्ताकुठे चार दिवस झाले शाळा सुरू होऊन शिक्षक का शिकवत नाहीत याची विचारणा करण्यासाठी गजानन लघुळे हे आपल्या पाल्याला घेऊन शाळेत गेले.तेथे जाऊन मुख्याध्यापक शेख नजीर अहमद याची भेट घेतली व तुम्ही मुलांना का शिकवत नाही अशी विचारणा केली.


मुख्याध्यापक शेख नजीर याने पालकाचे काही एक ऐकून न घेता गजानन लघुळे यांना तु याद राख, मुगावला आलाव तुला उटीतो साल्या म्हणायला सुरुवात केली,गजानन लघुळे हे तुम्ही 12 वाजेपर्यंत काय केल्या हे सतत विचारत आहेत तरी त्यावर शांतपणे समर्पक उत्तर न देता,.....केलाव,.....केलाव,मझं.....केलाव,तुझे पोरं.....मधे आहेत,अरं रेकॉर्डिंग कर, माईक लाव र,अबे माईक लाव मझं  माईक लाव,दारु पिऊन आलाव,शिकिना र,शिकिना र,मझी रेकॉर्डिंग कर, रेकॉर्डिंग कर बे, तु व्हिडिओ कर,जिल्हा परिषद नांदेडला माईक लाव,पिदाड्या...पिदाड्या...,तुझी मरेपर्यंत जमानत व्हयना, मोबाईल रेकॉर्डिंग कर बे,दिल्ली ला लाव,आर दिल्लीला लाव र म्हणत हाताने ईशारे करताना शेख नजीर व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये दिसत आहे.अशा अभद्र भाषेचा वापर करत असताना विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या शाळेत मुख्याध्यापक शेख नजीर याची एका पालकासोबत वापरत असलेले गलिच्छ शब्द शाळेत शिकून सुसंस्कारित होण्यासाठी आलेल्या बालकांच्या कानावर पडत होते,सर्व विद्यार्थी दंग होऊन शेख नजीरने चालवलेली दंडेलशाही पहात,ऐकत होते.तुला जिंदगीभर जेलमध्ये सडवतो,......अशा अभद्र भाषेचा वापर करुन तो तेवढ्यावरच थांबला नाही.मुख्याध्यापक असलेल्या शेख नजीरचा हा सर्व प्रकार पाहून जवळच असलेल्या पालक गजानन लघुळे यांचा पाल्य आपल्या वडिलांना घरी चला असे म्हणत रडत आहे.हे सर्व पाहून देखील बेभान झालेला मुख्याध्यापकाने एवढ्यावरच न थांबता,रानटी माणसा सारखे शेताच्या धु-याचे भांडण असल्या सारखे मुलासमोरच त्याच्या वडिलांना माईला बाईला शिव्या देणे चालूच होते.थोड्या वेळाने शेख नजीर ने आपल्या मोबाईलवरून कुणालातरी फोन करून फोन वर पोलीस स्टेशन ला फोन लावा मझी नोकरी संपली, कुणालाही शाळेत ठेवणा शाळेला कुलूप लावतो,नरसीहून पोरं बोलवतो,मुलाला फोन लावतो असे सांगत होताा.शाळेत शिकण्यासाठी येणारा मुलगा शिक्षकाचे हे वागने पाहून शाळेत,वर्गात कसा बसेल,बसूच शकत नाही.जीवनाला वळण लागण्याच्या वयात शिक्षकाकडून असे तालिबानी शिक्षण मिळत असेल तर पुढील पिढी सुसंस्कृत कशी तयार होणार? शेख नजीरने त्याच्या या अशा वागण्यामुळे शिक्षकी पेशेला काळीमा फासण्याचे काम केले आहे,याचे कुणीही समर्थन करणार नाही.दिड वर्षांपासून फुकट पगार घेऊन गंडारुन गेलेल्या शेख नजीर यांने पालक गजानन लघुळे यांना कुणालाही ऐकावं वाटणार नाही अशा अभद्र भाषेचा वापर करुन घाण घाण शब्दात शिव्या दिल्याचा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणा-या व्हिडिओ मध्ये पालकाशी हुज्जत घालत शिव्या देताना पहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर कारवाई ची सूत्रे हालण्यास सुरुवात झाली आहे.निलंबनाचे आदेश देण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.निलंबनासोबत मुख्याध्यापक असलेल्या शेख नजीर विरुद्ध विभागीय कारवाई देखील प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे समजते.या प्रकरणाने मुख्याध्यापक शेख नजीरने अनेक वेळा पालकांशी असे वर्तन केले असल्याची माहिती समोर आली आहे.त्याचे आपल्या सहशिक्षकांसमवेत सुद्धा वागणे बोलणे योग्य नसल्याची बाब उघडकीस आली आहे.हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गावातील नागरिकांनी शाळेत जाऊन धारेवर धरल्यावर स्वतःची चूक कबूल करत शेख नजीरने गावकऱ्यांसमोर नाक घासत ज्या पालकाचा शाळेत अपमान केला होता त्यांची माफी मागून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता असे अपमानीत झालेल्या गजानन लघुळे यांनी सांगितले.या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर शेख नजीर वर शिविगाळ करुन एखाद्या पालकाला अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल त्यांच्यावर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात येतो की असेच सोडून देण्यात येते हे पहावे लागणार आहे.या प्रकारामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संताप चढलेला आहे.


Popular posts लोकप्रिय पोस्ट