ॲंटी करप्शन ब्यूरो, सातारा यांचे वतीने दक्षता जनजागृती सप्ताह साजरा
संपादक - संजय चिखले मरवाळीकर सातारा,दि.०४ नोव्हेंबर २०२४: राज्यामध्ये प्रतिवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिनांक ३१ ऑक्टोंबर या जन्मदिवसाचे औचित्य साधून एक आठवडा 'दक्षता जनजागृती सप्ताहाचे (Vigilance Awareness Week) आयोजन करण्यात येते. या वर्षी दिनांक २८/१०/२०२४ ते दिनांक ०३/११/२०२४ या दरम्यान केंद्रीय दक्षता आयोग व महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभर दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. यंदाच्या दक्षता जनजागृती सप्ताहाचे ब्रीदवाक्य' सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृद्धी ' हे ठेवण्यात आलेले आहे. दिनांक २८/१०/२०२४ ते दिनांक ०३/११/२०२४ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे अनुषंगाने सातारा जिल्हयातील सातारा, कराड, पाटण, जावली (मेढा), महाबळेश्वर, वाई, खंडाळा, माण, वडूज, लोणंद व फलटण या सर्व तालुक्यातील २७९ शासकीय कार्यालयाचे आवारात व जनजागृती होण्याकरीता टोल फ्रि क्रमांक १०६४ संबंधाने हॅण्डबिलचे वाटप केले. पोस्टर चिकटवले तसेच लोकांना लोकसेवका बद्दल लाच मागणीची तक्रार देण्याबाबत प्रोत्साहीत करण्यात आलेले आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व नागरीकांची जनजाग...