🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, डिसेंबर ३१, २०२४

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर खोडवे यांचे उत्कृष्ट कार्या बदल पोलीस अधीक्षक नांदेड यांनी बक्षीस देवुन केला सन्मान...

 

By संजय चिखले मरवाळीकर

नांदेड,दि.३० डिसेंबर: अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे नेमणुकीस असलेले श्री सुधीर भालचंद्र खोडवे यांनी दिनांक 10 डिसेंबर, 2024 रोजी सायंकाळी 07.30 वा. चे सुमारास नांदेड उत्तरचे आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या घराजवळील स्टेट बँकेसमोर उभ्या असलेल्या कारने पेट घेतला असता बघ्याची गर्दी जमली असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर भालचंद्र खोडवे, हे तिथुन जात असतांना त्यांनी जमलेली गर्दी पाहुन सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी चारचाकी वाहन क्रमांक एमएच-20/ईई-7982 ही जळत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी कोणीही मदतीला जात नव्हते अशावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन समोर असलेल्या बेकरी य आजुबाजूला असलेल्या घरातुन बकेटमध्ये पाणी घेतले आणि आगीवर नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे आग बघणारे अनेक जण होते कांही तर मोबाईलमध्ये शुटींग करीत होते परंतु कोणीही ही आग विझविण्याकरीता धावुन आले नाही. आगीमुळे निर्माण होणारा पुढील अनर्थ टळला आहे. त्यांनी या पुर्वी सुध्दा उत्तम कामगीरी केली आहे.


त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगीरीमुळे त्यांनी केलेले हे कार्य निश्चितच प्रशंसनीय असून पोलीस दलाचे नावलौकीक वाढवणारे आहे. त्यामुळे श्री अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी बक्षीस व प्रशस्तीपत्र देवुन सन्मान केला आहे.


श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, डॉ. अश्विीनी जगताप, गृह पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी त्यांचे उत्कृष्ट कामगीरी बदल कौतुक केले आहे.

(श्री सुधीर भालचंद्र खोडवे हे पुर्वी नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे कार्यरत होते.)


शुक्रवार, डिसेंबर २७, २०२४

वृत्त क्र.1232 - स्वामित्व योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप

प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद साधतील 

 राज्याच्या स्वामित्व योजनेला देशभरात मान्यता


By संजय चिखले मरवाळीकर

नांदेड दि. 26 डिसेंबर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या स्वामित्व योजनेला देशभरात मान्यता मिळाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे या योजने अंतर्गत वितरण करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत उद्या दिनांक 27 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींना सनद वाटप होणार आहे. 

लाभार्थ्यांना माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार तुषार राठोड ,अन्य लोकप्रतिनिधींच्या व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सनद वाटप करण्यात येईल. तसेच देशभरातील लाभार्थ्यांशी यावेळी प्रधानमंत्री संवाद साधतील. 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजता स्वामित्व योजने अंतर्गत सनद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 

विभागात विशेष शिबिर घेवून सनद वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, महसूल, भूमीअभिलेख व अन्य विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री यांच्या हस्ते स्वामीत्व हक्क योजनेअंतर्गत 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे , सनदचे ई वितरण होणार आहे .तसेच या योजनेतील काही लाभार्थ्यांची प्रधानमंत्री थोडक्यात संवाद साधतील. 

स्वामित्व योजनेचे फायदे  

अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने गावाठाणातील मिळकतीचे अचूक मोजमाप, नकाशा आणि मालमत्ता पत्रक तयार करणे सोपे व सुलभ झाले आहे, सिमा निश्चिती आणि मोजमापाची कामे आता अधिक प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होतील,मालमत्तेची कायदेशीर मालकी आणि सुरक्षिततेची हमी,कर्ज मिळण्याची सुलभ सुविधा, जमीनीशी संबंधित मतभेदाचे त्वरित निराकरण,मालमत्तेचे विभाजन अधिक सुलभ, गावांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा व चालना मिळणार आहे. त्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

00000




 

मंगळवार, डिसेंबर २४, २०२४

संघटन पर्व: भाजपा राष्ट्रीय सदस्यता अभियान - २०२४ अनुषंगाने भाजपा नांदेड दक्षिण ची जिल्हा कार्यशाळा संपन्न

By संजय चिखले मरवाळीकर

नांदेड,दि.२३ डिसेंबर: विष्णुपुरी, नांदेड येथील शैक्षणिक प्रतिष्ठान सहयोग कॅम्पस या ठिकाणी सोमवार, दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजताच्या दरम्यान भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण जिल्हा च्या वतीने सदस्यता नोंदणी अभियानाचे जिल्हा संयोजक डॉ.माधवराव पाटील उच्चेकर यांच्या विनंतीवरून जिल्हाध्यक्ष मा.डॉ.संतुकराव हंबर्डे यांचे अध्यक्षतेखाली संघटन पर्व: भाजपा राष्ट्रीय सदस्यता नोंदणी अभियान - २०२४ अंतर्गत जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यशाळेला सुरुवात करण्या आधी दीपप्रज्वलन करून भारत माता, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारत माता की जय च्या जयघोषाने पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

मार्गदर्शक म्हणून विभाग संघटनमंत्री मा.संजयजी कौडगे होते, तसेच या कार्यशाळेस मा.खासदार,मा.आमदार,प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य,प्रदेश मोर्चा पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी,जिल्हा मोर्चा अध्यक्ष,आघाडी, प्रकोष्ठ, सेल जिल्हा संयोजक,मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस,माजी जि. प. सदस्य,सोशल मिडिया संयोजक,सदस्यता अभियान जिल्हा समिती,विस्तारक या अपेक्षितांची उपस्थिती अनिवार्य होती.या कार्यशाळेच्या माध्यमातून भाजपा सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.

या प्रसंगी मंचावर जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे मराठवाडा विभागीय संघटनमंत्री संजयजी कौडगे, प्रदेश सचिव देविदासजी राठोड, भाजपा ज्येष्ठ केरबाजी सावकार बिडवई, जिल्हासरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, डॉ. माधव पाटील उच्चेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सतीश अण्णा गोड, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व मोर्चा व प्रकोष्ठचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण जिल्हा संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत जिल्हा कार्यशाळेचे आयोजन आज शैक्षणिक...

Santuk Hambarde यांनी वर पोस्ट केले सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

सोमवार, डिसेंबर १६, २०२४

शासन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल-डॉ हनुमंत भोपाळे

 

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची सहविचार सभा
संजय चिखले पाटील मरवाळीकर

नायगाव बा.(जि:नांदेड), दि.१४ डिसें २०२४- काय गोड तर काम गोड असते. कामाला सुस्वभावाची जोड असेल आणि आपल्याकडे कौशल्य अन् क्षमता असेल तर नक्कीच भवितव्य आहे, त्यामुळे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये काम करत असलेल्या युवकांनी सकारात्मक राहून प्रशिक्षणकार्य पूर्ण करावे. नक्कीच शासन प्रशिक्षणार्थींना न्याय देईल असा आशावाद मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण संघटनेचे संस्थापक प्रोफेसर डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण राज्य संघटनेच्या वतीने नायगाव तालुक्यातील गंगणबीड येथील महादेव मंदिराच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

महाराष्ट्रातील शैक्षणिक पात्रताधारक युवक आणि युवतींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडून प्रशिक्षण घेण्याची संधी देण्यात आली आहे. बारावी पास, पदविका आणि पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अनुक्रमे सहा, आठ आणि दहा हजार रूपयांचे विद्यावेतन देण्याचे निश्चित केले, पण विद्यावेतन वेळेवर मिळत नाही. तसेच हे विद्यावेतन तुटपुंजे असल्याने प्रशिक्षणार्थींना हेळसांड होत आहे. नियमानुसार काम आणि वेळेवर द्यावे. ही प्रशिक्षणार्थींची मागणी न्याय्य असून सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करून ती मागणी पूर्ण करावी. सहा महिन्यानंतर आम्हाला काय भवितव्य आहे, या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. भोपाळे म्हणाले की, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आमचे लाडके भाऊ जिथे काम करत आहेत तिथेच कायम (पर्मनंट) होतील, असे आश्वासन दिले आहे. हे आश्वासन ते नक्कीच पूर्ण करतील.

9 जुलै 2024 च्या जीआरमध्ये या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग, आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवारांची इच्छूकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. शासनाने तसा निर्णय घेण्यासंबंधी आस्थापना यांना आदेशित करून आस्थापना पगार देणार नसेल तर शासनाने त्यांचा पगार देण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती त्यांनी शासनाला केली. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील
लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या संदर्भात सकारात्मक आहेत त्यामुळे युवकांनी निराश होऊ नये. लवकर मिनी मंत्रालय समजल्या जाणा-या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत,महायुतीने विधानसभेवर झेंडा फडकवला आणि त्यांना महाराष्ट्रातील मिनी मंत्रालयावरदेखील त्यांना झेंडा फडकावयाचा आहे. त्यामुळे ते नक्कीच लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणांना नाराज करणार नाहीत आणि म्हणून शासन नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा वाटते असे प्रतिपादन प्रोफेसर हनुमंत भोपाळे यांनी केले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले

यावेळी भोपाळे यांनी युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची सकारात्मक उत्तरे दिली.या सहविचार सभेला गंगाधर बालाजी शिंदे, वाघमारे हनुमंत मधुकर ,जाधव इंद्रजीत गोविंदराव, कांबळे राजेश शिवाजी, नरसीकर आकाश नंदकिशोर, पवार संतोष शंकर, दासरवाड गंगाधर शिवाजी, लुटके लक्ष्मण पंढरी, मंगेश बालाजीराव आनेमवाड, मिटके साईनाथ सुरेश,कोमल विठ्ठल शिंदे, भगवान संभाजी पांचाळ ,शिवप्रसाद आनंदराव मिर्झापुरे, सुरज कोंडीबा गलांडे, सचिन अनुरथ शेळके, भारती राजाबुवा शंकर, चिखले अवधूत शिवाजी, मुतखेडे विनोद शिवाजी, परडे राहुल बालाजी ,लव्हाळे नारायण उत्तमराव ,होळकर गजानन साहेबराव, कदम कृष्णा रावसाहेब, पांडे शिवराज दादाराव, जुने विठ्ठल रावसाहेब, वाघमारे केशवराव साहेब सूर्यवंशी कल्याण योगेश्वर संभाजीराव भोगे निखिल विश्वनाथ ,जगदीश गंगाधर भिलवंडे , कैलास गोविंदराव पांचाळ ,जगदीश बालाजी नरहरे, श्यामसुंदर लिंगुराम कर्वेडकर , गोरगे मनमत नागोराव, गजले जगदीश व्यंकटराव, बसवेश्वर शिवाजी महाजन, नरेश शंकराव अरगुलवार, शैलेश संभाजी स्वामी, अनिरुद्ध साहेबराव भदर्गे ,बोरगे शिवाजी गुलाबराव, मुर्के साहेबराव प्रभाकर, दासरवाड हनुमंत गंगाधर, बालाजी साहेबराव दुरे, प्रसाद उत्तमराव पांडे, सचिन बालाजी पगलवाड, सरस्वती लक्ष्मण गजलेकर, सुनील बालाजीराव हांडे, माधव देविदास खांडरे, धीरज गोविंद शिंदे, साबळे परमेश्वर रावसाहेब, कैलास दगडू शिरसे , रहमान सत्तार बिरबल, मोईन हैदराबाद शेख, दशरथ रंगराव पवार , योगेश्वर वसंतराव भालेराव , नितीन पिराजीराव महादळे, शिरसे अनिकेत आईनाथ, कदम अरुणा संतोष, जाधव राजेश्वर अशोक, कपिल रामराव गोंशेट्वाड, बारदेसंगम रमेशराव संतोष, भिवाजी तेलंग साईप्रसाद गंगाधरराव जळपतवार ,गणेश प्रभू पुरी, हैदर रहमान शेख, अनिता संतोष तेलंग, रोडे सुप्रिया राजाराम, पवार वैष्णवी माधवराव, सोनूताई धनराज कदम, मंगेश विलासराव देशमुख, अमित शिवकुमार भांगे, पिराजी पांडुरंग श्रीमलवार, श्रीकांत बाबना बहनवाड, तिरुपती व्यंकटराव डोईफोडे, मारुती संभाजी चेरकेवाड,मानसिंग संतोषसिंह तोर, प्रेमुलवाड शिवकुमार माधवराव, चक्रधर मुरलीधर पुयड, जयराम नामदेव गाडेकर, सचिन राजाराम दासरवाड, उंबरे रोहित सोपानराव, शिवदास हरिदास कुराडे, ज्ञानेश्वर गंगाधर तोडे, संतोष सुधीर भिसे, साईनाथ चंद्रकांत जिंके, विजयकुमार नारायण अमृतवार, जयश्री विलास वाघमारे, श्रीनिवास नागनाथ करपे, रमेश अर्जुन कांबळे, यशवंत कांबळे, प्रदीप शिवराम राठोड, पांडुरंग बाबाराव राठोड, ज्ञानेश्वर नागोराव देगावे, गजानन केशव सूर्यवंशी, जाधव हनुमंत गोविंदराव, कापसे व्यंकट आनंदराव, गायकवाड प्रसाद चांदू, हेमलवाड गंगाप्रसाद, सय्यद जबार पीरसाब, जोंधळे प्रदीप अशोकराव, साईनाथ गंगाधर चंदनकर, परमेश्वर साहेबराव कांबळे, संदीप मारुती मस्के आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर घंटेवाड, बालाजी मंडलापुरे, परमेश्वर कांबळे, ज्ञानेश्वर तोडे, प्रसाद पांडे, प्रदीप जोंधळे आदींनी परिश्रम घेतले.

गुरुवार, डिसेंबर १२, २०२४

रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर

 

प्रधानमंत्री फसल बीमा योजना

संजय चिखले

मुंबई, दि.१२ : राज्य शासनामार्फत रब्बी हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा उतरवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे.

राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२३ पासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. चालू रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्या.

महाराष्ट्रात रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच रब्बी कांदा पिकासाठी भाग घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे. तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी ही मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. गतवर्षी रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये विमा योजनेत साधारणता ७१ लाख विमा अर्ज प्राप्त झाले होते.

स्त्रोत: महासंवाद

मंगळवार, नोव्हेंबर १९, २०२४

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या माध्यमातुन देव, देश व धर्म लक्षात ठेवून हिंदू समाजाने १००% मतदान करावे असे आवाहन संत प्रवासातून संतांनी केले

 संत प्रवासामुळे जिल्ह्यात वातावरण भगवेमय झाले


संजय पाटील चिखले मरवाळीकर

नांदेड,दि.१९ नोव्हेंबर : लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुशंगाने हिंदु समाजाने १००% मतदान करावे असे आवाहन विश्व हिंदुपरिषद व बजरंग दलाच्या माध्यमातुन करण्यात आलेल्या संत प्रवासात समाविष्ट असलेल्या श्री विरुपक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठसंस्थान मुखेड, श्री व्यंकटाचार्य स्वामी बालाजी मंदीर संस्थान गाडीपुरा नांदेड, श्री योगीपुरन्नाथ महाराज (सोनखेड), श्री चंद्रकांत महाराज लाठकर, श्री श्रीधर महाराज कासराळीकर, श्री भुजंग महाराज, श्री दुधाटे महाराज, श्री मधुसुदन महाराज कापसीकर, इतर महाराजांनी केली. 

या मागचा उद्देश हा फक्त मतदारांसह हिंदुसमाजाने १००% सहभाग नोंदवत देव, देश व धर्मासाठी मतदान करावा हाच असल्याचे विश्व हिंदु परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंदजी शेंडे, प्रांत मंत्री योगेश्वरजी गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रांत संघटन मंत्री गणेशजी मोकाशी यांचा या अभियानासाठी विशेष प्रवास, कृष्णाजी देशमुख प्रांत कार्यकर्ते, गजानन पांचाळ प्रांत सहसंयोजक, रविकुमार चटलावार वि.हि.प जिल्हाध्यक्ष, गणेशजी महाजन जिल्हा कोषाध्यक्ष, विभाग सहमंत्री शशिकांत पाटील, जिल्हामंत्री राजकुमार गोडसे, राजेशजी महेत्रे, सहमंत्री गणेश कोकुलवार, जिल्हा संयोजक सदाशिव दुधाटे, राजेशजी देशमुख विशेष संपर्क, प्रेमानंद शिंदे, सहसंयोजक ऋषीकेश गोगरोड, कृष्णा इंगळे, अॅड. महेश कुलकर्णी ता. अध्यक्ष, सुदर्शन रुमने ता. अध्यक्ष, प्रशांत रापतवार ता. अध्यक्ष, मारोती पाटील तालुका मंत्री, अविनाश डोपोड ता. संयोजक, गणेश यशवंतकर, शुभम ठाकुर, श्रीधर शर्मा, आकाश कापकर, अनंत मरेवार, अक्षय ठाकुर, शंकर अनंतवाड, कैलास बंडगर, राजु माहेवार, साईप्रसाद गंगलोड, बसजीत अरगुलवार, साईनाथ बुच्छलवार, दिनेश बोईनवाड, राहुल समुद्रे, विठ्ठल राठोड, साईनाथ लंगडे ता. मंत्री, योगेश गडपवार, शिवाजी पांचाळ, माधव ताटे, अमोल अबादार, राजु बारतोंडे, माधव पाटील, नागेश मुपडे, कैलास राजरवाड, विश्वनाथ करुळे, मारोती वडजे ता.संयोजक, गिरीश वजलवाड, सुरेश केंद्रे, सदानंद राजुरे, चंद्रशेखर मोरे, श्री गंगाधर पाटील, महेश मुक्कावार, शंकर नाईनवाड ता.संयोजक, नागेश मोरचोंडे ता. मंत्री, उमाकांत लघुळे, गणेश शिंदे, अतुल बिच्चेवार, शैलेश बोगुलवार यांच्यासह, अनेकांनी १२० गावात संतप्रवास व कार्यकर्ता पत्रक प्रवासात ३५७ गावात हिंदु समाजाचे १००% मतदान वाढीसाठी प्रवास केला आहे.

या प्रवासामुळे जिल्ह्यात संपुर्ण वातावरण भगवेमय झाल्याची माहिती जिल्हा मंत्री राजकुमारजी गोडसे मुदखेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Tags: #विधानसभा_निवडणुक_२०२४

#संत_प्रवास 

#मतदार_जनजागृती 

#हिंदू

सोमवार, नोव्हेंबर ०४, २०२४

ॲंटी करप्शन ब्यूरो, सातारा यांचे वतीने दक्षता जनजागृती सप्ताह साजरा

 


संपादक - संजय चिखले मरवाळीकर

सातारा,दि.०४ नोव्हेंबर २०२४: राज्यामध्ये प्रतिवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिनांक ३१ ऑक्टोंबर या जन्मदिवसाचे औचित्य साधून एक आठवडा 'दक्षता जनजागृती सप्ताहाचे (Vigilance Awareness Week) आयोजन करण्यात येते. या वर्षी दिनांक २८/१०/२०२४ ते दिनांक ०३/११/२०२४ या दरम्यान केंद्रीय दक्षता आयोग व महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभर दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. यंदाच्या दक्षता जनजागृती सप्ताहाचे ब्रीदवाक्य' सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृद्धी' हे ठेवण्यात आलेले आहे.
दिनांक २८/१०/२०२४ ते दिनांक ०३/११/२०२४ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे अनुषंगाने सातारा जिल्हयातील सातारा, कराड, पाटण, जावली (मेढा), महाबळेश्वर, वाई, खंडाळा, माण, वडूज, लोणंद व फलटण या सर्व तालुक्यातील २७९ शासकीय कार्यालयाचे आवारात व जनजागृती होण्याकरीता टोल फ्रि क्रमांक १०६४ संबंधाने हॅण्डबिलचे वाटप केले. पोस्टर चिकटवले तसेच लोकांना लोकसेवका बद्दल लाच मागणीची तक्रार देण्याबाबत प्रोत्साहीत करण्यात आलेले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व नागरीकांची जनजागृती होणेकामी आकाशवाणी सातारा येथे दिनांक २९/१०/२०२४ रोजी निवेदन देण्यात आलेले होते त्याचे आकाशवाणी सातारा यांचेकडुन दिनांक ३१/१०/२०२४ रोजी ०९.३० वाजता प्रसारण करण्यात आले आहे. सातारा एस.टी. स्टॅन्ड वरील ध्वनिक्षेपकावरून सर्व प्रवासी नागरिकांना एकत्र करून दक्षता जनजागृती सप्ताहाचा उद्देश समजावून सांगुन मार्गदर्शन केले व आकाशवाणी सातारा येथुन प्रसारीत करण्यात आलेली मुलाखतीची क्लीप बसस्थानकावरील ध्वनीक्षेपकावरून प्रसारीत केली तसेच सदरची क्लीप ही सातारा जिल्ह्यातील सर्व बसस्थानकावर प्रसारीत करणेकामी आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधुन जिल्हयातील सर्व बसस्थानकावर मुलाखत प्रसारीत करून जास्तीत जास्त नागरीकांना तक्रारी देण्याबाबत प्रोत्साहीत केलेले आहे.
सप्ताह यशस्वी करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक श्री राजेश वाघमारे यांचेसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व सहकारी यांनी परिश्रम घेतले.

१. टोल फ्री क्रमांक
१०६४,

२. अॅन्टी करप्शन ब्यूरो, सातारा दुरध्वनी क्रमांक ३ ०२१६२-२३८१३९.
. श्री. राजेश वाघमारे, पोलीस उप-अधीक्षक मोबा. क्रमांक-९५९४५३११००, ९७६३४०६५००,

३. ई-मेल आयडी
- dyspacbsatara@gmail.com
- dyspacbsatara@mahapolice.gov.in

४. संपर्कासाठी पत्ता
(राजेश वसंत वाघमारे)
पोलीस उप-अधीक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा
५२४ अ सदर बझार, जिल्हा न्यायालयासमोर, सातारा


शुक्रवार, ऑक्टोबर २५, २०२४

भ्रष्टाचार रोखण्यासाठी २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान ‘दक्षता जनजागृती सप्ताह’

लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार 
संपादक -संजय चिखले मरवाळीकर 
मुंबई, दि. २५: भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृती उपक्रम राबविले जातात. भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी नागरिकांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने जाहीर केल्यानुसार 28 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाकरीता यावर्षी सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृद्धी ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. सप्ताहाचा प्रारंभ येत्या 28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाच्या प्रतिज्ञेने होणार आहे.

कुणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना, भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, 91, सर पोचखानवाला मार्ग, वरळी मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1064, दूरध्वनी क्रमांक 022-24921212, अथवा संकेतस्थळ https://acbmaharashtra.gov.in/, ईमेल acbwebmail@mahapolice.gov.in, addlcpacbmumbai@mahapolice.in, फेसबुक www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप acbmaharashtra.net, ट्विटर – @ACB_Maharashtra आणि 9930997700 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप दिवाण, अपर पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांनी केले आहे.

निलेश तायडे/विसंअ

शनिवार, ऑगस्ट १७, २०२४

डॉ. दिगंबर प्रधान यांनी सांभाळला पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचा कार्यभार


New S.P ACB Nagpur

संपादक- संजय चिखले
नांदेड,दि.१६/०८/२०२४: दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र शासन गृह विभागामार्फत भारतीय पोलीस सेवा/ राज्य पोलीस सेवेतील अधिकारी यांच्या बदली/पदस्थापनेबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर आदेशान्वये पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र येथे डॉ. दिगंबर प्रधान, भापोसे यांची बदली करण्यात आलेली होती.

आज दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी डॉ. दिगंबर प्रधान, भापोसे यांनी श्री राहुल माकणीकर यांचेकडून पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर पदाचा कार्यभार स्विकारलेला आहे. डॉ. दिगंबर प्रधान यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण (एम.बी.बी.एस) शासकीय मेडीकल महाविद्यालय, मिरज जि. सांगली येथून पुर्ण केलेले आहे. सन १९९८ मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली. त्यांनी पोलीस उपअधीक्षक या पदावर तासगावं, मिरज, कराड इ. ठिकाणी कर्तव्य बजावलेले आहे. तसेच पोलीस अधीक्षक या पदावर सांगली, कोल्हापूर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, महामार्ग सुरक्षा ठाणे इ. ठिकाणी कर्तव्य बजावलेले आहे. दरम्यानचे काळात सन २०१३ मध्ये त्यांना भारतीय पोलीस सेवेत प्रतिष्ठापित करण्यात येवून त्यांनी नॅशनल पोलीस अकॅडमी, हैद्राबाद येथे त्यांचे प्रतिष्ठापणा प्रशिक्षण पुर्ण केलेले आहे. ते पोलीस अधीक्षक / दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे येथे नेमणुकीस असतांना त्यांची पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे बदली झाल्याने आज रोजी त्यांनी नागपूर येथील कार्यभार स्विकारलेला आहे.

"नवनियुक्त पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर डॉ. दिगंबर प्रधान यांनी नागपूर परिक्षेत्रातील सर्व जनतेला आवाहन केलेले आहे की कोणत्याही शासकीय कार्यालयात तुमचे काम प्रलंबित असल्यास आणि त्या कार्यालयातील कोणताही अधिकारी / कर्मचारी तुमचे काम करून देण्याकरिता लाचेची मागणी करीत असल्यास आपण कुठल्याही प्रकारे अशा कृत्याला बळी न पडता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे संपर्क करून आपली तक्रार नोंदवावी. आपले तक्रारीवर नियमानुसार आणि कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल."

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे खालील क्रमांकावर संपर्क साधावा

१. पोलीस अधीक्षक कार्यालय दुरध्वणी क. ०७१२-२५६१५२०,

२. टोल फ्री क्रमांक : १०६४

३. डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाप्रवि नागपूर मो. क. ९९२३१८५५६६

४. श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि नागपूर मो. क. ९९२३०६१९९९ 

५. श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि नागपूर मो.क. ७७९८०१७७०८

६. श्री. सचिन मत्ते, वाचक पोलीस निरीक्षक, लाप्रवि नागपूर मो. क. ९५१८३३९७३८

शुक्रवार, ऑगस्ट ०९, २०२४

Dispute Free Village: मरवाळी येथील तंटामुक्त गाव समितीचे पुनर्गठन करण्याची निवेदनाद्वारे मागणी,तुमच्याही ग्रामपंचायतीकडे 15 ऑगस्ट पर्यंत करा मागणी, गावातील तंटे गावातच मिटवा

 

Dispute Free Village

संपादक-संजय चिखले

मरवाळी,दि.8 ऑगस्ट 2024: गावात तंटे निर्माण होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून सामोपचाराने मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी आणि सामाजिक शांती प्रस्थापित होऊन राज्याची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल व्हावी या दृष्टीने तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट 2007 पासून 'महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम' राज्यात सुरु करण्यात आली. 

नांदेड जिल्ह्यातील नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे मरवाळी/कोपरा ग्रामपंचायत येथील काही सुज्ञ,जागरूक व प्रतिष्ठित ग्रामस्थांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व सदस्यांकडून शासन निर्णयानुसार समितीसाठी घालून दिलेल्या आचारसंहितेचे  कुठलेच पालन करण्यात येत नसल्याची बाब ध्यानात आली.

मागिल दोन वर्षात समितीने एकही बैठक घेतली नाही तसेच गावात निर्माण होणाऱ्या तंट्यांबाबत समितीला कसलेच देणं घेणं नसणे,समितीला गावात निर्माण झालेल्या तंट्यात रस नसणे,तंटे/वाद याची माहिती तंटामुक्त गाव समितीकडे देण्यासाठी समितीकडून ग्रामस्थांना आवाहन न करणे,उद्भवलेल्या तंट्यांसंदर्भात बैठक घेतल्याचे रेकॉर्ड नसणे. 

विशेष बाब म्हणजे असे असताना देखील सर्व नियम धाब्यावर बसवून मागिल दोन वर्षांपासून समितीचे पुनर्गठनच करण्यात आले नाही व एकही तंटा/वाद न मिटवता समिती अध्यक्ष व सदस्य स्वतःच्या बतावणी करीता पदाचा गैरवापर करत,पदाचा मोठेपणा मिरवत फिरत असल्याची धक्कादायक व संतापजनक बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने तसेच शासन आदेशानुसार समितीत बदल करण्याची १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यानची हीच योग्य वेळ असल्याने काही जागरूक नागरिकांनी ग्रामसेवक एन.एच कुलकर्णी यांचेकडे एका निवेदनाद्वारे ग्रामसभा बोलावण्याची मागणी केली आहे.


समितीचा कार्यकाळ व समिती सदस्य, अध्यक्ष बदलणे

तंटामुक्त गाव समिती कायमस्वरुपी कार्यरत राहील.तथापी जे सदस्य समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नसतील, समितीच्या कामात वेळ देत नसतील समितीच्या कामात रस घेत नसतील, समितीच्या कामकाजात अडथळा निर्माण करत असतील अशा सदस्यांना बदलून नवीन सदस्य घेणे बाबत प्रत्येक वर्षाच्या १५ ऑगस्ट नंतरच्या पहिल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घेता येईल.तसेच समितीचा अध्यक्ष बदलण्याची ग्रामसभेला आवश्यकता वाटत असेल तर अध्यक्ष बदलून नवीन अध्यक्षाची निवड त्याच ग्रामसभेमध्ये करण्यात यावी. मात्र कोणत्याही परिस्थितीत तंटामुक्त गाव समितीचे १/३ पेक्षा अधिक सदस्य एकाचवेळी बदलता येणार नाहीत.

तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व सदस्य 

कसे असावेत

ग्रामसभेने अध्यक्ष निवडताना सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या,प्रतिष्ठित, प्रामाणिक,समजुतदार, समाजात ज्यांचा प्रभाव आहे व सदस्य निवडताना निस्वार्थी निवडले पाहिजेत किंवा घेतले पाहिजेत.

कसे नसावेत

समितीमध्ये गुंड प्रवृत्तीच्या, कडव्या जातीय विचारसरणीच्या, अवैध धंदे असणाऱ्या व अवैध धंद्यांचा पुरस्कार करणाऱ्या तसेच असामाजिक तत्वांचा अवलंब करणा-या व्यक्तींना स्थान असणार नाही.समितीचे सदस्य निर्व्यसनी व उत्तम चारित्र्याचे असावेत.

समितीच्या बैठकीस उपस्थित राहणे गावपातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांना अनिवार्य असेल

समितीच्या सदस्यांसाठी आचारसंहिता

समितीच्या सदस्यांनी निर्पेक्ष व निष्पक्षपातीपणे काम करणे आवश्यक आहे.समितीच्या बैठकांना उपस्थित राहणे,समितीच्या कामासाठी वेळ देणे,तंटे मिटविण्याच्या कामात रस घेणे आवश्यक आहे.तंटे मिटविताना त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे.तंटे मिटवित असताना नकारात्मक व पुर्वगृहदुषीत दृष्टीकोन सदस्यांनी ठेवू नये.

समितीची कार्य व कक्षा

गावामध्ये शक्यतोवर तंटे निर्माण होऊ नयेत,जातीय धार्मिक सलोखा, सामाजिक व राजकीय सामंजस्य आणि अनिष्ट चालीरीती व प्रथांचे निर्मुलन करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना :

सार्वजनिक सण/उत्सव शांततेत साजरे करणे.

जातीय व धार्मिक सलोखा निर्माण करणे.

सार्वजनिक व खाजगी मालमत्तांचे संरक्षण करणे.

ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यरत करणे.

अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्यांचे निर्मुलन करणे.

सामाजिक सुरक्षिततेसाठी कार्यक्रम राबविणे.


गाव हा विश्वाचा नकाशा। गावावरूनी देशाची परीक्षा।।

गावची भंगता अवदशा। येईल देशा।।

 ---ग्रामगीता वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


संबंधित बातम्या

Dispute Free Village: ग्रामस्तरीय पर्यायी वाद निवारण (एडीआर) व्यवस्था अर्थात तंटामुक्त गावचा बाजार संपला का❓

मंगळवार, ऑगस्ट ०६, २०२४

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (SC-ST) प्रवर्गातील आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे धर्माबादेत फटाके फोडून जल्लोषात स्वागत; मोदी हैं तो मुमकिन हैं चे नारे देत सर्वोच्च न्यायालय, केंद्र व राज्या सरकारचे मानले आभार

 

संपादक-संजय चिखले

नांदेड,दि,०६/०८/२०२५:  दि०१ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला ते म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, (SC,ST) प्रवर्गातील समाजाला आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येणार आहे ते अधिकार राज्यांना असणार आहेत यामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये पूर्वी उप आरक्षण म्हणजेच अ, ब, क, ड, असे लागू होते पण 2004 साली त्या निर्णयाला स्थगती दिली होती. पण दिनांक एक ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगती उठून एससी एसटी प्रवर्गात उप वर्गीकरण करू शकता असा निर्णय दिलेला आहे.

 या निर्णयामध्ये केंद्र सरकारची महत्वपूर्ण भूमिका आहे त्या निर्णयाचा जल्लोषत स्वागत धर्माबाद तालुक्यामध्ये मातंग समाजाच्या वतीने पानसरे चौक, डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक, व लहुजी साळवे चौक, या ठिकाणी फटाके फोडून करण्यात आला करण्यात आला.


यामध्ये यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रवींद्र पोतगंटीवार, माजी नगरसेवक संजय पवार, सज्जनगड गाडोड, लो.आं. प्रदेश उपाध्यक्ष व्ही.जी डोईवाड, मराठवाडा सरचिटणीस बी एम गोणारकर(लो. आं.) इंदिरानगर येथील जयंती मंडळाचे अध्यक्ष बीएम सूर्यवंशी उपाध्यक्ष दिलीप बोईवार, सत्यनारायण पवळे, माधव कमलाकर, विठ्ठल शिंदे अविनाश पिंगळे, डॉ अण्णाभाऊ साठे ट्रस्टचे उपाध्यक्ष जी.पी. जटाळकर, नागनाथ गोणारकर बाबु गोणारकर, रामभाऊ पवळे,सुदर्शन गुर्जलवड, बजणवाड, साईनाथ गोणारकर, श्रीकांत गोणारकर, विजय गोणारकर,अनिल, जीआर गोणारकर, विशाल इबितवार, लक्ष्मण निदानकर, गोणारकर, व असंख्य तरुण मुली उपस्थित होते यावेळी व्ही जी डोईवाड ,बी एम गोणारकर,पी डी गोणारकर, यांनी महाराष्ट्र सरकारने सुद्धा तात्काळ वर्गीकरणाची अंमलबजावणी करावी असे म्हणाले.


यावेळी मंदा कृष्णा मादिगा चा विजय असो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, मोदी हे तो मुमकिन है अशा जल्लोषाने घोषणा दिल्या तसेच सर्वोच्च न्यायालयाचे व केंद्र सरकारचे राज्य सरकारचे खूप खूप आभार मानले.

रविवार, ऑगस्ट ०४, २०२४

Dispute Free Village: ग्रामस्तरीय पर्यायी वाद निवारण (एडीआर) व्यवस्था अर्थात तंटामुक्त गावचा बाजार संपला का❓

 


तंटामुक्त गाव

महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याने १९ जुलै २००७ रोजी एमआयएस:१००७/ सीआर-२३८/पीओएल-८ या जीआरद्वारे पर्यायी वाद निवारणासाठी हा नवोन्मेषकारी उपक्रम सुरू केला. महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तसेच तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील हे या उपक्रमामागील जिवंत प्रेरणा होते. हा उपक्रम कायमस्वरूपी असून, २००७ सालच्या स्वातंत्र्यदिनी त्याचा शुभारंभ करण्यात आला. 

विविध न्यायालयांमधील प्रलंबित वाद-खटल्यांचे प्रचंड प्रमाण आणि त्यामुळे अपरिहार्यपणे निकाल देण्यात होणारा विलंब याचा विचार करता, पर्यायी वाद निवारण अर्थात एडीआर ही काळाची गरज आहे. लोकन्यायालये व फास्ट ट्रॅक न्यायालयेही याच कारणासाठी स्थापन करण्यात आली आहेत. 

खेड्याच्या स्तरावर अत्यंत किरकोळ मुद्दयांवरून वाद निर्माण होतात. सुरुवातीला यात मोजके लोक गुंतलेले असले, तरीही निराकरण न झाल्यास छोटे मुद्दे मोठे होतात व अधिकाधिक लोक यात गुंतू लागतात. या निराकरण न झालेल्या वादांतून पुढे सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय फौजदारी व दिवाणी न्यायव्यवस्थांवर अतिरिक्त ताण येतो तो वेगळाच. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही ग्रामस्तरीय पर्यायी वाद निवारण (एडीआर) व्यवस्था आहे. ही व्यवस्था लोकसहभागाच्या माध्यमातून वाद निर्माण होण्यास प्रतिबंध करते आणि वाद सोडवण्याचे कामही करते. महाराष्ट्रातील समृद्ध अध्यात्मिक तसेच सामाजिक सुधारणावादामुळे हे शक्य झाले आहे. 

उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:

१. राज्यातील प्रत्येक खेड्यामध्ये तंटामुक्ती समित्या स्थापन करणे

२. वर्तमानातील वाद ओळखणे, त्यांचे फौजदारी, दिवाणी, महसुली अशा विभागांमध्ये वर्गीकरण करणे  

३. समितीच्या रजिस्टरमध्ये त्यांची नोंद करणे

४. तंटे होऊच नयेत या दृष्टीने प्रतिबंधात्मक योजना व उपाय करणे

५. लोकशाहीवादी, न्याय्य व सहभागात्मक पद्धतीने पूर्वीच्या व नवीन वादांचे निराकरण करणे

हे अभियान दीर्घकाळ सुरू राहील आणि सामाजिक शांतता, व्यवस्था व न्याय यांच्या नव्या युगाची निश्चिती करेल. महाराष्ट्राला शांततेकडून समृद्धीच्या मार्गावर ही योजना घेऊन जाईल.

शासन व प्रशासनाची उदासीनता

एवढी सगळी योजनेची खास वैशिष्ट्य असताना आज घडीला शासन व प्रशासन या समितीची पुनर्रचना करण्यासाठी उदासीन का आहे. जिल्हा, तालुका, पोलीस ठाणे व गावस्तरावर या योजनेच्या मुल्यमापन व कामकाजाची नागरिकांमधून साधी चर्चा देखील होताना दिसत नाही, सरपंच, ग्रामसेवक समितीचे पुनर्गठन करण्याकडे कानाडोळा करत आहेत,वरीष्ठांकडून देखील याकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे.

१५ ऑगस्ट जवळ आलेला असताना गतवर्षी समितीवर निवड झालेल्यांनी वर्षभरात किती तंटे मिटवले तंटामुक्त गाव समितीकडे किती तंटे आले याचा मागमूसही घ्यायला नागरिक तयार नसतील तर हा उपक्रम कसा प्रभावी ठरेल ? आणि गावातील तंटे गावातच कसे मिटतील? तसेच पोलीसावरील ताण कमी करावयाचा असेल तर समित्यांची पुनर्रचना होत राहणे आवश्यक आहे.

नांदेड जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये अध्यक्ष निवडी झाल्या ते फक्त अध्यक्ष म्हणून मिरवत आहेत,तंटे मिटवण्याच्या नावाने बोंबाबोंब आहे.समितीचे पुनर्गठन केले गेले नाही तर तोच अध्यक्ष कायम राहतो , नियमानुसार ती समिती बरखास्त होत नाही ही बाब गावकऱ्यांना माहिती नसते एकिकडे हे अध्यक्ष स्वतः च्या  मोठेपणासाठी पदाच्या नावाचा समाजात सर्रासपणे वापर करताना दिसून येतात  आणि दुसरीकडे गावातील तंटे गावातच मिटवले जात नाही अशा परिस्थितीत समितीची पुनर्रचना झाली तर लोकांना नवीन समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची माहिती होते.

शासनाने मोहीमेवर खर्च केलेले लाखों रुपये पाण्यात जाऊन आता या उदासीनतेमुळे ग्रामस्तरीय पर्यायी वाद निवारण (एडीआर) व्यवस्था अर्थात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेचा बाजार संपला का असं विचारण्याची वेळ आली आहे.

तंटामुक्त गाव

Dispute Free Village

एस बी चिखले मरवाळीकर

सोमवार, जुलै २९, २०२४

बेजबाबदार असलेल्या व्यक्तींची न्यायाधिश सारख्या अतिशय महत्त्वाच्या पदावर नेमणूक होतेच कशी???

 

संपादक संजय चिखले

मुंबई,दि २९/०७/२०२४ :-"कनिष्ठ न्यायालयांचे अनेक न्यायाधीश महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये जामीन न देता सुरक्षित भूमिका घेण्याला प्राधान्य देतात. मात्र अशा खटल्यांमध्ये जामीन अर्जावर विचार करताना सामान्य व्यवहारी ज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे." असे आवाहन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी बंगळूर येथे "तुलनात्मक समानता आणि भेदभाव" या विषयावर बर्कले केंद्रीत ११ व्या वार्षिक परिषदेत न्या. चंद्रचूड यांनी मुख्य भाषण करताना आपली मते मांडली. ते म्हणाले की, "जेथे कनिष्ठ न्यायालयांमध्ये जामीन मिळायला हवा, तेथे तो नाकारला जातो. त्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात जावे लागते. ज्यांना उच्च न्यायालयात जामीन मिळायला हवा होता, तेथे न मिळाल्याने त्यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागते. " या विलंबामुळे त्यांना मनमानी पणे अटक होते आणि समस्या वाढतात, याकडे न्या. चंद्रचूड यांनी लक्ष वेधले असलेल्याची दैनिक लोकसत्ता मध्ये दिनांक २९.०७.२०२४ रोजीची बातमी नुकतीच माझ्या वाचण्यात आली."

 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश चंद्रचूड यांना सामान्य ज्ञानाबाबत खालच्या कोर्टातील न्यायाधीशांना "अतिशय शुल्लक बाब सांगण्याची वेळ" आल्याचे सदरचे वृत्त वाचून मला आश्चर्याचा धक्काच बसला.

अतिशय शुल्लक बाब सांगण्याची नामुष्कीची वेळ सरन्यायाधीश चंद्रचुडांवर यावी, यासारखी लाजीरवाणी दुसरी कुठलीही गोष्ट असूच शकत नाही, हे अतिशय संतापजनक व तीव्र खेदजनक बाब आहे.

ज्यांना केवळ सामान्य ज्ञान नाही, अशा बेजबाबदार असलेल्या व्यक्तीची अतिशय महत्त्वाच्या न्यायाधिश पदी नियुक्ती होतेच कशी?? हा सर्व सामान्य माणसांच्या आयुष्याशी खेळ नाही का??? तसेच न्यायाची प्रतारणा करण्या सारखे नाही काय?? यासारखे अनेक प्रश्न आता सर्व सामान्य माणसांना पडलेला आहे.

सर्व सामान्य माणसांना आता न्याय मिळणे अतिशय दुरापास्त व अतिशय खर्चिक झालेले आहे, हे अतिशय कटु सत्य आहे. तसेच या वरील बाबी वरुन सर्वत्र आलबेल चालू आहे, हे मात्र निश्चित अधोरेखित होते.


श्री. वसंत शामराव उटीकर,

एक सामान्य नागरिक

भायखळा, मुंबई.

मो.नं. ९३२४५६१५९१.


निकाल मात्र एकेका कोर्टात प्रत्येकी दहा वर्षानंतर मिळाला. म्हणजे कोर्टात गेलेल्या फिर्यादी चे आयुष्यच संपून जाईल. अशावेळी त्याचा स्वर्गातच न्याय निवड होतो, हे कोर्टाला का दिसत नाही??? वकिलांना देखील आशील वाढवायची हाऊस फार असते, परंतु तारीख पे तारीख घेण्याचे वृत्तीमुळे व न्यायाधीशांच्या तारीख पे तारीख देण्याच्या वृत्तीमुळे फिर्यादी अक्षरशः भरडून जात आहे ही 'अन्याय व्यवस्था' बदलावी हे का सूचत नाही??? 
न्यायात विलंब हा न्याय न दिल्यासारखाच आहे.
राजकीय लोकांचे अपील यावर सुनावण्या एक दोन दिवसात, पंधरा दिवसात लगेच होते. परंतु बाकीच्या सर्वसामान्य जनतेला मात्र वर्षानुवर्ष मिळणाऱ्या न्यायासाठी तिष्टत वाट पाहत बसावे लागते. किती दुर्दैव आहे या देशातील नागरिकांचे!!!! यासाठी कोणीही बोंबलत नाही, भाषण देत नाही, ओरडत नाही, सर्वांनाच याचा त्रास होतोय पण का बोलत नाहीत????
कांदे भाव वाढले, टोमॅटो भाव वाढले, भाज्या महागल्या, ट्रॅव्हलिंग महाग झाले, जिओ रिचार्ज महाग झाला, दळणवळण महाग झाली, कोथींबीरीचे भाव वाढले, साखरेला भाव मिळाला नाही, दुधाला भाव मिळाला नाही यावर मात्र सगळेजण बोलताना आंदोलन करताना दिसत आहेत. 
 न्यायालयाची 'हीच काळी बाजू' लोकांना का दिसत नाही???

शरद नाईक

चेस प्लेअर,जिम सचिवालय 


केस मध्ये बहुतेक सर्वच वेळा दोन्ही बाजूंच्या वकिलांचे एकमेकांशी ""साटेलोटे"" असते. ते जाणुन बुजून तारखा वाढवून घेतात. कारण, त्यांना सुरूवातीला दिलेल्या रग्गड पैशांव्यतिरीक्त प्रत्येक सुनावणीच्या तारखेसाठी पैसे मिळत असतात. तसेच, बहुतेक वकिलांचे मा. न्यायाधीश महोदयांशी चांगले संबंध असतातच. (सुज्ञास अधिक सांगणे न लगे) त्यामुळेच, अशिलांनी जास्तीत जास्त तारखांना स्वतः समक्ष उपस्थित राहून शक्यतो लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी प्रयत्न करावा. तो त्यांचा नैतिक, नैसर्गिक तसेच कायदेशीर अधिकारच असतो. सुनावणी लवकरात लवकर आटोपण्यासाठी अशिल मा. न्यायाधीश महोदयांना विनम्रतापूर्वक सविनय विनंती देखील करू शकतात. त्याला दोन्ही वकील किंवा मा. न्यायाधीश सो. सुद्धा हरकत घेऊ शकत नाहीत. आठ-दहा वर्षे रखडलेला खटला (खरं तर मुद्दामहून, जाणुन बुजून, जाणिवपूर्वक तसेच हेतुपुरस्सररीत्या रखडवलेला खटला) २-३ वर्षांच्या आत निर्णयान्वित होऊ शकतो. हा माझा स्वानुभव आहे.

मी स्वतः वकील नाही. त्यामुळे, मला कोणत्याही फौजदारी न्यायालयात कायदेशीररीत्या वकिली करता येत नाही. परंतु, मी व माझी पत्नी सौ. संपदा संजय रांगणेकर आमच्या सुमारे १०-१२ वर्षांच्या न्यायालयीन अनुभवातून दिवाणी तसेच महसूल न्यायालयात उपस्थित राहून खटला निश्चितपणे चांगल्या प्रकारे लढवू शकतो. सल्ला देऊन किंवा प्रत्यक्ष उपस्थित राहून (पैसे घेऊन किंवा न घेता देखील) एखादा जुना किंवा नवीन खटला लढवून लवकरात लवकर निकाली देखील काढू शकतो

संजय रांगणेकर

सेवानिवृत्त एसीपी

रविवार, जुलै २८, २०२४

नायगावच्या SBI,BOI शाखा व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांच्या खात्याचे अनधिकृत होल्ड लवकरात लवकर काढावे अन्यथा...नायगाव युवक काँग्रेसचा इशारा

 

नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याचे लवकरात लवकर होल्ड काढावे-नायगाव युवक काँग्रेसची मागणी

संपादक संजय चिखले

नायगाव बा,दि.२७/०७/२०२४: नायगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात स्टेट बँक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया या बँकेत खाते असून,या खात्याला शाखा व्यवस्थापकांनी कुठलीही पुर्व सुचना न देता, मोबाईल वर बॅंकेकडून साधा टेक्स्ट मेसेज पाठवण्याची तसदी न घेता होल्ड केल्यामुळे खातेधारक शेतकऱ्यांना विविध कामाकरीता आर्थीक व्यवहार करण्यासाठी अडचणी येत आहेत तसेच शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई जमा रक्कम, पी.एम.किसान योजनेचा खात्यात जमा झालेला हप्ता, दुष्काळी अनुदानाची रक्कम उचलता येत नसल्याने तालुक्यातील पिक कर्ज घेतलेल्या जवळपास सर्वच शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान होत आहे.


सदरील शेकऱ्यांचे शासनाकडून बँक खात्यास होल्ड करण्यात यावे असे कोणते शासन निर्णय असल्यास त्याचा अहवाल शेतकऱ्यांना लेखी स्वरुपात द्यावा.


तसेच शेतकऱ्याचे लकवरात लवकर बँक खात्याचे होल्ड काढण्यात यावे.जेणे करून शेतकऱ्यांना बँकेत व्यवहार करण्यास गैरसोय होणार नाही. अन्यथा बैंक खात्यांचे होल्ड नकाढल्यास गांधी गिरी पध्दतीने यूवक कॉग्रेस तालुका नायगांवच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन सदरील बँकेस कुलूप लावून बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा विनंती वजा इशारा नायगाव युवक काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.



बुधवार, एप्रिल २४, २०२४

प्रचार संपला; 26 एप्रिलला सकाळी 7 पासून मतदान; 48 तासांच्या शांतता कालावधीला सुरुवात प्रशासनाची तयारी पूर्ण ! 25 एप्रिलला सकाळीच पोलिंग पार्ट्या रवाना होणार; जिल्हयामध्ये कलम 144 लागू; सर्वत्र चोख बंदोबस्त



WEDNESDAY, APRIL 24, 2024

वृत्‍त क्र. 381 

प्रचार संपला; 26 एप्रिलला सकाळी 7 पासून मतदान 

48 तासांच्या शांतता कालावधीला सुरुवात 

प्रशासनाची तयारी पूर्ण ; 25 एप्रिलला सकाळीच पोलिंग पार्ट्या रवाना होणार 

जिल्हयामध्ये कलम 144 लागूसर्वत्र चोख बंदोबस्त 

शुक्रवार फक्त मतदानासाठी राखीव ठेवा प्रशासनाचे आवाहन 

नांदेड दि. 24 : 16- नांदेड लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासाला बुधवारी सायंकाळी 6 वाजतापासून सुरुवात झाली आहे. या काळात कोणत्याही राजकीय पक्षाला प्रचार करता येणार नाही. जिल्हा प्रशासनाने आयोगाच्या सूचनेनुसार निवडणुकीची पूर्ण तयारी केली असून उद्या सकाळी सात वाजता पासून पोलिंग पार्ट्या रवाना होणार आहे. सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघातील 2062 मतदान केंद्रावर 18 लक्ष 51 हजार मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. 

नांदेड लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणामध्ये आहेत. २६ एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होणार आहे. २३ उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी आज खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. तर मतदान कर्मचारी अधिकारी यांचे शेवटचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण ठिकठिकाणीच्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. जिल्हा प्रशासनाने आज सर्व यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी निवडणूक प्रक्रिया तसेच कायदा व सुव्यवस्था या संदर्भात विभाग प्रमुखांची व भोकरनांदेड उत्तरनांदेड दाक्षिणनायगावदेगलूरमुखेडयांच्यासह हिंगोली मतदारसंघात येणाऱ्या किनवट व हादगाव येथील सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. 

एकूण १८ लक्ष ५१ हजार मतदार

नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये भोकर (२९४४०९), नांदेड उत्तर (३४६८८६)नांदेड दक्षिण (३०८७९०)नायगाव (३०१२९९)देगलूर (३०३९४३), मुखेड (२९६५१६) असे एकूण १८ लक्ष ५१ हजार ८४३ मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये ९ लक्ष ५५ हजार ८४ पुरुष तर ८ लक्ष ९६ हजार ६१७  महिला तर १४२ तृतीय पंथीचा समावेश आहे. 

२९ संवेदनशील केंद्र

जिल्ह्यामध्ये 16 नांदेड मतदार संघात 29 संवेदनशील मतदान केंद्र आहेत.५ शाडो मतदान केंद्र आहे. 16 ठिकाणी महिला व्यवस्थापनातील मतदान केंद्र आहेत. दिव्यांगांसाठी विशेष अशा सहा मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. १०० टक्के तरुण अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती असणारे 16 केंद्र आहेत. इको फ्रेंडली मतदान केंद्राची संख्या ०६ आहेनांदेड दक्षिणमध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेडया ठिकाणी महिला मतदार केंद्र उभारण्यात आले आहेत. गुजराती उच्च माध्यमिक शाळा वजीराबाद येथे दिव्यांग मतदान केंद्रउत्तर नांदेड मध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहे तर शंकरराव चव्हाण इंग्लिश स्कूल या ठिकाणी महिला मतदान केंद्र केंद्रीय विद्यालय दक्षिण मध्य रेल्वे या ठिकाणी युवा मतदान केंद्र तर ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.

 १० हजार ६३७ कर्मचारी कार्यरत

नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी १० हजार ६३७ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये केंद्राध्यक्ष २७६६इतर मतदान अधिकारी ७९२१,क्षेत्रीय अधिकारी २४२याशिवाय मायक्रो ऑब्जर्वर ३९होम वोटींग करीता ५०अशा अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहे. आज कर्मचाऱ्यांचे शेवटचे प्रशिक्षण पार पडले असून उद्या कर्मचाऱ्यांना आपापले केंद्र समजणार आहे. उद्या सकाळी हे सर्व कर्मचारी रवाना होणार आहेत. जिल्ह्यात पुरेशा मतदान यंत्राची उपलब्धता आहे. 

144 कलम लागू

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या 48 तासा अगोदरच्या कालावधीमध्ये सार्वजनिक सभा आयोजित करता येणार नाही. ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. बेकायदेशीरिता जमा होता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमा होता येणार नाही. किंवा एकत्रित फिरता येणार नाहीअसे स्पष्ट केले आहे.

बुथ व्यवस्थापन महत्वाचे

यासोबतच राजकीय पक्षांनी निवडणूक बूथ कुठे उभारावेबुथवर कशी व्यवस्था असावीत्या ठिकाणचे बॅनर बैठक व्यवस्था व गर्दीचे व्यवस्थापन या संदर्भातील निर्बंध जारी करण्यात आले आहे. मतदान केंद्राजवळ शस्त्र बाळगणे किंवा शस्त्र प्रदर्शन करणे प्रतिबंधित आहे.

कडेकोट बंदोबस्त   

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी देखील 48 तास आधी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्धारित केलेल्या कर्तव्यात कोणताही कसूर करता कामा नये असे स्पष्ट ताकीद सर्व अधिकाऱ्यांना दिली आहे. रात्रीची गस्त वाढवण्यात आली असून फिरत्या पथकांवर अधिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरातील हॉटेललॉजनिवारा ठिकाणांची असून तपासणी करण्यात येत असून या काळामध्ये रोकड मौल्यवान वस्तूभेटवस्तू  ,मद्य अमली पदार्थ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे . केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकांसह ठीक ठिकाणी पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे निवडणूक केंद्रावरही कडे कोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवर निर्बंध

प्रचाराचा कालावधी संपल्यामुळे 48 तासापूर्वी मतदार संघाबाहेरील राजकीय नेते कार्यकर्ते यांनी मतदारसंघ सोडावा,असे आवाहन करण्यात आले आहे. प्रचार कालावधी संपल्यामुळे राज्यकीय कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते मिरवणुकीतील कार्यकर्ते मोहिमेचे कार्यकर्ते यांची उपस्थिती प्रतिबंधित करण्यात आली आहे.

 मोबाईल वापरावर बंदी

मतदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचनेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक आणि अधिकृत निवडणूक पोलिस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघातमतदान केंद्रात शेजारील परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. मतदारनिवडणूक कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावीअसे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 सार्वजनिक सुटी बाजार बंद

26 एप्रिल रोजी मतदान होत असून या दिवशी मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ज्या अत्यावश्यक व खाजगी आस्थापना दुकानेरेस्टॉरंट सुरु असतील त्या ठिकाणाच्या सर्व व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना दोन तासाची सुट्टी द्यावीअसे आदेश कामगार आयुक्त मार्फत जारी करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार 26 एप्रिल शुक्रवार रोजी बंद ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आठवडी बाजार होते त्या ठिकाणीचे बाजार दुसरे दिवशी घेण्यात येणार आहे. 

मतदान केंद्रावर प्रतीक्षालय

नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान करावे असे आवाहन करताना जिल्हा प्रशासनाने यावेळी लाईनमध्ये नागरिकांना उभे राहावे लागू नयेयासाठी प्रत्येक केंद्रावर प्रतीक्षालय उभारले आहे. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती सावलीची व्यवस्थारांगेविरहित मतदान व्हीलचेअरची व्यवस्थाहिरकणी कक्ष व पाळणा घरआवश्यकता भासल्यास ॲम्बुलन्सची व्यवस्था केली जाणार आहे.

 48 तास मद्य विक्री बंद

 कायदा सुव्यवस्थेसाठी बुधवारच्या सायंकाळी सहा वाजता पासून मतदान पूर्ण होईपर्यंत 48 तास मद्य विक्री बंद करण्यात आली आहे. 

पोलचीट (मतचिठ्ठी) मिळवा !

नांदेड जिल्ह्यात Poll Chit  मिळाली नसल्यास कृपया खालील क्रमाकावर +91 75885 69875 या नंबरवर Pchit असा व्हाटस ॲप मेसेज करावाअधिकृत माहिती मिळवावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

गुरुवार, एप्रिल १८, २०२४

भाजप-महायुती घटक पक्ष राष्ट्रीय स्वराज्य सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल यांनी पत्रकार परिषद घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील संभ्रम केला दूर



संजय पाटील चिखले

पुणे,दि.१८:  राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल यांनी राम नवमी निमित्त देवाची आळंदी येथे माऊळी चे दर्शन घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेऊन पत्रकार परिषद घेतली व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर केला.पुणे येथे पत्रकार परिषद घेण्या आधी श्रीहरि बागल यांनी पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भा चा संपूर्ण दौरा करून महाविजय २०२४ साकार करण्यासाठी सर्वांना एकत्र करुन नियोजन बद्ध काम केले आहे.

             यावेळी बागल साहेब म्हणाले कि राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीचा धर्म पाळणे आपले कर्तव्य आहे.व आपण महायुती चे उमेदवार भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज असल्याने काही नाराज लोकांनी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्ष लोकसभा २०२४ निवडणूक स्वबळावर लढणार असा संभ्रम निर्माण केला होता तो संभ्रम दुर करून पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दीले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पक्षाकडे सक्षम उमेदवार असतानाही पक्षाने स्वतः निवडणूक न लढवता महायुतीचे काम करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब परत तिसऱ्या वेळेस हि पंतप्रधान होण्यासाठी मा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा श्री आमदार प्रसादजी लाड साहेब समन्वयक ( पक्ष व सरकार ) यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती चा महाविजय २०२४ साकार करण्यासाठी काम करणार आहे असे आश्वासन या वेळेस सर्वांना दिले आहे . - ॲड. श्रीहरी बागल   

 राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना (मराठा राजकिय पक्ष) ELACATION COMMISSION OF INDIA REG NO -b 56/284/2018-19 /PPS-i (New DELHI). भाजपा - महायुती चा घटक पक्ष

Popular posts लोकप्रिय पोस्ट